फळांचा गुच्छ - एक उत्तम स्टार्टर

Submitted by गोपिका on 1 July, 2014 - 11:08

मुलीचा वाढदिवसानिमित्त बनवला होता हा गुच्छ...बच्चे कंपनी विशेष तुटून पडली ह्यावर.मोठे ही खाल्ले.नंतर पिझ्झा आणी केक खाऊन कॅलरीस वाढव्ल्याचि अपराधि भावना कोणाचा चेहर्यावर नव्हति Proud

१. आधी कलिंगड व्यवस्थित कापून घेतल....
२. अनन्स व किवि कापून घेतल
३.फोटोत दाखवल्या प्रमाणे फळे काड्यांध्ये टोचुन घेऊन ते नंतर कलिंगड्यावर सजवावे

टिप्स :कलिंगड शक्य तेवढ उशीरा कापवे(कार्यक्रमाचा ४५ मिन्स आधि). जेणे करून त्याचा ताजे पणा टिकून राहिल.
लवकर कापणार असाल तर फ्रिज मध्ये न ठेवता त्यावर प्लस्टिच ने झाकावे.फ्रिज मधे ठेवल्यास त्याला सुरकुत्या पडून,त्याचा ताजे पणा निघून जातो.
बाकिचि फळे सकाळिच स्किवर ला टोचुन फ्रिज मधे ठेवली होति.ऐन वेळेला ति कलिंगड्यावर सजवलि
फोटो खूप घाईत काढले आहेत.

Fotor070192631.jpgFotor070192829.jpgFotor070193248.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदा जेली, चीज आणि पाईनअ‍ॅपल असा काँबो करुन बघा.>>>> जेलीच्या जागी स्ट्रॉबेरी सुद्धा चांगली लागते.. पण चीज मस्ट .. तसेच सर्व्ह करताना एखाद्या थाळीत बर्फाचे खडे वा चुरा घेऊन त्यात थोडावेळ ठेवायचे मस्त थंड व्हायला .. आणि थंड होईपर्यंत आपल्या संयमाची परीक्षा घ्यायची Proud

बाकी हे वरचेही सहीच दिसतेय, पटकदिशी तुटून पडावेसे.. Happy

खूप मस्त दिसते आहे. कलिंगडाची परडी ही छान झाली आहे. फक्त एक सांगावेसे वाटते आहे की ते शेवटचं द्राक्ष आरपार घातले नसते तर शेवटी दिसणार्‍या काड्या दिसल्या नसत्या आणि अजून छान दिसले असते.

मुलीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!

सुंदर आहे. कलिंगडाची परडी कापताना कडेच्या बाजूने /\/\/\/\/\/\ असे कापत गेले तर अजून सुंदर दिसेल. वेळ लागतो पण पार्टीमधे एक्दम भाव खाऊन जातो हा शो पीस. Happy

मस्त.