मी नास्तिक आहे असा माझा समज आहे.... पण

Submitted by ब्रह्मांड आठवले on 10 July, 2014 - 10:23

सामान्य माणूस नास्तिक असू शकतो का ?
कारण मी नास्तिक आहे, असा माझा समज आहे. मी नास्तिक असण्याने इतरांना त्रास होतोय असं आजवरच्या वाटचालीवरून वाटलं नाही. पण मी नास्तिक का आहे याची कारणं मला माहीत असलीच पाहीजेत असा आजूबाजूच्यांचा आग्रह का ?
मग मिळेल ते वाचावं लागतं. म्हणजे असं वाटतं की आपण इतरांच्या कटकटीला वैतागून वाचतोय हे सर्व..
पण खरं म्हणजे
माझ्या नास्तिक असण्याशी माझा अंतर्गत झगडा चालू असतो. निरंतर.
मग सगळी तत्त्वज्ञानं थोडी थोडी, झेपेलशी चाळून मेंदू बधीर होतो. वाचनासाठी डोळे खोबणीतून बाहेर येतात आणि झोप न झाल्याने आता आत खेचले जाऊन मेंदूला चिकटतात.
मग मेंदूचं कामकाज सुरळीत चालत नाही. जडत्व येतं
मग वाटतं या मेंदूच्या हार्डवेअरचा निर्माता कोण ?
याला सूक्ष्म डीसी करंट पुरवणारा जनरेटर कुठला ?
मेंदूचं विचाररुपी सॉफ्टवेअर आणि त्याची प्रोग्रामिंग लँज्वेग लिहीणारा तो अभियंता कोण ?

बाळ जन्मताना त्याचे एकेक अवयव तयार होणं
त्यात चैतन्य निर्माण होणं
मग पूर्ण आकार आल्यावर
आईशी नाळेनं बांधलं जाणं
आईने पचवलेलच बाळाला आयतंच मिळणं
आणि बाहेर आल्यानंतर
आईला पान्हा फुटणं
हा कुठला प्रेग्राम असेल ब्वॉ ?
जन्मण्याआधीच लिंग, स्वभाव, रंग रुप निश्चित होणं
आणि हे सर्व
या अफाट ब्रह्मांडातल्या एका सूर्य नामक ता-याच्या
जीवसृष्टी असलेल्या एकांड्या ग्रहावर

या अशा प्रश्नांची उत्तर मिळेनाशी होतात, तेव्हां मग भीती वाटू लागते.
स्वतःच्या नास्तिक असण्याची

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>या अशा प्रश्नांची उत्तर मिळेनाशी होतात, तेव्हां मग भीती वाटू लागते.
स्वतःच्या नास्तिक असण्याची Lol

Hmm

What can be asserted without evidence can also be dismissed without evidence.
- Christopher Hitches

हा लेख/स्फुट/काव्य/मुक्तचंद म्हणजे मोदी बाशींगच्या धाग्यांवरून पुरोगामी आयडीजचे लक्ष विचलित करण्याची भाजपेयींची चाल आहे!

तुमचा स्वतःबद्दल काय समज आहे किंवा इतरांचे याबाबत काय मत आहे, किंवा कारणे काय हे सर्व प्रश्न गौण आहेत.
थोडी उलटी बाजू विचारात घेतली म्हणजे मी आस्तिक आहे का या प्रश्नाचे उत्तर तुमचा स्वतःबद्दलचा काय समज आहे किंवा लोक काय म्हणतात किंवा कारणे काय यावर अवलंबून नसून ते मनापासून श्रद्धा वाटते का यावर अवलंबून आहे.
स्वतःच्या किंवा प्रिय व्यक्तीच्या जीवावर बेतले किंवा तत्सम महत्वाच्या क्षणी ईश्वराची आठवण होते का? ईश्वर सर्व ठीक करेल असे मनापासून वाटते की नाही यावर तुमची आस्तिकता नास्तिकता ठरते. बाकी कुणी काही समजो.

>>हा लेख/स्फुट/काव्य/मुक्तचंद म्हणजे मोदी बाशींगच्या धाग्यांवरून पुरोगामी आयडीजचे लक्ष विचलित करण्याची भाजपेयींची चाल आहे! Lol

उलट ब्र.आ. तर भाजपेयी नाहीत असेच वाटत होते मला. Uhoh

छान स्फुट. असे प्रश्न पडले कि निसर्ग नियमानुसार सगळे घडते असे उत्तर द्यावे. निसर्ग नियम कसे तयार होतात? तर तेही निसर्गनियमानुसारच.

ते अजिब्बात भाजपेयी नाहीत.
पण हा लेख म्हणजे भाजपेयींचीच चाल! यात काही संशय असूच शकत नाही! Wink

- (आपल्या मतावर ठाम) इब्लिस.

धीरज काटकर तुमची लिंक वाचतो.

@ झक्की गुर्जी

मी आस्तिक आहे का या प्रश्नाचे उत्तर .......... ते मनापासून श्रद्धा वाटते का यावर अवलंबून आहे.
स्वतःच्या किंवा प्रिय व्यक्तीच्या जीवावर बेतले किंवा तत्सम महत्वाच्या क्षणी ईश्वराची आठवण होते का? ईश्वर सर्व ठीक करेल असे मनापासून वाटते की नाही यावर तुमची आस्तिकता नास्तिकता ठरते. बाकी कुणी काही समजो. >>>>

केवळ यावरच आस्तिक नास्तिक ठरत असेल ?
आस्तिक माणूस आस्तिक का आहे हे शोधण्यापेक्षा तो आस्तिक आहे याला त्याचे स्वतःचे विचार कारणीभूत आहेत की परंपरा ? पांगळे करणारी श्रद्धा मान्य करणे जरा अवघडच आहे, तसंच नास्तिक आहे म्हणून सगळंच नाकारणे हे देखील अवघड आहे.

@ बॉबी जासूस
स्विकारण्यासाठी जसं तर्कट आवश्यक आहे तसं नाकारण्यासाठीही. (मराठीत लिहीलं तर समजायला बरं पडेल. इथे माझ्यासारखे अशिक्षित बरेच आहेत हो Happy ).

कोनाला येडी घालून राहिले ?
<<
१. तुम्हाला नक्कीच नाही. येडी शहाण्यांना घालता येते. घालवेड्यांना नाही Wink
२. ती दोन्ही विधाने परस्पर विरोधी नाहीत.

(शब्दार्थ :
घालवेडा = वेड्याचे सोंग करणारा.)

एखाद्या लहान मुलाला ईश्वर ही संकल्पना (रूढ अर्थाने) सांगितलीच नाही तर मोठेपणी संकटकाळी तो ईश्वराचा धावा करेल काय ?

आठवलेजी,

मलाही अनेक वर्षे असेच प्रश्न पडत होते.

कारण लहानपणा पासून झालेले संस्कार, मन आणि बुद्धी त्या पलिकडे विचारच करु शकत नाहीत. खरेतर आपल्यासमोर चाललेल्या मुर्तिपुजा, कर्मकांडे यामधून सदसदविवेकबुद्धीला न पटणार्‍या गोष्टीतुन हे द्वंद्व चालू झाले. एकिकडे लहानपणापासून झालेले संस्कार आणि दुसरि कडे सदसदविवेकबुद्धीला न पटणारी कर्मकांडे यातून मला त्या सगळ्याच गोष्टी नकोशा झाल्या.

पण मग नंतर लक्षात आले की, मुर्तिपुजा आणि देव, धर्म आणि देव, कर्मकांडे आणि देव या सर्व वेगळ्या गोष्टी आहेत. देवाचा या सर्वाशी काहीही संबंध नाही. मुर्तिपुजा, कर्मकांडे हे सर्व मनुष्यनिर्मित आहे.

यजुर्वेद, ३२: ३, त्याची कोणतीही प्रतिमा नाही. ते अजन्म आहेत.
यजुर्वेद,४०:८, त्याला शरीर नाही.

जरा घाई मधे असल्याने थोडक्यात लिहिले. वेळ मिळाला की पुर्ण श्लोक शोधुन लिहितो.

पण तुम्ही स्वताच्या डोक्यातून आणि मनातून लहानपणा पासून झालेले संस्कार पुर्ण पणे काढून टाकू शकता का पहा. विचार करायला सोपे जाईल. देवाला किंवा देव या संकल्पनेला कोणताही धर्म, मुर्तिपुजा, देवळे, रुढी परंपरा या सगळ्यापासून वेगळा करुन विचार करा. कदाचित तुम्ही आस्तिक व्हाल.

@ झक्की जी
विपू पहावी. उत्तर दिले आहे.

@ अतरंगी - जरूर.
देव आहे की नाही हा माझ्या औत्सुक्याचा विषय नाही.
मी आस्तिक / नास्तिक का आहे ही श्रद्धा मी तपासून घेतलेली आहे का ?

माझ्या मते श्रद्धा म्हणलं कि तिथे वैज्ञानिक दृष्टिकोण, सदसदविवेक बुद्धी नाही. हे आहे असे आहे. उदा. माझी गणपतीवर श्रद्धा आहे. मग त्याचा जन्म कसा झाला, त्याला हत्तीचे डोके कसे काय? त्याला मोदक, जास्वंदचेच फुल कशावरुन आवडते ? आणि असे अनेक, ह्या असल्या प्रश्नांना जागा नाही.

जगात देव आहे हि belief system जर मानायची झाली तर देव आहे कि नाही? मग आहे तर का आहे , नाही तर का नाही. मला आलेले अनुभव, माझी विचारपद्धती, त्यातुन आपला निर्णय होउन belief system तयार होते.

तुमचा जन्म एखाद्या बेटावर झाला असता जिथे तुम्हाला हत्तीचे डोके असलेल्या देवाबद्दल माहीती मिळणे अशक्य आहे, आणि अचानक काही वर्षांनी गणपती या देवतेची माहीती मिळाली असती तर तुम्हाला प्रश्न पडले नसते का ? असो.

आस्तीक म्हणजे काय?
एक गूढ शक्ती असते यावर विश्वास ठेवणे म्हणजे आस्तिक. त्या शक्तिला, कान, नाक, डोळे, हात, पाय वगैरे अवयव गृहीत धरलेले नसतात. याचाच अर्थ 'एक शक्ती आहे' या काल्पनिक तत्वज्ञानावर विश्वास/ श्रद्धा ठेवणे म्हणजे आस्तिक. या व्याखेला अजुन सोपं करायचं म्हटल्यास ती अशी होईल...

"अज्ञात शक्तीबद्दल श्रद्दा बाळगणे म्हणजे आस्तिक"

आता नास्तिकांच म्हणणं काय असत बघा. देव, शक्ती, चमत्कार वगैरे काही नसते असे मानणारे म्हणजे नास्तिक. आस्तिक जसे असण्याच्या तत्वज्ञानावर विश्वास ठेवत असतात अगदी तसेच नास्तिक नसण्याच्या तत्वज्ञानावर विश्वास ठेवत असतात. थोडक्यात दोघांचीही एका अज्ञात तत्वज्ञानावर श्रद्दा आहे.

देव नाकारणे ही नसण्यावरची श्रद्धा... म्हणजे नास्तिक सुद्धा श्रद्धावानच... त्यामुळे व्यापक अर्थाने नास्तिक हा आस्तिकच.

तुमचा जन्म एखाद्या बेटावर झाला असता जिथे तुम्हाला हत्तीचे डोके असलेल्या देवाबद्दल माहीती मिळणे अशक्य आहे, आणि अचानक काही वर्षांनी गणपती या देवतेची माहीती मिळाली असती तर तुम्हाला प्रश्न पडले नसते का ?>>>>>>>>>>>>>

अर्थातच पडले असते. कारण गणपती विषयी माझ्या मनात श्रद्धा निर्माणच झाली नसती. देवाविषयी जे सिस्टिमॅटिक ब्रेन वॉशिंग माझं लहानपणा पासुन ईथे झालं आहे ते झालेलं नसेल.

गणपती, शंकर, दत्त, पींड म्हणजे आस्तिक भावनेचे दृश्य रुप होत. हे रुप त्या त्या प्रदेशातील चालीरितीना अनुरुप असे असतात. ते जगभर सापडतात. आस्तिकता म्हणजे गणपती नव्हे, तर आस्तिकता ही मनाची एक अवस्था आहे. ती अवस्था धर्म, राज्य, देश, प्रांत याच्या पलिडे जाते.

मनाला ही अवस्था का प्राप्त होत असते... हा संशोधनाचा विषय आहे.

एक ज्ञात कारण असुरक्षीत भावना मानले जाते.

पण अत्यंत सुरक्षीत आयुष्य लाभ्ले, मनाला स्थैर्य प्राप्त झाले तरी माणूस आस्तिक बनतो असेही अनुभव आहेतच!

अर्थातच पडले असते. कारण गणपती विषयी माझ्या मनात श्रद्धा निर्माणच झाली नसती. देवाविषयी जे सिस्टिमॅटिक ब्रेन वॉशिंग माझं लहानपणा पासुन ईथे झालं आहे ते झालेलं नसेल. >> Happy

एखाद्या लहान मुलाला ईश्वर ही संकल्पना (रूढ अर्थाने) सांगितलीच नाही तर मोठेपणी संकटकाळी तो ईश्वराचा धावा करेल काय ? >>>> माझ्या अनुभवाप्रमाणे याचं उत्तर नाही हेच आहे. (अर्थात संकल्पना सांगितली नाही म्हणजे नक्की काय यावरही हे अवलंबून असेल. आमच्या लहानपणी आम्ही घरात कधी कसली पुजा बघितली नाही. आई-बाबांना कोणत्याच मंदिरात जवून पाया पडताना बघतलं नाही. कर्मकांड-उपास इ तर दुरच. थोड्याश्या कळत्या वयामध्ये शेजार्‍यांबरोबर देवळात जाणं, गावी आज्जील/काकुला देवपुजा करताना बघणं हे सगळं झालं... ..

पण आता मोठं झाल्यावर अजूनतरी कुठल्याही संकटकाळी देवाची आठवण आली नाहीये.

तुम्ही नास्तिक असा कि आस्तिक असा हा तुमचा प्रश्न आहे परंतु माणुसकी असणे महत्वाचे आहे.

परंतु आस्तिक असलात तर मात्र माणुसकीला मर्यादा पडतात. प्रत्येक धार्मिक गोष्टीकडे तटस्थपणे पाहता येत नाही.

Pages