पॅरानॉर्मल-सत्य असत्याचे संतुलन किती?

Submitted by विज्ञानदासू on 1 June, 2014 - 06:41

लहरविज्ञान(Wave Physics) ऊर्जाशास्त्र्(Thermodynamics,Electromagnetics,Quantum Physics alied Energies), मानसशास्त्र या त्रिकोणी बंधांची खूणगाठ मनाशी बांधून केलेली वाटचाल अतर्क्य घटनांसाठी त्यातल्या त्यात भितीदायक घटनांसाठी दिलासादायक ठरेल यात शंका नाही,त्याचाच थोडासा आढावा घेण्यासाठी हा लेख प्रपंच.

एका धाग्यावर,एका प्रश्ना मागील उत्तर उघड करण्याचा काहींनी आग्रह केला.खरेतर विशेष उत्तर नव्हतंच त्या प्रश्नाचं. किंबहूना कुठल्याही मोठ्या रहस्याचं कारण हे साधंच असतं,असं आईन्स्टाईन महाशयांनीच सांगून ठेवलं आहे.बॉलीवूड आणि हॉलिवूडचे चित्रपट बघून बर्‍याच गोष्टी आपल्याला त्या थाटाच्या लागतात.त्याविरूध्द काही निघालं की हिरमोड होतोच ही खरे तर आपण आपल्या मेंदूला लावलेली सवय आहे,असे आता म्हणावे लागेल.

त्या धाग्यावरील घटनेच्या उत्तरामागे,मग ते ऊर्जा विज्ञान असेल किंवा टेलीपॅथीसारख्या गोष्टी, टेलीकायनेटीक्स किंवा मग गाडीचं साधं मेकॅनिझम.तिथेच उत्तर होतं.गाडी तापली असल्याने बंद झाली.गाडीने थोडी विश्रांती घेतली.तापलेलं इंजिन थोड्यावेळाने नॉर्मल आल्यावर चालू झाले.वर ज्यांची गाडी होती त्यांनी भीतीने गडबडून जाऊन किक मारली असावी असे दिसते व गाडीने चालू होण्यास खो दिलेला असावा.त्यांच्या सोबतीला कोणी आल्यावर दोघांचाही धीर वाढला अशणार. त्यानेच गाडी चालू झाली.निदान वरवर पहात असेच झाले आहे असे दिसते व पटतेही.पण हे उत्तर लोकांना अपेक्षित असण्यापेक्षा त्यांना वेगळी अपेक्षा होती की काही नवल विचित्र त्यामागे असेल.

पॅरानॉर्मल(यात भूताच्या आणि दैवी दोन्ही गोष्टी येतात) म्हणजे काय याचा थोडक्यात आढावा मला घ्यावासा वाटतो आहे.पॅरानॉर्मॅलीटी ही भूत या संकल्पनेशी जोडली आहे तशीच परमेश्वर या संकल्पनेशीही आहे.तेव्हा इथे तो समज आधीच सोडवला जावा,अशी अपेक्षा ठेवतो.लेखाद्वारे भूत आहे किंवा काय यावर प्रकाश टाकावयाच नसून त्याच्या अस्थित्वाला किती महत्व द्यायचं याचा ऊहापोह केला आहे...

लहर विज्ञान आणि ऊर्जा विज्ञान समोर असताना या गोष्टी विचारात घ्यायला हव्यात.मुळात भूत(!) ही संकल्पना पाहण्याआधी थोडं फिजिक्स लक्ष्यात घ्यायला हवं.आत्मा ही एकार्थाने ऊर्जाच म्हणावी लागेल.व्यासांनी आत्म्याला "नैनं छिंदन्ती..." या श्लोकात बसवलेले आहे. दुसर्‍या बाजूने हा 'नैनं छिंदन्ती...'एक प्रकारे थर्मोडायनामिक्सचा पहिला नियम्,आत्म्याच्या व्याख्येला व एकंदर आत्म्याला चपखल बसतो.म्हणजे त्याला जर ऊर्जा मानले तर त्याचं अस्थित्वही मान्य होईल.परंतु थर्मोडायनॅमिक्स च्या पुढ्च्या नियमांनी त्याचं अस्थित्व धुसर ठरतं.तरीही,तरीही त्याला ऊर्जा मानून भूत आणि देव या दोन्ही गोष्टींकडे पाहता येईल.जर आत्मा ही एक ऊर्जाच आहे तर ऊर्जेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय...ती कितीही मॅग्नीट्युडमध्ये असू शकते तसेच धन आणि ऋण वेक्टर्समध्ये असू शकते.तिचं मोजमाप निगेटीव्ह असणार नसून तिची शक्ती धन आणि ऋण प्रभारात असू शकते.भौतिकशास्त्राचे जाणकार इथे जास्त चांगले बोलू शकतील.

तेव्हा इथे पॉसिटिव्ह आणि निगेटिव्ह्चं ऊर्जेचं मोजमाप पॅरानॉर्मल(!) अस्थित्वासाठी महत्वाचं ठरेल आणि तिथेच आपल्या थकलेल्या मेंदूला ठकवण्यासाठी,या निगेटीव्ह लहरींच्या ठराविक ठि़काणी,हीच ऊर्जा समोर येते.एक

त्याच धाग्यावरील काही घटनांचा संदर्भ देतो-
उदा.गाडी लॉक होणे,ओढ जाणवणे या खरं तर डोक्यात चालणार्‍या गोष्टी आहेत.अर्थात भिती आणि याच ऊर्जा लहरी त्याला कारण असतात.अनेक प्रसंगात गाडीला ओढ लागली आणि नंतर सुटली,हलकं वाटलं असे जाणवलेले दिसून येणे खरे तर 'न्यूरल लॅग' आहे.त्यावेळेस गाडीच्या स्पीडोमीटऱकडे कुणाचं लक्ष्य गेलं असेल तर गाडी वेगातच(जरा जास्तच) चाललेली होती असे दिसेल.

खरे तर माणूस जेव्हा प्रचंड ताकद लावून यातून बाहेर येतो तेव्हा ती त्याने 'त्या मनातल्या' न्युरल लॅगच्या थ्रेशोल्डवर केलेली मात असते.आता हेही कळण्यासाठी सिनॅप्सकडे(गुगल करावे) जावं लागेल जिथे विद्द्युत ऊर्जा आणि केमिकल्स यांचा अखंड सुंदर खेळ चालू असतो.तिथे थोडी गडबड झाली की वेगळे(पॅरानॉर्मल[!]) संदेश जाऊ लागले की तो मनाचा खेळ सत्य-आभासात परावर्तीत होतो.तर मुद्दा हा की बराच भाग ऊर्जाविज्ञानाशीच(Energetics) व उर्जावहनाशी(Energy-Dynamics) जोड्ला गेला आहे.

आता स्लीप पॅरालिसीस-ऑक्सीजनच्या कमतरतेने होऊ शकतो,हे कितींना माहीत आहे?ढगाळ हवामानात, थंडीत्,एसी मध्ये झोप लागली की स्लीप पॅराचा अनुभव बर्‍याच जणांना येऊन जातो. तोंडावर पांघरून घेऊन झोपल्यानंतरही स्लीप पॅरा.ची फेज येऊ शक्ते.तसेच स्ट्रेस आणि कमी ऑक्सीजन हेही त्याला कारणिभूत ठरतात असे सांगितलेले आहे.हॅरी पॉटरचा स्लीप पॅरालीसीस असाच आहे.गळा,डायफ्रामचे स्नायू आखडल्याने छातीवर दाब येतो.तसेच REM अवस्थेत आलेल्या जागृत मनामुळे स्वप्न किंवा आधीचे विचार यांचे आभासी वास्तवात रुपांतर होऊ शकते.

दोघांना एकाच प्रकारची स्वप्ने पडणे.इथे परत टेलीपॅथी आणि टेलीकायनेटीक्सचा संदर्भ.पण हे मुद्दे असे आहेत की इट हॅज वेरी लेस फिजीकल एव्हिडन्स अँड सो लेस अमांउंट ऑफ रेसिड्युअल प्रुफ्,बाय चान्स...मिळाले तर...अथवा शोधत बसा.उर्जा हातात सापडेल तर खरे.ते मिळतच नाही.

(poltergeist)पोल्टरगिस्ट म्हणजे आवाज करणारं भूत(!)दारे,खिडक्या हलणे,बेड हलणे इ. याचा स्त्रोत सायकोकायनेसीस असू शकेल असं बर्‍याच जणांचं मत आहे.सायकोकायनेसीस किंवा टेलीकायनेसीसची उदाहरणं आपण डायनामो सेरीज बघताना(इथे ट्रीक्स आहेत बहुदा) पाहीली आहेत किंवा अक्षय कुमार ने कॉमेडी नाईट्स मध्ये जो चष्मा उचलला होता,हाताचा स्पर्श न करता तेच.अर्थात पोल्टरगिस्टमध्ये हे करणारी व्यक्ती कोण हे मात्र कळलेलं नाहीये.अर्थात इथे त्यांचं असं म्हणणं आहे कि पोल्टर्गिस्ट या टेलीकायनेसीसचा वापर करत असावा.असावा...ती खरेच तसे करते का हा संशोधनाचा विषय आहे.याच्या अस्थित्वाला आधार नाही.

Synchronicity-ज्यात दोन किंवा अधिक घटना एकमेंकांशी दुरान्वये वा सलगीने समान असतात.उदा.दोघांना एकच स्वप्न पडणे.दोघांना एकावेळी एकच जाणीव होणे इ.या गोष्टिच्या ऊहापोहासाठी प्रसिध्द मानसशास्त्र तज्ञ कार्ल जुंगचं 'युंग ऑन सिन्क्रोनिसिटी अॅंड द पॅरानॉर्मल' हे पुस्तक वाचावं.पाऊली नावाचा शास्त्रज्ञ याच किश्शांसाठी प्रसिध्द होता.त्याचे किस्से तर अमाप प्रसिध्द्द आहेत.

मी जेव्हा कंप्यूटर लॅब मध्ये पाऊल ठेवायचो तेव्ह दोन वेळा कंप्यूटर्स आपोआप रिस्टार्ट झाले आहेत म्हणजेच लाईट त्याचवेळी गेली आणि आली आहे.अनेकदा मी खुर्चीवरुन उठलो की कॉलनीतली लाईट जाते किंवा येते तरी.एकदा वर्गात शिरलो आणि पीसीचा फ्युजच उडाला होता.यामागेही MSEB वाल्यांशी माझी 'वेव्हलेंग्थ' चांगली जुळते असा निष्कर्ष एका मित्राने काढला आहे.हा विनोदाचा भाग सोडा पण टेली कायनेसीसचं अस्थित्व आहे,असा हायपोथेटीकल विचार मांडून त्याला सत्य-असत्य ठरविण्याचा प्रयत्न अजून करायला हवा आहे.खरे तर इन्व्हर्स स्क्वेअर लॉ नुसार सायकोकायनेसीस कठीण गोष्ट आहे.पण अगदी सुक्ष्म पध्दतीने या कथीत गोष्टीचं अस्थित्व शोधण्यासाठी अजून प्रयत्न गरजेचे आहेत.अणूमधला केंद्रक आणि त्यातले उप-अणू, यांमधल्या काही थेओरीज अजून सिध्द झालेल्या नाहीत.त्यातले मेकॅनिक्स गुल्दस्त्यातच आहे... बिग बँग थेओरीमध्ये मूळ उप-कणांचे प्रसरण पहील्यांदा कसे झाले.ती उर्जा कोणती होती याचे केवळ तर्कच मांडले गेले आहेत.त्याचीही सिध्दता होत नाही तोपर्यंत काही बाबी पडद्याआडच असतील.(संपादित)

पॅरानॉर्मल(!) हे अतर्क्य नाहीच मुळी.भिती,ऊर्जेचं स्वरूप आणि ब्रेमिकल्स चा त्रिवेणी संगम होऊन भूत आणि अमानवि गोष्टींचा उगम झालेला आहे. कधी कधी अमानविय(खरे तर यात अ‍ॅंटॅ-प्रोटॅगोनिस्ट दोघे येतात) या संकल्पनेचे पूर्वग्रह मनात असल्याने त्या गोष्टींना बढावा आपलं मन देतं आणि परत भिती...असे चक्र समोर येत असावे असे दिसते.

पॅरानॉर्मल ही कंसेप्ट रोबोटस् सारखी नाटकांमधून आली असावी.जिला नंतर अभ्यासाचं(!) स्वरूप दिलं गेलं असावं.हॉलीवूड्पटांनी झोंबीला डोक्यावर घेतलं तसेच.

पॅरानॉर्मलला काहींनी स्युडोसायन्सचं रूप दिलेले आहे.जे सायन्ससारखं आहे पण सायन्स नव्हे.अमीबाला असणारे पायासारखे अवयव.म्हणून ते स्युडोपोडा.तसच हेही.म्हणजे संकल्पना तर सगळ्या वैज्ञानिक...परंतु सिद्ध करण्यामध्ये अडचणीच्या किंवा ज्यात सिध्द् करण्यासाठी बरेच अडथळे आहेत असे.बरे,अशा गोष्टी सिध्द करणार कशा?त्याला जवळपास 'शून्य' वेळा फिजीकल एविडन्स असतो. मग अशावेळी कुणीतरी जे बघीतलंय त्यावर फक्त अनुमान काढत बसणंच हातात राहतं.याचा फायदा भोंदू लोकांना आजतागायत होत आला.जसा भोंदूना फायदा तसाच स्वत:कडे लक्ष्य वेधून घेणार्‍यांनाही फायदा झाला आहे.

आशूचँपच्या या धाग्यावरचे सगळ्यांचे अनुभव खरे आहेत,जे त्यांनी स्वतः घेतले आहेत,असे म्ह्णू.परंतु त्याला कुठे ना कुठेतरी ठोस उत्तर आहे.त्यावर उपाय आहेत.ते हातात आहेत आणि काही पडद्यामध्ये आहेत.परंतु त्या उपायांचं अस्थित्व नक्की आहे.या निगेटीव्ह ऊर्जेला ऊत्तरं आहेत,हा दिलासा जरी मनात ठेवला तरी बरेच प्रश्न आणि मानसिकता सुटतील असे वाटते.

तसे,म्हणूनच माझ्या एका प्रश्नाचं उत्तर कुणीही द्यावं की फ्रेश असताना,दिवसा उजेडी अमानविय असं कधी कां जाणवत नाही?

कुठलाही 'इव्हेंट' हा एकाचा द्योतक नाहीच असू शकणार.त्यासाठी अनेक घटक एकत्र येऊन काम करत असतात.त्याच सारखे अमानविय अनुभवांची त्या-त्या क्षणी एक कारणांची साखळी असते कां,हे पाहायला हवं.ती साखळी त्यातली प्रत्येक कडी सोडवून परत जुळवता आली की झालं.भितीच्या पकड घेण्याने त्याची मिमांसा त्यावेळी शक्य होत नाही.हिरवी साडी नेसलेली स्त्री ही विचारधारेत एवढी प्रवाही आहे की मुन्नाभाई सारखी(येथे त्याचे गांधीजी) ती मनात असल्याने दिसत असते.अनेक रंगांनी ही साडी रिप्लेस केली,तशी मानसिकता भिनवली की त्या-त्या रंगातल्या साडीत ते भूत दिसेल.

युंगच्या पुस्तकात त्याने एकेठिकाणी त्याच्याच घरातली काही उदाहरणं दिली आहेत.पण त्याची कारणंही पुढे वाचायला मिळतात.युंगचा एक किस्सा रोचक आहे.त्या अनुषंघाने माझा किस्सा त्यात मिसळ्तो.त्याने त्याच्या एका पेशंटला एक रत्न भेट दिले असे स्वप्न त्या पेशंट्ला पडत असे.ते रत्न एका बीट्लसारखे(कठीण कवचाचा किडा किंवा ममी रिटर्न्स मधला इजिप्शीयन बीट्ल) आकाराला होते.एकदा तिच्यावर थेरपी चालू असताना एक बीटल जुंगच्या खिडकीवर धडका देऊ लागला.(असाच एक मोठा ब्राऊनबीट्ल माझ्या खोलीच्या खिडकीवर रात्री तीन-चार दिवस धडका देत आहे आणि आत्ता पुस्तकात मला युंगचा किस्सा सापडावा हा काय योगायोग आहे?)जुंगने त्याला पकडले आणि आश्चर्य म्हणजे तो किडा हा त्याच प्रकारचा होता ज्याचे रत्नरुपी स्वप्न त्या पेशंटला पडत असे.

युंगने याची मिमांसा मटेरीअलिझमच्या बाहेरची घट्ना अशी केली आहे.तो मानसशास्त्रीय कारणे मानतो तर कधी दिग्मूढदेखील होतो.कारणांचे अस्थित्वमय पुरावे दिसू शकत नाहीत याचा उद्वेगही त्याला येतो.कधी कधी त्याचा संबंध अॅस्ट्रॉलॉजीशी तो जोडतो.

पॅरानॉर्मलच्या नाट्यमय अस्थित्वापेक्षा,दुनियेत ऊर्जाविज्ञानाचं स्थान बलाढ्य आहे,असेच म्हणावे लागेल. त्या घटनांना आपण कसे बघतो हे आपल्या डोळसपणावर अवलंबून आहे.आपण एवढं रोज वाचतो.नव्या संकल्पनांच्या संपर्कात राहतो.नवीन जाणून घेण्याचा अट्टहास बाळगतो.पण असे अनेक लोक आहेत ज्यांना हे ज्ञान मिळत नाही पुस्तकांपासून ही माणसं हाता-तोंडाच्या लढाईत बाजूला राहतात.ती माणसं कशी रहात असतील्,त्यांच्याकडे काय पर्याय असतील आणि त्यांचे प्रबोधन कसे केले जावे हा प्रश्न आहे.

मला जमेल तसे इथे मांडलेले आहे.त्यानिमित्ताने याविषयाचे थोडे लिटरेचर नजरेखालून गेले आणि नवीन ज्ञानात भर पडली असे वाटते.मी या विषयातला जाणकार नव्हे व एरवीही एक विद्यार्थीच. परंतु माणसाने बघताना भौतिकाकडून अदिभौतिकाकडे(जर ते असेल तर) जावे असे नाही का? आमच्या संस्कृतच्या सरांनी एकदा म्हटलेले जिथे विज्ञान संपते तिथे अध्यात्म चालू होते.त्यावर वर्गात वादंग होऊन त्यांना आपले म्हणणे मागे घ्यावे लागले.

खरे तर विज्ञानाला अवकाश हीच मर्यादा आहे.त्यामुळे अध्यात्म म्हणजे विज्ञानच.पोथी,पुराण म्हणजे त्याच स्युडोसायन्सला समजण्याचा आटापिटा ठरेल किंवा टूल्स(?) म्हणता येतील.आदिभौतिक हेच मुळात मानवनिर्मित आहे त्यामुळे ते सत्य मानण्याऐवजी आईनस्टाईनचे नैसर्गीक रहस्य जास्त स्वारस्ययुक्त वाटते,ज्याला आईन्स्टाईन कुट म्हणतो,ते कुटील कसे असेल?आणि मानवाला अमानविय त्रास देण्यात याच विज्ञानाला पर्यायाने काय हशील होणार आहे?

वरच्या उदाहरणात गाडीला किक मारताच गाडी चालू झाली कारण ती नॉर्मलला आली असावी.अत्यंत वेगात चालवून ती तापून बंद पडली हे तिथे लक्ष्यात आले असते तर भिती अजूनच वाढली नसती.तिथे वेळीच लगाम बसला असता आणि निदान गाडी ढ्कलत न्यायला बळही आले असते. हे मात्र निश्चित खरं कि कई बार दिमाग पे डर हावी हो जाता है.... लेकीन डर भी केमिकल लोच्याही हय बाबांनो...

मुळात येणारे अनुभव हे सगळे सायकॉलॉजिकल फेनोमेनॉ आहेत असा मतप्रवाद आहे आणि वैयक्तिक रित्या त्याचं विश्लेषण मान्य असल्याने मलाही तो मान्यच आहे.विज्ञान हे डोळस तपास शिकवत असते.अंधश्रध्दा हा थोडासा गोंधळात टाकणारा शब्द आहे.

डोळसपणे कुणी भूतावर श्रध्दा ठेवली तर त्या माणसाची ती श्रध्दा ठरेल.जर देव ही देवळातली कंसेप्ट कुणी अश्रध्द ठरविली तर ती अंधश्रध्दा होईल.ती भावना आहे तर तिला शास्त्र काट्याची कसोटी लावायला नको काय? ती संकल्पना व्यक्तीविचार सापेक्ष आहे आणि विचार हा बुध्दीवर अवलंबून आणि बुध्दी अर्थात शिक्षणावर.ती श्रध्द्दा म्हणून माना पण त्याची कसोटी करून,अशीच अनेक विद्वानांची आकांक्षा आहे.

मी स्वतः भूत पाहीलेलं नाही आहे जर पाहीलं असतं तरी त्याला मानलं नसतं.कारण अद्रुश्यापेक्षा माणसाच्या वावरावरती माझा विश्वास आहे आणि भूतासारख्या वाम गोष्टीवर ते अस्थित्वात असेल तरी विश्वास नसेलच.म्हणून इकडच्या या एका धाग्यावरील अनुभवांना मी हस्यास्पद मानत नाही.परंतु त्यांचं स्पष्टीकरण असू शकतं इतकं मला ठामपणे म्हणायचं आहे.ते स्पष्टीकरण नसता,त्या गोष्टी हस्यास्पदच(चेष्टेने हस्यास्पद नव्हे) ठरतात.त्याची अनेक उदाहरणे ज्योतिबा,जेजुरीला किंवा इतर ठिकाणी गेलात तर दिसतात.ज्योतिबाला गेलो होतो तिथे एका महीलेला चक्कर आली.त्यांना आम्ही सांगीतले गाडीने पन्हाळा हॉस्पिटलला जाऊ.पण त्यांनी ऐकले नाही. ज्योतिबाच्या दारात काय भिती वगैरे त्यांचे म्हणणे.जवळपास दोन-अडीच तास ती महीला त्या भर उन्हात, फुफाट्यात पडून होती.तिच्याभोवती तिचे नातेवाईक होते.पण एकालाही हालचाल कराविशी नव्हती वाटली. डिहायड्रेशन आणि पार्शल कोमा.शेवटी देवस्थळ्यांनी उचलून दवाखान्यात नेली पण नाही वाचू शकली.

विज्ञान सर्वव्यापक जरी असले तरी काही संदर्भात अजून रहस्यच आहे,पण म्हणून त्याला अतर्क्य म्हणून वा अध्यात्मिक म्हणून न पाहता,शास्त्र म्हणूनच पहावे,अशी विज्ञानाच्या भक्तांतर्फे इच्छा.

-विज्ञानदास.
धन्यावाद!

(लेखात तांत्रिक चूक असल्यास निदर्शनास आणल्या जाव्यात.आभार)
संदर्भ-कार्ल युंग ऑन सिक्रोनिसीटी अँड द पॅरानॉर्मल
-www.indianparanormalsociety.com
-Some Referal Articles
-Richard Wisemans Statements/Articles(जरुर वाचावित अशी)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तूमच्या संस्कृतच्या गुरुजींना आपले म्हणणे मागे का घ्यावे लागले होते, ते ( म्हणजे त्या चर्चेतले मुद्दे ) थोडक्यात लिहिणार का ? ते वाक्य त्या क्षेत्रातील लोकांचे आवडते वाक्य आहे.

डिस्कवरीवर "ब्रेन गेम्स" नावाचा कार्यक्रम असतो.. नक्की बघा.. बर्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील कारण ते आपल्या मेंदुतच आहे Happy

दिनेशदा आपल्यासाठी,
मला ठिकसे मुद्द्ये आठवणार नाहीत परंतू काही मुद्दे ज्यात आम्ही वाद घातला होता.त्यातला एक मुद्दा मी वर याच विधानाच्या पुढे ठेवला आहे.मुळात अध्यात्म ही बाब पॅरानॉर्मल आहे.स्पिरीच्युअल घटना याही भूतासारख्याच आपल्या संस्कृतीच्या मुळाशी आहेत.अध्यात्म हे विज्ञान संपल्यावर सुरू होत नसून Itself it is a Science.माणूस अध्यात्माला पोथी,स्तोत्रे,पारायणे याच्याशी जोडतो.हे जे आपण करत असतो ती अर्थात पॉझीटीव्ह ऊर्जा आहे किंवा तशा लहरी उत्पन्न करण्यास मदत करणारी टूल्स आहेत असे म्हणू.पण 'यालाच' आपण अध्यात्म असे म्हणतो.

खरे अध्यात्म हे जास्त उजळ आहे.काही लोक देव मानत नाहीत परंतु परमेश्वर मानतात.काही वेदांत मानत नाहीत वेद मानतात.तसाच हा मुद्दा.सो कॉल्ड अध्यात्म हे भटजी-ब्राह्मांनी(जातीउल्लेख नाहिए) हेतुपुरस्सर काढलेला भाग आहे.हे स्वतः त्यांनाही मान्य आहे.जिथे अध्यात्म हे विज्ञान आहे.म्हणजेच ते नैसर्गीक आहे तिथे सो कॉल्ड 'अध्यात्म' या संकल्पलनेची आवश्यकता वाटत नाही.अध्यात्म हे पोथ्या,ठराविक ठिकाणी उभारलेली देवतीर्थे यापेक्षाही भव्य-दिव्य आहे.विज्ञान म्हणजे केवळ प्रयोग,मेडीकल सायन्स,टेक्नॉलॉजीशी संदर्भात जोड्ले जाते.परंतु जर तुम्ही विज्ञानाची व्याप्ती सर्वव्यापी केली आणि अध्यात्माची व्याख्या बदलली तर जिथे विज्ञान संपते तिथे अध्यात्म चालू होते ह्या वाक्याचा फोलपणा समोर येतो.

तेव्हा मांडलेले मूळ मुद्दे:-
१-पोथ्या,पुराणे,वेदांत,सप्ताह्,सोहळे,प्रवचन म्हणजे अध्यात्म नसून अध्यात्म हे विज्ञान आहे.जे केवळ आणि केवळ नैसर्गीक तुमच्या आमच्या सर्वांमध्ये,जळी,स्थळी,काष्ठी आणि पाषाणी आहे.
२-अध्यात्माची व्यावसायीक व्याख्या रद्द करून तिला विज्ञानाच्या छटेत पहा.
३-प्रार्थनांसाठी आरत्या,स्तोत्रे न म्हणताही साध्या शब्दानेही ते कार्य साधले जाऊ शकते.
४-उर्जा हाच परमेश्वर आहे,जो वेदांनी सांगीतला आहे.
५-वेद हे अपौरूषेय आहेत आणि म्हणून ते स्त्रियांनी लिहिले असावेत हे मान्य नसले तरी अमान्य करण्याजोगे यात काहीही नसावे.स्त्री ही जर पुजनीय आहे तर मुर्त देव कशासाठी?त्याला जोडून येणारे सर्व सोपस्कार कृत्रिमरित्या व्युत्पन्न आहेत्,नैसर्गीक नाहीत.
६- अतर्क्य आहे म्हणून ते दैवी/अध्यात्मिक/आदिभौतिक्/अमानविय् किंवा तत्सम हे,असे का?त्यालाही कारणे आहेत.केवळ माहीत नाही म्हणून ते काम देवाधिकांनी किंवा सो कॉल्ड अध्यात्माने केले असे कसे म्हणता?
७-एखादा माणूस दैवी चमत्काराने बरा होणे,वाचणे याला त्या माणसाची याच जन्मातली कर्मे कारण असतात.तसेच हा कर्मांचा नियम न्युटनच्या तिसर्‍या नियमाने पडताळून बघता येऊ शकतो. Proud

सबब विज्ञान अमर्याद आहे अध्यात्म मानवनिर्मित आहे.

यावर त्या सरांनी आपल्या पोथ्या गुंडाळल्या आपली हार इनडायरेक्टली मान्य करीत ते वर्गातून बाहेर पडले.त्यांचा इगो दुखावला गेला होता.ती हार त्यास एवढी लागली असावी की त्यांनी आमचे कॉलेज सोडले (कारण वेगळे होते) मात्र नंतर अनेक दिवस इतर शिक्षकांचे त्यावरती डोस/लेक्चर आम्हाला ऐकावे लागले होते.

कदाचीत हे मुद्दे पटणारे न पटणारे असू शकतील.परंतु एकमताने समोर मांडलेले होते.त्यामुळे त्याला एक सकारण बळ मिळाले होते,हे नक्की.

इति

विज्ञानदास,

शेवटी शेवटी आलेलं वाक्य लेखाच्या सुरुवातीला ठेवा. बराच गोंधळ कमी होईल. हे ते वाक्य :

>> लहरविज्ञान्,ऊर्जाशास्त्र्,मानसशास्त्र या त्रिकोणी बंधांची खूणगाठ मनाशी बांधून केलेली वाटचाल अतर्क्य घटनांसाठी
>> त्यातल्या त्यात भितीदायक घटनांसाठी दिलासादायक ठरेल यात शंका नाही.

असो.

तुम्हाला काय म्हणायचंय ते शेवटपर्यंत कळलं नाही. मात्र शेवटच्या वाक्याने थोडीफार संगती लावता येईल असं वाटतंय. पहिल्याप्रथम या संज्ञांचे इंग्रजी प्रतिशब्द देता का? लहरविज्ञान म्हणजे Quantam Mechanics, ऊर्जाशास्त्र म्हणजे Thermodynamics, मानसशास्त्र म्हणजे Psychology, बरोबर?

आ.न.,
-गा.पै.

>>>> ७-एखादा माणूस दैवी चमत्काराने बरा होणे,वाचणे याला त्या माणसाची याच जन्मातली कर्मे कारण असतात.तसेच हा कर्मांचा नियम न्युटनच्या तिसर्‍या नियमाने पडताळून बघता येऊ शकतो. <<<<

कसा?

अवांतर : मिपा प्रमाणे माबो वर सुद्धा कोट-अन कोट ची सोय उपलब्ध करून देत येयील काय ?? याचा पाठपुरावा कसा करावा ? Happy

वर माझा एक लेखप्रयत्न काल दिलेला आहे.तिथे काही चर्चा या गोष्टींबद्दल केलीत तर आवडेल.शिवाय त्यांचा आधार पडताळून बघण्यासाठी इतरांनासुध्द्दा मदत होईल.
काहींना जरी यातून सकारत्मक रित्या या विषयाकडे पाहण्याचे बळ मिळाले तरी खूप आहे.

ध.

नवीन माहीती मिळाल्यास तीही इकडे द्यावी.लेख विषय वेगळा आणि लांबलचक लेखामुळे तो न कळण्याची शक्यता जास्त.तरी तो समजेल तसा टप्प्याने वाचणे.

झेनॉग्लॉसी म्हणतात नवीन भाषा अचानक बडबडण्याला.त्याची कारणे:-
१-टेलीपॅथी.
२-चुकून एखाद-दोन शब्द/फ्रेजेस उच्चारणे.तेच सतत उच्चारणे.
३-मित्र किंवा कोणी ओळखीचे त्या भाषेशी संबधीत असणे किंवा लक्ष्य वेधून घेण्यासाठी अशी भाषा शिकणे.
४-एकंदर मेंदूचा वापर हा खूप कमी असतो.समुद्र्,अवकाश आणि मेंदू यात अजून बरेच शोधण्यासारखे आहे,ज्याला एक जन्मही अपुरा पडेल.मेंदूच्या कुठला कोपरा कशाने भरला आहे आणि तो केव्हा अ‍ॅक्टीव्हेट होईल कळणे कठीण.
५-अशा केसेस मध्ये पेशंट बंगाली,एजीप्शीयन अशाच भाषा बोलत असतो.त्यानंतर इतर भाषांचा क्रमांक.
६-ठोस पुरावे नाहीत.ठोस अभ्यास अजून तरी नाहीए यावर.
७-आपली पुस्तके खपावित म्हणून लेखक कितीही मोठा मानसशास्त्रज्ञ असला तरी काहीही सांगू शकतो.
८-झेनोग्राफीचेही ठोस पुरावे उपलब्ध नाहीएत.खूपच कमी रिसर्च.
९-असे घडत असेल परंतु त्याला अतर्क्य म्हणू नये,मानू नये.
१०-कुठलंही पुस्तक वाचून मानसीकता तयार करु नयेत अशा गोष्टींच्या ज्यांना अजून आधारच नाही आहेत.
११-हायपोथेसिस टू प्रूफ टू कन्फर्मेशन अशी पध्दत आहे,अगदी नेहमीच्या माणसाने देखील तिच कायम ठेवावी असे वाटते.

कुणी लेखक म्हणतो म्हणून पुर्वजन्म्,झेनॉलोजी,इतर गोष्टींना महत्व दिले जाते असे वाटते.

Very Good!
एकदा वर वर वाचला पण काही गोष्टी समजायला जड गेल्या. पुन्हा एकदा मन लावून वाचेन
पण इंटरेस्टींग आहे Happy

विज्ञानाला, विज्ञानाच्या मर्यादा ठाऊक असतात.. पण त्या दिशेने प्रयत्न मात्र अव्याहत चालू असतो.
अगदी ताजे उदाहरण बघा. मलेशियन एअरलाईन्सच्या विमानाचे काय झाले हे फक्त विज्ञान आणि विज्ञानच शोधून काढू शकेल.

दिनेशदा,
बरोबर.त्या मर्यादांनाही न जुमानता आपले एवढे लोक त्यावर वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असतात/आहेत...एक शेतीवैज्ञानिक मला वाटत म.वा.धोंड असे म्हणाले होते की वैज्ञानिक/शास्त्रज्ञाला निराशेची सवय असायला हवी.सतत नवीन-नवीन हुडकण्याची पराकाष्ठा करायलाच हवी,डिस्पाईट ऑफ फेल्युअर...कधी तरी बल्ब लागणारच...

मलेशिअन एअरलाईन्स बाबत असे घडू शकेल की कुणाच्या तरी स्वप्नात त्याचे काय झाले हे यावे आणि मग त्याचा पत्ता मिळावा.पण हे घडेलच असे फार दुर्मिळ.कुणाच्या तरी इन्ट्यूशनने जर काही नवीन कळाले तर? अजूनही मी तरी आशा सोड्लेली नाह्ही... आत्ता मात्र जुन्या फिल्मी डायलॉग सारखे 'जमी खा गयी या आसमान निगल गया' अशी अवस्था आहे.

एखाद्या विषयाचा ध्यास घेतल्यावर, किंचीत झोपेत असता मेंदूने त्या सत्याकडे जाण्याचा एखादा ( आजवर न सुचलेला ) मार्ग सुचवावा.. हे सहज शक्य आहे.

ह्म्म...यात केक्युली इफ्फेक्ट... सगळ्यात आधी तोच आठवतो... Happy मग बाकी ज्यांना ज्यांना स्वप्नात सुचलं ते सगळे... अम्मेझींग होते सगळे...

अध्यात्म हे विज्ञान संपल्यावर सुरू होत नसून Itself it is a Science.माणूस अध्यात्माला पोथी,स्तोत्रे,पारायणे याच्याशी जोडतो.हे जे आपण करत असतो ती अर्थात पॉझीटीव्ह ऊर्जा आहे किंवा तशा लहरी उत्पन्न करण्यास मदत करणारी टूल्स आहेत असे म्हणू.पण 'यालाच' आपण अध्यात्म असे म्हणतो.

म्हन्जे देवला देव न म्हन्ता God म्हनायचे .

@जाइ
तो प्रतिसादामधला भाग आहे.मूळ लिखाणात वर 'टूल्स(?)' असं टंकलेलं आहे.(प्रतिसादात तसं नमूद करायचं राहून गेलं किंवा माझा आळस नडला आणि तुम्ही तोच मुद्दा पकडलात.) Happy
ती खरेच 'टूल्स' आहेत का? असा म्हणण्याचा अर्थ आहे. यालाच अध्यात्म म्हणायचं का?असा त्याचा अर्थ आहे.

त्यातले सर्व मुद्दे वाचा लक्ष्यात येईल.

रिप्लेस इट बाय 'परमेश्वर'... पंचमहाभूतं,परमेश्वर म्हणजेच ऊर्जा माना.सो,ऊर्जा जोडली गेली विज्ञानाशी...सो विज्ञान म्हणजे परमेश्वर... सिध्दता. 'त्याला' मिळवायचें असेल तर वेदान्त काय वाचता?आरत्या काय म्हणता? संवाद वाढ्वा..संवाद साधा... हेच खरे मंत्र... असं त्यावेळी आम्हाला म्हणायचं होतं...

स्वामी विवेकानंदांप्रमाणे आम्हीही तेव्हा वेदान्ताला पुरवणी म्हणालो... हा ज्याचात्याचा वैयक्तिक विचार असू शकतो... हा विषय अत्यंत किचकट आहे.समज वाढवण्यापेक्षा गैरसमजांची खैरात करून ठेवेल.. तेव्हा इतकेच...

बा़की इब्लीसजींनी एका हुंकारात सोक्षमोक्ष लावून टाकलेला आहेच... त्यात सर्व आलेच...
ध.

विज्ञानदास,

>> ऊर्जा जोडली गेली विज्ञानाशी...

हे विधान जरा स्पष्ट करून सांगता का? धन्यवाद!

आ.न.,
-गा.पै.

याच्यातच वैश्विक सत्य दडलंय की... विज्ञान आणि ऊर्जेच्या मैत्रीचं...
कदाचीत मला नीट समजलेले नहीए,तुम्हाला काय अपेक्षित आहे? Sad किंवा तुम्ही वाक्याचा शब्द्शः अर्थ लावला आहे बहुधा...

ऊर्जा विज्ञानाशीच जोडलेली आहे ना? गतीज ऊर्जा विज्ञान आहे.औष्णीक ऊर्जा विज्ञान आहे... याअर्थाने... बरोबर ना?
बरोबर,चूक सांगावे कृपया..

@aschig-आभार.
नेमका रो़ख कळला नाही<<< शक्यता आहे..थोडासा किचकट्च लेख. Sad

आधीचा लेख कुठे आहे?<<< आधीचा लेख एक धागा आहे...त्यावर बरेच प्रतिसाद आहेत त्याचा संदर्भ आहे. Happy

टेलेकायनेसीस खरे आहे हे कसे ठरविले?<<< टेलीकायनेसीस काही प्रमाणात खरे आहे.हिप्नॉसिससुध्दा एक टेलीकायनेसिसचाच भाग आहे.शाओलीन आणि कंग-फू प्रकारतही वापरले जाते. पण त्याच्या मॅग्नीट्यूडविषयी वाद आहेत.याची मदत घेऊन एखादी वस्तू थोडी हलवता,उचलत येऊ शकते... अर्थात हे संदर्भांमधून घेतेलेले विधान आहे... त्यातल्या टेक्नीकल डिटेल्स तुम्हाला एक्सपर्ट कडून मिळतील.

विज्ञानदास,

हो, मी वाक्याचा शब्दशः अर्थ लावलाय. ऊर्जा म्हणजे विज्ञान हे विधान तुमच्या खालील पार्श्वभूमीवर बघायला पाहिजे.

>> रिप्लेस इट बाय 'परमेश्वर'... पंचमहाभूतं,परमेश्वर म्हणजेच ऊर्जा माना.सो,ऊर्जा जोडली गेली विज्ञानाशी...सो
>> विज्ञान म्हणजे परमेश्वर... सिध्दता. 'त्याला' मिळवायचें असेल तर वेदान्त काय वाचता?आरत्या काय म्हणता?
>> संवाद वाढ्वा..संवाद साधा... हेच खरे मंत्र...

माझ्या माहीतीप्रमाणे आणि पारंपारिक आकलनानुसार परमेश्वराला मिळवण्यासाठी साधना करावी लागते. वेदान्त वाचणे, आरत्या म्हणणे, इत्यादि कृती साधनेच्या भाग आहेत. त्या टाळून तुम्ही थेट संवादावर झेप घ्यायला सांगताय. तर हा संवाद कोणाशी करायचा? आणि त्यात विज्ञानाचा ऊर्जामार्गे संबंध कसा येतो?

आ.न.,
-गा.पै.

गा.पै.जी,

थोडी मिस्कील सिध्दता दिसते आहे पण सारासार आहे. Happy

वेदान्त वाचणे, आरत्या म्हणणे, इत्यादि कृती साधनेच्या भाग आहेत<<< 'याच' कृती;साधनेच्या भाग आहेत असं म्हणणं याच गोष्टीत अडकून पडल्यासारखं नाही का? याच कृती साधनेच्या भाग आहेत असं कोणी सांगितले आहे का?

>>मूर्त स्वरूप(मूर्त्या) हे परमेश्वरापशी पोहोचण्याचे साधन आहे म्हणजे आपण देव म्हणतो तो परमेश्वर नाही असं सरळ म्हणणं आहे लोकांचं.<<

हा संवाद कोणाशी करायचा? <<<अर्थात शक्य सहज आजूबाजूला वावरणार्‍या परमेश्वराशी,आपल्या स्वत:शी,मग घरच्यांशी,मग समाजाशी...

तुकारामांसम सर्वांनी आपल्याशी संवाद केलेला आहे.व्यासांनी गीता सांगितली संवाद आहे.दासांनी बोध सांगितला संवाद केला.व्यासांनी संवाद मांडला.मी थेट्च संवादावर उडी घेत नसून तिथूनच सुरूवात होते...आधी परमेश्वर आपल्यात्,आपल्याभोवती आहे हे कळले म्हणजे त्याची भेट झाली आहे असे नाही का? मग संवादच थेट असू द्यावा.

विज्ञानाचा ऊर्जामार्गे संबंध कसा येतो<<< आता हा अनुभवण्याचा भाग आहे.परमेश्वर भेटतो म्हणजे तो फोटोमध्ये पाहीलेल्य तत्सम रुपातून समोर येतो हे आधी मनातून काढून टाकायला हवं... तुम्ही सूफी कवाल लाईव्ह ऐअकली आहे काय? ती ऐका आणि ऊर्जा म्हणजे काय याचा अनुभव येतो...तुम्ही तुकाराम गाथेतला दोन ओव्या आचरणात आणा...'ऊर्जे'चा फील येतो. मी गणपती स्तोत्र म्हणण्याऐवजी गणपती बाप्पा मोरया म्हणणं चूकीचं का? किंवा गणपतीची पूजा बांधण्याऐवजी मी दहा माणसांचे कष्ट सोपे करण्याचे साधन या पंचमहाभूतांच्या मदतीने तयार केले,तर ती ईश्वर आराधनाच नव्हे काय?

त्या 'साधना' करण्याच्या नादात आपण निसर्गाचा जो 'कायापालट' करतो,ध्वनीप्रदूषन करतो,साधनेच्या नावाखाली पैसा उधळतो आणि उकळतो,साधनेच्या नावाखाली प्रचंअड वेळ वाया घालवतो त्याला आक्षेप आहे. विज्ञान हेच म्हणतं की देव ऑलरेडी तुमच्या समोर आहे,तो आहे... त्याला मिळवायचं कशाला?

हे म्हणजे मांडीखाली आरी आहे माहीत्ये आपल्याला.तरी लोकांना दखवण्यासाठी,आपल्याला त्या आरीबद्दल किती कन्सर्न आहे शोधत बसायचं... तो समोरचाही त्याच्यासोबत बसतो शोधत ते... त्याला वाटतं तो खरं बोलतोय त्याची वस्तू खरच हरवलीये... पण तुझी वस्तू तुझ्यजवळच आहे.तू उगाच स्वतःचा आणि त्या माणसाचा वेळ का घालवून राहीला भाउ... आणि पोरांना मारून राहिला ना तू ... म्हणजे पोरांना काय माहीती तुझी आरी...? तूच लपव आणि तूच शोध...शोधण्याचा कांगावा कर... वर गावाला बोलव शोधायला... काय राव?

गा.पै, तुमचा खरा प्रश्न ऊर्जेविषयी आहे... आणि ती अनुभवण्याची गोष्ट आहे.ती ऊर्जा साधनेमधून येते ही गोष्ट खरी पण जी साधना सार्वत्रिकरीत्या,अध्यात्मिकतेसाठी वापरली जाते(वेदान्त्,आरत्या,स्तोत्रे) हा सरळ सरळ वेळखाऊ,पैसे उकळवण्यासाठी काढलेला मार्ग आहे.एवढच सांगणं...

मास्तर नसूनही,लईच प्रवचन झालं की...

विज्ञानदास,

>> अध्यात्मिकतेसाठी वापरली जाते(वेदान्त्,आरत्या,स्तोत्रे) हा सरळ सरळ वेळखाऊ,पैसे उकळवण्यासाठी काढलेला
>> मार्ग आहे.एवढच सांगणं...

इथे तुमच्याशी असहमत आहे. कर्मयोग साधण्यासाठी भावपूर्ण रीतीने कर्म करावं लागतं. हाच नियम भक्तीयोगासही लागू पडतो. संत नामदेव भावलीन होऊन स्तोत्रे गात. हा सगुण भक्तीचा अत्युच्च अविष्कार आहे. स्तोत्रे, आरत्या, इत्यादि करू नयेत हे तुमचं सांगणं पटत नाही. कारण ते पारंपारिक साधनामार्गाशी जुळत नाही.

तुमचं मत बरोबर की चुकीचं यात मला रस नाही. ते परंपरेत कुठे बसतं एव्हढंच दाखवायचा हेतू आहे.

आ.न.,
-गा.पै.

गापै,
बरोबर्,माझे विचार इतर काही लोकांच्या संपर्कातून,वाचनातून तयार झाले आहेत.ते माझे वैयक्तिक विचार आहेत.हेच मान्य करा असेही माझे म्हणणे नाही व सो कॉल्ड अध्यात्म माझा प्रांतही नव्हेच...परंतु काही प्रमाणात त्याचा विचार होणे आवश्यकच आहे.

ते परंपरेत कुठे बसतं एव्हढंच दाखवायचा हेतू आहे.>>>परंपरा बदलण्याची मानसिकता लोकांमध्ये आली की बसेल ते परंपरेत असे वाटतेय...

या सगळ्यावरून Blood Diamond नावाचा शिनुमा आठवला...लिओ.कॅप्रिओच्या तोंडी एक जहरी वाक्य...तो म्हणतो,'Sometimes I wonder... will God ever forgive us for what we've done to each other? Then I look around and I realize... God left this place a long time ago.

हलके घ्या... माझी मते हसत-खेळतच असतात.सो कोल्ड अध्यात्मात जसे कर्मठ असतात तसे वैज्ञानिक विचारांचेही असते आणि ते सिध्द करता येते. Happy

गापै,चर्चेबद्दल आभार...

टेलेकयनेसीसचे बेसीस काय? केवळ फर्स्ट प्रिन्सिपल्स वापरून तो प्रकार निकालात काढता यायला हवा.
तुमच्याजवळ सिग्नल पाठवायची सगळी तयारी/मेकॅनिझम असेल, पण ती रिसीव्ह करायची पण तर जी गोष्ट हलवायची आहे तिच्या स्थानी असायला हवी?

@aschig
प्रस्तुत भाग संपादित केला आहे.

तुमच्या ट्रांन्स-रिसिव्हरचं म्हणणं काही प्रमाणात मान्य होईल... पण सगळीकडे तेच प्रिन्सीपल लावता येत नाही. इतरही बर्‍याच गोष्टी विचारात घ्यायला हव्यात.उदा.बिग-बँगचा बेसीक उप-अणूचा सर्वात बेसीक एनर्जी सोर्स...कोणता?

Pages