मुलीचा विवाह लवकर होण्यासाठी गुरुचरीत्रातला कोणता अध्याय वाचावा

Submitted by मोहिनि३३३ on 21 July, 2014 - 02:47

घरातील मुलीचा विवाह लवकर होण्यासाठी गुरुचरीत्रातला कोणता अध्याय वाचावा ? कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावे . मी नेटवर सगळीकडे शोधलं पण सापडलं नाही. ५३ व्या अध्यायात संपूर्ण गुरुचरित्राचे सार असल्यामुळे हा अध्याय वाचला तर चालेल का ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफिकीर.:हाहा:

वेदाक्षरांना स्त्रीयांचे वावडे कां?? <<<
वा हे काय विचारणं? नेहमीचीच भिक्कार, खुळचट, बुरसटलेली, मागास कारणे....

स्त्रीला कोणाच्यातरी डोक्यावर बसण्यासाठी ज्ञानी बनावे लागते हे ऐकले नव्हते >>>>>>.

अत्यंत स्फोटक वाक्य..........

मी पॉपकॉर्न घेउन येतो

Women r not narrow minded like vedpandits... Gruhashobhika is open to all

वेदाक्षरे असतात म्हणजे काय असतं हे मला शप्पत माहित नाहीये. आता मी पूर्णच गुरुचर्रित्र वाचल्याने जे काय असेल नसेल ते वाचलं असणारच की...

कुणातरी जाणकाराने प्रकाश पाडावा - वेदाक्षर म्हणजे नक्की काय ते

आणि वेदाक्षरे वगैरे पाळायचं असेल तर संस्कृतच्या किमान काही विद्यापीठांच्या पदव्युत्तर/पदवी अभ्यासक्रमांवर आधी बंदी घाला हो. सरळ सरळ वेदातले वेचे वगैरे लावलेले असतात. शांतम् पापम्|

वेदाक्षरे वाचू नयेत.वेदशब्द वाचले तर चालतात. Happy
गु.च. चं अचूक पारायण अशक्य वाटतं.मग 'तुमचंच वाचायला चूकलं असेल' असं म्हणता येईल.आता आणखी एक मुद्दा एका व्यवसायावर घसरतो,म्हणून टाळतो.

बेफ़िकीर | 22 July, 2014 - 19:04
स्त्रीला कोणाच्यातरी डोक्यावर बसण्यासाठी ज्ञानी बनावे लागते हे ऐकले नव्हते.
<<
तेच तर!
अज्ञानी लोक स्त्रियांना डोक्यावर बसवून घेत नाहीत. Wink

स्त्रिया फाSSSSर पूर्वी वेदाक्षरे वाचायच्या. त्यावर चर्चाबिर्चाही करायच्या. पण भारतावर चालून आलेल्या व येथे राज्यकर्ते झालेल्या अनेक परकीय आक्रमकांपासून स्त्रीच्या सन्मानाचे आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी स्त्रियांना वेदाक्षरे वाचण्यापासून थांबवण्यात आले.

(हे लिहीत असताना माझं मराठी हिंदी स्टाइलचं का होतंय ते कळत नाही. रक्षणच्या ऐवजी आधी रक्षा झाले होते. दुर्दैवाने पोस्ट करायच्या आधीच लक्षात आले .)

वेद अपौरुषेय म्हणजे स्त्रियांनीच लिहिलेले आहेत. त्यांना ते ज्ञान आधीच असल्यामुळे वाचायची आवश्यकता नसते असं आहे ते.

Proud

त्याकाळच्या बायका घोडनवरी व्हायच्या आतच लग्न करायच्या. त्यामुळे त्याना गुरुचरित्र वाचायची गरज नसायची.

लगो एकंदरीत बायकाना चिडवण्याचा दिवस दिसतोय आज!! आपण एका स्त्री असल्याचा आव (नावाने) आणून बिनदिक्कत वावरतोय एवढे लक्षात ठेवावे म्हणजे झाले.

वेद अपौरुषेय म्हणजे स्त्रियांनीच लिहिलेले आहेत.
<<


और ये लगाऽ सिक्सर!
url.jpg

आजकालच्या पोरींचे नखरेच फार ...
शिक्षण घेणार. त्यानंतर पीजीकरणार. मग स्वपाऊरा नोकरी करणार ,मग त्या ३०शीच्या घोडनवर्या झाल्यानंतर गुरुचरीत्र वाचत बसतात.

E ba Lol

ब्रह्मांड आठवले,

द्रौपदीने काही वाचलेलं नाही. ती यज्ञातून उत्पन्न झाली तीच मुळी एक तरुणी म्हणून. तिला बालपण नव्हतं. उत्पन्न झाल्यावर लगेच तिचं स्वयंवर रचण्यात आलं.

आ.न.,
-गा.पै.

पैलवाना तुझी विनोदबुद्धी नष्ट झालेली आहे.

मायबोली पीठाचे जगद्गुरु श्री श्री लिंबु कुठे गेले आहेत?

मोडत असेल. पण तसे धागाकर्तीला वाटत नाही ना. कूणी काही बोलून मत बदलणार नसतंच.
म्हणूनच पटत असेल आणि माहित असेल तर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे नाही तर सोडून द्यायचे. Happy

आपल्या अवास्तव अपेक्षा कंट्रोल मधे ठेवा.>>> इब्लिस उवाच

एव्हढे सडेतोड सांगितल्यावर आणखी काय पाहिजे.

लगो
उगीच काहीतरी लिंका देत बसू नका. वाचून स्वतःच्याच झिंजा उपटावश्या वाटतायत. झोप यायला लागली.

सिंहासन बत्तीशी/विक्रम वेताळ यापेक्षा कितीतरी चांगली करमणूक करते.

लोक नीट वाचत नाहीत.
<आता आपल्या सगळ्यांना विनंती आहे कि मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असल्यामुळे ह्या धाग्यावारची चर्चा थांबवावी> असं त्यांनी कालच म्हटलंय. त्यामुळे कोणता अध्याय वाचावा ही चर्चा आता करायचे कारण नाही. या धाग्याचा वापर जागता (आता झोपलेला) पहारा सारखा होऊ शकतो.

पण नेमका कोणता अध्याय वाचायचा या माझ्या प्रश्नाचं उत्तर काही त्यांनी दिलेलं नाही.
मी यासाठी वेगळा धागा काढला तर तिथे येऊन त्या उत्तर देतील का?
तेवढीच जनरल क्नॉलेजात भर.

@ महेश,
>>अहो नक्की कोणते अध्याय ते सांगा की अरेरे ते काय सापडेनात बघा.

ते मला पण ठाऊक नाहीये, जर पुर्ण वाचून काढलेत तर सापडेल तुम्हाला.
वाचाल तर वाचाल !!! Happy

तुम्ही स्त्री असा पुरूष असा, नियम पाळा, नका पाळू, काही फरक पडत नाही असे मला वाटते.
मन चंगा तो कठौती मे गंगा | Happy

(हे वरचे वाक्य मात्र निट वाचा बर का ! )

Angry

नाही मी ते कठौती असेच ऐकले आहे, त्याचा अर्थ कमंडलू असा होतो बहुतेक.
कटोरी मधे भिक्षा (अन्न) आणि कमंडलू मधे पाणी असे असते ज्ञात माहितीनुसार.

मराठमोळ उत्तर बरोबर आहे, पण गुण मिळणार नाहीत, कारण पेपर वेगळ्या विषयाचा आहे आणि तुम्हि उत्तर वेगळ्या विषयाचं दिलं आहे, "गुरुचरित्रा"तला अध्याय हवा आहे,(धाग्याच्या शिर्षकात तसा स्पष्ट अल्लेख आहे) "नवनाथ उपासना"तला नाही त्यामुळे तुम्हाला ० गुण.

कठौती म्हणजे चांभारासमोर पाण्याचे भांडे असते ते. मोठी कहाणी आहे. नंतर लिवेन

Angry अग्निपंख मुद्दा गुरुचरित्र आहे नवनाथ उपासना नाही मला माहित आहे पण मी ग़ुण मिळवण्यासाठी माहिती दिली नव्ह्ती इकडे सर्वजण आपले मत मांडून माहिती सांगत होते विषय विवाह लवकर होण्यासाठी आहे म्ह्णुन सांगितले.तुम्हाला त्रास होत असेल तर संपादनdelete करते

तुम्हाला त्रास होत असेल तर संपादनdelete करते>>
अरेरे, दुखवायचा हेतु नव्हता, तुम्ही वरच्या प्रतिक्रिया वाचल्या असतिल ना, (इतर काहीही महिती नकोय, फक्त शिर्षकात लिहिलेल्या प्रश्नाच उत्तर हवय (आणि ते धागा कर्त्यांना मिळालय Wink )) तरि हे मनाला लाउन घेतलत, माफ करा.

कठौती म्हणजे चांभारासमोर पाण्याचे भांडे असते ते. मोठी कहाणी आहे. नंतर लिवेन>>
लगो एकदम बरुबर, हिंदीच्या पुस्तकात होती ही गोष्ट, कबिरांबद्द्ल होती की काय आता आठवत नाही,

हो. त्या एक आहेत ना लग्न होऊनही अविवाहीत राहीलेल्या...
तुम्ही द्याल की मीच देऊ ? Lol

Pages