अमानवीय...? - १

Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34

अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

http://www.maayboli.com/node/12295

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला अचानक ही चर्चा वाचत असताना भुलभुलैय्याची आठवण झाली.
असंही काही असू शकतं ना?
असचं असू देत रे देवा Sad

वि.दास

"What You Fear… We Chase!"

हे लोक प्रोफेशनली ट्रेन आहेत! इन्वेस्टीगेशन च्या सुरवातीला हे लोक सर्व प्रकारच्या शास्त्रीय कारणाना वापरून बघतात आणि तरीही एखाद्या अमानवीय गोष्टी चे कारण नाही सापडले तर त्यांच्या कडील परानोर्मल इक्विपमेंट ने टेस्ट घेउन बघतात !

आणि तरीही त्यांना एखाद्या गोष्टी चे कारण नाही सापडले तर त्यांना त्या गोष्टीला,घटनेला, ठिकाणाला , "अमानवीय "
असा शिक्का मोर्तब करावाच लागतो, खुपश्या गोष्टी आपल्या आणि विज्ञाना च्या पलीकडलया असतात .

"What You Fear… We Chase!"

paranormal eqiopments ह्या खरोखर असतात काय? मला वाटले ह्ये फकस्त विंग्रजी शिणुमात दिसतया.

सध्या आपल्या भारतात Veenu Sandal (Paranormal Expert) या सर्वात टॉपच्या परानोर्मल एक्सपर्ट आहेत तुम्ही यांना फेसबुक वर प्रश्न विचारू शकता .

आज प्रचंड अमानविय दिवस आहे........ बायका आपापल्या नवर्‍यांच्या परवानगीविरुध्द वडाची पुजा करुन वटसावित्रीचे टॉपअप करुन ७ जन्मीसाठी नवर्‍याची अ‍ॅड्व्हास बुकिंग करुन ठेवत आहे

आज तुम्ही अमानवीय धागा बनविला
कोण जाणे
तिकडे भूतांनी अभूतीय धागा तयार करुन ठेवला असेल. Happy

आजचाच अनुभव नाही तर गेले ४-५ वर्षांत अधूनमधून येणारा ..

ऑफिसहून संध्याकाळी उशीराचे परतताना बहुतांश वेळा ट्रेन रिकामीच असते. त्यातून फर्स्टक्लासचा डबा म्हणाल तर खिडकीवर बसावे आणि समोर तंगड्या पसराव्यात असा असतो.
ट्रेनच्या प्रवासात पेपर वाचल्याने माझे डोके गरगरते, आणि मोबाईलवर चाळा डोळ्याना त्रास देतो, त्यामुळे मी झोपणेच पसंद करतो.
अर्थात सकाळी हमखास झोपूनच जातो मात्र संध्याकाळी नेहमीच झोपेल असे नाही, कारण झोपण्यासाठी मुळात ती यावी लागते. त्यामुळे मग लोकांचे निरीक्षण करणे हा छंद जोपासत जातो.

पण उशीरा घरी परतताना शरीर आणि मन दोन्ही थकले असते, काम करून मेंदूलाही विश्रांतीची गरज असते, अश्यावेळी मग डोळे जड होतात आणि पापण्या आपोआपच मिटतात.
खिडकीची जागा, तितून सुसाटपणे येणारा आणि रिकाम्या डब्यात खेळणारा वारा... ठार बेशुद्ध पडल्यासारखी झोप लागते. कैकदा या झोपेच्या नादात छत्रपती शिवाजी टर्मिनस जाऊन पुन्हा परत आलोय.

असो,
तर अश्या या गाढ झोपेत असताना बरेचदा मला एक वेगळीच स्थिती अनुभवायला मिळते. माझे शरीर हलके झाले आहे आणि त्यातून माझा मीच, कदाचित ज्यालाच आत्मा म्हणत असावेत असा मी, बाहेर पडतो आणि माझ्या समोरच्या वा बाजूच्या सीटवर जाऊन बसतो आणि तिथून नेहमीसारखे लोकांचे निरीक्षण करू लागतो. माझ्या त्या आत्म्याचा बाजूला माझे शरीर गाढ झोपेत असते त्यालाही तो माझा आत्मा एकवार न्याहाळून घेतो. तो माझाच आत्मा असल्याने मलाही ते जाणवत असते की मी माझे मलाच बघतोय. किंबहुना माझी जाणीवच बाहेर पडली असते त्यामुळे बाहेर पडलेल्या मला झोपलेलो मी दिसत असतो, पण झोपलेला मी झोपेतच असल्याने त्याच्या काही गावीही नसते की आपल्याकडे कोणी (म्हणजे आपलाच आत्मा(?) हा) बघत आहे. त्यानंतर पुढे बाहेर पडलेलो मी बाजूला आपलाच एखादा मित्र झोपलाय या थाटात झोपलेल्या माझी झोपमोड न करता आजूबाजुंच्या लोकांचे निरीक्षण चालू ठेवतो.

अर्थात हा खेळ थोड्यावेळाने संपतो, माझा आत्मा माझ्यात पुन्हा काय कधी कसा परत येतो हे मला आठवत नाही, पण जाग आल्यावर मी झोपेत असताना माझ्या आत्म्याने केलेले निरीक्षण सारे आठवत राहते.

ईथे मात्र ते खरेखोटे कसे करायचे हे मला समजत नाही, कारण आजूबाजुच्या डब्यातील लोकांना मी झोपायच्या आधीही पाहिलेले असतेच, तेव्हाही सवयीनेच त्यांचे निरीक्षण केलेले असतेच, त्यामुळे तेच नजरेसमोर असताना मी झोपेत गेलो आणि तेच दृष्य़ पुढे स्वप्नात घेऊन गेलो की खरेच हे असे काही अदभुत अविश्वसनीय असे काही माझ्याशी घडते देवासच ठाऊक.

१) या अनुभवाची फ्रिक्वेन्सी बोलाल तर गेल्या चार-पाच वर्षात फक्त १०-१२ वेळा आलाय, संध्याकाळच्या वेळी आणी ट्रेनमध्येच आला आहे.

२) ठरवून बाहेर पडता येत नाही की बाहेर पडल्यावर काय करायचे हे ठरवून झोपता येत नाही.

३) मी या अनुभवात जागा सोडून कधी दारात वारा खायला गेलो नाही की डब्यात साधी एखादी चक्कर मारली नाही, फक्त बसूनच राहतो. जणू काही त्या आत्म्याला माझ्या शरीराशी एखाद्या शक्तीने ठराविक मर्यादेपर्यंत बांधून ठेवल्यासारखे.

४) हे स्वप्न नसावे. म्हणजे नेहमीसारखे स्वप्न नसावे जसे रात्रीचे पडते. मी रोजच्या झोपेत चार ते पाच स्वप्ने चार-पाच दूरदर्शन मालिका बघितल्यासारखी नियमाने बघतो त्यामुळे स्वप्नांचा मला फार्रफार अनुभव आहे, आणि हे यापेक्षा वेगळा प्रकार आहे हे मला स्वतालाच जाणवते.

५) आत्मा शब्द वापरला आहे तरी त्या पुढे प्रश्नचिन्ह गृहीत धरा. आत्मा असतो की नाही माहीत नाही पण माझा घाबरवणार्‍या भुतांवर विश्वास नाही.

६) मी वेडा (मनोरुग्ण) नाही. असण्याची शक्यता फार कमी. या अनुभवानेही मला आजवर कुठलाही मानसिक त्रास दिला नाही. तर शेअर करतोय ते फक्त कारणमीमांसा या हेतूने केलेल्या चर्चेसाठीच. वैद्यकीय सल्ल्यासाठी नव्हे.

इयत्ता ५ वीत असताना आमच्या वर्गात एक मुलगी होती रंजना घोडगे नावाची सडपातळ आणि उंच, वर्गात उंची प्रमाणे बसवायची प्रथा असल्यानी तिचा शेवटचा बेंच ठरलेला असायचा. ती बरीच सडपातळ होती नंतर कळल कि तिला कसलासा आजार होता आणि त्या आजारात ती मेली .
त्यावेळेस वय लहान असल्यामुळे माणूस मेला कि त्याचा भूत होतो हेच सामान्यज्ञानं अस्तितवात होत वर्गातली टवाळ खोर मुल रंजना आता भूत बनून आपल्याला दिसणार अस काही बाही बोलायची नाही बोल्ल तरी भीतीही वाटायची रात्री घरी असतानापण ह्या आठवणीने झोप लागायची नाही .
एकदा असच शाळेत ऑफ पेरीयेड मध्ये माझा वर्गपाठ करत बसले होते, दुपारची शाळा असल्यामुळे संद्याकाळी ५.३० ला सुटायची, शाळा सुटायची वेळ झाली होती. माझा थोडासाच अभ्यास बाकी होता मैत्रिणीला फक्त ५च मिनिट थांब अस सांगितलं आमचे बाळू शिपाई येउन वर्ग चेक करून गेले आम्हाला लौकर निघा जास्त वेळ थांबू नका अस सांगितलं. माझा अभ्यास झाला मी आणि मैत्रीण दप्तर आवरत होतो. अचानक शेवटच्या बेंच ची खुडबुड जाणवली. आम्ही एकमेकीनकडे पाहिलं . आणि निघायला लागलो नाही म्हंटल तरी मनातून थोड्या घाबरलोच होतो , शेवटी दप्तर अंगावर टाकून वर्गाच्या दरवाज्या पर्यंत गेलो आणि पुन्हा शेवटच्या बेंचची खुडबुड जाणवली मी पुढे होते माझी मैत्रीण मागे होती , जेव्हा आवाज आला तेव्हा मी वर्गाबाहेर गेले होते आणि मैत्रीण वर्गाच्या दारात तिने शेवटच्या बेंच कडे पाहिलं आणि जोरात किंचाळून धावतच सुटली मला काही कळल नाही मी पण तिच्या मागोमाग धावायला लागले , ती काहीच सांगत न्हवती घरी गेल्यावर तिला ताप भरला ती दुसर्या दिवशी शाळेत आलीच नाही मी तिच्या घरी गेले तेव्हा तिने मला सांगितलं "अग, मी... . मी तिला पहिली रंजनाला शेवटच्या बेंचवर, माझ्याकडे बघत होती" मी तिला खुपदा तुला भास झाला असेल हे पटवून देत होते ती ऐकत न्हवती. शाळेत हि गोष्ट मी कुणालाच सांगितली नाही कारण मला स्वतालाच ते पटल न्हवत, त्यादिवशी मला आमचे शिपाई काका शाळेत दिसले तेव्हा मी जेव्हा हि गोष्ट सांगितली तेव्हा त्यांनी काहीश्या गंभीर नजरेने बघितलं मला बोलले " खरतर, मलापण ती एकदा दिसली होती पण माझ्यावर कुणी विश्वास ठेवेल कि नाही म्हणून गप्प होतो आणि त्या दिवशी तुम्हाला लौकर निघा अस मी म्हणालो" त्या दिवसानंतर मात्र मी कधीच एकटी शाळा सुटल्यावर थांबले नाही.

अभिषेक,

तो बाहेर येणारा तुमचा लिंगदेह आहे. मृत माणसाच्या लिंगदेहास प्रेत म्हणतात. हा लिंगदेह जर पुढच्या योनीत न जाता त्याच योनीत अडकून भटकत राहिला तर त्यास प्रेतात्मा म्हणतात. या प्रेतात्म्यास लोक बोलीभाषेत भूत म्हणतात. तुमचा अनुभव खूप जणांना येतो. यात घाबरण्यासारखं काही नाही.

आ.न.,
-गा.पै.

विरोधाभासात्मक स्टेटमेंट आहे. घाबरण्यासारखे काहीही नाही हे सगळ्यांनाच माहीत्ये.कुणीही सांगेल.
उगाच काहीच्या काही सांगू नका गामाजी. अशा माण सांना कोणी आवरेल का? :रागः

अभिषेक अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद.या अनुभवावर वेळेअभावी वाचन करता आलेले नव्हते.पण थोडक्यात ही संज्ञा काय असू शकते हे इथे देतो.माणसाने थोडे डोळे उघडे ठेऊन या सर्वांकडे बघणे हाच या मागचा महत्वाचा उद्देश आहे.

मानसशास्त्रात या प्रकाराचे विविध प्रकारांनी/पद्धतींनी उल्लेख आढळतात.विशेष म्हणजे हा प्रत्येक प्रकार एकाच विषयाचा वेगवेगळ्या अनुभवांनी/लक्षणांनी तयार झाला आहे. त्यासाठी खाली काही समजण्यास सोपी संदर्भस्थळे देतो त्यावरून समजेल. निरोगी व्यक्तीलाही हे अनुभव येऊ शकतात असे सिद्ध झाले आहे.

त्याच स्थळांवर खाली काही संदर्भांची सूची आहेत.खोलात जाऊन कुणाला शोध घ्यायचा असल्यास उपयोगी पडेल.

शरीराबाहेर स्वत:चे अस्थित्व पुसटसे भासणे,स्वत:च्या शरीरात राहून गुगल अर्थ चा पॅन मोड काम करतो तसे इतर जगाचा अनुभव घेणे,शरीराच्या बाहेर जाऊन स्वत:चे शरीर बघणे,शरीराच्या बाहेर जाऊन आपले शरीर दिसणे व जगाकडे बघणे,दोन वेगळी अशी स्वतःची शरीरे अनुभवणे,हे सगळे एकच वाटत असले तरी वेगवेगळे प्रकार असतात.

याची सामान्य कारणे:- त्याचं विभाजन दोन प्रकारात करूया---
अ‍ॅबनॉर्मल कारणे:-
१-चिडचिड्,राग्,अति-चिंता(Histeria,Anxiety,Fear)
2-उन्माद(Bi-polar Disorders Group)
3-दुभंगलेले व्यक्तिमत्व(Schizotypes)
4-फिट येणे(Strokes,Epilepsy)

सामान्य स्थितीतील काही कारणे:-
१-अतीश्रम,थकवा,ताण
२-सतत टेबलवर्क
३-गर्दी,कोलाहल,प्रवासाच ताण
४-भरपूर ताण येतो,अचानक ताण नाहीसा होऊन हलके वाटणे.
५-इतर उपचारतील काही औषधे,

दोन्ही वेगळ्या स्थितीतील कारणे आहेत.नॉर्मल व्यक्तीला असे अनुभव येऊ शकतात.असे अनुभव येणारी व्यक्ती अ‍ॅबनॉर्मल आहे/असते असे समज कृपया घडू देऊ नयेत.

विषय समजण्यासाठी काही सोप्या संदर्भ-स्थळाच्या दुव्यांची जोडः-
@ ऑटोस्कोपी आणि ह्युटोस्कोपी
@ डिल्यूजनल सबजेक्टीव डबल्स
@ ओबीई

@ महत्वपुर्ण संशोधित आधार

हे अनुभव येणं हे व्यक्तीसापेक्ष आहे.परंतु त्याला कुठल्याही अध्यात्माचा,अतर्क्यतेचा मुलामा कोणी चढवत असेल तर त्याने दहा वेळा अधी विचार केला पाहीजे. चु़कीचे आधार घेऊन सावरण्यापेक्षा सत्य आणि वास्तव लक्ष्यात घेऊन त्या दिशेने प्रयत्न करणे महत्वाचे असते असे डॉ.दाभोळकरांनी सांगितलेले आहे. पण नेमके हेच आपण विसरून जात आहोत असेच म्हणावे का? वैयक्तीक भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व्.

धन्यवाद.
-विज्ञानदास.

विज्ञानदास यांचा अप्रोच जरी खुप डोळस आणि वैज्ञानिक असला आणि इथे लिहिलेल्या बर्‍याच अमानवीय घटनांची ते वैज्ञानिक कारणे सांगत असले तरी वर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे अमानवीय धाग्यावर हे खुप स्पॉईलर होतंय. Sad

सॉरी विज्ञानदास.. राहावलं नाही म्हणुन सांगतेय. राग आल्यास क्षमस्व.

पियू,
लिहायचं मनात नव्हतंच.मागे मी एकाला तसं विचारलेलंही. पण वरती एकांनी जे कारण दिलेय त्यामुळे लिहावे लागले.

जर चूकीचे समज पसरताहेत असे दिसले तर लिहीणे भाग आहे... जर इतक spoil-sport होत असेल तर ज्यांना गरज आहे असेच लोक वाचतील.इथे बरेच वाचक असतात.लॉग इन केलेले न केलेले.तेव्हा एका-दोन माणसांची मजा जाते म्हणून गप्प बसणे कृपया मला जमणार नाही.

वर प्रिती यांनी जो अनुभव दिला त्यावर पण लिहीता आले असते की पण तो तुम्हाला 'एंजॉय' करण्यासाठी सोडलेला आहे की.

अर्थात इथून पुढे माझ्या धाग्यावर त्यांची उत्तरे टाकेन.ती वाचायची की नाही हे तुम्हाला ठरवता येईलच. रागाने बोलत नाहीये. पण कुणी चुकीचे समज पसरत असतील,तेही माझ्या समोर तर मला नाही डोळेझाक करता येत .. सॉरी. इतकेच.

माझे चूकीचे असेल तर तसे स्पष्ट सांगा.

विचारवंतच ते त्यांचे कोणी मनावर घेते का? Happy

अरे भांडू नका,
पियू, जर आपली (म्हणजे आपल्या सर्वांची) भूतावर मनापासून श्रद्धा असेल ना तर विज्ञानदास यांनी कितीही विज्ञानाचे तारे तोडले तरी आपल्या मनातील भूताचे अढळ स्थान ते हलवू शकणार नाहीत. Happy

विज्ञानदास,
अर्थातच मलाही काही तो अमानवीय चमत्काराचा प्रकार नाही वाटत. हे मानसिक स्थितीशीच संबंधित असावे. त्यात शेवटी मी वेडा नाही हे गंमतीने लिहिले. जर खरेच हि एकप्रकारची अ‍ॅबनॉर्मलिटी असली तरी त्याने लगेच वाईट वाटून घेण्याईतका मी असमंजस नाही. फक्त हा अनुभव मला काही त्रास देत नाही किंवा फ्रिक्वेन्सी फारच कमी म्हणून मी या प्रॉब्लेम समजत नाही. पण जर हे मला थोड्याफार प्रमाणात होतेय तर जगात आणखी कोणाला तरी किंवा बरेच जणांना होत असणार, आणि त्यांचे स्वरूप कदाचित यापेक्षा गंभीर आणि पुढच्या स्टेजचे असू शकते. एक विषय चर्चेला आला तर तेवढेच लोकांना माहीत होईल तसेच मलाही माहिती मिळाल्यास चांगलेच. अर्थात उगाच याचा जास्त विचार करून ते मनात आणखी खोलवर भरवूनही घ्यायचे नाहीये मला हे ही आलेच.

वर प्रिती यांनी जो अनुभव दिला त्यावर पण लिहीता आले असते की पण तो तुम्हाला 'एंजॉय' करण्यासाठी सोडलेला आहे की

छान हा विज्ञानदास - मीच असते का टार्गेट तुमची

2422288hac7a9safi.gif

Potion making is ongoing for those who wants inspiration to write 'Amanaviya kisse' here.

प्रिती तुम्ही काही टारगेट वगैरे नाही हो... तुमचा अनुभव थ्रील घेण्यास सोडण्यासारखा आहे.. Wink यापेक्षा जबरी किस्से इकडे आहेत.वाचले असतीलच.म्हणून फक्त...
तुम्ही इकडे लिहाल हे अनपेक्षित होते मला..:) म्हणजे कविता-कादंबर्‍या सोडून भूत बीत.. Wink

-------------------------------------------------------------------------------------------------------------------
अभिषेक,तो नॉर्मल अनुभव आहे. Happy मीपण एकदा घेतला होता.तुमचा शेवटचा मुद्दा आणि माझी संपूर्ण कंमेंट यात कोणताही संबंध नाही...

'नॉर्मल' माणसाला हे केव्हा जाणवतं हे तिकडे म्हणूनच लिहीलंय की. Happy .. Happy पण काय करणार इतर चार लोकांना माहीती मिळते ना?

पियू, जर आपली (म्हणजे आपल्या सर्वांची) भूतावर मनापासून श्रद्धा असेल ना तर विज्ञानदास यांनी कितीही विज्ञानाचे तारे तोडले तरी आपल्या मनातील भूताचे अढळ स्थान ते हलवू शकणार नाहीत.<<< येस्स.. मला बी घ्या यात... Wink Happy

विज्ञानदास, आपण अमानविय धाग्यांमधल्या किस्स्यांनी वैज्ञानिक कारण दुसर्‍या धाग्यांवर वाचुयात का?
एक धागा काढुयात हवं तर.
ज्याला कारण नकोयेत तो धागा त्याने इग्नोर करावा Happy
इथे फक्त भुतांचे किस्से असू देत.
काय वाटतय? Happy

प्रीति, बाप्रे!

रीया, बघू......मी उत्तराची लिंक टाकत जाईन.पण आधी किस्से येऊ देत तरी... Happy
महाराष्ट्रासारख्या ट्रॅडिशनल भागातून भूता-खेतावर किस्स्यांचा एवढा दुष्काळ??? का भूतं घाबरली आपलं बिंग इथं फुटतंय म्हणून.. Wink

महाराष्ट्रासारख्या ट्रॅडिशनल भागातून भूता-खेतावर किस्स्यांचा एवढा दुष्काळ???
>>>>>>>>
यावरून आठवले, कोकणात भुताखेतांचे प्रकार फार असतात असे बरेच लोकांना म्हणताना पाहिलेय. हे जर खरे मानले तर यामागे काही भौगोलिक कारण असू शकेल का? कि ही निव्वळ कोकणाला बदनाम करायची साजिश आहे.

का भूतं घाबरली आपलं बिंग इथं फुटतंय म्हणून..

>> तसं नाही हो विज्ञानदास. आता कल्पना करा कि सुट्टिच्या निमित्ताने सारी मामे/चुलत/आते भावंडे आजोळी जमली आहेत आणि रात्री जेवण झाल्यावर चांदणं पडलेल्या अंगणात सगळी भावंडं एकमेकांना आपापले भुताचे किस्से सांगत आहेत. एकेका कहाणीने सगळ्यांच्या अंगावर काटा येत आहे. आणि प्रत्येकजण हुरुप येऊन अजुन रंगवुन आपला किस्सा सांगत आहे. आता त्यात एखादाच भाऊ प्रत्येक किस्स्यामागचे विज्ञान सांगत बसला, प्रत्येक घटनेची कारणमिमांसा करत बसला आणि रेफरन्सेस देऊ लागला तर ती मैफल/ बैठक रंगेल का? सगळ्यांना बोर होईल आणि सगळे काढता पाय घेतील.

तसंच थोडंसं झालंय या धाग्याचं.

वर प्रिती यांनी जो अनुभव दिला त्यावर पण लिहीता आले असते की पण तो तुम्हाला 'एंजॉय' करण्यासाठी सोडलेला आहे की.

>> म्हणजे तुम्हाला मान्य आहे कि ज्या ज्या किस्स्याची कारणमिमांसा तुम्ही देताय त्या किस्स्याची एंजॉयमेंट व्हॅल्यु निघुन जातेय म्हणुन Sad

पण कुणी चुकीचे समज पसरत असतील,तेही माझ्या समोर तर मला नाही डोळेझाक करता येत

>> तुमचा हेतु चांगला आहे हे कळतेय. पण इथले वाचुन कोणी लगेच अंधश्रद्ध होणार नाहित याची खात्री बाळगा. आणि जर एखादा होणारच असेल तर तुम्ही दिलेल्या कारणमिमांसेमुळे ते थांबणार नाही.

(तुम्ही "<<< येस्स.. मला बी घ्या यात..." इथे ते मान्य केले आहे असे मी समजते).

कोकण कसं ना समुद्र किनारी आहे ना..म्हणून तिकडे भूताच्या गोष्टी जास्त...भूतांना खार्‍या पाण्यात पोहायला आवडतं .. हो खर्रर्रर्रच...
--------------------------------------------------------------------
पियू,
मला माहीत होतं हे...म्हणून सेपरेट धागा काढला.अगदी पहिला प्रतिसाद गेल्या धाग्यावर वैज्ञानिक कारणाने दिला तेव्हाच हे कळालं होतं. तसं आधी एका दोघांजवळ बोललोपण आहे.मी अभिषेक यांच्या किस्स्यावर अभिप्राय दिला कारण वरती एका पैलवानाने मला उकसवलं...

पण इथले वाचुन कोणी लगेच अंधश्रद्ध होणार नाहित याची खात्री बाळगा<<< मला लिहून देताय तसं खात्रीने?? अंधश्रद्ध होण्यापेक्षा आधी असलेला बदलला तरी पुष्कळ.

आणि जर एखादा होणारच असेल तर तुम्ही दिलेल्या कारणमिमांसेमुळे ते थांबणार नाही.<<< एखादा थांबला तरी पुष्कळ आहे.निदान भिती तरी कमी होईल...आणि होतो इफ्फेक्ट...मी वरच म्हटलं ना इथे प्रतिसाद देणार्‍यांपेक्षा वाचणारे जास्त असतात...गोष्टीमधूनच या गोष्टी खर्‍या की काय असं होतं आणि बर्‍याच लोकांना त्या सहन कराव्या लागतात.आपण शहरात राहतो,पण आडगावाला,खेडोपाडी बाद अवस्था आहे 'याच' गोष्टींनी.अर्थात इकडे पण कमी थोडेच आहेत?

इथे ते मान्य केले आहे असे मी समजते<<< ते उगाच तुम्हा लोकांना बरं वाटावं म्हणून.. Lol

मी इकडे प्रतिसाद टाकणार नाही असे ठरले असताना कृष्णाला जसे शस्त्र उचलावे लागले तेच माझ्या बाबत घडले हो... Happy

-विज्ञानदास

---------------------------------------------------------

यामागे काही भौगोलिक कारण असू शकेल का? कि ही निव्वळ कोकणाला बदनाम करायची साजिश आहे. << कोकणातल्या एखाद्या आतल्या गावामधल्या वाडीमध्ये वीजेची अजिबात सोय नसताना एक अख्खा पावसाळा राहून बघा. तुमचे तुम्हालाच समजेल.

कोकणामध्ये करणी देवदेवस्कीचे प्रकारदेखील खूप चालतात. यामधले लोकांना बर्‍यापैकी माहित असलेले म्हनजे बायंगी. शाळेत असताना गल्लीतल्या एका अत्यंत रंगेल माणसाने "बायंगी आणलीये" या चर्चेचा अर्थ त्याने त्याने "कीप ठेवलीये" असा घेतला होता. नंतर एका मित्राने बायंगीवर ज्ञानप्रबोधन केले. या प्रबोधनामध्ये बायंगी कशी आणायची इथपासून ते कशी नेऊन सोडायची इथवर साग्रसंगीत वर्णन होते. "तुला एवढे कसे माहित?" म्हणून विचारल्यावर "बापाने आणली होती माझ्या" असे उत्तर मिळाले. मित्राच्या घरी जाणे, त्याच्याकडचा खाऊ खाणे तेव्हापासून बंद!!!!

Pages