या जेवायला ! दोन पदार्थ जास्तीचे वाढलेत.

Submitted by दिनेश. on 30 June, 2014 - 09:36

बर्‍याच दिवसात जेवायला आला नाहीत ना, आज या ! साधेच पदार्थ आहेत. गोड मानून घ्या !

अपेटायझर म्हणून माझे आवडते ड्रिंक - टोमॅटो ज्यूस ( त्यात सोया सॉस, मिरपूड, साखर, तिखट आणि बर्फ )

१) तीळ लावलेली भाकरी, वांग्याचे चिंचेच्या कोळातले भरीत

२) दम आलू

३) ग्रील्ड भेंडी

४) इंडोनेशियन करे ( तयार मसाला वापरून ) आणि नूडल्स

५ ) इंडोनेशियन भात ( नासी कुनींग ) यात आले, लसूण, मिरची वाटून घातलेले असते. मी तयार मसाला वापरलाय.

६) खसखस पेरलेली भाकरी.. आणि शेज्वान पोटॅटो

७) उतप्पा, सांबार आणि चटणी

८) अख्खा मसूर आणि भात

९) भाजूक तूकड्या

१० ) चटणी भाकरी

११) कोबीचे भानोले

१२) उकडपेंडी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ए सगळ्यांनी खबरदार!!!!
...... मी दिनेशदांना दत्तक घेतले आहे.... कोणीही ढवळा ढवळ केली तर कायदेशीर कारवाई करु.... ( त्यांना दत्तक घेण्यात दुहेरी फायदा... मला मस्त जेवायला मिळेल आणि माझी फर्म पण ते सांभाळतिल)

तुर्त... दिनेशदा तुम्ही ते कोबीचं भानोलं प्रकरण आणि भाजुक तुकडी प्रकरण ह्यांची रेसिपी लौकर टाका.....

इंडोनेशियन करे>>> यात ते टेन्टॅकल बंद केलेल्या ऑक्टोपस सारखे लाल रंगाचे काय आहे? Uhoh

मोकिमी अनुमोदन. चला म्हणजे ठाण्यातले रेस्टो फिक्स झाले तर Wink

मोनाली, ती लाल भेंडी वाटतेय Lol
अदिति, डिश खाली टाका काय? सांडतील ना सगळे पदार्थ Uhoh Proud

आज भंकस करायचा मूड आहे Happy

आहाहा.. मस्त वाटले बघुन..... भुक भुक भुक... (हे भुकेल्या कुत्र्यासारखे वाटायला लागले Wink )

यातल्या सगळ्याच रेसिप्या तुम्ही दिल्या नसतील ना?? ज्या दिल्या नाहीत त्या द्याना.. (मला खरेतर सगळ्याच्याच पाहिजेत, एकेक फोटोची नावे कुठे घेत बसणार.. )

ती करे सोबत आहे ती लाल मिरची. मिरची उभी कापून बर्फाच्या थंड पाण्यात ठेवली की अशी उमलते. काकडी, गाजर वगैरेंचे पण असे करता येते.

भेंडी मधे परंपराचा मसाला, लेज वेफर्सचा चुरा आणि थोडा पावाचा चुरा असे मिक्स करून भरलेय. त्यापुर्वी भेडींतल्या बिया काढल्या होत्या, तेच दांडे सांबारात टाकलेत.

बाकी सगळ्या रेसिप्या सोप्प्याच आहेत कि !

मीरा माँ.... भाजूक तूकड्या आहेत इथे.
भानवल्यासाठी कोबी बारीक चिरून कुस्करायचा. त्यात आले, लसूण, मिरची वाटण, धणे जिरे पूड, लाल तिखट,
मीठ व बेसन घालून सरबरीत भिजवायचे. त्यातच थोडे कच्चे तेल टाकायचे. मग हे मिश्रण मंद आचेवर भाजून काढायचे. आधी वाफवून मग तळले तरी चालते.

मस्त! मुंबई, पूणे, कोल्हापूर झाल्यावर नागपूरचाही विचार करा प्लीज.... आधी नागपुर्रचा केला तर सोने पे सुहागा...

अतिशय सुंदर फोटो दिनेशदा! भेंडी तर अप्रतिम सुंदर! खुप दिवसांनी डोळ्यांना ईतकी सुंदर ट्रिट मिळालीय!!!

मलाही भेंडी खुप आवडली. नेहमी टोके कापुन टाकली जातात. त्या टोकांमुळे अजुन नजाकत वाढलीय असे सतत वाटत राहते.

आणि फोटोसाठी पदार्थांची मांडणीही खुप सुरेख केलीय.

दिनेशदा तिथे लांब आफ्रिकेत आहात म्हणून इथे येऊन करा, आम्ही सगळेजण धाड टाकतो की नाही बघा, करुन करुन थकून जाल. तिथुन फोटो टाकून आम्हाला वाकुल्या दाखवताय.

दिनेशदा असले फोटोज् टाकुन प्लिज जळवत नका जाउ हो.
आणि जेवणाच्या वेळेला तर अजिबात नाही.
आता ते कँटीन चे बकवास जेवण कसले नरड्याखाली उतरतेय.

दिनेशदा तिथे लांब आफ्रिकेत आहात म्हणून इथे येऊन करा, आम्ही सगळेजण धाड टाकतो की नाही बघा, करुन करुन थकून जाल. तिथुन फोटो टाकून आम्हाला वाकुल्या दाखवताय>>१

वाह....तीळ लावलेली भाकरी आणि भरीत....यम्म...
एकेक पदार्थ- दम आलू काय, आक्खा मसूर काय आणि भाजुक तुकड्या....लाजवाब.....
एक से एक पदार्थ आणि त्याहून बढके त्यांचे सादरीकरण.. मस्तं, मस्तं आणि केवळ मस्तं.

उकडपेंडी, माझा सर्वात आवडता नाश्ता..
करायला जरा पेशन्स लागतो बस.. त्यावर विजय मिळवला कि जमल भजन Wink
ये लो मेरी पेशकश Happy

कोरडि कणीक भाजण्याइतके कन्टाळवाणे काम दुसरे नाही पण एन्ड प्रोड्क्ट वर्थ ऑल एफर्ट

हा साधा मेनु आहे Uhoh स्पेशल बेत काय असेल हा विचार करतोय मी आता! कोबीचे भानोले हा पदार्थ माहित नव्हता. आजच पाहिल्यांदा ऐकतोय!

Pages