अमानवीय...? - १

Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34

अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

http://www.maayboli.com/node/12295

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या सौ ला झोपेत बडबड करायची सवय आहे. म्हणजे रोज रोज का ते माहीत नाही (मी स्वतः डाराडूर असतो त्यामुळे मला बरेचदा कळत नाही), पण कधी कधी दमणूक ज्यास्त झाली किंवा टेंशन असेल तर विशेष करून लक्षात येते.

गेले काही दिवस आमची ही बर्यापैकी टेंशन मध्ये आणि गप्प गप्प असते. मी गंमत करायची म्हणून सात आठ दिवसांपूर्वी आय फोन वर वॉईस अ‍ॅक्टीवेशन नी रेकॉर्ड करायचे सॉफ्ट्वेअर विकत घेतले. हे सॉफ्ट्वेअर आवाज झाल्यावर आपोआप चालू होते आणि रेकॉर्ड करते. रात्री जेवण बिवण झाल्यावर तिच्या उशी पाशी फोन चार्जिंग ला लावायच्या बहाण्याने ते सॉफ्ट्वेअर चालू करून ठेवून दिला. माझा प्लॅन असा होता की दुसर्या दिवशी तिची रेकॉर्डिंग ऐकून तिची गंमत करायची. दुसर्या दिवशी ती घाई गडबडीत लोकल गाठायला बाहेर पडल्यावर मी रेकॉर्डिंग ऐकले. ही अगदी काकूळतीला येऊन विनवण्या करत होती:
"सुप्रिया मला आत येउ दे", "सुप्रिया मला आत घे". जवळ जवळ १५ मिनिटे असे चालले होते. मग मी त्याच दिवशी तिची गंमत करायच्या ऐवजी अजून काही दिवस रेकॉर्डिंग करायचे ठरवले. त्या दिवशी संध्याकाळी ती आल्यावर मागच्या काही दिवसांप्रमाणेच गप्प गप्प होती. आम्ही नेहमीची कामे आटोपून जेवण करून झोपी गेलो. मी परत फोन रेकॉर्डिंगला लावला होता.

दुसर्या दिवशी सकाळी परत कालच्या प्रमाणेच सर्व. सुप्रियेला वारंवार विनवण्या. फक्त फरक ईतकाच कि १५ मिनिटे च्या ऐवजी जवळ जवळ २०-२२ मिनिटे आणि शेवटी शेवटी धमकी आणि विकट हास्य. खर सांगतो, त्या धमकीच्या आवाजाचा टोन ऐकून माझ्या शरीरातून एक शिरिशीरी गेली. हिच्या तोंडातून असा आवाज मी कधीच ऐकला नव्हता. त्या दिवशी संध्याकाळी ही ज्यास्तच दमलेली होती. परत सर्व आधिच्या दिवसाप्रमाणे रिपिट.

गेले ५-६ दिवस हे चालू आहे. आता फक्त बडबडण्याचा कालावधी जवळ जवळ १ तास झाला आहे. आता विनवण्या जवळपास नसतातच. फक्त हिच्या तोंडातून फक्त धमक्याच येत असतात. "सुप्रिया मला आत घे नाहीतर तुझ्या घरादाराचा नाश करीन" ई ई.

मी जागायचा प्रयत्न करून स्वतः ऐकायचा प्रयत्न केला. पण नेमका माझा डोळा लागल्यावरच हे सर्व घडते. काल तर कहरच झाला. रेकॉर्डिंग मध्ये ही शेवटी शेवटी किंचाळून उठ्ली आणि नंतर बरेच वेळ हिच्या मुसमुसण्याचा आवाज येत राहीला. हे सगळ होऊन ही मला जाग कशी काय आली नाही हे एक कोडच आहे. सकाळी मी ते ऐकल्यावर बर्यापैकि अस्वस्थ झालो आणि सरळ सरळ हीला विचारल. ही चहा करत होती. हे ऐकल्यावर ती पांढरी फटक पडली. तिच्या म्हणण्यानुसार तिला जवळ जवळ महीनाभर एकच स्वप्न पडत असते ज्यामध्ये ती स्वतःला पलंगावर झोपलेली पहाते. महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या बायकोचे नावच सुप्रिया आहे. माझी बायको कुणाला धमक्या देत नसते. कुणीतरी दुसरच तिच्या तोंडून तिच्याच आवाजात धमक्या देत असते.

आता रात्रीचा एक वाजून गेला आहे. माझी बायको गलितगात्र होऊन माझ्या शेजारी मेल्यासारखी झोपून आहे. मी जागतो आहे. आज मला याची उत्तरे हवी आहेत.

अरे बाप्रे Sad
काहीतरी उपाय करा प्लिज Sad
घर बदलून बघा Sad
रेकॉर्डिंगचे क्लिप्स सांभाळून ठेवा
आधी एखाद्या मानसोपचार तज्ञाकडे जाऊन या Sad

मलाच भिती वाटतेय खुप... तुमचं काय झालं असेल.

बापरे वाचून अंगावर काटा आला.. ़आपल्याच माणसाची किती भीती वाटत असेल अशा वेळी.
रागवू नका पण एखाद्या मानसोपचार तज्ञाची मदत घ्या.

गोगोल
हे खर आहे ??? Uhoh त्यांचच रेकोर्डींग आधी त्यांना एकवा.. कदाचित कुठलीतरी भिती किंवा पाहिलेल्या भितीदायक घटनेमुळे अस होत असाव...

@गोगोल भाऊ
ज्या देवाला मानत असाल त्या देवाचा फोटो असु द्या उशी खाली: शक्यतो आपल्या कुल देवते/कुलदेवी चा.
रात्री झोपताना रामरक्षा अथवा मारूती स्तोत्र मोठ्याने म्हणा...!

हम्म..स्ट्रेंज...व्हेरी स्ट्रेंज...
जिथे खूप काही समजायला अनाकलनीय असतं,कारणांचे मार्ग बंद झालेले वाटतात्,डोक्याला ताण देऊन कारणं मिळत नाहीत तेव्हाच तिथे काही तरी पाणी मुरत असावं अशी शंका मला येत असते...
शेरलॉक होम्स कथांमध्ये शोभणारं वाक्य मला सुचलं.. (हशा)

ब्रो,तुमचा पोलिस महाशय जे अनुअभवत होता तो हायपॉक्सी स्लीप पॅराच होता हे नक्की.हा प्रकार तिथेच होत असावा ह निष्कर्ष बरोबर वाटत नाही.दुसरीकडे झोपण्याचा प्रयत्न त्यांनी करून पहायला हवा होता असे वाटते.हा प्रकार शास्त्रिय भाषेत समजायला किंचित कठीण आहे तेव्हा एक सोपी लिंक बघा वाचून समजेल.ही ती लिंक-http://sleepdisorders.about.com/od/commonsleepdisorders/a/Symptoms-Of-Sl...

आपल्या अंगावर बसून कोणी आपला गळा दाबते आहे,ही भावना SP मध्ये गळ्याजवळचे स्नायू,डायफ्रामचे आकुंचन आणि CO2चे रक्तातले वाढलेले प्रमाण यामुळे येते.त्यातच REM मध्ये आपलं मन जागृत अवस्थेत आलेलं असतं,त्यामुळे जागे असतानाचे विचार समोर अवतरणे सहाजीक आहे.ही प्रक्रीया गुंतागुंतीची असली तरी कळली तर सोपी आहे.

या घटना व्यक्ती-विचार सापेक्ष्,त्याने झोपण्याआधी केलेल्या विचारांशी,बोलण्याशी,तिथल्या वातावरणांत असणार्‍या वैचारीक प्रभावांवर अवलंबून आहे.दार बंद करून झोपलेला हवालदार्,पंखा चालू असला तरी कोंदट वातावरण,पाऊस होता का हेही विचारात घ्यायला हवं.

तेव्हा अशी काही बातमी पसरत असेल तर थांबवायला हव्यात.
बाकी साठे कॉलेजचा बेसमेंट सोडा ते आख्खे कॉलेजच फोटोंमध्येही अमानविय दिसते. Wink Happy

विज्ञानदास - असं बोलू नका हो माझ्या कॉलेजबद्दल. अख्ख कॉलेज अमानवीय काय, काहीही.

बाकी तुम्ही जे हायपॉक्सी स्लीप पॅराचे explanation दिलत त्याला अनुमोदन.

१९९१ च्या डिसें मध्ये जेव्हा मुंबईत दंगली सुरु होत्या तेव्हा पासून कॉलेजमध्ये पोलिस असतात. त्यापूर्वी कधी पाहिले नव्हते, त्यापूर्वीही असतील तर माहित नाही माझ्या आठवणी प्रमाणे बेसमेंट साडेसहाला बंद होतं. अख्खं कॉलेज आठ वाजता बंद होतं. पोलिसाम्च्या ड्युटीज बेसमेंटच्या बाजूला असलेल्या गेटवर असतात. पण बेसमेंट मध्ये ड्युटी कशाला? ब्रो - कोणी तरी तुम्हाला फसवतय.

विज्ञानंदास

www.indianparanormalsociety.com/

ही लिंक घ्या आणि तुम्ही ही यांच्या बरोबर घोस्ट हंटिंग ला जा ...
जिधर साइंस (विज्ञानं) की भी पोहोच कम पड़ती है वहा ये पोहोच जाते है

संत ब्रो;-)

विज्ञानदास - असं बोलू नका हो माझ्या कॉलेजबद्दल. अख्ख कॉलेज अमानवीय काय, काहीही. <<<
सॉरी.मी सहज म्हणालो.वातावरण थोडं हलकं व्हवं म्हणून...पर्सनली घेउ नका.चूकलच.प्रत्यक्ष बघूनच कंमेंट करायला हवी कुठेही... सॉरी पुन्हा... Happy

बाकी मी ओव्हरऑल एक्सप्लेन केलेय... पहिल्या धाग्यावरही काही अनुभव असे आहेत त्यांनाही धरुनच बोललो आहे.
लोक भलतं पसरवत असतात्,वास्तव बर्‍याचदा वेगळंच असतं. Happy

गोगोल
बापरे एकदम भयंकर आहे हे सगळे, अंगावर काटा आला.
एखाद्या मानसोपचार तज्ञाची मदत घ्या. आणि तरीही फरक नाही पडला तर कुटुंबातील मोठ्यांना विचारुन कुण्या 'जाणका-याची' मदत घ्या

ब्रो,त्या संकेतस्थळाची टॅगलाईन वाचा.... मलाही तेच म्हणायचंय...
माणूस घटना आणि त्यामागची प्रोसेस किंवा कारणं या दोघांची सरमिसळ का करतो? अओ:
घटना आणि कारणं दोन्ही वेगवेगळ्या.... माणुस घाबरतो कारण तो घटनेकडे बघतो... कारण सापडत नाही कारण त्याची कारणं ठरलेली असतात.तेव्ह्ढीच त्याला माहीत असतात.

कुण्या 'जाणका-याची' मदत घ्या<<<निल्सन उगाच वाटेल ते काय सांगताय.

ध.

अहो सॉरी काय त्यात. मी काही मनाला लावून घेतलेलं नाही. उगाच थोडंसं वाईट वाटलं. बिच्चारम माझं कॉलेज असं...

कुण्या 'जाणका-याची' मदत घ्या<<<निल्सन उगाच वाटेल ते काय सांगताय. >>>>

वाटेल ते नाही सांगत विज्ञानदास. मी प्रथम त्यांना मानसोपचार तज्ञाची मदत घ्या असेच सांगितले आहे आणि तरीही फरक नाही पडला तर कुटुंबातील मोठ्यांना विचारुन कुण्या 'जाणका-याची' मदत घ्या असे सांगितले आहे.

मला माहित आहे तुम्ही सर्व गोष्टी विज्ञानाच्या नजरेने पाहता आणि ते बरोबरही आहे नाहीतर सगळ्याच गोष्टींना उगाचच अमानविय वैगरेचे लेबल लावले जाईल. पण काही वेळेस विज्ञानाकडे उत्तर नसते तेव्हा अशाच 'जाणकार' व्यक्ती कामी येतात. आणि मी हे एव्हढ्या ठामपणे म्हणु शकते कारण माझ्या आईसोबत असेच काही अतर्क झाले आहे कदाचित मी याआधी या धाग्यावर लिहलेही असेल.

गोगोल तुमचा अनुभव वाचून भर दिवसा सरसरून काटा आलाय अंगावर!!!
काही जुना अनुभव वगैरे आहे का सौंच्या आयुष्यात? लहानपणीचे अनुभव किंवा काही ऐकलेलं कायम असं मनावर कोरलं जातं आणि अशा सुषुप्तावस्थेत कधीतरी उसळून बाहेर येते. आपल्या कुलदेवतेचे स्मरण करावे. शक्य झाल्यास रोज रात्री झोपायच्या आधी शनिमहात्म्य वाचावे. मला आधी असे भास अनुभव यायचे आता जवळपास पूर्ण बंद झालेत.

अशी स्वप्ने पडल्यावर उठून गुडघेस्नान करावे. (हात, गुडघ्यापासून पुढे पाय आणि तोंड स्वच्छ धुवावे) देवाला साजूक तुपाचा दिवा लावावा आणि मनोमन विनवावे की काय अरिष्ट असेल ते सांभाळून घे आणि कुटुंबावर कृपादृष्टी ठेव.

याचा वैज्ञानिक्दृष्ट्या किती फरक पडतो माहीत नाही पण आपल्या मनाला नक्की समाधान मिळते. बाकी निल्सन यांच्या प्रतिसादाशी काही प्रमाणात सहमत.

गोगोल,मी धरून आणखी तिघे 'हे खरंय??' असं विचारत आहेत.बाकीचे डोळे झाकून तुमच्यावर विश्वास ठेवल्यात जमा आहेत....... काय चाललंय काय?

निल्सन्,मानोसोपचाराचं आपलं म्हणण मी वाचलं आधीच.ते मान्य.विज्ञानाकडे उत्तर कधी-कधी पडद्यामागे बंद असतं...ते नसतंच असं असं कोण म्हणालं...(माझा एक लेख आहे...वाचून बघा कळला तर सुंदर)
कदाचित,'बाह्य' उपचार हे वैचारीक मानसीक दृष्ट्या लागू पडतीलही... पण तेच योग्य उपचार आहेत असा समज त्यातून उगवू नये एवढच... Happy मनाला समधान मिळत असेल तर जरूर करा...

ब्रो,वेल्,साठे कॉलेजची वेबसाईट वाचली.खरच छान कॉलेज आहे. Happy

अरे आम्ही 'स्ट्राँग' किश्शांच्या शोधात आहोत... भयानक... अमानवि वगैरे... मानवनिर्मित नव्हे.. Wink

Pages