Submitted by मोहिनि३३३ on 21 July, 2014 - 02:47
घरातील मुलीचा विवाह लवकर होण्यासाठी गुरुचरीत्रातला कोणता अध्याय वाचावा ? कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावे . मी नेटवर सगळीकडे शोधलं पण सापडलं नाही. ५३ व्या अध्यायात संपूर्ण गुरुचरित्राचे सार असल्यामुळे हा अध्याय वाचला तर चालेल का ?
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ज्या आयड्यांचा उल्लेख इतका
ज्या आयड्यांचा उल्लेख इतका त्वेषाने केला आहे ते पाहून कुणातरी दु:खी आत्म्याचा वावर इथे दिसतोय. असा आत्मा ज्याचे जिवंतपणी षडरिपू प्रज्वलित होऊन इतरांस जाळत असत. आज नाहीतरी पहाटे १२.३० ते ३.३० (भारतीय वेळेप्रमाणे ) कॉस्मिक रेज पृथ्वीच्या जवळून जाणार असल्याने मेल्यानंतरही विकार उफाळून वर येणारच...
नाहीतर स्वतःच स्वतःला संबोधायची लाज वाटली नसती. काय गोड्बोले ?
ब्रह्मानंदा, या मोहिनीचे
ब्रह्मानंदा,
या मोहिनीचे विष्णूरूप गोडबोले नसावेत असा अंदाज आहे.
मूळ रूपाची थोडी आयडिया आहे, पण नॉट पीजी आय थिंक.
ब्रह्मांड्या काय लिवलेस?
ब्रह्मांड्या काय लिवलेस? काही कलले नाही
ब्रम्हांड्या नंतर सविस्तर
ब्रम्हांड्या नंतर सविस्तर लिवतो
कुणी का असेनात . असतील
कुणी का असेनात . असतील निकाळजेंचे हुजरे..
आपल्याला तर अजिबात हिकीर नाही
ज्यांना टिंगल टवाळी करायची
ज्यांना टिंगल टवाळी करायची आहे त्यांनी कृपया प्रतिसाद देण्याची तसदी घेवू नये .
लोक इतके खालच्या थराला जातात हे बघून वाईट वाटत . जावूदे <<<
तुमच्या लेखाच्या शीर्षकात तीन गृहीते आहेत.
१. मुलीचा विवाह जमण्यासाठी श्री गुरू चरित्रातील विशिष्ट अध्यायाचे वाचन सहाय्यभूत ठरते
२. तो अध्याय कोणता हे येथील सदस्यांपैकी काहींना माहीत असेल.
३. ज्यांना ते माहीत नसेल किंवा ज्यांना ह्या विषयाची टिंगल करायची असेल त्यांना हा धागा दिसणारच नाही.
माझ्या माहितीप्रमाणे गुरूचरित्राचे वाचन हे अत्यंत कर्मठ पद्धतीने केले जाणे अपेक्षित आहे.
१. स्त्रीच्या पदराचा वाराही अंगावरून न जाणे
२. स्त्रीच्या बांगड्यांचा किंवा पैंजणांचा आवाजही ऐकू न येणे
३. घरात एखाद्या स्त्रीचे ते पाच दिवस सुरू असल्यास वाचन तोवर थांबवणे
हे सगळे 'मॅनेज' करण्यासाठी भल्या पहाटे, म्हणजे तीन वगैरे वाजता उठून हे चरित्र वाचण्याचा 'प्रघात' आहे.
गुरूचरित्र वाचताना चूक झाल्यास वाचणार्याची वाताहात होते असे म्हंटले गेलेले आहे व त्याचा ज्वलंत व जिवंत (ह्याची देही ह्याची डोळा) अनुभव माझे वडील सांगतात.
माझ्या वडिलांच्या घरी एका गुरुजींना हे वाचायला नियुक्त केलेले होते कारण आजोबांना ते रोज पहाटे उठून वाचणे शक्य नव्हते. आजोबांचे एक मित्र, ज्यांच्या अंगात तेवीस विभुती यायच्या (मी त्या पूजा स्वतः पाहिलेल्या आहेत) त्यापैकी एक सर्वात महत्वाची विभुती म्हणजे माताजी (कोल्हापूर येथील शालिनी पॅलेस जेथे आहे तेथे आठशे वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेली एक धार्मिक वृद्धा) हिने आजोबांना त्या गुरुजींना बोलावून घे असे भर पूजेत सांगितले. बरं, आजोबांच्या त्या मित्राला आजोबांच्या घरात असे काही होत आहे ह्याची अजिबात कल्पनाही नव्हती. गुरुजी आल्यावर 'माताजींनी' त्या व्यक्तीला विचारले की पोथी वाचताना तुझी एकदोनदा डुलकी लागते ना? त्यावर ती व्यक्ती हो म्हणाली. त्यावर त्याला सांगण्यात आले की पोथी वाचणे बंद कर! त्याने त्यानुसार ते बंद केले. वाचणारा व ज्याच्यासाठी वाचत आहे त्या दोघांचीही वाताहात होऊ नये म्हणून हा सल्ला देण्यात आलेला होता.
पण काळ बदलला. कित्येक चमत्कार मी स्वतःही अनुभवलेले असूनही असे लिहावेसे वाटते की मुलीचा विवाह आणि त्या चरित्राचे पारायण ह्यांच्यात सशक्त संबंध आहे असे गृहीत धरून बाकीचे प्रयत्न कृपया थांबवू नका. इतर धर्मात काय होत असेल ह्याचाही विचार करा.
टोचा - हा माझा प्रतिसाद!
वैयक्तीक मत - हे एक प्रकारचे वैचारीक अपंगत्व असले तरी आजच्या व कालच्या अनेक पिढ्यांना अजिबात कल्पनाही नसलेले काहीतरी तर्कशास्त्र त्याच्यामागे असू शकेल असे मानण्याइतपत अनुभव मी ऐकलेले व काही फार कमी प्रमाणात घेतलेले आहेत. त्यामुळे, धाग्याची खिल्ली उडवावीशी वाटत नाही, खिल्ली उडवणार्यांवर किंवा गंभीर प्रतिसाद देणार्यांवर ताशेरे ओढावेसे वाटत नाहीत आणि ह्यात कोणत्याही प्रकारचे पुरोगामीत्व वा प्रतीगामीत्व वगैरे आहे असे म्हणावेसे वाटत नाही.
चु भु द्या घ्या
-'बेफिकीर'!
ब्रह्मांड्या, तो आयडी माझा
ब्रह्मांड्या, तो आयडी माझा नाही.
चार वर्शापुर्वे माझे फ्यामिले लाइफ बर्बाद झाले होते. तेंव्हा एका अतीशहाण्याने मला १४ वा अध्याय वाचण्याचा सल्ला दिला होता.
मी वाचायला सुरुवात केली.
आणि सातच दिवसांनी गुढीपाडव्याच्या दिवशी माझा अपघात होऊन माझा पाय मोडला.
त्यानंतर माझ्या घरच्यानी हितचिंतकानी रामरक्षा, स्तोत्रे, मोठे व संक्षिप्त गुरुचरित्र , गीता, शिवलीलामृत, मनाचे श्लोक. दासबोध , गोंदवलेकर प्रवचने इ इ चा ढीग रचला होता. पण एकंदरच त्यातल्या त्या संकल्पना , मानवी जीवन हे दु़ह्मय आहे, कर्माचे फळ , शिक्षा, भवसागर , देवाला शरण जा इ इ वाचुन माझं मन अक्षरशः विटलं .
मग ती पुस्तकं मी बाजुला केली.
मुकाट्याने दोन वर्शे सहन केली.
आज मी सुखात आहे.
लगो ना तुमचं नाव घेतलंय, ना
लगो
ना तुमचं नाव घेतलंय, ना विचार केला. ओढवून घेऊ नका.
जशी तुमची आज्ञा
जशी तुमची आज्ञा मालक.
असो.
नस्ती संशय पिशाच्चे इथे आणुही नका. दत्ताच्या ठिकाणी पिशाच्चे टिकतही नाहीत. ( म्हणे )
फेकाफेकीचा खेळ सुरु झाला.
फेकाफेकीचा खेळ सुरु झाला. ईथेच पहारा द्यावा काय??
@लगो तुम्हाला उद्देशून ती
@लगो
तुम्हाला उद्देशून ती पोस्ट नाही हे एकदा सांगितल्या नंतरही कळत नाही का ? वेड बिड लागलंय का ?
लगो, तुम्ही जरा तुमचे मेल चेक
लगो, तुम्ही जरा तुमचे मेल चेक करा.
एक गंमत आहे.
६० वर्षांच्या बाईला जिची
६० वर्षांच्या बाईला जिची मासिक पाळी थांबली आहे आणि जिचा पती ८० वर्षांचा आहे तिला १ मुलगी आणि १ मुलगा श्री गुरूंच्या कृपेने कसा प्राप्त झाला ह्याबद्दलचे ते २ भक्तीरसाने भरलेले अध्याय आहेत << अल्टीमेट!
६० वर्षांच्या बाईला जिची
६० वर्षांच्या बाईला जिची मासिक पाळी थांबली आहे आणि जिचा पती ८० वर्षांचा आहे तिला १ मुलगी आणि १ मुलगा श्री गुरूंच्या कृपेने कसा प्राप्त झाला ह्याबद्दलचे ते २ भक्तीरसाने भरलेले अध्याय आहेत
>>>
पुढे त्या मुलांचा सांभाळ कुणी केला?
पाळी बन्द झाल्यावर आणि
पाळी बन्द झाल्यावर आणि नवर्याची कपॅसिटी संपल्यावर देवाच्या कृपेने पोरं होणार असतील तर योग्य वयात लग्न व्हावे ही मोहिनीबाइंना का चिंता पडली आहे ?
पुढे त्या मुलांचा सांभाळ कुणी
पुढे त्या मुलांचा सांभाळ कुणी केला? >>>>
पुढे त्या मुलांचा सांभाळ कुणी
पुढे त्या मुलांचा सांभाळ कुणी केला? >>

पाळी बन्द झाल्यावर आणि नवर्याची कपॅसिटी संपल्यावर देवाच्या कृपेने पोरं होणार असतील तर योग्य वयात लग्न व्हावे ही मोहिनीबाइंना का चिंता पडली आहे ? >>
अरेरे असल्या विषयांची सुद्धा
अरेरे असल्या विषयांची सुद्धा खिल्ली उडवणार्या पोस्टी पाहून वाईट वाटले. विरोधी मतेच मांडायची तर ती संयमित भाषेतपण मांडता येतात. काय केले म्हणजे लोकांना कळणार आहे देव जाणे. ?
टण्या बाकी प्रश्न पास.
टण्या
बाकी प्रश्न पास.
पुढे त्या मुलांचा सांभाळ कुणी
पुढे त्या मुलांचा सांभाळ कुणी केला? >> सांभाळ करण्यासाठीही काही अध्याय असु शकतात की. यु नेव्हर नो
६० वर्षांच्या बाईला जिची
६० वर्षांच्या बाईला जिची मासिक पाळी थांबली आहे आणि जिचा पती ८० वर्षांचा आहे तिला १ मुलगी आणि १ मुलगा श्री गुरूंच्या कृपेने कसा प्राप्त झाला ह्याबद्दलचे ते २ भक्तीरसाने भरलेले अध्याय आहेत<<<<<<
"भक्तीरसाने भरलेले???"
त्या चौदाव्या अध्यायात एक
त्या चौदाव्या अध्यायात एक मुसलमान राजा असतो आणि तो नित्यनेमाने एका ब्राह्मणाचा प्राण घेत असतो वगैरे कथा आहे. च्यायला, साडेतीनशे वर्षे अखंड हिंदुस्तानावर राज्य करणारे मुसलमान इतके मूर्ख होते की काय!
मला आज गंमत वाटते, मी हे असलं त्या काळात कसं काय वाचत होतो!
ब्राह्मणाला अन्न मुसलमान घालणार आणि ब्राह्मण त्याच मुसलमानाविरुद्ध तक्रार करत हिंदु देवापुढं पालथा पडणार !
http://sandhyashram.wordpress.com/2007/12/01/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0...
उद्या संतान होण्यासाठी कुठले
उद्या संतान होण्यासाठी कुठले पुस्तक वाचावे >> अरे असा धागा खूप आधीच निघालेला आहे. जरा शोधलात तर लगेच सापडेल.
मोहिनी परत एकदा सान्गते/
मोहिनी परत एकदा सान्गते/ लिहीते की स्त्रीयानी श्री गुरुचरित्र वाचु नये.
रश्मी.. निस्सीम दत्तभक्त ज्यांना श्री दत्तात्रेयांच प्रत्यक्ष दर्शन झाल आहे असे लोक योग्य काळजी घेवून स्त्रियांनी खुशाल गुरुचरित्र वाचवा असं सांगितल आहे . मी स्वतः गुरुचरित्राची पारायणं केली आहेत . कुठलीही nigetive गोष्ट माझ्या बाबतीत घडली नाहीये . झालं ते positive च झालं आहे . स्त्रियांनी ह्यव करू नये आणि स्त्रियांनी त्यव करू नये ह्या खुळचट पुरुषी कल्पना आहेत . माझ्या स्वताच्या अनुभवावरून सांगते .
प्रोब्लेम असा आहे कि जिच्या लग्नाची खटपट चालू आहे ती हे करत नाही . तेव्हा आपणच तिच्यासाठी करावं म्हनला . actually गुरुचरित्राच्या शेवटी कोणत्या अध्यायाची काय फलश्रुती आहे ते दिलेलं नाहीये म्हणून मी गोंधळले होते .
आर्य ने सांगितलेला श्लोक बरोबर आहे. तिला त्याचा जप करायला सांगते . शिवाय श्रावणा मध्ये गुरुचरित्र पारायण सुरु झाल कि तिला जवळ बसवून ऐकायला सांगेन
नरसोबावाडीला गुरुचरित्र मिळते.. महिलानी ते वाचावे की नाही याबाबत त्यत सविस्तर दिलेले आहे. सल्ले विचारण्यापेक्षा.खुद्द ग्रंथातच जे दिले आहे त्याचे पालन करावे.
हे original गुरुचरित्र आहे का? original गुरुचरित्रात २ ओळी अश्या आहेत . "जेव्हा जेव्हा मन असेल पवित्र , सदाकाळ वाचावे गुरुचरित्र " . ती कोणी वाचव आणि कोणी नाही ह्याबद्दल कुठेही खुलासा नाहीये . मग स्त्रियांनी वाचू नये हे कोणी ठरवला ?
माझ्या मते विवाह लवकर होण्यापेक्षा सुयोग्य जोडिदार मिळावा यासाठी प्रयत्न करा..बाकी उगाच दहा पुजा करायला लावुन मुलिला पिडु नका!
बाकीचे सल्ले देवू नका हो. जेवढ विचारलाय तेवढाच सांगा . तुम्हाला कोणी सांगितला आम्ही मुलीला पिड्तोय ?
अध्यात्मिक वृत्तीचे लोक गावंढळ , जुन्या विचारांचे असतात हा फार मोठा गैरसमज आहे . खरं तर असेच लोक खरे modern असतात . कारण त्यांचे विचार हे जात पात , खोटी प्रतिष्ठा ,समाजाची फालतू बंधनं ह्यांच्या पलीकडचे असतात .
मुलगी ४ चौघीन्सारखी ह्या category मधली नाहीये . तर 'गोरी आणि सुंदर ' ह्या category मधली आहे . तुला कोणी आवडतो का? तू तुझा जोडीदार निवद्लायेस का हे सगळ विचारून झालाय . मुलगी वेल educated आहे . हिंजवडीत m n c त अहे. विवाहाचं वय उलटून चाललं आहे .इब्लिस ने सांगितलेलं सगळं काही करून झालंय . तरीही पूर्वकर्माने काही अडथळे येत असतील तर ईश्वर कृपेने ते दूर व्हावेत म्हणून हा प्रयत्न. (आता पुर्वकर्म सत्य कि थोतांड ह्या विषयावर इथे चर्चा नको. करायची असेल तर त्यासाठी कृपया वेगळा धागा काढावा ).
आता आपल्या सगळ्यांना विनंती आहे कि मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असल्यामुळे ह्या धाग्यावारची चर्चा थांबवावी
पाळी बन्द झाल्यावर आणि
पाळी बन्द झाल्यावर आणि नवर्याची कपॅसिटी संपल्यावर देवाच्या कृपेने पोरं होणार असतील तर योग्य वयात लग्न व्हावे ही मोहिनीबाइंना का चिंता पडली आहे ?
हे बोलण्याच्या आधी तो अध्याय वाचला असता तर थोडी तरी अक्कल शिल्लक राहिली आहे हे तरी आम्हाला समजलं असत . आपण काय बोलतो आहोत हे सुधा तुम्हाला समजत नसेल तर ती चिंता तरी काय समजणार तुम्हाला . सोडा हो तुमच्या बालबुद्धीला आम्ही समजून घेवू .
@लक्ष्मी गोडबोले
तुमच्या प्रतिसादाच्या सुरावरून समजताच आहे कि कुणी सांगितलाय म्हणून तुम्ही जीवावर आल्यासारखं वाचत होतात . त्यात श्रद्धा , भक्ती कुठेही नवती .संकटात झक मारत लोक देवाचं नाव घेतातच हो. हे संकट यायच्या आधी कधी तुम्हाला देवाची आठवण आली होती का ? तुमच्यासारख्या दुतोंड्या लोकांचा हाच प्रोब्लेम आहे . काही चांगलं झालं कि ते माझ्या प्रयत्नांमुळे झालाय . त्यात देवाचा काही हाथ नाही वगेरे म्हणायचं . पण काही वाईट झालं कि हे देवाने केलाय म्हणून त्याला दोष द्यायचा . थोडं कठोर वाटेल पण तुमच्या सोबत जे झालं ते योग्यच होतं असं मी म्हणेन .
<मला माझ्या प्रश्नाचं उत्तर
<मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं >
मग नेमका कोणता अध्याय वाचायचा असतो? आणखी कोणाला असा प्रश्न पडला तर उत्तर लगेच मिळावं म्हणून कृपया उत्तर इथे प्रतिसादात लिहून, कृपया हेडरमध्येही नोंदवाल का?
मोहिनि३३३, गुरुचरित्राच्या
मोहिनि३३३, गुरुचरित्राच्या प्रत्येक अध्यायासोबत फलश्रुती आहे.
मी अख्खं पारायण कधी केले नाही. पण २ अध्याय वाचनात आहेत. पाळणूक काहीही करत नाही. मोबाईलमध्ये ग्रंथ डाउनलोड केला आहे त्यातूनसुद्धा वाचते कधी कधी. किंवा सुटे अध्याय मिळतात पॉकेट पुस्तकासारखे ते आहेत.
मोहिनीबै, तुमची आणि तुमच्या
मोहिनीबै,
तुमची आणि तुमच्या देवाची अक्कल समजली.
मनात भक्ती नसेल तर पाय मोडतो म्हणे.
मग तुमच्या त्या मुलीचं मन शुद्ध आहे ना, तर तिच्या लग्नासाठी तुम्ही का भीक मागत फिरत आहात? तुमचे मन शुद्ध आहे तर निवांत बसा, फळ मिळेलच नै का?
तू माझी भक्ती नाही केलीस , माझ्या दारात नाही आलास तरी मी तुझं कल्याणच करीन असे सांगणारा परमेश्वर मला हवा आहे. तो मला मिळालेला आहे.
तुम्ही हे जे भकलात, तु भक्त नव्हतास म्हणुन तुझा पाय मोडला , ज्यानी ज्यानी मला ते वरचे धर्मग्रंथ दिले ते असेच बोलले. म्हणुनच मी ते सगळे इश्वर आणि ग्रंथ सोडुन दिले.
धन्यवाद.
हे बोलण्याच्या आधी तो अध्याय
हे बोलण्याच्या आधी तो अध्याय वाचला असता तर
<<
कोणते बरे ते भक्तीरसाने भरलेले अध्याय? लिंक मिळेल का?
अरे कशाला चेष्टा करताय. उत्तर
अरे कशाला चेष्टा करताय. उत्तर माहीत असेल तर सांगा नाहीतर सोडून द्या.
कुणी सांगितलाय म्हणून तुम्ही
कुणी सांगितलाय म्हणून तुम्ही जीवावर आल्यासारखं वाचत होतात
तुम्हीदेखील कुणीतरी सांगतय म्हणुनच करणार ना?
आणि तुम्हीदेखील जिवावर आल्यावरच वाचताय ना ? ती तुमची मुलगी घोडनवरी झाल्यावर तुम्हाला गुरुचरित्र आठवले.
(No subject)
लक्ष्मी गोडबोले म्हणजेच
लक्ष्मी गोडबोले म्हणजेच डॉक्टर गजानन कागलकर, जरा शब्द जपून वापरा. एक तर खोडी काढायची म्हणून काहीही बोलताय आणि वर ही असली भाषा?
हे
हे गुरूचरित्र,
http://www.khapre.org/portal/url/pages/i071024224507/view
यातले ते अध्याय कोणते ते माहिती नाही
इब्लिसभाउ. गुरुचरित्र
इब्लिसभाउ.
गुरुचरित्र चौदावा
असे शब्द अध्याय क्र घालुन गुगल करा
मोहिनी तुम्हाला स्वतःला असे
मोहिनी तुम्हाला स्वतःला असे प्रत्यक्ष वाचण्याचे अनूभव असतील तर मग माझी काहीच हरकत नाही. माझ्या वडिलाना नोकरीच्या अनियमीत वेळान्मुळे वाचणे/ करणे जमत नव्हते, तेव्हा आम्ही घरी एका आमच्या परिचीत गुरुजीना बोलावुन पारायण करवुन घेतले होते. त्यानी तेव्हा हेच सान्गीतले होते की स्त्रीयानी हे वाचु नये. खरे तर ते गुरुजी खूप आधूनीक विचारान्चे होते, पण खरे कारण ते ही सान्गु शकले नाहीत.
वरदा, आश्विनी तुमचाही वाचण्याचा प्रत्यक्ष अनूभव आहे हे वाचुन आनन्द वाटला, कारण निदान ते काय आहे हे तरी तुम्ही बघीतलेत. शेवटी मनाचे समाधान आणी ईश्वरी ईच्छा.
लगो आपल्या आयुष्यात खूप वेळा बर्या वाईट घटना या नेहेमी घडतात, सन्ताना देखील त्यान्चे भोग चुकले नाहीत, तर तुम्ही, मी सामान्य माणसे. हे ही खरे आहे की माणुस चान्गले झाले की देवाला विसरतो आणी वाईट घडले की देवाला रिटायर करा असे म्हणतो.
वाईट अनूभवातुन फ्रर्स्टेशन येणे साहजीक असते, आपल्या जवळचे दुरावल्यावर आपण विवीध प्रयत्न करतो, पण मनासारखे नाही झाले तर देवाला/ दैवाला बोल लावतो. होते असे. पण खरे तर असे समजायला पाहीजे की जे होते ते चान्गल्याकरता होते. तुमच्या बाबतीत जे झाले ते वाईट होते, पण काही काळानन्तर आता सुख आले असेल तर चान्गलेच आहे.
मनी नाही भाव म्हणे देवा मला
मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव
देव अशानं पावायचा नाय रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे-राष्ट्रसंत तुकडोजी म्हाराज.
रश्मी, मी कामासाठी वाचलंय हां
रश्मी, मी कामासाठी वाचलंय हां ते. त्याच्यात भक्तीचा वगैरे काडीमात्रही संबंध नाही.
एकुणात कुठलेही ग्रंथ वगैरे वाचून आयुष्यातल्या समस्या सुटल्या असत्या तर मग आणखी काय हवं होतं?
एकुणात कुठलेही ग्रंथ वगैरे
एकुणात कुठलेही ग्रंथ वगैरे वाचून आयुष्यातल्या समस्या सुटल्या असत्या तर मग आणखी काय हवं होतं?>>>>>>>>>>>. अनुमोदन..
वर्दा, हे सांगायची काही गरज
वर्दा, हे सांगायची काही गरज होती ??? तू modern नाहीस आता. जात-पात, समाजाची खोटी बंधन इ. पाळतेस. श्या. शोनाहो.
विचारवांतीला पाच प्लस.
विचारवांतीला पाच प्लस.
रश्मी.., >> त्यानी तेव्हा हेच
रश्मी..,
>> त्यानी तेव्हा हेच सान्गीतले होते की स्त्रीयानी हे वाचु नये. खरे तर ते गुरुजी खूप आधूनीक विचारान्चे होते,
>> पण खरे कारण ते ही सान्गु शकले नाहीत.
टेंबेस्वामींनी याचं कारण सांगितलंय :
आ.न.,
-गा.पै.
अमितव मी वरदाला नावे ठेवणार
अमितव मी वरदाला नावे ठेवणार नाही. मी समान बाजूने आहे. दोन्हीचा आदर करतेय, आणी कुणावर माझे विचार लादतही नाही. ज्या व्यक्तीला तुम्ही पहात नाही किन्वा पाहिले पण नाही अशान्बद्दल असे कसे बोलु शकता? कमाल आहे.
विचारवांती >>
विचारवांती >>

तर गापै यांनी रहस्यभेद केलाच.
तर गापै यांनी रहस्यभेद केलाच. तोही पुराव्यसकट.
ते काय सापडेनात बघा.
"वेदाक्षरे" आहेत म्हणून स्त्रियांनी वाचू नये!
वा वा वा. मार्मिक उत्तर.
स्त्रिशिक्षा.
हिंदीतली शिक्षा आहे की मराठीतली?
*
@ महेश,
अहो नक्की कोणते अध्याय ते सांगा की
विचारवांती हे नाम त्याना
विचारवांती हे नाम त्याना इब्लिसनी दिले आहे.
वेदाक्षरांना स्त्रीयांचे
वेदाक्षरांना स्त्रीयांचे वावडे कां??
Why dont u try gruahshobhika
Why dont u try gruahshobhika / playboy / how to attract men / १० things about men
वेदाक्षरांना स्त्रियांचे
वेदाक्षरांना स्त्रियांचे वावडे कशाला असेल ! पण वेद स्त्री ने वाचले अन ती ज्ञानी झाली तर डोक्यावर बसेल ना हो !!
असं आहे ते ! म्हणून वर वाचल्यास अमूक होईल अन तमूक होईल अशा धमक्या घालून खुंटा बळकट करायचा.
बरं, वेदाक्षरे का म्हणे
बरं, वेदाक्षरे का म्हणे वाचायची नाहीत? मी वेदग्रंथ वाचलेत पण मला ती भाषा येत नाही.
पण माझ्या माहितीत वैदिक वाङ्मयाचा अभ्यास, संशोधन केलेल्या संस्कृतज्ञ आंतरराष्ट्रीय (मराठी) विदुषी पण आहेत. व्यवस्थित एरवी चारचौघांसारखं आयुष्य असणार्या? त्यांचं काय वाईट झालं वेदाक्षरे वाचून? उगाच कैच्याकै..
@ अमितव
Pages