गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यासंदर्भात शंका

Submitted by मी अमि on 27 June, 2014 - 00:45

गणेशचतुर्थी दिवशी प्रतिष्ठापित केलेल्या मुर्तीचे ठरलेल्या दिवशी समुद्रात/ नदीत/ तळ्यात विसर्जन करणे गरजेचे असते का?
समजा धातुच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केली आणि तिचे घरीच प्रतिकात्मक विसर्जन केले तर नाही चालत का? तिच मुर्ती पुढल्या वर्षि प्रतिष्ठापित करु शकतो का?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

समजा धातुच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केली आणि तिचे घरीच प्रतिकात्मक विसर्जन केले तर नाही चालत का? तिच मुर्ती पुढल्या वर्षि प्रतिष्ठापित करु शकतो का?<<<< चाल्तंय. गणप्तीबाप्पा काही म्हणत नाही. फक्त "पार्थिव गणपती" असे मंत्र म्हणायचे नाहीत. आणि उत्तर पूजा व्यवस्थित करायची. अधिक माहिती भटजी देऊ शकतील.

चालतंय काय पळतंय.. भरपूर ठिकाणी असे करतात. माझा काका अमेरिकेत असेच करतो.. गणेश चतुर्थीला व्यवस्थित साग्रसंगीत प्रतिष्ठापना करा आणि विसर्जनाच्या दिवशी योग्य पद्धतीने उत्तर पूजा करुन विसर्जन करा.. आणि मग ती मूर्ती योग्य जाग बघून घरात ठेवा.. हे कसे करायचे ह्याचे अँड्रॉईड अ‍ॅप पण आहे..

समुद्रात/ नदीत/ तळ्यात विसर्जन करणे गरजेचे असते का? << स्वच्छ बादलीत स्वच्छ पाण्यात विसर्जन केले तरी चालेल की, विसर्जन केल्यावर जमलेली माती कुंड्यांमधे घालायची,

आमच्या घरी आम्ही गेली ८-१० वर्षे पंचधातूची मुर्तीच पुजतो. एक बर्‍यापैकी मोठी व एक पुजेची लहान. लहान मुर्तीचे विधिवत पुजन करुन विसर्जनाच्या दिवशी घरतुन बाहेर, अंगणात आणून धातुच्या घंगाळात पाणी घेवून ती मुर्ती त्यात ३ वेळा बुडवून बाहेर काढतो. (जसे तलावावर विधीवत करतात तसेच, मंत्रोच्चारासह) आणि पुन्हा घरात आणून दोन्ही बाप्पा धुवून पुसून पॅक करुन बॉक्समध्ये ठेवून देतो, पुढील वर्षासाठी. हे सगळे भटजींच्या सल्ल्यानुसारच करत आहोत. त्यानंतर उत्तर्पुजाही करतो.
विसर्जनानंतर गणेशमुर्तींची जी विटंबना समुद्रावर वगैरे दुसर्‍या दिवशी पहायला मिळते ते पाहून हा निर्णय घेतला.
इको-फ्रेंडली बाप्पाचा

मला एक प्रश्न विचारायचा आहे. आमच्याकडे म्हणजे सासरी आमचे लग्न झाल्यावर गौरी गणपती बसवतो आहोत. मुंबईला सासू सासरे दिर जाउ असतात. आम्ही ३ वर्शापासुन पुण्याला आहोत. आम्ही मोठे असल्याने या वश्रीपासुन आमच्या घरी गौरी गणपती बसवणार आहोत. आमच्याकडे पितळीचा मुखवटा आहे तर या वर्शापासून आमच्या घरी शाडूचा मुखवटा स्थापना केली तर चालेल का?

सासू सासरे आहेत ते मोठे घर. गौरी तिथेच येतील.
घरी जे मुखवटे आहेत, (पितळी) तेच पुढे सुरू ठेवायचे असतात. एकतर तिथून घेऊन या, किंवा तिथेच बसवत जा
Happy

समजा धातुच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केली आणि तिचे घरीच प्रतिकात्मक विसर्जन केले तर नाही चालत का? तिच मुर्ती पुढल्या वर्षि प्रतिष्ठापित करु शकतो का?<<<< चाल्तंय. गणप्तीबाप्पा काही म्हणत नाही. फक्त "पार्थिव गणपती" असे मंत्र म्हणायचे नाहीत. आणि उत्तर पूजा व्यवस्थित करायची. अधिक माहिती भटजी देऊ शकत +१११११

माझ्या घरी पण धातुची मुर्ती आहे. मी गणेशउत्सवात प्रतिष्ठापना करुन प्रतिकात्मक विसर्जन करतो.

पार्थीव मुर्ती आपल्या हाताने बनविणे हा या व्रताचा गाभा आहे. कालमान परत्वे हे शक्य नाही म्हणुन आपण विकत आणतो. प्रतिष्थापना आणि विसर्जन हे मंत्र आहेत. या मंत्राच्या उच्चाराने आपण मुर्तीत आपले प्राण स्थापित करतो ही कल्पना आहे. व्रताच्या समाप्तीला मंत्राने आपण मुर्तीचे विसर्जन करतो.

जे गणेशतत्व आपण प्रतिष्ठापित केलेले असते ते व्रतानंतर पुन्हा आपल्या स्वरुपात परत जाते. रहाते फक्त मातीची मुर्ती. अशी मुर्ती जास्त काळ सुस्थितीत राहु शकत नाही म्हणुन जलात विसर्जन करायचे असते.

मुर्ती जर धातुची असेल तर व्रताच्या कालावधीत प्रतिष्ठापना करुन व्रतसमाप्तीनंतर विसर्जनाचे मंत्र म्हणुन पुन्हा पुढच्या वर्षी प्रतिष्ठापीत करता येईल. जलात विसर्जन करण्याची आवश्यकता नाही.

( माझ्या मते ) ही मुर्ती रोज देवपुजेत असु नये. रोजच्या पुजेतल्या मुर्तीची प्रतिष्ठापना वेगळी असते.

जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा.

परकाया प्रवेशाचे प्रकर्ण वाटते आहे हे अरेरे
एक आयडी का आत्मा किसी दुसरे के अंग मे

काय कमेंट आहे. मी धन्य झालो.

परकाया ? आपण सगळेच आणि ब्रम्हांडातल्या सर्वच गोष्टी परमेश्वर निर्मीत आहेत. अस असेल तर परमेश्वराचे स्वरुप असलेल्या श्रीगणेशाला मातीची मुर्ती परकाया कशी असेल ?

परकाया हा शब्द दुसर्‍याच्या आत्माचे अस्तित्व असताना त्याच्या शरीरात शिरुन त्यावर अधिकार चालवणे याला म्हणतात.

कोणीतरी शंका विचारतोय, दुसरा उत्तर देतोय यात तिसर्‍याने बहुमोल माहिती वाढवावी का भलतेच लिहावे ? आपला नसेल परमेश्वरावर विश्वास म्हणजे आपण दुसर्याच्या मतांचा, श्रध्देचा अनादर करावा असे आहे का ?

सासू सासरे आहेत ते मोठे घर. गौरी तिथेच येतील.>> आणि सासु सासर्‍यांनीच हात झटकले असतील तर
>>>> हात नाहि झटकले आता ती जबाबदारी तुम्ही घ्या म्हणतात. म्हणजे आम्हीच करत असतो दरवर्शी मुंबईला. या वर्शापासून घर बदलणार गौरी गणपतीसाठी. तर चालेल का शाडूचा मुखवटा??

विद्या१, सगळं चालतं. आपल्या मनात कुठलही किल्मिष असु नये. माझ्या गावी ५ दिवसांचा गणपती असे. मला ५ दिवस गांवी राहाणं शक्य होत नसे. गावच्या काकांचा विरोध पत्करुन मी दीड दिवसांचा गणपती ठेवायला सुरुवात केली. काही होत नाही.

जे गणेशतत्व आपण प्रतिष्ठापित केलेले असते ते व्रतानंतर पुन्हा आपल्या स्वरुपात परत जाते. रहाते फक्त मातीची मुर्ती. अशी मुर्ती जास्त काळ सुस्थितीत राहु शकत नाही म्हणुन जलात विसर्जन करायचे असते.
बरोबर आहे. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्यावर त्याच्यात ईश्वरीय तत्व अवतरता. विसर्जनाच्या मंत्रानंतर ते तत्व बाहेर निघून जातं. त्यामुळे मूर्ती नदीत , तलावात बादलीत कुठेही विसर्जित केली तरी चालते.
विसर्जनाचे मंत्र कोणाला माहित असतील तर प्लीज द्या.

बादलीत कुठेही विसर्जन करावे या मताचा मी नाही. अनिसने खास दगडाच्या खाणित विसर्जन आणि मुर्तीदान इ प्रकार आणले होते जे मला वैयक्तीक रित्या चांगले वाटले नाहीत.

खास शाडु मातीची आणि नैसर्गीक रंगाची मुर्ती घ्यावी म्हणजे विसर्जनास आणि पर्यावरणास धोका रहाणार नाही. समुद्र, तलाव किंवा नदीतच विसर्जन केल्यास आपल्या मनास वाईट वाटत नाही.

समुद्रात आणि उथळ नदीत काय होते याची कल्पना आहे. पण बादली नाही पटत.

जुन्या मुखवट्यांचं काय करणार मग? अन कोठ्यांचं काय असतं तुमच्याकडे? अनेक चालीरीती घरानुसार बदलतात. सासूबाईंना एक शब्द विचारा की!
आपल्या घरातली प्रथा आपण आहे तशी चालू ठेवायची की बदलायची, त्याला आपणच मुखत्यार असतो. फक्त अशा बाबींत घरातले वयस्कर लोक दुखावणार नाहीत याची काळजी घेतली की झाले.

असल्याने या वश्रीपासुन आमच्या घरी गौरी गणपती बसवणार आहोत. आमच्याकडे पितळीचा मुखवटा आहे तर या वर्शापासून आमच्या घरी शाडूचा मुखवटा स्थापना केली तर चालेल का?>>> बदलायच काही खास ़ कारण आहे ़का? कारण गौरी च विसर्जन हे प्रतिकात्मक असत, त्यामुळे तुम्हाला मुखवटा विसर्जित करता येत नाही.शाडुचा मुखवटा नाजुक असतो काळजीपुर्वक हाताळाव लागतो.

अवांतर..
जुने पितळी मुखवटे जरा उग्र दिसतात. विद्या ताईंना बहुतेक शाडूच्या सुंदर सुबक मुखवट्यांची भुरळ पडलेली दिसते आहे. काय बरोबर ना?

>>>> मला एक प्रश्न विचारायचा आहे. आमच्याकडे म्हणजे सासरी आमचे लग्न झाल्यावर गौरी गणपती बसवतो आहोत. मुंबईला सासू सासरे दिर जाउ असतात. आम्ही ३ वर्शापासुन पुण्याला आहोत. आम्ही मोठे असल्याने या वश्रीपासुन आमच्या घरी गौरी गणपती बसवणार आहोत. आमच्याकडे पितळीचा मुखवटा आहे तर या वर्शापासून आमच्या घरी शाडूचा मुखवटा स्थापना केली तर चालेल का? <<<<<
काहीच हरकत नाही.
माती ऐवजी धातू, तो देखिल पितळ नन्तर सोनेचान्दी वगैरे लक्षणे आपल्या सूप्त मनात आपण "प्रगतीची" मानत असलो तरी इथे त्याचा काहीही संबंध नाही. पितळी मुखवट्यानन्तर मातीचे मुखवटे कसे करू हाच प्रश्न प्रामुख्याने निर्माण होतो.... तर तसे काहीही नसते.
अगदी शास्त्रानुसारच बघायचे तर स्वहस्ते मातीचे बनविलेलेच हवेत, ते नसतील, तर बनवुन घ्या, मातीचे तकलादू वाटतात, तर धातुचे घ्या, धातू मधे जरा श्रीमन्ती दाखवायची तर सोने चान्दीचे घ्या अशी ही आपली अध्यात्मिक प्रगती आहे......
तेव्हा विनासंकोच, कसलीही भिती न बाळगता, जे सोईचे असेल ते करावे, मात्र जे कराल ते श्रद्धेने निष्ठेने करावे हे उचित.

बहुतेक सर्व धार्मिक विधी त्यावेळेस रचले गेले जेव्हा मातीची भान्डीकुन्डीच वापरली जायची, अन त्यामुळेच (मातीच्या) कलशास (बळकटीकरता) "सूत्रवेष्टन" हा विधी आहे, व आजही शाबुत असून तो चक्क ताम्ब्याच्या कलशास वापरला जातो हा विरोधाभास आहे... !
येऊन जाऊन, अन्त्येष्टीवेळचा मडक्यात अग्नि नेणे, व पाण्याने भरलेल्या मडक्यास तिनवेळा छिद्र पाडून चितेभोवती पाण्याची धार टाकत प्रदक्षिणा घालणे हा विधी मात्र जसाच्या तसा राहिला आहे... कदाचित अन्त्येष्टीवेळेस, ताम्बेपितळ/सोनेचान्दी याची सुबत्ता दाखविण्याचे आजवर कोणा महाभागास सुचले नसेल...
पण आचरट अन्निसवाले कसाचित सुचवु शकतील की मडके वाया घालविण्या ऐवजी ताम्ब्यापितळ्याच्या कलशास तिन तोट्या बसवुन प्रत्येक प्रदक्षिणेवेळेस तोट्या सोडुन धार पाडावी व तोच कलश पुन्हा पुन्हा वापरावा.... Proud Lol Wink

याव्यतिरिक्त, नवरात्रात आजही मातीचाच कलश स्थापन केला जातो, ज्यात,/आजुबाजुला माती घालून विशिष्ट बीबियाणे/धान्ये रुजविले जाते, व नऊ दिवसात उगविलेल्या/आलेल्या कोम्बाप्रमाणे पिकान्चा अन्दाज बान्धायची प्रथाही काही ठिकाणी आहे.

पण बहुतेक शहरी ठिकाणी प्रथेचा मूळ अर्थ बाजुला राहून केवळ निरर्थक उपचार शिल्लक असतो असेच दिसते.
पण त्यास निरर्थक तरी का म्हणावे?
मूळ अर्थ गेला तरी भक्ताच्या मनात जर तितक्याच तीव्रतेने भक्तिभाव / श्रद्धा उमलत असतील, तर चालू उपचारही निरर्थक का ठरवावेत?
हां, अन्निस वाल्यान्च्या पोटात जरुर दुखते अशामुळे, पण त्याला इलाज नाही. नै का? Wink

>>>> हात्तिच्या!
इब्लिस आयडीने प्रतिसाद पडला का तो? सॉरी हं. libutimbu ने द्यायचा होता. अरेरे चुकलंच जरा.. <<<<

"एम" विसरलात.... limbutimbu असे आहे स्पेलिन्ग माझ्या आयडीचे......
अन ते जाऊदे, ही अवदसा का आठवावी तुम्हाला? तुमची साडेसाती सुरू झालीये की क्कॉय?? Proud

थोडे अवांतर - माझ्या एका मैत्रिणीच्या घरी पद्धत अशी की गणेश चतुर्थीला प्रतिष्ठापना करतात आणि दुसर्‍या वर्षी हरतालिकेच्या दिवशी विसर्जन करतात. मग गणेश चतुर्थीला नवीन मूर्ती आणतात. कोणी ह्या पद्धतीवर प्रकाश टाकू शकेल का?

>>>> थोडे अवांतर - माझ्या एका मैत्रिणीच्या घरी पद्धत अशी की गणेश चतुर्थीला प्रतिष्ठापना करतात आणि दुसर्‍या वर्षी हरतालिकेच्या दिवशी विसर्जन करतात. मग गणेश चतुर्थीला नवीन मूर्ती आणतात. कोणी ह्या पद्धतीवर प्रकाश टाकू शकेल का?<<
अतिसन्कटकाळी, वा विशिष्ट उद्देश/नवस ठरवुन, जसा देव पाण्यात बुडवुन ठेवतात, तसेच आणलेल्या गणेशाची पाठवणी न करता घरातच वर्षभर ठेवून पूजायचे असेठेवून, देवास "सन्कटात" टाकणे , अशा स्वरुपाची ही पद्धती आहे.
अज्ञानामुळे वा आवडल्यामुळे वा चांगले परिणाम दिसुन आल्याने मूळ नवस्/कारण जरी पूर्ण झाले तरी भाविक ती प्रथा तशीच चालू ठेवतो व पुढील पिढ्या मागच्यान्चे अनुकरण करतात.
माझे मते, मूळ कारण, जसे की संकटनाश/संततीप्राप्ती वा असेच काहीही नवस, जर नवसाचे ते ते फळ मिळाले असेल, तर अशी प्रथा कायमकरता सुरू ठेवू नये हे तुम्ही तुमच्या मैत्रिणीस सान्गावे. Happy

लि.न्बु! आमच्याकडे माहेरी घरातली स्त्री पेग्नट असेल तर त्यावर्शी गणपती विसर्जन केले जात नाही .. दहाव्या दिवशी गणपती आरती करुन एखाद्या सहज हात न लागेल अशा सुशोभित जागी प्रतिस्थपीत ़केला जातो.. वर्शभर त्याची दर सकश्टीला आरती केली जाते.. पुधिल वर्शी त्याची प्रतिस्थपना त्यावर्शीच्या गणपती मुर्तीबरोबर करतात.. मग १० दिवसाने दोन्ही मुर्तॉचे विर्सजन केले जनाही) याला कुठल्याही नवसाचा बॅक ग्राउन्द नाही... एरवी एकच मुर्ति आणली ़जाते..
( त्या पुर्ण वर्शात गावाला वैगरे जाताना घर ब.न्द करुन सगळ्या.ना जाता येत नाही)

>>>>> आमच्याकडे माहेरी घरातली स्त्री पेग्नट असेल तर त्यावर्शी गणपती विसर्जन केले जात नाही .. <<<<
या प्रथेस धार्मिक शास्त्राधार नसुन ही मात्र "अन्धश्रद्धा" या सदरात मोडू शकते. स्पष्टच शब्दात सान्गायचे तर व्रात्य बोलिभाषेत सम्बन्ध आणत असले तरी "गणपती बसविणे" व "गर्भ रहाणे" याचा सूतराम संबन्ध नसल्याने गणपती विसर्जन केल्यास गर्भास धोका होईल अशा काहीशा अडाणी विचारातुन ही प्रथा रुजली आहे. तुमच्या घरात पन्चायतन असते, पन्चायतनात गणपती असतोच, मग भादव्यातला पाहुणा गणपती त्याच्या वेळेस परत पाठवला तर बिघडते कुठे? असो.

Pages