या जेवायला ! दोन पदार्थ जास्तीचे वाढलेत.

Submitted by दिनेश. on 30 June, 2014 - 09:36

बर्‍याच दिवसात जेवायला आला नाहीत ना, आज या ! साधेच पदार्थ आहेत. गोड मानून घ्या !

अपेटायझर म्हणून माझे आवडते ड्रिंक - टोमॅटो ज्यूस ( त्यात सोया सॉस, मिरपूड, साखर, तिखट आणि बर्फ )

१) तीळ लावलेली भाकरी, वांग्याचे चिंचेच्या कोळातले भरीत

२) दम आलू

३) ग्रील्ड भेंडी

४) इंडोनेशियन करे ( तयार मसाला वापरून ) आणि नूडल्स

५ ) इंडोनेशियन भात ( नासी कुनींग ) यात आले, लसूण, मिरची वाटून घातलेले असते. मी तयार मसाला वापरलाय.

६) खसखस पेरलेली भाकरी.. आणि शेज्वान पोटॅटो

७) उतप्पा, सांबार आणि चटणी

८) अख्खा मसूर आणि भात

९) भाजूक तूकड्या

१० ) चटणी भाकरी

११) कोबीचे भानोले

१२) उकडपेंडी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझे ताबडतोब वार लावून घ्या दिनेश! सकाळच्या नाश्त्यापासून ते डिनरपर्यंत! हे सगळं आणि आधीच्या सगळ्या मेजवान्या तर पाहिजेतच, शिवाय फर्माईशी पण करणार.. वारावर जेवायला असूनही Happy

अगआईगं अजुन मोजुन ७५ मिनिटे आहेत जेवायला जायला. काय करु आता Uhoh
दिनेशदा, असल्या धाग्याच्या हेडरमधे कधी पहावे यासाठी सुचना द्या बरे. जसे जेवल्यावर / नाश्ता झाल्यावर इ.

बाकी पदार्थ बनवायला घेतलेली मेहेनत रंग लाई है. Happy

मला............ भुक................लागलीये.........................

ओ एम जी... दिनेश.............. क्या बात है...

त्या नासी कुनिंग ला त्रिकोणी आकार केला कि ओरिजिनल दिसेल अगदी..

इंडोनेशियन फूड.. यम्मी...

आणी सर्व फोटो महा तोंपासु आहेत...

व्वा! तोपासु..... मसुर डाळ आणि भात / भरीत भाकरी काय ! आणि डेझर्टस कुठे आहेत? गोड तर
पाहिजेच बुवा! Happy

मस्त

दिनेशदा...आमचा नमस्कार स्विकारावा! आम्हाला अजुन इतका उरक नाहीये आणि तुम्ही इतक्या आवडीने हे एकेक पदार्थ केलेत.

इब्लुभौ... दिनेशदांना 'भगराळी' आणि 'आसट' शब्द समजलेत बरं!! Proud

आता खरंच विचार करायला हवा मला.. कुणी सुरु केलाच उद्योग तर सल्लागार म्हणूनही काम करेन !

आता कसं, मला पोट भरल्यासारखं वाटतंय.

आम्ही हॉटेल सुरु करतो मुंबई आणि पुणे यांच्या सुवर्ण मध्यावर>> म्हणजे बदलापुर काय रे?? Proud

पिंपरी चिंचवडच्या ऐवजी "विक्रोळी" टाका>> तुमच्याकडे कुठे आहे देहु आळंदी??
उअगाच आपलं कैतरी. Wink

तुम्हाला माझ्या घरातली एक रूम फ्री मध्ये राहिला देते.>> त्यांच्या येरीयात गुन्डगिरी असते.
नकोच तिकडे. Wink

तुम्हाला माझ्या घरातली एक रूम फ्री मध्ये राहिला देते.>> त्यांच्या येरीयात गुन्डगिरी असते.
नकोच तिकडे. :डोळा मारा:
>>>
तुम्ही माझ्या घरी दर वीकेण्ड्ला गटगला या.... झालं तर!
बघा विचार करा Wink

दिनेशदा, आपलं फिक्स का मग? Proud

दिनेश....

तुम्हाला माहीतच आहे की ब्रेन ऑपरेशनंतर माझ्या खाण्यापिण्याचे वांधे झाले आहेत आणि गेले वर्षभर अगदी गवत खावून राहिलो आहे मी, पथ्यपाण्यामुळे.....

.....तेव्हा आता ह्या सार्‍या लज्जतदार डिशेस पाहिल्यावर मी सार्‍या पथ्यपाण्यावर पाणी सोडायला तयार आहे.... तरी कोल्हापूरात सेंटर सुरू करायचा तुम्ही गंभीरपणे विचार करा....!

पुण्यात शाखा उघडण्याबद्दल मनी विचार येऊ देवू नका.....

दिनेशदा, अत्याचार आहे हा..... नुसते फोटो नका दाखवू... प्रत्यक्षात खायला द्या प्लीजच....कधी आहे तुमची भारतवारी.... माझ्या घरी गटग करु तुम्ही येणार असाल तर..... सगळी पूर्वतयारी करुन ठेवेन पण मुख्य काम तुमचेच हां...

छे गारढोण कडक सँडविच कसेबसे गिळत हे असले फोटो पाहणं म्हणजे अन्याय आहे. निषेध!!
तुम्ही आमच्या कंपनीच्या कॅफेचा चार्ज घ्या बघु. रोज चांगले खायला तरी मिळेल. Happy

अशोकमामा कोल्हापुर का म्हणून? दिनेशदा आमच्या मुंबईचे आहेत त्यामुळे पहीला मान हॉटेलचा इथे. मग शाखाविस्तार करू देत कोल्हापुर, पुणे वगैरे.

Pages