मी नास्तिक आहे असा माझा समज आहे.... पण

Submitted by ब्रह्मांड आठवले on 10 July, 2014 - 10:23

सामान्य माणूस नास्तिक असू शकतो का ?
कारण मी नास्तिक आहे, असा माझा समज आहे. मी नास्तिक असण्याने इतरांना त्रास होतोय असं आजवरच्या वाटचालीवरून वाटलं नाही. पण मी नास्तिक का आहे याची कारणं मला माहीत असलीच पाहीजेत असा आजूबाजूच्यांचा आग्रह का ?
मग मिळेल ते वाचावं लागतं. म्हणजे असं वाटतं की आपण इतरांच्या कटकटीला वैतागून वाचतोय हे सर्व..
पण खरं म्हणजे
माझ्या नास्तिक असण्याशी माझा अंतर्गत झगडा चालू असतो. निरंतर.
मग सगळी तत्त्वज्ञानं थोडी थोडी, झेपेलशी चाळून मेंदू बधीर होतो. वाचनासाठी डोळे खोबणीतून बाहेर येतात आणि झोप न झाल्याने आता आत खेचले जाऊन मेंदूला चिकटतात.
मग मेंदूचं कामकाज सुरळीत चालत नाही. जडत्व येतं
मग वाटतं या मेंदूच्या हार्डवेअरचा निर्माता कोण ?
याला सूक्ष्म डीसी करंट पुरवणारा जनरेटर कुठला ?
मेंदूचं विचाररुपी सॉफ्टवेअर आणि त्याची प्रोग्रामिंग लँज्वेग लिहीणारा तो अभियंता कोण ?

बाळ जन्मताना त्याचे एकेक अवयव तयार होणं
त्यात चैतन्य निर्माण होणं
मग पूर्ण आकार आल्यावर
आईशी नाळेनं बांधलं जाणं
आईने पचवलेलच बाळाला आयतंच मिळणं
आणि बाहेर आल्यानंतर
आईला पान्हा फुटणं
हा कुठला प्रेग्राम असेल ब्वॉ ?
जन्मण्याआधीच लिंग, स्वभाव, रंग रुप निश्चित होणं
आणि हे सर्व
या अफाट ब्रह्मांडातल्या एका सूर्य नामक ता-याच्या
जीवसृष्टी असलेल्या एकांड्या ग्रहावर

या अशा प्रश्नांची उत्तर मिळेनाशी होतात, तेव्हां मग भीती वाटू लागते.
स्वतःच्या नास्तिक असण्याची

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आस्तिक म्हणजे भय्/असुरक्षीतता यावरील एक उपाय... देव.
नास्तिक म्हणजे भय/असुरक्षीतता यावरील अनेक उपाय... तर्क.

गंमत म्हणजे जसे देव आहे हे सिद्ध करता येत नाही, तसेच तर्कही अधिकांशवेळी टिकत नाही.

पण नास्तिकाना छाती बडवायची सवय असते. त्यावर उपाय नाही.

नास्तिक होणे भित्रटांचे काम नाही>> नास्तिक आणि आस्तिक दोन्ही भित्रटपणाचेच लक्षण आहे. फक्त दोघांचे उपाय वेगवेगळे असतात. एक क्ल्पनेकडे धावतो तर दुसरा तर्काकडे.

भिती मात्र माणसाचा स्थायीभाव आहे.

अगदी चार-पाच महिन्याच्या बालकाचे निरिक्षण केल्यास असे आढळते की त्याला भिती व प्रेम या दोन गोष्टी व्यवस्थीत कळत असतात.

आस्तिक लोकांमध्ये स्वार्थी पणाचे प्रमाण जास्त असते. देवाने आपल्यावर कृपा करावी म्हणून तासंतास ते देवळाच्या रांगेत उभे राहतात.

देवाने आपल्यावर कृपा करावी म्हणून तासंतास ते देवळाच्या रांगेत उभे राहतात.>> त्यांच्या आकलनाप्रमाणे हे फलप्राप्तीचे कर्म असते. जसे की नास्तिकांच्या आकलना प्रमाणे ते याच फळासाठी वेगळा मार्ग चोखाळतात. तोडक्यात हा आकलन भिन्नतेचा प्रश्न असतो.

स्वार्थी पणा मात्र स्वतंत्र स्वभाव असून तो देवभोळेपणा वाल्याना फारसा जमणारा नसून तर्काचा खेळ खेळणा-या बुद्धीवंताना जास्त प्रभाविपणे खेळता येतो. कारण स्वार्थामध्ये दुस-याचे पळवायचे असते. त्यासाठी तार्कीक कसरतीतून पळविण्याचं मिशन पुर्ण करायचं असतं.

ढोंगी महाराज आस्तिक लोकांचे शारीरिक नि आर्थिक शोषण करू शकतात >> ही ढोबळ वाख्या झाली.

बाबांच्या आतील ढोंगीपणा व अढोंगिपणा हा तर्कावर सोडविता येणारा प्रश्न नाही. त्यामुळे हा तर्कातील दोष मानून हे मापदंड बाबांसाठी गैरलागू ठरवावे.

बाबांची जेन्यूअनिटी मोजण्यासाठी वेगळ्या मापदंडाची गरज आहे.
ते कोणते? माहीत नाही!
पण तर्क मात्र नक्कीच नाही!

नास्तिक वा अस्तिक असणे हा आपापल्या श्रद्धेचा भाग आहे अशी समन्वयवादी भुमिका घेतली जाते ती मला पटते. त्यामुळे संवाद रहातो. असो
श्रद्धा -धार्मिकांचा प्लासिबो हा प्रभाकर नानावटींचा लेख या अनुषंगाने जरुर वाचा

आपल्या देशातील जातीभेद ,उच्चनीचता, अंधश्रद्धाळू पणा, बुवाबाजी, भ्रष्टाचार करणे नि पावन होण्यासाठी एखाद्या नदीत आंघोळीचा पर्याय ठेवणे हि सर्व आस्तिक लोकांचीच देशाला मिळालेली देन आहे.

बाबांची जेन्यूअनिटी मोजण्यासाठी वेगळ्या मापदंडाची गरज आहे.
ते कोणते? माहीत नाही!
पण तर्क मात्र नक्कीच नाही!>>>> बरोबर आहे ह्यावर उपाय तर्क अजिबात करायचा नाही त्या बाबाचे डोळे मिटून भक्त बनायचे. मग शारीरिक अथवा आर्थिक शोषण झाले कि आपोआपच कळते बुवा जेनुईन आहे कि नाही. वा क्या बात है!

आपल्या देशातील जातीभेद ,उच्चनीचता, अंधश्रद्धाळू पणा, बुवाबाजी, भ्रष्टाचार करणे नि पावन होण्यासाठी एखाद्या नदीत आंघोळीचा पर्याय ठेवणे हि सर्व आस्तिक लोकांचीच देशाला मिळालेली देन आहे.>> चूक.

नास्तिक व आस्तिकता हे भितीवरील दोन भिन्न उपायांचे नाव आहे.

जातीभेद ,उच्चनीचता, बुवाबाजी, भ्रष्टाचार>> नैतिक वर्तनाच्या अभावाचे लक्षण आहे.

अंधश्रद्धाळू पणा>> हा तार्कीक लोकांचा आस्तिकावरील चार्वाक काळापासूनचा पारंपारीक आरोप आहे.

दोन्ही विषयांचा परस्पर संबंध नाही!

हातोडावाला आणि पगारेजी,
आपण दोघांनी व्यवस्थित,पूर्ण आस्तिक आणि नास्तिकच्या व्याख्या २-३ ओळीत द्य बरं आधि.मग पुढे चर्चा चालू दे.
फक्त व्याख्यच द्या.व्यवहारात अस्थित्वात असलेली आणि तुम्हाला मान्य असलेली व्यख्या.
हे पहा अशा-
१)आस्तिक- ...........
२) नास्तिक- ................
याला म्हणतात.

आस्तिक लोकांना आयुष्यभर कुबड्या लागतात...>> हो, अन नास्तिकानाही लागतात. त्याला तर्क असे म्हटले जाते, एवढेच!

आस्तिक- याचे नाव घेतल्यावर माणसाला साप चावत नाहीत
नास्तिक- याचे नाव घेतल्यावर सापाला काय ढिम्मं फरक पडत नाही.
Happy

हतोडावाला यांनी आधी म्हटल्याप्रमाणे आस्तिक आणि नास्तिक या दोघांची आपापल्या विचारांवर श्रद्धा असते.देव किंवा स्वतःचे विचार!
कोणीतरी पाठीशी आहे या विचाराने आस्तिक मंडळींचे जगणे जास्त सोपे असावे.आईवर विसंबले की मूल निश्चिंत होते त्याप्रमाणे. तुलनेत नास्तिकांना स्वतःशी आणि आस्तिक मंडळींशी झगडावे लागते.

एखाद्या लहान मुलाला ईश्वर ही संकल्पना (रूढ अर्थाने) सांगितलीच नाही तर मोठेपणी संकटकाळी तो ईश्वराचा धावा करेल काय ?>>>>>>> कठीण आहे.माझ्या लेकाच्या लहानपणी देवासमोर दिवा लावून शुभंकरोतीचे प्रयोग करण्याचे प्रयत्न केले.पण तो निरांजनावर फुंकर घालायचा ,हॅपी बर्थडे म्हणून! शेवटी संस्कारवर्ग आवरते घेतले.मग बाकी काय सांगू! माझाच विश्वास नव्हता/नाही . दिवा लावणे वगैरे बाबी नवर्‍यासाठी करायची. आता तो पण नास्तिकतेकडे झुकला.

आई नास्तिक ,पण भाऊ लहानपणापासून आस्तिक होता त्याने गणपती घरी आणायला सुरुवात केली. आईकडे ,गणपतीच्यावेळी घरात फुले,उदबत्ती यांचा संमिश्र सुवास खूप आवडायचा.ते वातावरण खूप छान वाटायचे.

तरीही मला संध्याकाळी देव्हार्‍यात लावलेले निरांजन दिसले की प्रसन्न वाटतं हे खरं.
लहानपणापासून झालेले प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष संस्कार आपला नकळत ताबा घेतात.

पोस्ट भारीए देवकीताईंची.आस्तिक मंडळींशी झगडावे लागते.<<< Lol
हतोडावाला,त्या म्हणण्याचा अर्थ असा की ह.वा. आयडी मागचा चेहरा,कळला कोण आहे.. Wink
(मला हे वाक्य लिहीताना 'देजा वू' अनुभवलं. )

आस्तिक आणि नास्तिक चर्चेचा कोणत्याही एखाद्याच धर्माशी संबंध नसावा असे वाटते.
वर बरेचसे मुद्दे हे केवळ हिंदू धर्माबद्दलच दिसत आहेत म्हणुन विचारले.
अन्य धर्मांमधे पण अशी चर्चा होत असेल काय ? असल्यास कोणात बदल (आ.ना.) होत असेल काय ? Uhoh

पण नास्तिकाना छाती बडवायची सवय असते. त्यावर उपाय नाही.
<<
आस्तिकांना काय बडवायची सवय असते बा?
*
महेश,
इंग्रजी, फारसी, उर्दू वाचता येत असल्यास इतर धर्मांतील चर्चांचे दुवे देतो.

वि.दा. - मला खरच ही शंका आहे. कारण अन्य धर्मांमधले बहुसंख्य लोक फार काटेकोरपणाने त्यांच्या धार्मिक गोष्टींवर श्रद्धा ठेवून पालन करत असतात, मग त्यांच्यात नास्तिक नसतातच का ? असले तरी त्यांना त्यांची मते अशी उघडपणे व्यक्त करता येतात का, किंबहुना धार्मिक गोष्टींचे पालन न करण्याची मुभा मिळत असेल का ? इ. इ.

>>इंग्रजी, फारसी, उर्दू वाचता येत असल्यास इतर धर्मांतील चर्चांचे दुवे देतो.

इंग्रजी येते, फारसी फारशी काय अजिबातच येत नाही, आणि उर्दू चा दूर दूर तक संबंध आला नाही कधी.
देऊन ठेवा दुवे, अब दवा की नही दुवा की जरूरत है. Lol

तर्क केला नाही तर माणसात नि जनावरात फरक काय?>> अमुक तर्काच्या आधारे तमूक अंतीम निष्कर्ष हे मला नाही.
...............
जनावर अनेक बाबतीत माणसापेक्षा श्रेष्ठ आहे दादा. आठ दिवस जनावराच्या कळपात राहून बघा. माणूस असल्याची लाज वाटेल.

साधी गोष्ट आहे महेश... गूगल सर्च मारला की पाहीजे ते मिळतं...आख्या विश्वात माबो एकमेव फोरम असल्यासार्खे विचारताय हो.एवढं तरी निदान माहित असावच किंवा असतंच ना?
(बादवे,पेडगावचा पत्ता काय हो? ) Wink

जनावरांना मध्ये आणू नका प्लीज. नास्तिक माणूस तर्कापेक्षा सत्यावर जास्त विश्वास ठेवतो.निदान तो ढोंगी आणि दांभिक तरी नसतो हो.
तर्क तर्क करताय,एक उदाहरण देता का? कसला तर्क करतो नास्तिक? म्हणजे नीट समजवं म्हणून...

Pages