अमानवीय...? - १

Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34

अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

http://www.maayboli.com/node/12295

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुडीचा धागा तसाच झाडावर काही महीने अडकुन होता. नंतर हे प्रकार बंद झाले.

>> पुडीचा धागा सोडवल्यावर / उडुन गेल्यावर हे प्रकार बंद झाले का?
म्हणजे त्या धाग्यात त्याचा जीव अडकला होता जणु.

पण अ माणसाने ब माणसांवर जरी करणी केली तरी अ माणसाला पन त्याचा तेवढाच त्रास होतो ना???... म्हण्जे करणी उलटते ना???.. ब्लॅक मॅजिक चा वाईट परिणाम होतच असणार ना ???

बायंगी म्हणजे एक प्रकारचे भूत असते. ते अमावस्येला रात्री स्मशानात जाऊन पकडून आणतात. ही बायंगी नारळामध्ये धरून आणतात. आणल्यानंतर (आणायचा विधी इथे लिहत नाही!!) घरामध्ये त्याची "कुनाच्याही नजरेला न पडेल अशी स्थापना केली जाते. व्यवस्थित पूजा (परत विधी लिहत नाही) वगैरे करून रोजच्यारोज नैवेद्य दाखवावा लागतो. ही बायंगी ज्याने आणली असेल त्याच्या घरचा सगळा उत्कर्ष होत जातो. अचानक धंदा बरकतीला येतो. अथवा कोर्ट केसेस सुटतात वगैरे वगैरे. थोडक्यात सगळं चांगलं होतं जातं. या बायंगीचा काही ठराविक कालावधी असतो. त्या कालावधीनंतर बायंगीला परत सोडावं लागतं (टिपिकली सातेक वर्षे) जर तसं सोडलं नाही अथवा त्याच्या करण्यामध्ये काही कमीजास्त झालं तर बायंगी घराला खाली आण्ते. इतके दिवस झालेला आर्थुइक उत्कर्ष क्षणामध्ये खाली येतो. असं म्हटलं जातं की बायंगी आणल्यावर त्याचा मोह इतका जबरदस्त असतो की, ती परत सोडवत नाही आणि त्यामुळे बायंगी नंतर त्या घराला खाऊन टाकते.

ही बायंगी धरून आणलेला नारळ कितीही वर्षं ठेवला तरी खराब होत नाही. घराचा उत्कर्ष आणि र्‍हास हे अगदी डोळ्यात भरण्याइतके पटापट होतात. वरती ज्या मित्राचा उल्लेख केला होता त्याच्या वडलांनी एके दिवाळीला "दोन किलो" सोन्याचे दागिने खरेदी केलेले आम्ही पाहिलेत. तोच मित्र त्याच गावांत रोजंदारीवर रिक्षा चालवतो हेही पाहिलंय. वडील वारले, आई वारली. घर विकलं, बाकी पैश्याचं काय झालं माहित नाही. एका भावाचा अपघात होऊन तो गेला. बहिणीने पळून जाऊन लग्न केलं तिचं पुढे काय झालं ते आजवर माहित नाही. हा अद्याप बिनालग्नाचा आहे. आता एकाच भाड्याच्या खोलीत राहतो. असं सर्व आहे.

(ता.क. माझा या सर्वांवर विश्वास आहे असं नाही. जे ऐकलंय, पाहिलंय ते लिहिलं आहे. उगाच मला विज्ञानवादच्या शिकवण्या नकोत. धन्यवाद)

नंदिनी,

बायंगीच्या माहितीबद्दल धन्यवाद. Happy हा प्रकार घराला व त्यातल्या माणसांना पछाडणारा दिसतोय. बाहेरच्यांना काही लाभहानी होत नसावी. तर मग हे करण्याचं काही खास कारण? :

>> मित्राच्या घरी जाणे, त्याच्याकडचा खाऊ खाणे तेव्हापासून बंद!!!!

केवळ सावधगिरी का आजून जास्त काही?

आ.न.,
-गा.पै.

बाहेरच्यांना काही लाभहानी होत नसावी. तर मग हे करण्याचं काही खास कारण? :<<< जास्त पैसा कुणाला नको हवा असतो?

केवळ सावधगिरी का आजून जास्त काही?>> माहित नाही, पण आम्ही सर्वांनीच त्याच्याकडे जाणे सोडले. सहावी सातवीमध्ये इतकी माहिती आम्हाला पुरेशी भितीदायक होती.

बायंगी प्रकरण प्रथमच ऐकले.
खास कोकणी प्रकार आहे का हा?

माहितीबद्दल थॅन्क्स Happy

नंदिनी,
बायंगीच्या माहितीबद्दल धन्यवाद.
विधीही माहिती असतील तर लिहा... तेही टेरिफिक अमानवीय असतील असे वाटते आहे...
अर्थात, न लिहिण्यामागे तुमचे व्यक्तिगत काही कारण असेल तर असू द्या,
पण तुम्ही ते न लिहिल्यामुळे अजूनच क्यूरियॉसिटी निर्माण झाली आहे.
-चैतन्य

शक्य असल्यास कोणी प्लांचेट बद्दल हि लिहा.

मी आजवर वेगवेगळ्या मित्रांबरोबर वेगवेगळ्या प्रकारे तीन वेळा केलेय आणि तीनही वेळा फसलेय. एकदा मात्र काहीतरी घडलेय आणि ते चुकीचे घडून आपण फसलोय अशी पुसटशी शंका आलेली पण ती फोल ठरली.

आयुष्यात कधीतरी सक्सेसफुली करायचेय, त्यामुळे जाणून घेण्यास उत्सुक.

आम्ही पण २०वर्षांपुर्वी हॉस्टेलला असतांना करुन पाहिलं प्लँचेट! पण मैत्रीणीच्या आगाउपणामुळे फसलं होतं.
Sad पण माझ्या मामाने आम्ही लहान असतांना आजोळी केलं होतं, ते मात्र चांगलच लक्षात आहे. लिहिते थोड्याच वेळात.

चैतन्य, एक एथिक म्हणून इथे लिहिणार नाही. पब्लिक फोरम आहे, कुणी दुरूपयोग केला तर काय!!!

प्लांचेट करण्यासाठी आम्ही एकदा एकाच्या गच्चीवर बसलो होतो तेव्हा (प्लान्चेट करायच्या आधीच) भुतं यायच्या ऐवजी त्तिथे साप निघाला. तेव्हापासून भुतं सापांच्या रूपात येऊ शकतात का हा आमच्याकडे अद्याप विवादाचा विषय आहे.

नंदिनी,
समजले. आणि योग्यच आहे. मी फक्त उत्सुकता म्हणून विचारले इतकेच.

प्लांचेटचा अनुभव आहे...
आम्ही प्लांचेट केला... सक्सेसफुल झाला आणि लग्गेच नंतर हे कसं खोटं असतं यावर चर्चा केली... Proud

हो प्लांचेट केलंय मी स्वतः, सांगते ती मजा.

बर्‍याच वर्षांपूर्वी शाळेत असताना, एकदा कुणाला तरी करताना पाहिलं होतं, कृती समजुन घ्यायला आणि नंतर उन्हाळ्याच्या सुट्टीत मामे, मावस भावंडं एकत्र जमायचो, तेव्हा गच्चीत केले. पहिल्यांदा जेव्हा बघ्याची आणि विद्यार्थ्याची भूमिका बजावली होती, तेव्हा ते तितकेसे यशस्वी झाले नव्हते आणि त्यामुळे हे सगळं बकवास असतं असंच वाटत होतं.

दुसर्‍यांदा मात्र इतर भावंडं, आजुबाजुची मित्र-मंडळी आग्रह करु लागली, दुपारच्या वेळी, गच्चीत, कृती मलाच नीट माहित होती, म्हणून केले धाडस, मात्र ती वाटी इतकी जबरदस्त वेगाने फिरू लागली पाटावर कि आमाची भंबेरी उडाली हाताची बोटे स्थिर ठेवताना. बॉलिवूडमधील दिवंगत नट-नट्यांना बोलवले होते आणि प्रश्नांची उत्तरेही बर्‍यापैकी योग्य वाटत होती, कैच्याकै वाटत नव्हती. सगळे खूप एंजॉय करत होतो. पण जसजसा दिवस मावळू लागला, सर्वच अस्वस्थ होवू लागले व तो प्रकार थांबवला.

एका मामे भावाला (वय वर्षे १०) खूप भिती वाटली हे बघताना व भितीने ताप भरला आम्ही बाकी सारे १३-१४ वर्षांचे होतो व काही त्रास जाणवला नाही नंतर मात्र काहितरी चुकीचे केल्याची रुखरुख लागून राहिली का कोण जाणे आणि हे असले काही त्यानंतर कधीच परत करायचे नाही हे ठरवून टाकले.

हे सारं का व कसं घडतं, नाही माहित, पण मी स्वतः माझ्या डोळ्यांनी वाटी अक्षरांवरुन फिरताना पाहिलीय आणि आपण जावू शकता हे शेवटी सांगताच ती वाटी हलायची थांबून मुळ स्थानी परत येतानाही पाहिलंय.

कृती मी मुद्दाम सांगत नाही इथे कारण कुणीही तिचे अनुकरण करावे असे मलाच आता वाटत नाही.
इथे अनेकांना माहितही असेल बहुदा.

एक अविस्मरणीय अनुभव होत प्लांचेटचा !!

आम्ही पण हॉस्टेलवर राजीव गांधी, राज कपुर, स्मिता पाटील वै. वै. दिग्गजांच्या आत्म्यांना बोलवण्याचा प्रयत्न केला होता. Lol

हो पण कधी कधी आपल्याला अपेक्षीत 'आत्मा' येत नाही..दुसरा त्याच नावाचा किंवा एखादी आगाऊ कुठलातरी आत्मा येतो. मग त्याला उलटसुलट प्रश्न विचारुन, त्याच्या नातेवाईकांविषयीचे/घर/गाडीबद्दलचे प्रश्न विचारुन 'चेक' करावं लागतं. आपण बोलवलेला आत्मा हाच आहे हे कन्फर्म झालं की मग पुढचे प्रश्न विचारावे लागतात. कधी कधी हे 'आत्मे' लवकर जात नाहीत. मग त्यांच्या मुलांची/ नातवंडांची/ आवडत्या व्यक्तीची/देवाची शपथ घालुन 'त्यां'ना परत पाठवलं जातं. तरीही एखादा अडेलतट्टु आत्मा परत गेला नाही की प्लँचेट करणार्‍यांची फॅ फॅ उडते. Proud

नाही आम्ही ३-४ रुममेटस ने मिळुन एकदाच केलय. ते आमचं फसलं.
बाकी पाहिलय दोनदा फक्त मामाने केलेलं... आणि ते सक्सेसफुल झालं होतं.
आता या क्षेत्रात यशस्वीची व्याख्या म्हणजे माझ्या मते हवा तो आत्मा येउन, आपल्याशी संभाषण साधुन, परत स्वगृही जाणे हेच असावं. तरी माझ्या आजोबांच्या आत्म्याने माझ्याबद्दल वर्तवलेलं भविष्य खरं निघालं होतं. Wink

हो पण कधी कधी आपल्याला अपेक्षीत 'आत्मा' येत नाही..दुसरा त्याच नावाचा किंवा एखादी आगाऊ कुठलातरी आत्मा येतो. मग त्याला उलटसुलट प्रश्न विचारुन, त्याच्या नातेवाईकांविषयीचे/घर/गाडीबद्दलचे प्रश्न विचारुन 'चेक' करावं लागतं. आपण बोलवलेला आत्मा हाच आहे हे कन्फर्म झालं की मग पुढचे प्रश्न विचारावे लागतात. कधी कधी हे 'आत्मे' लवकर जात नाहीत. मग त्यांच्या मुलांची/ नातवंडांची/ आवडत्या व्यक्तीची/देवाची शपथ घालुन 'त्यां'ना परत पाठवलं जातं. तरीही एखादा अडेलतट्टु आत्मा परत गेला नाही की प्लँचेट करणार्‍यांची फॅ फॅ उडते>>> हो आमचा पण असाच अनुभव Happy

>>मात्र ती वाटी इतकी जबरदस्त वेगाने फिरू लागली पाटावर कि आमाची भंबेरी उडाली हाताची बोटे स्थिर ठेवताना.

आमचेही असेच झाले होते.
मी ३-४ वेळा केलंय प्लांचेट.
माझ्या ताईच्या लग्नानंतर ती दिवाळसणाला आली होती तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा केलं.
भावजींनी शिकवलं.
कृती फारच सोपी होती त्यामुळे अजिबात विश्वास बसत नव्हता.
पण जेव्हा ती वाटी फिरायला लागली तेव्हा अक्षरशः हात घाईला आले.

नंतर मी नोकरीनिमित्त चेन्नईला गेलो तेव्हा तिथल्या मराठी चमूमधल्या काही मैत्रिणींना खूप उत्सुकता होती.
म्हणून एकदा रात्री आमच्या घरी केलं होतं.
आम्ही सावरकर, शिवाजी महाराज, पु.ल. ह्यांना बोलावलं होतं.
सावरकरांचा आत्मा लवकर जाईच ना आणि नंतर नंतर (खूपच प्रश्न विचारून झाल्यानंतर) उत्तरे असंबद्ध येत होती.
आम्ही विचारलेल्या एकाही प्रश्नाचे उत्तर खरे ठरले नाही.
आत्ता आम्ही त्याच्याकडे केवळ गंमत म्हणून पाहतो खरे, पण वाटी जोरजोरात फिरायला लागली तेव्हा दोन क्षण जाम टरकलो होतो सगळेच. त्यात ते (सावरकर) जा म्हणता जाईनात.
"आमचे प्रश्न विचारून झालेत. तुम्ही गेलात तरी चालेल. तुम्ही जाणार असाल तर 'येस' कडे चला. "
असं म्हणून पाहिलं पण वाटी हलेच ना.
तुम्ही जाणार नाही आहात का? असं विचारल्यावर 'येस' कडे वाटी.... आणि आमची वाट Proud
थोड्या वेळाने पुन्हा जाणार का म्हणून विचारलं तर वाटी 'नो' कडे.
मग आम्ही वाटी सरळ केली. ज्यांनी पहिल्यांदाच केलं होतं त्यांना जाम टेन्शन.
पण त्यामुळे वेगळं/ वाईट काहीच झालं नाही.
मग ती वाटी फिरण्याची कारणे वगैरे ऊहापोह सुरू.
ग्रूपमधल्या एकाने जरी त्यावर अविश्वास दाखवत भाग घेतला असेल तर वाटी फिरत नाही असा मात्र अनुभव आहे.
गूगलबाबाकडे याची शास्त्रशुद्ध उत्तरे आहेत. इच्छुकांनी लाभ घ्यावा Happy

Pages