शब्दार्थ

Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11

एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.

या आधिचे संभाषण या दुव्यावर सापडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ललिता....

तुम्ही बोरीवली नॅशनल पार्कचा उल्लेख करून "पेव फुटणे" वाक्यप्रचाराचा उगम सांगितला आहे. त्यावरूनच मला लोकसत्तेत श्री.अतुल साठे यानी याच उद्यानाची सफर करून लिहिलेला एक लेख आठवला. त्यात ते म्हणतात.....

".....नुकताच पावसाळा संपला होता. जंगल सर्वत्र घनदाट झालं होतं. पायवाटेच्या दोन्ही बाजूंना बांबू, हेदू, करवंद, कराई, साग, सावर, कांचन आणि काही ठिकाणी वन विभागाने लावलेली गिरिपुष्प, सोनमोहर व गुलमोहर अशी सगळी झाडं दाटीवाटीने उभी होती. उन्हं कललेली होती व त्यामुळे वातावरण एकप्रकारे गूढ व गंभीर भासत होतं. जागोजागी खाली लाल व वर पांढरी असणारी पेवची फुलं डोलत होती. त्यामुळे वातावरणात थोडा जिवंतपणा येत होता. मराठीत 'पेव फुटणे' हा वाक्प्रचार रानात मोठ्या संख्येने वाढणाऱ्या या सपुष्प झुडपामुळेच प्रचलित झाला. सोबत जांभळी तेरड्याची फुलं (बाल्सम), गुलाबी-पिवळी रानहळदीची फुलं व नाजूक गौरीची फुलंही (सिल्व्हर कॉक्स कोंब) लक्ष वेधून घेत होती....."

वरदा यानी एका प्रतिसादात श्री.अनिल अवचट यांच्या सांगली हळद कामगार लेखाचा उल्लेख केला आहे. तिथे तर हळद पेव प्रकरण तर त्या व्यवसायाचा अविभाज्य घटकच आहे. विक्री मोसम सुरू झाला की हुंडेकर्‍यांची सभा होऊन हळदीचे बाजार दर निश्चित केले जातात आणि नंतर एका शुभ मुहूर्तावर प्रत्येकाच्या ताब्यात असलेले ते हळकुंडांचे पेव भांडार फोडण्यात येते.....त्या प्रक्रियेलाही त्यांच्या भाषेत "पेव फुटले" असे नाम साहजिकच प्राप्त झाले आहे.

चंदन याला समानार्थी शब्द कोणी सांगू शकेल का?>>>
चंदनाला वेगवेगळ्या भाषेतून चंदन असेच म्हटले जाते.पण त्याचे काही अप्रचलित शब्द पहा.
सुकेत्,अग्रुगंध्,भद्रसार्,सुखद्,मलयज.अगदी श्रिखंडसुद्धा.अजून बरेच आहेत मोजकेच देत आहे.

गंध होऊ शकेल का?<< गंध थोडा जवळ जाणारा..गंधसार असा एक शब्द आहे समानार्थी.
बहुतेक शब्द संस्कृत आहेत.

कोकणीमधे चंदनाला कॉमनली गंध म्हटले जाते. रोजच्या बोलण्यात गंध म्हणजे आपण मराठीत ज्याला चंदन म्हणतो ते , आणि चंदन म्हणजे मराठीत ज्याला रक्त चंदन म्हणतो ते Happy

आजी मला चंदनाचा मोठा तुकडा हवाय घरी न्यायला म्हटल्यावर आजीने स्पेशली मागवून दिला होता रक्त चंदनाचा किलोभर वजनाचा तुकडा

अवांतर - मसाला वाटताना पण अगदी गंध वाटायचा असतो . उगाळलेल्या गंधाइतका गुळगुळीत, जराही कचकच न रहाता Happy

रोजच्या बोलण्यात गंध म्हणजे आपण मराठीत ज्याला चंदन म्हणतो ते , आणि चंदन म्हणजे मराठीत ज्याला रक्त चंदन म्हणतो ते>>>
चंदन आणि रक्तचंदन वेगवेगळे.गंध हा चंदनाला समानार्थी? गंध म्हणजे सुवास या अर्थाने शिवाय टिळा या अर्थाने वापरला जातो.त्यामुळे चंदनाला समानार्थी शब्द गंध हा नाही. गंध लावणे असा शब्द असल्याने,गंध म्हणजे चंदन असा अर्थ रुढ झाला.

रक्तचंदन हे खोडाच्या गाभ्यात सापडते तसेच चंदनही गाभ्यातच.म्हणून रक्तचंदनाला-चंदन शब्द जोडला गेला आहे.वास्तविक दोन्ही झाडे वेगळी आहेत तसेच दोघांची फॅमिली वेगवेगळी आहे.गंम्मत अशी की रक्तचंदनाची रेस ही मेथी,भुईमूग,सोया इ.च्या फॅमिलीतली आहे. Happy रक्तचंदन आणि चंदन याचा दुरान्वयेहि संबंध असा नाही.

पेव नावाचे झाड फार लोकांनी ऐकलेले नसावे. तसेच ते महाराष्ट्रभर मुबलक दिसते असेही नव्हे. त्यामुळे त्यावरून वाक्प्रचार येणे कठीण दिसते.

नुसत्या हळदीचीच नाहीत, तर खानदेश, विदर्भात ज्वारीबाजरीची देखिल पेवे असतात.

रस्ता/अंगणात कोरडी विहीर असावी तसा खड्डा बनवतात. त्याला आतून खारी माती / शेणाने लिंपले जाते. यावर कडबा/चारा इ. टाकून वर पुन्हा माती टाकून लिंपून टाकत, जेणेकरून आतमधे वॉटरप्रूफ बनते. मुबलक उत्पन्नाच्या साली पेवं भरली जात. त्यानंतर दुष्काळाच्या वर्षी पेव फोडून धान्य काढले जाई.
मात्र एकदा पेव फुटलं, की संपूर्ण रिकामे करावे लागते. थोडे काढून परत बंद करत नाहीत. तसे केल्यास धान्यास कीड लागते.

बळदाबद्दल वरदाताईंनी लिहिलेलं बरोबर.

ही माहिती पुन्हा एकदा महाराष्ट्र दर्शन गोनिदा.

>> गंध हा चंदनाला समानार्थी?
हो, धार्मिक कार्याच्या संदर्भात (कॉन्टेक्स्ट) त्या अर्थानेच वापरला जातो.

एरवी गंध = वास हे बरोबर.
सुवासही नाही. सुगंध आणि दुर्गंध हे स्पेसिफिक शब्द आहेत ना त्यासाठी.

रक्तचंदनाची बाहुली असे बहुतेक घरांत. जुन्या लाकडी ठकीसारखी.
सहाणेवर घासायच्या खोडासारखी ही बाहुली देखील उगाळली जायची. याच्यासोबत उगाळायची अंबी हळद.
असा या अंबीहळद-रगतरोड्याचा लेप पळीत किंचित गरम करून मुका मार लागल्यावर लावायचा. सूज उतरायला मदत होते. त्वचेखाली रक्त साकळलेले असले तर या रक्तचंदनाचा लेप ते निवळायला मदत करतो असे आजीबाईचा बटवा सांगतो.
लाकूडही गडद काळपट लाल रंगाचे असते. कदाचित त्यावरून नांव आलेले असावे.
आता अ‍ॅक्चुअली काही थ्रोंबोलायटिक (रक्ताची गुठळी वितळविणारे) घटक त्यात आहेत का ? असलेत तर टॉपिकल अ‍ॅप्लिकेशन अर्थात जागेवर लेप करून काम करतात का वगैरे संशोधन विदा मजपाशी नाही.
पण उन-उन लेप लावल्याने किमान पोटीस तत्वावर सूज उतरविण्याचे काम नक्कीच होते.

पेंव म्हणजे जमिनीखालील धान्याचे कोठार हाच अर्थ बरोबर आहे. कृ.पां. कुलकर्णींच्या व्युत्पत्तिकोशात आणि विश्वकोशातसुद्धा हाच अर्थ आहे. उदाहरण म्हणून 'किंबहुना जें पेंव| विंचुवांचे| (ज्ञा.१७/२८५) हा श्लोक कृ.पां.नी दिलेला आहे. पयंबु(तमीळ) म्हणजे खड्डा. यावरून हा शब्द आला असावा असे व्युत्पत्तिकोशात आहे. विश्वकोशात 'धान्य साठवण्यासाठी जमिनीत केलेला खोल खड्डा, ग्रेन सेलर, अंडर-ग्राउंड ग्रेनरी असा स्पष्ट अर्थ आहे. पेव फोडले किंवा फुटले की धान्याची रेलचेल होते, मुबलकता येते, धान्याचा सुकाळ होतो, यावरून पेव फुटणे म्हणजे एखादी गोष्ट भरपूर प्रमाणात असणे किंवा मिळणे हा अर्थ आला.
पेव या वनस्पतीशी जोडला गेलेला संबंध हा निव्वळ अतिउत्साही वनस्पतितज्ज्ञांनी अर्थाचा खोलवर शोध न घेता नॅशनल पार्कमध्ये लावलेल्या साफ चुकीच्या फलकामुळे आला आहे. जे जे लोक नॅशनल पार्कला भेट देतात ते हा चुकीचा अर्थ गाठीला बांधून परततात. वनस्पतितज्ज्ञ हे भाषातज्ज्ञ, त्यातूनही मराठीभाषातज्ज्ञ असतीलच असे नाही, किंबहुना तसे ते नसतातच असा (अनेक नेचर-ट्रेल्स केल्यानंतर आलेला) स्वानुभव आहे. त्यांच्याकडून भाषातज्ज्ञतेची अपेक्षाही नसते. पण शब्दचिकित्सा करणार्‍या आपल्यासारख्यांनी मात्र योग्य ती चिकित्सा करून अर्थ लावायला पाहिजे. श्री लिमये नॅशनल पार्कचे वन अधीक्षक असताना मी याविषयी एक पत्र त्यांना पाठविले होते. लोकसत्तामध्येही लिहिले होते; पण पुढे पाठपुरावा ठेवला नाही. आपल्यामधल्या कोणी किंवा आपण सर्वांनी हा फलक बदलण्यासाठी जोर लावावा.
पेव ही वनस्पती सीझनल, मोसमी आहे. शिवाय महाराष्ट्रात ती सार्वत्रिक नाही. त्यावरून एखादा वाक्प्रचार रूढ व्हावा इतकी ती धार्मिक-सामाजिक अंगांनी महत्त्वाचीही नाही. जिथे पेव म्हणजे लिंपलेले कोठार हा अर्थ आणि प्रत्यक्ष पेव ही संस्था प्रामुख्याने प्रचलित आहे त्या देशावरच्या पठारात पेव चे अस्तित्व फारसे नाही. त्यामुळे या वनस्पतीवरून पेव फुटणे हा वाक्प्रचार रूढ झाला असावा असे वाटत नाही. किंबहुना तसे ते नाहीच. ही नवी चुकीची व्युत्पती गेल्या दहावीस वर्षांतली आहे.

रक्तचंदन बाहुलीच्याच रूपात मिळतं. दोन वर्षांपूर्वी तुळशीबागेतून आणलं होतं. आहे घरी अजून पण वापरायची वेळ आलेली नाही (नशीबच).
पेव आख्ख्या महाराष्टात देशभागात आढळतं. जिथे मातीला ओल धरणार नाही अशा ठिकाणी खोदली जातात. मी बहुतांशी ज्वारीची पेवं बघितली आहेत. फोटोही असेल माझ्याकडे, शोधला पाहिजे..
पेव फुलांबद्दलची माहिती इंटरेस्टिंग.

गापै - नारायण बद्दल अजून काही दिवस जरा धीर धरा. माहिती मिळाली की लगेचच लिहेन इथे..

नुसत इतकच नाही इब्लिस, ज्या भागावर लेप लावायचाय तोच भाग घासतात बाहुलीचा. मुक्या माराने रक्त साकलल्यावर बर्‍याचदा लावून घेतलाय हा लेप. हमखास गुणकारी.

हीरा, पेव बद्दल अनुमोदन.

कॉन्टेक्स्टमध्ये असले तरी तो समानार्थी शब्द म्हणता येत नाही.गंध आणि चंदन वेगवेगळे.एक साधा मुलतानीमातीचा चंदनाची भूकटी मिसळलेला रॉड मिळतो त्यालाही गंध म्हणतात.त्यामुळे त्याचा शब्दश: अर्थ घेणे चूकीचे ठरते.
तसेच कोकणात काय नि कुठे काय्,चंदनाचा सहानेवर उगाळून लावलेला टिळा=गंध्,चंदन नाही.
या नादात वर दिलेले चंदनाला समानार्थी शब्द दुर्लक्षले जातील. Wink त्याविषयी चर्चा करा.
चंदनाची एटायमोलॉजी 'कंदा' या शब्दापासून झाली आहे म्हणे.शब्दोत्पत्तीले मास्टर्स योग्य ते टंकतीलच चंदन शब्दोगमाविषयी.

मेधा यांनी चंदन आणि रक्तचंदन यांची सरमिसळ केलेली आहे म्हणून जरा आवांतर टंकले व बाहेरही हा गैरसमज प्रस्थापित आहेच.

आस्तिक या शब्दाची व्युत्पत्ती देईल का कोणी? आस्तिक मुनि-ऋषी होते हे माहिती आहे.

>> आस्तिक या शब्दाची व्युत्पत्ती देईल का कोणी
अस्ति = अस्तित्त्वात आहे, नास्ति = अस्तित्त्वात नाही. त्यावरून आस्तिक आणि नास्तिक आलेत.

>> ज्या भागावर लेप लावायचाय तोच भाग घासतात बाहुलीचा
मी (इब्लिस चिडतील म्हणून :P) मघापासून हसायचं टाळलंय त्यावर. Proud

(इब्लिस चिडतील म्हणून फिदीफिदी)
<<
त्यावर मी का चिडावं बा? मी पण हसतोच आहे त्यावर.
कपाळावर टेंगूळ आलं, तर एका टेंगळात फ्यामिली भावलीचा अख्खा चेहरा उगाळून गायब होईल की!

आस्तिक, नास्तिकची व्युत्पत्ती बरोबर आहे.
मूळ अर्थ - आस्तिक= वेदप्रामाण्य मानणारा/री, नास्तिक= वेदप्रामाण्य न मानणारा/री

ओक्के,मेधाताई ...
इब्लीसजी,या रक्तचंदनाचे लई उप्येग एत.किती सांगू तुझी थोरवी...फेनॉलीक्स मेजर.
रक्त हा शब्द त्याच्या रंगावरूनच आला शिवाय चंदन म्हणतात कारण 'त्या' खर्‍या चंदनासारखंच हा पण खोडाच्या गाभ्यात सापडतो आणि उगाळून उपयोगात आणला जातो.आज्जीकडे एक भावली आहे याची ती जवळपास पाच सेमी उंचीची,आणि मायान संस्कृतीतली टिपीकल पुतळ्यासारखी दिसते.दुसरी एक होती,ती बर्‍यापैकी मोठी होती.आम्ही तिला लहानपणी भातुकलीत खेळायला वापरायचो. Happy मुकामार लागला की,ती बाहुली उगाळायची,चमच्यात घेउन,तापवायचा,आणि लेपायचा.ते फारच छान वाटायचं.पण रक्तचंदनाची 'बाहुली' ही कन्सेप्ट काय कळली नाय बा?आवडली मात्र नक्कीच. (परत अवांतर्,स्वारी)

हीरा चांगली माहीती आहे.धन्यवाद!
स्वातीताई धन्यवाद.
वरदा,धन्यवाद...प्रतिसाद पाहीला.

बोलीभाषेतून लुप्त झालेल्या, होत चाललेल्या शब्दांबद्दल फेसबुकवर शिवाजी घुगे छान माहीती देतात.

वदाड, माळवद, दमणी असे अनेक शब्द आज ओळखीचे वाटत नाहीत. माळवद त्यातल्या त्यात माहीतीचा .

https://www.facebook.com/shivaji.ghuge.71?fref=nf

आयचन, अरगळा हे शब्द खूप कधीतरी ऐकलेले , घुगेंमुळे पुन्हा एकदा आठवले.

चंदनाला उर्दूत संदल आणि इंग्रजीत सँडलवुड म्हणतात. रक्तचंदनाला रेड सँडर्स म्हणतात. रोमन लिपीतल्या 'सी' या लेटरचे वेगवेगळ्या काळांत आणि वेगवेगळ्या प्रदेशांत 'स', 'क'' 'च' असे उच्चार होते/आहेत. या सर्वांचे प्रोटो भाषेतले मूळ एकच असावे. (निदान भारतीय) मुस्लिमांमध्ये संतांच्या पीर्/दर्गा/कबरीवर संदल चढवणे हा एक विधी असतो. जंगली महाराजांच्या समाधीवर उत्सवामध्ये अजूनही त्यांच्या वंशजांकडून संदल येते असे त्यांच्या चरित्रात वाचले आहे.
रक्तचंदन ही एक दुर्मीळ वनस्पती आहे. तिच्या तोडीवर आणि निर्यातीवर बंधने आहेत. त्याचे ओंडके थेट विकता येत नाहीत. पण जर कोणी त्यापासून काष्ठशिल्प बनवले तर त्याला वेगळे नियम लागू होतात. म्हणून किरकोळ विक्रीसाठी थोडासा बाहुलीचा आकार देऊन ते खोड विकतात अशी माहिती कर्नाटकातल्या चंदनफॅक्टरीत कित्येक वर्षांपूर्वी सांगितली गेली होती. खखो माना.
आपल्याकडे सन्यासी मठाधीश पूजेत रक्तचंदन वापरतात पण त्यांना (संन्यस्त असल्यामुळे) स्त्रीस्पर्श वर्ज्य असतो, म्हणून बाहुलीरूपातले खोड (कांड) त्यांना चालत नाही. मग भक्तगण कुठून कुठून रक्तचंदनाचे ठोकळे मिळवतात. आमच्याकडे त्या फॅक्टरीतच मिळालेले असे दोन ठोकळे होते ते असेच कुणी कुणी मागून नेले.

रक्तचंदन ही एक दुर्मीळ वनस्पती आहे. तिच्या तोडीवर आणि निर्यातीवर बंधने आहेत. त्याचे ओंडके थेट विकता येत नाहीत. पण जर कोणी त्यापासून काष्ठशिल्प बनवले तर त्याला वेगळे नियम लागू होतात. म्हणून किरकोळ विक्रीसाठी थोडासा बाहुलीचा आकार देऊन ते खोड विकतात अशी माहिती कर्नाटकातल्या चंदनफॅक्टरीत कित्येक वर्षांपूर्वी सांगितली गेली होती. खखो माना.
<<< इंटरेस्टींग.

माहित नाही, हीरा. अनेक वेळेला प्राचीन, पारंपरिक समजुती असतात वेगवेगळ्या काष्ठौषधींशी निगडित. बाहुलीच्या अवयवाचा तोतो भाग उगाळून देणे वगैरे मला त्याचाच एक भाग वाटते. तसंही आजवर जुन्या लोकांकडूनही रक्तचंदनाची बाहुली असल्याचेच उल्लेख ऐकलेत. तेव्हा मला वाटतं बाहुली प्रकरण पारंपरिक आहे.
तसंही रक्तचंदनाच्या निर्यातीवर बंदी वगैरे आधुनिक बाबी आहेत.
जरा आणखी तपास करायला हवा, नक्की काय कारण आहे त्याचा

Pages