अमानवीय...? - १

Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34

अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

http://www.maayboli.com/node/12295

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुडीचा धागा सोडवल्यावर / उडुन गेल्यावर हे प्रकार बंद झाले का?
म्हणजे त्या धाग्यात त्याचा जीव अडकला होता जणु. ++++ ==
नाही. त्या मरण पावलेल्या माणसाला भजी खाता आली नव्हती. भजी दील्यावर ते भुत अंगातुन नीघुन जात असे,
म्हणजे त्या अंगात आलेल्या व्यक्तीला काही माहीत नसे की आपण काय बोललो होतो.

कमीजास्त झालं तर बायंगी घराला खाली आण्ते. इतके दिवस झालेला आर्थुइक उत्कर्ष क्षणामध्ये खाली येतो. असं म्हटलं जातं की बायंगी आणल्यावर त्याचा मोह इतका जबरदस्त असतो की, ती परत सोडवत नाही आणि त्यामुळे बायंगी नंतर त्या घराला खाऊन टाकते. ===== असच आमच्या गावातही झाले आहे.
आता ते घर मोडकळीला आले आहे. घरातील बायका मुंबईला येवुन घरकाम करत आहेत आणि मुले व्यसनी
झाली आहेत. तीचे सासरे रोजच्यारोज नैवेद्य द्यायचे ते गेल्यावर नैवेद्य बंद केले.

अनिश्का.,

तुमची दादरची कथा कितपत खरी आहे हे माहित नाही. मात्र एक वेगळ्या प्रकारच्या लक्षणांचा अनुभव आम्हाला आहे. सांगाडा वगैरे काही नाही. आमची जुनी सदनिका (फ्लॅट) भाड्याने ज्यांना देऊ केली त्या सगळ्या भाडेकरूंवर काहीतरी संकट ओढवलेलं आहे. एकाला हृद्विकाराचा झटका आला. दुसऱ्याची बायको अचानक मेंदूत रक्तस्राव होऊन वारली. मग आम्ही ते घर भाड्याने देणं बंद केलं. मात्र एकाला ते घर फार आवडल्याने त्याने गळ घातली. आम्ही पूर्वेतिहास सांगूनही तो मागे हटायला तयार नव्हता. त्याला वाटलं की आम्ही काही सबबी सांगतो आहोत. म्हणून त्याने घराला रंग लावून देण्याचंही आमिष दाखवलं (तशीही त्याला तिथे कचेरी थाटायची होती). मग आम्ही होकार दिला. त्याने घर रंगवलं आणि नेमका धंद्यात घाटा आला!

आम्हाला मात्र काही त्रास नाही घराचा! असं का बरं?

आ.न.,
-गा.पै.

आम्हाला मात्र काही त्रास नाही घराचा! असं का बरं? >> कारण तुम्ही अजून तिकडे राहायला गेला नाही.. उगाच विषाची परिक्षा घेऊ नका.

>>मग सोनीवर आहट आणि सीआयडी या वेगळ्या सिरीअल नसून एकच असत्या..

आणि शिवाजी साटम उर्फ एसीपी प्रद्युम्नने गुन्हेगाराऐवजी आत्म्याच्या कानाखाली वाजवली असती. शेवटी 'अब तुम्हे फासी होगी फांसी' च्या ऐवजी म्हणाला असता 'अब तुम्हे मुक्ती मिलेगी मुक्ती'! पण जोक्स अपार्ट, प्लॅचेन्ट बद्दल एक प्रश्न - मेल्यावर काय होतं हे कोणाला माहित नाही. पण पुनर्जन्म झाला असला तर आत्मा बोलावल्यावर नव्या कुडीतून निघून येणार नाही. आणि मरणानंतर काहीच नसेल तर आत्म्याचा प्र्श्नच नाही. हो की नाही?

बाय द वे, जेएफके ला बोलावून त्याला कोणी मारलं ते विचारून बघायला हवं एकदा. Happy

>>वडीचं प्रकरण दुसर्‍याच्या घरातले (ज्यावर प्रभाव केलेला अस्तो) त्याच्या घरातले खेचून आपल्याकडे आणते.

पण ते नॉनव्हेज खाणारे असले आणि आपण व्हेज असलो तर?? तसंच दुसर्‍या घरात पाली, झुरळ, ढेकूण असतील तर तेही येतात का? Wink

कोकणातले किंवा इन जनरल भूताचे प्रकार - मुंजा, खवीस, हडळ, समंध - वगैरेवर कृपया कोणी एक लेख लिहिल का? खूप इन्टरेस्टिंग वाटतंय वाचायला. मी आधीच्या बीबीवर माझ्या आजोबाना, आईला आलेले अनुभव दिले होते. आईच्या लहानपणचा आणखी एक अनुभव नंतर लिहेन.

swapne Lol

कोकणातले किंवा इन जनरल भूताचे प्रकार - मुंजा, खवीस, हडळ, समंध - वगैरेवर कृपया कोणी एक लेख लिहिल का? >>

अनुमोदन. मलाही वाचायचे आहे.

अहो गापै ते घर तुम्हाला लाभत असेल
बाकीच्यांना नाही
>>>>>
घर लाभते याचाच अर्थ तेथील अत्रुत्प्त आत्म्याला आपल्याला त्रास द्यायची इच्छा होत नाही,,
थोडक्यात अमुक तमुक भुताशी आपली केमिस्ट्री जुळली तर तो आपल्याला त्रास देत नाही..

अर्थात याची शक्यता आहेच,
म्हणजे बघा आमच्या एखाद्या घरात माझ्या खापरपणजीचे भूत आहे जे कोणालाच घर मानवू देत नाही, पण मला मात्र ते कधीच त्रास देत नाही. का? तर मी माझ्याच खापरपणजोबांचा पुनर्जन्म आहे..

पण पुनर्जन्म झाला असला तर आत्मा बोलावल्यावर नव्या कुडीतून निघून येणार नाही.
>>>>>>>
कदाचित आपला लिहिण्याचा टोन गंमतीचा असेल पण खूप महत्वाचा मुद्दा आहे.
जर पुनर्जन्म खरे मानले तर प्लांचेटने बोलावलेला आत्मा तेव्हाच येऊ शकतो जेव्हा तो दोन जन्मांच्या मध्ये मोकळा असेल..

अजून एक,
मी प्लांचेट करतोय आणि मी माझ्या खापरपणजोबांना बोलावतोय, पण समजा मीच माझ्या खापरपणजोबांचा पुनर्जन्म असेल तर मीच तिथल्या तिथे गरगरायला लागणार का?

एक बेसिक प्रश्न - प्लांचेटमध्ये बोलावलेले आत्मे भविष्यातील उत्तरे देतात, तर त्यांना म्हणजे आत्म्यांना भविष्य ठाऊक असते का? ते काळ या चौथ्या मितीत फिरत असतात का? हो तर एक्जॅक्टली कसे?

अभिषेक, प्लँचेट करुन, खापरपणजोबांना बोलवून बघाच काय होतय ते, आणि लगोलग इथे अपडेट करा आम्ही वाट बघतोय
Biggrin

ekach postit lihi ki
ka vegalya vegalya atymani lihitoyes vegalya vegalya posti?

म्हणजे बघा आमच्या एखाद्या घरात माझ्या खापरपणजीचे भूत आहे जे कोणालाच घर मानवू देत नाही, पण मला मात्र ते कधीच त्रास देत नाही. का? तर मी माझ्याच खापरपणजोबांचा पुनर्जन्म आहे..

अभिषेक, अरे मग तर जास्तच त्रास द्यायला हवा की नको Light 1

हर्पेन Lol

माझा इन जनरल भुतांवर विश्वास नाही, पण एखाद्या भागात जर काही सुपरनॅचरल असेल तर मात्र मला ते फार लवकर समजतं. मग ती शक्ती पॉझिटीव्ह असो वा निगेटीव्ह. त्यातही निगेटीव्ह असेल तर माझ्यावर परिणाम लवकर होतो. तसंच मला स्वप्नांमध्ये पुढे काय घडणार आहे याचे स्पष्ट संकेत फार आधीपासून मिळतात.

धन्यवाद गा.पै.ही लिन्क दिल्याबद्द्ल ...
माझ्या वाचन्यात आली नाही म्हनजे नक्कीच काहीतरी काळबेर असणार ... Uhoh

२००

मी आता ज्या फ्लॅट मधे राहतो त्या सोसायटी .. १०० पैकी ६५ फ्लॅट तरी बंदच आहेत .. फ्लॅट गुजरात्यांनी घेउन ठेवलेले आहे.. सुट्ट्यामधे हिलस्टेशन वर येण्यासारखे शनिवार रविवार गाड्या घेउन येतात.. असाच एक फ्लॅट माझ्या खिडकी समोर आहे.. रात्री ऑफिस मधुन गेल्यावर कधी लाईट लागली तर समजायचे की राहायला आलेत लोक....

पण काही महिन्यांनी कधी कधी हे लोक गेल्यावर काही दिवसांनी बाथरुम ची लाईट चालु असलेली दिसते .. आधी वाटायचे की बंद करायचे विसरुन गेलेत लोक .. पण नंतर नंतर असे लक्षात आले की रात्री लाईट चालु असते तर दिवसा मात्र बंद असायची....... जर लोक बंद करायचे विसरुन गेलेत तर दिवसा देखील चालु असलेली दिसायला हवी.... नंतर वाटले कोणी आले असेल.. बाथरुम ची लाईट चालु ठेउन झोपत असेल नाईटलॅम्प म्हणुन ... वॉचमन ला देखील विचारुन पाहिले .. कोणी आले आहे का .. तर तो नाही म्हणतो तिथे कोणीच नाही आलेले... ज्या दिवशी हे विचारलेले त्याच्या आदल्याच रात्री मी लाईट चालु असलेली पाहिली ...

मामला कुछ तो गडबड है ......

आता या आठवड्यात झाले की फोटोच काढतो...... लाईट चालु असलेला आणि वर जाउन टाळा लावलेल्या दाराचा Happy

पण दिवसा सुद्धा तो दिवा सुरूच असेल, तुला फक्त दिसत नसेल. >>>>. अहो .. मी ९ ला जातो घरी .. तेव्हा बंद असतो.. ११ ला बघितले की चालु असतो.....

कोणी आले आहे का .. तर तो नाही म्हणतो >>> वॉचमनला मॅनेज करायला असे काय लागते हो?

आमच्या समोरच्या फ्लॅटमधे असेच मध्यमवयीन जोडपे आहे. आठवडी पहिलवान आहेत. शनिवारी सकाळी येतात पाणी मागून घेतात आत जातात रविवारी संध्याकाळी बाहेर येतानाच तांब्या परत देतात... आम्हीही मागत नाही मधे आधे त्याना. असो तर फक्त शनिवारी सकाळी वाजणारे दार गुरूवारी रात्री बाराला वाजले ... बायको चिंतेत पडली... मी रगीत पडलो... पुन्हा तीनला दाराचा आवाज. घामच फुटला. पुन्हा पुढच्या गुरूवारी वाजले... मग मीच धाडस करून हॉलमधे गेलो बायकोला पुढे धरून आणि बघ म्हटलं काय आहे ते... "दार तर बंदच आहे" एका सेकंदात बेडरूम गाठली (नॉर्मलई ३ सेकंद लागतात). पुन्हा पुढच्या गुरूवारी दार वाजले...
४४४४ डायल केले :
'क्यारे मेरे सामनेके घर मे अबी कोण आयारे आत्ता?'
'कोईनई शाब कुछ नई शाब सोजाव मै गेटपेच है'

धावत बाहेर गेलो. काचेच्या भिसकातून बिचकत पाहिले तर जोडीतला म्हातारा दार लावून घेताना दिसला. मग जागाच राहिलो. तीनच्या सुमारास दार वाजले... बाहेर गेलो पाहिले तर काय... म्हातार्‍यासोबत दुसरीच कुणी सुबक ठेंगणी. तरी मला वाटलेलच हे उरावर बसणारच भूत असणार. पण ते आपल्या नाही.

वॉचमनला सकाळी दमात घेतला तर म्हणाला वो गलती होगया शाब वो पचास रुपया दिया बोला किसीको नय बोलनेका.

ह बा............. मी जिथे राहतो तिथे असले थेर चालत नाहीत.... सॅनिटोरिअम आहे ते....... तिथे कायदे कडक असतात .. ( तिथे पैसे सुध्दा चालत नाही... अतिश्रीमंतांचे लोक असतात बुकिंग फक्त मुंबईतुन होते.. इथुन नाही.. आणि घराच्या चाव्या सेक्रेटरीकडे असतात वॉचमन कडे नाही Happy )

अभिषेक, अरे मग तर जास्तच त्रास द्यायला हवा की नको >>>>>> ती पोस्ट लिहिताना माझ्याही मनात तेच आले होते. पण धागा अमानवीय शक्तींच्या त्रासाचा आहे, बायको हे प्रकरण मानवीय असल्याने ते त्रास यात न मोजलेलेच बरे Wink

मी जिथे राहतो तिथे असले थेर चालत नाहीत>>>> थेरं नव्हे लफडे. आमच्या भाषेत लिपडे. लफडे चालत नाहीत अश्या सोसायटीत राहणारे लोक म्हणजे एकतर प्रजापिता ब्रह्माकुमारीतले किंवा हुकलेले असले पाहिजेत. असो.

अतिश्रीमंतांचे लोक असतात बुकिंग फक्त मुंबईतुन होते.. इथुन नाही.. आणि घराच्या चाव्या सेक्रेटरीकडे असतात वॉचमन कडे नाही>>> जो आत गेला तो घरमालक होता. तुमच्या चाव्या तुम्हाला सेक्रेटरीकडे ठेवाव्या लागतात का? राहणारे लोक अतिश्रीमंत असतील पण वॉचमनचा पगार सत्तर हजार आहे काय? बाकी सोसायटीच्या वर्णनावरून आतली भुतं ही कर्जबाजारी लोकांची असणार असा अंदाज आहे.

अजून एक : घराच्या चाव्या सेक्रेटरीकडे असतात>>> मग जरा सेक्रेटरीवर लक्ष ठेवा. (तुम्हीच असाल तर सॉरी हं)

सारांश : मनाचे सारे खेळ थांबवून मेलो तरी चालेल पण या ठिकाणी जाणारच असा निर्धार करून जा. हार्ट पेशंट नसाल तर जिवंत मागे याल याची खात्री मी देतो. अगदीच जमत नसेल तर मला आपल्या सोसायटीचे स्वर्गीय सूख घेण्याचे आमंत्रण द्या.

Pages