पॅरानॉर्मल-सत्य असत्याचे संतुलन किती?

Submitted by विज्ञानदासू on 1 June, 2014 - 06:41

लहरविज्ञान(Wave Physics) ऊर्जाशास्त्र्(Thermodynamics,Electromagnetics,Quantum Physics alied Energies), मानसशास्त्र या त्रिकोणी बंधांची खूणगाठ मनाशी बांधून केलेली वाटचाल अतर्क्य घटनांसाठी त्यातल्या त्यात भितीदायक घटनांसाठी दिलासादायक ठरेल यात शंका नाही,त्याचाच थोडासा आढावा घेण्यासाठी हा लेख प्रपंच.

एका धाग्यावर,एका प्रश्ना मागील उत्तर उघड करण्याचा काहींनी आग्रह केला.खरेतर विशेष उत्तर नव्हतंच त्या प्रश्नाचं. किंबहूना कुठल्याही मोठ्या रहस्याचं कारण हे साधंच असतं,असं आईन्स्टाईन महाशयांनीच सांगून ठेवलं आहे.बॉलीवूड आणि हॉलिवूडचे चित्रपट बघून बर्‍याच गोष्टी आपल्याला त्या थाटाच्या लागतात.त्याविरूध्द काही निघालं की हिरमोड होतोच ही खरे तर आपण आपल्या मेंदूला लावलेली सवय आहे,असे आता म्हणावे लागेल.

त्या धाग्यावरील घटनेच्या उत्तरामागे,मग ते ऊर्जा विज्ञान असेल किंवा टेलीपॅथीसारख्या गोष्टी, टेलीकायनेटीक्स किंवा मग गाडीचं साधं मेकॅनिझम.तिथेच उत्तर होतं.गाडी तापली असल्याने बंद झाली.गाडीने थोडी विश्रांती घेतली.तापलेलं इंजिन थोड्यावेळाने नॉर्मल आल्यावर चालू झाले.वर ज्यांची गाडी होती त्यांनी भीतीने गडबडून जाऊन किक मारली असावी असे दिसते व गाडीने चालू होण्यास खो दिलेला असावा.त्यांच्या सोबतीला कोणी आल्यावर दोघांचाही धीर वाढला अशणार. त्यानेच गाडी चालू झाली.निदान वरवर पहात असेच झाले आहे असे दिसते व पटतेही.पण हे उत्तर लोकांना अपेक्षित असण्यापेक्षा त्यांना वेगळी अपेक्षा होती की काही नवल विचित्र त्यामागे असेल.

पॅरानॉर्मल(यात भूताच्या आणि दैवी दोन्ही गोष्टी येतात) म्हणजे काय याचा थोडक्यात आढावा मला घ्यावासा वाटतो आहे.पॅरानॉर्मॅलीटी ही भूत या संकल्पनेशी जोडली आहे तशीच परमेश्वर या संकल्पनेशीही आहे.तेव्हा इथे तो समज आधीच सोडवला जावा,अशी अपेक्षा ठेवतो.लेखाद्वारे भूत आहे किंवा काय यावर प्रकाश टाकावयाच नसून त्याच्या अस्थित्वाला किती महत्व द्यायचं याचा ऊहापोह केला आहे...

लहर विज्ञान आणि ऊर्जा विज्ञान समोर असताना या गोष्टी विचारात घ्यायला हव्यात.मुळात भूत(!) ही संकल्पना पाहण्याआधी थोडं फिजिक्स लक्ष्यात घ्यायला हवं.आत्मा ही एकार्थाने ऊर्जाच म्हणावी लागेल.व्यासांनी आत्म्याला "नैनं छिंदन्ती..." या श्लोकात बसवलेले आहे. दुसर्‍या बाजूने हा 'नैनं छिंदन्ती...'एक प्रकारे थर्मोडायनामिक्सचा पहिला नियम्,आत्म्याच्या व्याख्येला व एकंदर आत्म्याला चपखल बसतो.म्हणजे त्याला जर ऊर्जा मानले तर त्याचं अस्थित्वही मान्य होईल.परंतु थर्मोडायनॅमिक्स च्या पुढ्च्या नियमांनी त्याचं अस्थित्व धुसर ठरतं.तरीही,तरीही त्याला ऊर्जा मानून भूत आणि देव या दोन्ही गोष्टींकडे पाहता येईल.जर आत्मा ही एक ऊर्जाच आहे तर ऊर्जेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय...ती कितीही मॅग्नीट्युडमध्ये असू शकते तसेच धन आणि ऋण वेक्टर्समध्ये असू शकते.तिचं मोजमाप निगेटीव्ह असणार नसून तिची शक्ती धन आणि ऋण प्रभारात असू शकते.भौतिकशास्त्राचे जाणकार इथे जास्त चांगले बोलू शकतील.

तेव्हा इथे पॉसिटिव्ह आणि निगेटिव्ह्चं ऊर्जेचं मोजमाप पॅरानॉर्मल(!) अस्थित्वासाठी महत्वाचं ठरेल आणि तिथेच आपल्या थकलेल्या मेंदूला ठकवण्यासाठी,या निगेटीव्ह लहरींच्या ठराविक ठि़काणी,हीच ऊर्जा समोर येते.एक

त्याच धाग्यावरील काही घटनांचा संदर्भ देतो-
उदा.गाडी लॉक होणे,ओढ जाणवणे या खरं तर डोक्यात चालणार्‍या गोष्टी आहेत.अर्थात भिती आणि याच ऊर्जा लहरी त्याला कारण असतात.अनेक प्रसंगात गाडीला ओढ लागली आणि नंतर सुटली,हलकं वाटलं असे जाणवलेले दिसून येणे खरे तर 'न्यूरल लॅग' आहे.त्यावेळेस गाडीच्या स्पीडोमीटऱकडे कुणाचं लक्ष्य गेलं असेल तर गाडी वेगातच(जरा जास्तच) चाललेली होती असे दिसेल.

खरे तर माणूस जेव्हा प्रचंड ताकद लावून यातून बाहेर येतो तेव्हा ती त्याने 'त्या मनातल्या' न्युरल लॅगच्या थ्रेशोल्डवर केलेली मात असते.आता हेही कळण्यासाठी सिनॅप्सकडे(गुगल करावे) जावं लागेल जिथे विद्द्युत ऊर्जा आणि केमिकल्स यांचा अखंड सुंदर खेळ चालू असतो.तिथे थोडी गडबड झाली की वेगळे(पॅरानॉर्मल[!]) संदेश जाऊ लागले की तो मनाचा खेळ सत्य-आभासात परावर्तीत होतो.तर मुद्दा हा की बराच भाग ऊर्जाविज्ञानाशीच(Energetics) व उर्जावहनाशी(Energy-Dynamics) जोड्ला गेला आहे.

आता स्लीप पॅरालिसीस-ऑक्सीजनच्या कमतरतेने होऊ शकतो,हे कितींना माहीत आहे?ढगाळ हवामानात, थंडीत्,एसी मध्ये झोप लागली की स्लीप पॅराचा अनुभव बर्‍याच जणांना येऊन जातो. तोंडावर पांघरून घेऊन झोपल्यानंतरही स्लीप पॅरा.ची फेज येऊ शक्ते.तसेच स्ट्रेस आणि कमी ऑक्सीजन हेही त्याला कारणिभूत ठरतात असे सांगितलेले आहे.हॅरी पॉटरचा स्लीप पॅरालीसीस असाच आहे.गळा,डायफ्रामचे स्नायू आखडल्याने छातीवर दाब येतो.तसेच REM अवस्थेत आलेल्या जागृत मनामुळे स्वप्न किंवा आधीचे विचार यांचे आभासी वास्तवात रुपांतर होऊ शकते.

दोघांना एकाच प्रकारची स्वप्ने पडणे.इथे परत टेलीपॅथी आणि टेलीकायनेटीक्सचा संदर्भ.पण हे मुद्दे असे आहेत की इट हॅज वेरी लेस फिजीकल एव्हिडन्स अँड सो लेस अमांउंट ऑफ रेसिड्युअल प्रुफ्,बाय चान्स...मिळाले तर...अथवा शोधत बसा.उर्जा हातात सापडेल तर खरे.ते मिळतच नाही.

(poltergeist)पोल्टरगिस्ट म्हणजे आवाज करणारं भूत(!)दारे,खिडक्या हलणे,बेड हलणे इ. याचा स्त्रोत सायकोकायनेसीस असू शकेल असं बर्‍याच जणांचं मत आहे.सायकोकायनेसीस किंवा टेलीकायनेसीसची उदाहरणं आपण डायनामो सेरीज बघताना(इथे ट्रीक्स आहेत बहुदा) पाहीली आहेत किंवा अक्षय कुमार ने कॉमेडी नाईट्स मध्ये जो चष्मा उचलला होता,हाताचा स्पर्श न करता तेच.अर्थात पोल्टरगिस्टमध्ये हे करणारी व्यक्ती कोण हे मात्र कळलेलं नाहीये.अर्थात इथे त्यांचं असं म्हणणं आहे कि पोल्टर्गिस्ट या टेलीकायनेसीसचा वापर करत असावा.असावा...ती खरेच तसे करते का हा संशोधनाचा विषय आहे.याच्या अस्थित्वाला आधार नाही.

Synchronicity-ज्यात दोन किंवा अधिक घटना एकमेंकांशी दुरान्वये वा सलगीने समान असतात.उदा.दोघांना एकच स्वप्न पडणे.दोघांना एकावेळी एकच जाणीव होणे इ.या गोष्टिच्या ऊहापोहासाठी प्रसिध्द मानसशास्त्र तज्ञ कार्ल जुंगचं 'युंग ऑन सिन्क्रोनिसिटी अॅंड द पॅरानॉर्मल' हे पुस्तक वाचावं.पाऊली नावाचा शास्त्रज्ञ याच किश्शांसाठी प्रसिध्द होता.त्याचे किस्से तर अमाप प्रसिध्द्द आहेत.

मी जेव्हा कंप्यूटर लॅब मध्ये पाऊल ठेवायचो तेव्ह दोन वेळा कंप्यूटर्स आपोआप रिस्टार्ट झाले आहेत म्हणजेच लाईट त्याचवेळी गेली आणि आली आहे.अनेकदा मी खुर्चीवरुन उठलो की कॉलनीतली लाईट जाते किंवा येते तरी.एकदा वर्गात शिरलो आणि पीसीचा फ्युजच उडाला होता.यामागेही MSEB वाल्यांशी माझी 'वेव्हलेंग्थ' चांगली जुळते असा निष्कर्ष एका मित्राने काढला आहे.हा विनोदाचा भाग सोडा पण टेली कायनेसीसचं अस्थित्व आहे,असा हायपोथेटीकल विचार मांडून त्याला सत्य-असत्य ठरविण्याचा प्रयत्न अजून करायला हवा आहे.खरे तर इन्व्हर्स स्क्वेअर लॉ नुसार सायकोकायनेसीस कठीण गोष्ट आहे.पण अगदी सुक्ष्म पध्दतीने या कथीत गोष्टीचं अस्थित्व शोधण्यासाठी अजून प्रयत्न गरजेचे आहेत.अणूमधला केंद्रक आणि त्यातले उप-अणू, यांमधल्या काही थेओरीज अजून सिध्द झालेल्या नाहीत.त्यातले मेकॅनिक्स गुल्दस्त्यातच आहे... बिग बँग थेओरीमध्ये मूळ उप-कणांचे प्रसरण पहील्यांदा कसे झाले.ती उर्जा कोणती होती याचे केवळ तर्कच मांडले गेले आहेत.त्याचीही सिध्दता होत नाही तोपर्यंत काही बाबी पडद्याआडच असतील.(संपादित)

पॅरानॉर्मल(!) हे अतर्क्य नाहीच मुळी.भिती,ऊर्जेचं स्वरूप आणि ब्रेमिकल्स चा त्रिवेणी संगम होऊन भूत आणि अमानवि गोष्टींचा उगम झालेला आहे. कधी कधी अमानविय(खरे तर यात अ‍ॅंटॅ-प्रोटॅगोनिस्ट दोघे येतात) या संकल्पनेचे पूर्वग्रह मनात असल्याने त्या गोष्टींना बढावा आपलं मन देतं आणि परत भिती...असे चक्र समोर येत असावे असे दिसते.

पॅरानॉर्मल ही कंसेप्ट रोबोटस् सारखी नाटकांमधून आली असावी.जिला नंतर अभ्यासाचं(!) स्वरूप दिलं गेलं असावं.हॉलीवूड्पटांनी झोंबीला डोक्यावर घेतलं तसेच.

पॅरानॉर्मलला काहींनी स्युडोसायन्सचं रूप दिलेले आहे.जे सायन्ससारखं आहे पण सायन्स नव्हे.अमीबाला असणारे पायासारखे अवयव.म्हणून ते स्युडोपोडा.तसच हेही.म्हणजे संकल्पना तर सगळ्या वैज्ञानिक...परंतु सिद्ध करण्यामध्ये अडचणीच्या किंवा ज्यात सिध्द् करण्यासाठी बरेच अडथळे आहेत असे.बरे,अशा गोष्टी सिध्द करणार कशा?त्याला जवळपास 'शून्य' वेळा फिजीकल एविडन्स असतो. मग अशावेळी कुणीतरी जे बघीतलंय त्यावर फक्त अनुमान काढत बसणंच हातात राहतं.याचा फायदा भोंदू लोकांना आजतागायत होत आला.जसा भोंदूना फायदा तसाच स्वत:कडे लक्ष्य वेधून घेणार्‍यांनाही फायदा झाला आहे.

आशूचँपच्या या धाग्यावरचे सगळ्यांचे अनुभव खरे आहेत,जे त्यांनी स्वतः घेतले आहेत,असे म्ह्णू.परंतु त्याला कुठे ना कुठेतरी ठोस उत्तर आहे.त्यावर उपाय आहेत.ते हातात आहेत आणि काही पडद्यामध्ये आहेत.परंतु त्या उपायांचं अस्थित्व नक्की आहे.या निगेटीव्ह ऊर्जेला ऊत्तरं आहेत,हा दिलासा जरी मनात ठेवला तरी बरेच प्रश्न आणि मानसिकता सुटतील असे वाटते.

तसे,म्हणूनच माझ्या एका प्रश्नाचं उत्तर कुणीही द्यावं की फ्रेश असताना,दिवसा उजेडी अमानविय असं कधी कां जाणवत नाही?

कुठलाही 'इव्हेंट' हा एकाचा द्योतक नाहीच असू शकणार.त्यासाठी अनेक घटक एकत्र येऊन काम करत असतात.त्याच सारखे अमानविय अनुभवांची त्या-त्या क्षणी एक कारणांची साखळी असते कां,हे पाहायला हवं.ती साखळी त्यातली प्रत्येक कडी सोडवून परत जुळवता आली की झालं.भितीच्या पकड घेण्याने त्याची मिमांसा त्यावेळी शक्य होत नाही.हिरवी साडी नेसलेली स्त्री ही विचारधारेत एवढी प्रवाही आहे की मुन्नाभाई सारखी(येथे त्याचे गांधीजी) ती मनात असल्याने दिसत असते.अनेक रंगांनी ही साडी रिप्लेस केली,तशी मानसिकता भिनवली की त्या-त्या रंगातल्या साडीत ते भूत दिसेल.

युंगच्या पुस्तकात त्याने एकेठिकाणी त्याच्याच घरातली काही उदाहरणं दिली आहेत.पण त्याची कारणंही पुढे वाचायला मिळतात.युंगचा एक किस्सा रोचक आहे.त्या अनुषंघाने माझा किस्सा त्यात मिसळ्तो.त्याने त्याच्या एका पेशंटला एक रत्न भेट दिले असे स्वप्न त्या पेशंट्ला पडत असे.ते रत्न एका बीट्लसारखे(कठीण कवचाचा किडा किंवा ममी रिटर्न्स मधला इजिप्शीयन बीट्ल) आकाराला होते.एकदा तिच्यावर थेरपी चालू असताना एक बीटल जुंगच्या खिडकीवर धडका देऊ लागला.(असाच एक मोठा ब्राऊनबीट्ल माझ्या खोलीच्या खिडकीवर रात्री तीन-चार दिवस धडका देत आहे आणि आत्ता पुस्तकात मला युंगचा किस्सा सापडावा हा काय योगायोग आहे?)जुंगने त्याला पकडले आणि आश्चर्य म्हणजे तो किडा हा त्याच प्रकारचा होता ज्याचे रत्नरुपी स्वप्न त्या पेशंटला पडत असे.

युंगने याची मिमांसा मटेरीअलिझमच्या बाहेरची घट्ना अशी केली आहे.तो मानसशास्त्रीय कारणे मानतो तर कधी दिग्मूढदेखील होतो.कारणांचे अस्थित्वमय पुरावे दिसू शकत नाहीत याचा उद्वेगही त्याला येतो.कधी कधी त्याचा संबंध अॅस्ट्रॉलॉजीशी तो जोडतो.

पॅरानॉर्मलच्या नाट्यमय अस्थित्वापेक्षा,दुनियेत ऊर्जाविज्ञानाचं स्थान बलाढ्य आहे,असेच म्हणावे लागेल. त्या घटनांना आपण कसे बघतो हे आपल्या डोळसपणावर अवलंबून आहे.आपण एवढं रोज वाचतो.नव्या संकल्पनांच्या संपर्कात राहतो.नवीन जाणून घेण्याचा अट्टहास बाळगतो.पण असे अनेक लोक आहेत ज्यांना हे ज्ञान मिळत नाही पुस्तकांपासून ही माणसं हाता-तोंडाच्या लढाईत बाजूला राहतात.ती माणसं कशी रहात असतील्,त्यांच्याकडे काय पर्याय असतील आणि त्यांचे प्रबोधन कसे केले जावे हा प्रश्न आहे.

मला जमेल तसे इथे मांडलेले आहे.त्यानिमित्ताने याविषयाचे थोडे लिटरेचर नजरेखालून गेले आणि नवीन ज्ञानात भर पडली असे वाटते.मी या विषयातला जाणकार नव्हे व एरवीही एक विद्यार्थीच. परंतु माणसाने बघताना भौतिकाकडून अदिभौतिकाकडे(जर ते असेल तर) जावे असे नाही का? आमच्या संस्कृतच्या सरांनी एकदा म्हटलेले जिथे विज्ञान संपते तिथे अध्यात्म चालू होते.त्यावर वर्गात वादंग होऊन त्यांना आपले म्हणणे मागे घ्यावे लागले.

खरे तर विज्ञानाला अवकाश हीच मर्यादा आहे.त्यामुळे अध्यात्म म्हणजे विज्ञानच.पोथी,पुराण म्हणजे त्याच स्युडोसायन्सला समजण्याचा आटापिटा ठरेल किंवा टूल्स(?) म्हणता येतील.आदिभौतिक हेच मुळात मानवनिर्मित आहे त्यामुळे ते सत्य मानण्याऐवजी आईनस्टाईनचे नैसर्गीक रहस्य जास्त स्वारस्ययुक्त वाटते,ज्याला आईन्स्टाईन कुट म्हणतो,ते कुटील कसे असेल?आणि मानवाला अमानविय त्रास देण्यात याच विज्ञानाला पर्यायाने काय हशील होणार आहे?

वरच्या उदाहरणात गाडीला किक मारताच गाडी चालू झाली कारण ती नॉर्मलला आली असावी.अत्यंत वेगात चालवून ती तापून बंद पडली हे तिथे लक्ष्यात आले असते तर भिती अजूनच वाढली नसती.तिथे वेळीच लगाम बसला असता आणि निदान गाडी ढ्कलत न्यायला बळही आले असते. हे मात्र निश्चित खरं कि कई बार दिमाग पे डर हावी हो जाता है.... लेकीन डर भी केमिकल लोच्याही हय बाबांनो...

मुळात येणारे अनुभव हे सगळे सायकॉलॉजिकल फेनोमेनॉ आहेत असा मतप्रवाद आहे आणि वैयक्तिक रित्या त्याचं विश्लेषण मान्य असल्याने मलाही तो मान्यच आहे.विज्ञान हे डोळस तपास शिकवत असते.अंधश्रध्दा हा थोडासा गोंधळात टाकणारा शब्द आहे.

डोळसपणे कुणी भूतावर श्रध्दा ठेवली तर त्या माणसाची ती श्रध्दा ठरेल.जर देव ही देवळातली कंसेप्ट कुणी अश्रध्द ठरविली तर ती अंधश्रध्दा होईल.ती भावना आहे तर तिला शास्त्र काट्याची कसोटी लावायला नको काय? ती संकल्पना व्यक्तीविचार सापेक्ष आहे आणि विचार हा बुध्दीवर अवलंबून आणि बुध्दी अर्थात शिक्षणावर.ती श्रध्द्दा म्हणून माना पण त्याची कसोटी करून,अशीच अनेक विद्वानांची आकांक्षा आहे.

मी स्वतः भूत पाहीलेलं नाही आहे जर पाहीलं असतं तरी त्याला मानलं नसतं.कारण अद्रुश्यापेक्षा माणसाच्या वावरावरती माझा विश्वास आहे आणि भूतासारख्या वाम गोष्टीवर ते अस्थित्वात असेल तरी विश्वास नसेलच.म्हणून इकडच्या या एका धाग्यावरील अनुभवांना मी हस्यास्पद मानत नाही.परंतु त्यांचं स्पष्टीकरण असू शकतं इतकं मला ठामपणे म्हणायचं आहे.ते स्पष्टीकरण नसता,त्या गोष्टी हस्यास्पदच(चेष्टेने हस्यास्पद नव्हे) ठरतात.त्याची अनेक उदाहरणे ज्योतिबा,जेजुरीला किंवा इतर ठिकाणी गेलात तर दिसतात.ज्योतिबाला गेलो होतो तिथे एका महीलेला चक्कर आली.त्यांना आम्ही सांगीतले गाडीने पन्हाळा हॉस्पिटलला जाऊ.पण त्यांनी ऐकले नाही. ज्योतिबाच्या दारात काय भिती वगैरे त्यांचे म्हणणे.जवळपास दोन-अडीच तास ती महीला त्या भर उन्हात, फुफाट्यात पडून होती.तिच्याभोवती तिचे नातेवाईक होते.पण एकालाही हालचाल कराविशी नव्हती वाटली. डिहायड्रेशन आणि पार्शल कोमा.शेवटी देवस्थळ्यांनी उचलून दवाखान्यात नेली पण नाही वाचू शकली.

विज्ञान सर्वव्यापक जरी असले तरी काही संदर्भात अजून रहस्यच आहे,पण म्हणून त्याला अतर्क्य म्हणून वा अध्यात्मिक म्हणून न पाहता,शास्त्र म्हणूनच पहावे,अशी विज्ञानाच्या भक्तांतर्फे इच्छा.

-विज्ञानदास.
धन्यावाद!

(लेखात तांत्रिक चूक असल्यास निदर्शनास आणल्या जाव्यात.आभार)
संदर्भ-कार्ल युंग ऑन सिक्रोनिसीटी अँड द पॅरानॉर्मल
-www.indianparanormalsociety.com
-Some Referal Articles
-Richard Wisemans Statements/Articles(जरुर वाचावित अशी)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बिग बँगचा उर्जा स्त्रोत? आपल्याला बिग बँगच्या आधीचे काहीही माहीत नाही, बिग बँग नेमका कसा झाला ते ही नाही. त्याचा इथे काय संबंध?

असे.बरे,अशा गोष्टी सिध्द करणार कशा?त्याला जवळपास 'शून्य' वेळा फिजीकल एविडन्स असतो. मग अशावेळी कुणीतरी जे बघीतलंय त्यावर फक्त अनुमान काढत बसणंच हातात राहतं.याचा फायदा भोंदू लोकांना आजतागायत होत आला आहे

,............
.........

तुम्ही स्वतःच हे लिहिल्यावर इतराना काय समजते याची चिन्ता तुम्ही का करावी नै का?

बोलणारा रेडा, चालती भिन्त ही अध्यात्मवाद्यान्ची पेटन्ट उदाहरणे न देता आता अक्षयकुमार , रुद्राक्षातला सन्जय दत्त, म्याट्रिक्स अशी उदाहरणे येऊ लागली. काळानुसार तुम्हीही बदलताय हे पाहुन आनन्द जाहला

Proud

@aschig- आभार...

>>>बरोबर्,त्याचा इथे काही सबंध नाही.मी एक सामान्य उदाहरण दिले... त्यामागे एखादे नवीन बल अस्थित्वात असावे का या हेतूने विचार केला...

>>>तुम्ही म्हणता की ट्रान्स-रिसिव्हर- पण जेव्हा एखादा चुंबक जे करतो त्यात वस्तू हलतेच की... किंवा इलेक्ट्रोस्टॅटीक फोर्सने कागदाचे तुकडे उचलले गेले इथे कुठे ट्रान्समिटर रिसिस्व्हर येतो? मला हेच म्हणायचे आहे की सुक्ष्म प्रमाणात एखादे चौथे-पाचवे बल अस्थित्वात असेल तर? ते बल जी प्रमुख बले माहीत आहेत त्याला वरचढ असेल तर? बरोबर?

>>>मला त्रिमितीय वस्तूच दिसते,कारण मी स्वतः त्रिमितीय आहे.मला चौथी मिती द्या,चौथ्या मितीतल्या गोष्टी मला करत येतील... पण ती चौथी मिती मिळत नाही म्हणुन ती अस्थित्वाच नसावी असे म्हणायचे का?

>>>शकुनी मामाचे डाईस त्याला हवे तसे वळतात हे एकवेळ टेली-कायनेसीसचे उदाहरण म्हटलेच अगदी तर ते कसे फक्त सिध्द्द करायचे.(जुन्या युगात हे होतं ते होतं आपण असे प्रगत होतो हे म्हणण्याचा मानस नाहिये माझा इथे)

@राखी
thanks
जे काय आहे ते लिहून टाकावे,निसंकोच...तसेच इथे असेही नाही की सगळी उत्तरे मीच दिली पाहीजेत इतर विचारांचे स्वागतच असेल.

@जामोप्या ऊर्फ गोबोले- आभारी आहे.
उगाच काहीही टॅग करु नका. गझलांच्या धाग्यावर ऊठबस करता तेवढी पुरेशी आहे.जे म्हणायचं ते स्पष्ट म्हणत जा. उगाच इतरांचा गोंधळ उडतो...माझाही!
वरती लिहिण्यापेक्षा 'कै च्या कै' जे मागे लिहिलंत त्याचं कारण दिलं असतं तर बर नसतं का? आता जर विषय सोडून बोलायचे असेल तर विपूत भेटा.तिथे काय बोलायचे ते बोला...
फार आभारी आहे...

बिग बँग खरच झाले होते का ? बिनाउर्जा बिग बँग कसे होईल ? उर्जा स्थायी स्वरुपाची ठेवण्याकरीता कोणत्याना कोणत्या माध्यमाची आवश्यकता असते ... स्फोट होण्याकरीता अपरिमित उर्जाचे स्वरुन एका ठिकाणी एकाच जागी संचितस्वरुपात असायला हवे ..ज्यात उर्जेचे स्वरुप वाढत जाउन स्फोट झाला असे समजायला हरकत नाही.. पण उर्जा कशी वाढत गेली ? स्त्रोत कुठुन मिळाला ? ... एका बॅटरीत १किलो उर्जा आहे आणि त्या बॅटरीची कॅपेसिटी आहे असे मान्य केले तर त्या १किलो उर्जेचा स्फोट घडायला किमान त्याचे आकारमान वाढणे गरजेचे आहे.. म्हणजेच त्या बॅटरीला बाहेरुन चार्ज करणे आवश्यक आहे. तरच त्यातली उर्जा वाढेल... निर्वात पोकळीत त्या "बॅटरीला" कुठुन बाहेरुन उर्जा मिळाली ? या बिग बँंग पुर्वी विश्वात अनेक उर्जास्त्रोत अस्तित्वात होते आणि बिग बँग मधे ते सर्व नष्ट झाले ( जसे कृष्णविविर तयार होताना घडते ) आणि त्यामुळे अवकाशात निर्वात पोकळी निर्माण झाली ?

असे.बरे,अशा गोष्टी सिध्द करणार कशा?त्याला जवळपास 'शून्य' वेळा फिजीकल एविडन्स असतो. मग अशावेळी कुणीतरी जे बघीतलंय त्यावर फक्त अनुमान काढत बसणंच हातात राहतं.याचा फायदा भोंदू लोकांना आजतागायत होत आला आहे<<<<<<<<<<<<

हे वाक्य पुढचे मागचे लेखातले संदर्भ घेऊन येतं.ते असं सिंगल वाचण्यासाठी नाही.आणि ती परीस्थिती वर्णन केलेली आहे.निष्कर्ष नाही.

उगाच वाटेल ते बडबडताय.उदाहरण देऊन आपले अज्ञान मांडत आहात सगळ्यांसमोर..तेव्हा आवरा... मेडीकल सायन्स मधलं काही येत असल्यास आपण एखादा धागा काढावा.तिथे भेटू...

शकुनीमामाचे डायस...

अरे वा! कॉन्ग्रेस जिंकली की भाजपाचे पैलवान वरडतात... मशिन्मध्ये घोळ होत म्हणुन... हे त्याचेच पौराणिक रुप दिसते आहे. शकुनी जिन्कला की बोम्बलायचं फासे त्याचे ऐकतात म्हणुन ! कै च्या कै

हायला, खेळायचं आणि हरलं की म्हणायचं त्याचे फासे डुप्लिकेट होते !!! Proud
Happy

शकुनी त्याचा फासा याच्यामागे लागण्यापेक्षा तसा ऐकणारा फासा तुम्ही तयार करुन दाखवा ना!

@उदयन-तुमचा विचार बरोबर आहे.
समजा मी दोन अणू घेतले.त्यात त्यांची अशी स्वतःची ऊर्जा आहे.एक अणू सरळ फिरतो आहे दुसरा उलटा.दोन्ही अणूंनी आपली ऊर्जा वाटून घेतली आणि बंध निर्माण केला.काही ऊर्जा बाहेर फेकायला हवी पण ती त्यांनी शोषून घेतली.परत ऊर्जा वाढली आणि अणूंची रचना बदलून आणखी अणू वाढले.आता परत हेच चक्र चालू राहीले आणि आकारमान वाढता वाढता प्रचंड स्फोट झाला. यात अनेक नवे अणू तयार झाले.त्यांचे बंध आनि मुलद्रव्यं तयात झाली... अनेक वस्तूमाने विखूरली गेली आणि ग्रह तयात झाले.

बिग बँग झाला असावा याला दोन प्रमुख कारणं दिली जातात-
१-ग्रहांचा-तार्‍यांचा गोल आकार.वेगाने फिरल्यशिवाय गोल आकार येऊ शकणार नाही,आणि वेग तेव्हाच मिळेल जेव्हा ते फेकले जातील.
२-विश्व सतत प्रसरण पावतं आहे.का?तुम्ही एखादा चेंडु फेकला तो समजा शंभर मीटर त्याने प्रवास केला.आता हाच प्रवास तुम्ही कैक प्रकाशवर्षे असा रिप्लेस करा.म्हणजे तुम्ही फेकलेला बॉल अजून प्रवास करतोय.त्याला इतर अनेक चेंडू भेटले त्यांनी स्वतःचे बल तयार केले आणि ते एकमेकांना ढकलतायत...

इथेही आपण अणूंचा विचार केला.अणूकेंद्रकामध्ये अनेक उप-कण आहेत.त्यांचे व्यवहार कुठे पाहीलेत? कदाचीत त्यांनी ट्रिगर केलं असावं...एखाद्या इन्टरनल रिअ‍ॅक्शनला बाहेरून चार्ज करावं लागेल का???
उदयन??

इथे तरी भांडू नका कृपया.
ज्याला लेखकाचं म्हणणं पटत नाहीये त्याने विथ उदाहरण सांगा. म्हणजे लेखक इदर मान्य करेल ऑर आणखी काहईतरी स्पष्टीकरण देईल (तेही विथ उदाहरण हवे)

मला इथे बर्‍याच गोष्टी नव्याने कळतायेत त्यामुळे इंटरेस्टने हा धागा वाचतेय. प्लिज इथेही भांडण नकोत ही विनंती

प्रथम चांगला धागा काढल्याबद्दल अभिनंदन.

जे लिहीले आहे त्यापेक्षा विज्ञान खूप जास्त आहे. म्हणजे ब-याच गोष्टींचा उलगडा व्हायचाय हे नक्कीच.अजूनही आत्मा,मानवाची उत्क्रांती,मन असे अनेक गूढ आहेतच. प्रत्येक वेळी विज्ञानात एखाद्या गोष्टीचे तांत्रिक कारण मिळतेच असे नाही.

गाडी चालवायला पेट्रोल लागते थोडक्यात एक उर्जा लागते मग माणूस किंवा इतर प्राणी यांच्यामध्ये ही उर्जा कोठून येते.माणूस पुर्वी प्राणी होता किंवा आमिबाही असेल पण त्या आमिबात हालचाल करण्याची ताकत/उर्जा कोठून आली. मग जेव्हा असे काही प्रश्न आपल्याला पडतात तेव्हा आपण पॅरानॉर्मल म्हणून त्याकडे बघितले तर ते योग्यच आहे.इथे पॅरानॉर्मल म्हणजे आपल्याला माहीत नसलेली वा न उकललेली एक उर्जा/चेतना असच अपेक्षित आहे. जेव्हा काही गोष्टींची खूप चर्चा होते तेव्हा त्यातल्या थोड्याशा का होईना घटना ख-या असतात अस माझे ठाम मत आहे.

@रीया- हा धाग तरी अपवाद कसा राहीला असता... असो..

@किरण-आभार आपले
जेव्हा काही गोष्टींची खूप चर्चा होते तेव्हा त्यातल्या थोड्याशा का होईना घटना ख-या असतात अस माझे ठाम मत आहे.<<<< तुम्ही उपलब्ध वैज्ञानिक गोष्टींबद्दल बोलता आहात असा (गोड आणि गरजेचा ) समज मी करून घेत आहे. Wink

(किरण, इतर बाबतीत तशी मानसिकता तयार करून त्याला चिकटून राहणार्‍या लोकांचं काय करायचं सांगाल का?त्यांच्यामुळं अजून चार जण विश्वास ठेवायला लागतात.)

God and Ghosts are two unfound entities are covered under Paranormal status or terms. Something which has no reason means the reason is yet to unveil...you need to wait,untill it is solved out...

Meanwhile one should not attempt to term it as Atarkya,Amaanviy, beyond grasp etc.

Because these terms leads the whole thing towards Bhodugiri,Buvabaaji Anxiety, Fear, etc.

This period is critical for a person who is experiencing such a thing may lost his/her patience.So that here we thought science can prop your patience very well and in a positive manner than other spiritual methods.Or these methods,can be kept on second priority..!

>>>> अजूनही आत्मा,मानवाची उत्क्रांती,मन असे अनेक गूढ आहेतच. >>>>
खरतर विज्ञानाच्या दृष्टीने यात काहीच गूढ नाही.
उत्क्रांती = डार्विनचा उत्क्रांतिवाद हा विज्ञानाने मान्य केला आहे. व तो पूर्णपणे सिद्ध झाला आहे. तरीही त्यातल्या काही गोष्टींवर मतभेद आहेत. सजीवांची उत्पत्ती नेमकी कशी झाली यावर काही थिअरिज आहेत; त्यावर मतभेद आहेत. पण काहीही झाले तरी उत्क्रांतिवाद हा विज्ञानाला मान्य आहे.
मन = मेंदू म्हणजेच मन.
आत्मा = या विषयावर मात्र मला काही बोलता येणार नाही.

>>>> गाडी चालवायला पेट्रोल लागते थोडक्यात एक उर्जा लागते मग माणूस किंवा इतर प्राणी यांच्यामध्ये ही उर्जा कोठून येते.माणूस पुर्वी प्राणी होता किंवा आमिबाही असेल पण त्या आमिबात हालचाल करण्याची ताकत/उर्जा कोठून आली. >>>>

पृथ्वीवरील सर्व उर्जेचा स्त्रोत सुर्यच आहे.

>>>> जेव्हा काही गोष्टींची खूप चर्चा होते तेव्हा त्यातल्या थोड्याशा का होईना घटना ख-या असतात अस माझे ठाम मत आहे. .>>>>>

जरुरी नाही कि त्या खऱ्याच असाव्यात. हि चर्चा करणाऱ्या बहुतेक मंडळीनी त्याची सत्यता स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नसते. इंग्रजीमध्ये - Popularity of a notion does not guarentee its validity.

>>> इथे पॅरानॉर्मल म्हणजे आपल्याला माहीत नसलेली वा न उकललेली एक उर्जा/चेतना असच अपेक्षित आहे. >>> हि सोपी व सुटसुटीत व्याख्या मात्र पटते. Happy

समजा मी दोन अणू घेतले.त्यात त्यांची अशी स्वतःची ऊर्जा आहे.एक अणू सरळ फिरतो आहे दुसरा उलटा.दोन्ही अणूंनी आपली ऊर्जा वाटून घेतली आणि बंध निर्माण केला.काही ऊर्जा बाहेर फेकायला हवी पण ती त्यांनी शोषून घेतली.परत ऊर्जा वाढली आणि अणूंची रचना बदलून आणखी अणू वाढले.आता परत हेच चक्र चालू राहीले आणि आकारमान वाढता वाढता प्रचंड स्फोट झाला. यात अनेक नवे अणू तयार झाले.त्यांचे बंध आनि मुलद्रव्यं तयात झाली... अनेक वस्तूमाने विखूरली गेली आणि ग्रह तयात झाले >>>>

एका बंदिस्त निर्वात खोलीत "प्लबर" सारखे गुणधर्म असणारे दोन चेंडु ठेवलेले आहे. मी त्या खोलीत जाउन त्या चेंडुंना गती देतो.. सहाजिकच ते अतिशय वेगाने त्या खोलीत फिरत राहतील .. मी खोली बंद करतो.. बर्याच जणांना ती खोली उघडता येत नाही. आत काय चालु आहे ते कळत नाही... फार फार वर्षांनी कोणी तरी तो खोली उघडण्यास यशस्वी ठरतो.. तिथे त्याला दिसते दोन चेंडु प्लबर च्या गुणधर्माचे आपोआप त्या खोलीत प्रचंड वेगाने फिरत आहे.. निर्वात असल्याने जिथे आपटतील तिथुन दुप्पट वेगाने दुसरी कडे जातील..अश्याने त्यांचा वेग वाढतोच. जो कोणी खोली उघडेल त्याला तर तेच वाटणार की ते चेंडु उर्जेने इतरत्र फिरत आहेत. ... त्याला हे नाही माहीत की मी फार वर्षापुर्वीच त्याला गती दिलेली आहे... तो निष्कर्ष काय काढणार "चेंडु निर्वात पोकळीत उर्जेच्या साधनाने गतीवान झालेले आहेत" आणि निर्वात असल्याने आपटल्यावर दुप्पट वेगवान होतात"

अणु चे कण जे आहेत आता त्यचे देखील विघटन केलेले आहे इलेक्ट्रोल आणि प्रोटोन. प्रोटॉन चे विघटन करुन देवकण आहेत असे देखील निष्कर्ष काढला आहे.... परंतु अजुन देखील त्या उर्जेचा स्त्रोत सापडला नाही आहे ज्यातुन यांना उर्जा मिळाली आणि गती मिळाली

त्यात त्यांची अशी स्वतःची ऊर्जा आहे<<<हे वाक्य समोर ठेवा.ते गाळलत आपण...

देव कण<<हे फक्त नाव दिलेलं आहे.

त्यात त्यांची अशी स्वतःची ऊर्जा आहे >> स्वतःची उर्जी .. ?? उर्जा स्थिर असते जो पर्यंत गती मिळत नाही
आपण जेव्हा प्रकाशाचा झोत एका वस्तु वर टाकतो तेव्हा आपण खर तर त्या उर्जेला त्यावस्तुकडे ढकलतो गती देउन .. बरोबर.. उर्जा एकच ठिकाणी असेल आणि तिला गतीच मिळाली नाही तर ? एक कल्पना आहे ही.. उर्जेला गती मिळाली तरच ती प्रसरण होते. प्रकाश हा एकच उर्जेचे स्वरुप नाही आहे.. बरेच काही आहे उर्जेचे स्वरुपात..

पण तिच ऊर्जा त्यांना गती देते... काही हिंट देतो बघा-
१-अणू मध्ये इलेक्ट्रॉन असतात,ऋण भारीत
२-प्रोटॉन असतात-धन भारीत...
३-तसेच इतर केंद्रकातल्या दोन प्रकारतल्या ६ पार्टीकल्सना त्यांचा स्वतःचा विद्युत-भार असतोच...

गतीचं उत्तर आता मिळेल.पण आणखी एक प्रश्न उभा राहतो.तो कोणता?

बा़की तुम्ही फारच सखोल विचार करताय...
Happy

नक्किच त्यात विद्युत भार असतोच... पण तो कसा निर्माण झाला ? गतीमु़ळे,,, मग हिच तर गतीच्या मागची कारणे शोधायची आहेत ना.......दोन चुंबकिय क्षेत्रात विद्युत भार निर्माण होण्याकरीता काहीतरी घडावे लागतेच ... मी त्याच कारणाची उकल शोधत आहे..... कितीही काही अणु इलेक्ट्रोन आणि प्रोटोन या सगळ्यांसाठीच कहीतरी "क्लिक" हवीच..
जशी विश्वाची निर्मीतीची "क्लिक" बिगबँग म्हणुन प्रसिध्द आहे पण त्या बिग बँग साठी क्लिक कुठे आहे..? प्रत्येक अणु आणि इलेक्ट्रोन प्रोटोन चा स्वभाव एकसारखाच जर गृहीत धरला गेला तर असे लाखो बिग बँग झाले पाहिजे .. अणु तर सगळ्यात असेल सगळी कडे जर उर्जा सारखीच असेल तर एका अणुचे जे भविष्य तेच लाखो अस्तित्वात असणार्या अणु चे भविष्य असेल .. जर बिगबँग वाल्या अणुचे भविष्य हे इतर अणुंसारखे नव्हते वेगळे होते तर त्या वेगळे पणाचे कारण असायला हवे ..
मी जर दोनशे चेंडु सारख्या गतीने फेकले तर सगळे चेंडु सारख्याच अंतरावर जाणार पण जर एक चेंडु ओला करुन फेकला तर त्याच्या गतीत आणि परिस्थिती मधे बदल होणार आणि तो इतरांपेक्षा वेगळे रिझल्ट देणार मला..

गृहितके जी आहेत ती मान्यच आहेत.. परंतु असे झाले त्यापेक्षा इतर परिस्थितीपेक्षा ते तसेच वेगळे का झाले .. यावर विचार हवा....

@उदयन,
बरोबर ... आधी स्पीन घडणे गरजेचे आहे... पहिला स्पीन...बरोबर!.मग आता हे जे काही बल लावलं त्यात-
१-बल लावण्यात हात कुणाचा?
२-मूलभूत बलांपैकी की आणखी कोणी आहे?पाचवा ??
३-ग्रॅव्हिटेशन्,फोटॉन यात आधी कोण?
४-कुणी हलवलं राव? Uhoh
५-या चार बलांचं एकेमेकांशी नातं काय? (कोण घेतंय नोबेल त्यावर्षीचं त्यासाठी...कोणी भारतीय?)

प्रत्येक अणु आणि इलेक्ट्रोन प्रोटोन चा स्वभाव एकसारखाच जर गृहीत धरला गेला तर असे लाखो बिग बँग झाले पाहिजे<<< प्रॉपर्टीज सारख्या स्वभाव सारखा..पण,
जर बिगबँग वाल्या अणुचे भविष्य हे इतर अणुंसारखे नव्हते वेगळे होते तर त्या वेगळे पणाचे कारण असायला हवे ..<<<जर एकच अणू असेल तर..किंवा एकच उप-कण असेल तर... त्या हॅरी पॉटर्मध्ल्या जादू सारखं..ते एका पासून ग्लासेस मल्टीप्लाय होत जातात तसं...

पण असं असेल तर आजही बिगबँग असायल हवा चालू...पण तो पहीलाच अजून चालू आहे... असं मानायचं का?
ही ग्रॅव्हिटेशन काय भानगड आलिये मध्येच... संशयास्पद आहे...खुनी सापडेना झालाय...

Who pulled the Trigger?

आता तुम्ही बरोबर मार्गावर चालु लागलात........

एकच अणु ? शक्यता अतिशय धुसर आहे.. कारण सुरुवातीला प्रोटोन या त्याच्या आधीचे तयार होणार एका प्रोटोन पासुन एकच अणु एकाच वेळॅला निर्माण होणे ..शक्यता नाही प्रोटोन पासुन इलेक्ट्रोन जास्त तयार होतील मग त्यातुन हजारो अणु निर्माण होतील परंतु.........!!!!!!!!!

एकच "देवकण" फोटॉन या प्रोटोन तयार केले मग त्या प्रोटोन ने एकच इलेक्ट्रोन तयार केले मग त्यातुन एकच अणु निर्माण झाला मग त्याचा रेणु बनत जाउन पुढे एकच बिगबँग झाले....

ये बात कुछ हजम नही होती ..... Happy

Who pulld the Trigger?
<<

Do you mean that without the trigger everything would be without charges or movements?

and if you assume that SOMEONE pulled it, who created that someone?

the big bang 'theory' is assuming a placeholder, and so are you.

तुम्ही करताहात ती आर्ग्यूमेंट्स तुमच्याच मूळ हेतूचा पराभव करण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. (विज्ञाननिष्ठा व बुद्धीप्रामाण्य हा तुमचा हेतू असावा असे गृहित धरून.)

Happy

तेच तर.

प्रभुने सात दिवसत जग बनवले / ब्रह्माने सतःची मुल्गी भोगुन विश्व बनवले...... इतके सोपे सिद्धान्त असताना लोक का डोकेफोड करतात ?

@इब्लिस सर,
तुमचे रास्त प्रश्न ऑलरेडी विचारात होते... Who Pulled That Trigger? तुम्ही वाक्यशः अर्थ घेता आहात कदाचीत.तुमच्या प्रश्नांवर आधी कमेंट्स करूयात...

Do you mean that without the trigger everything would be without charges or movements? <<< अशक्य...हाच मलाही पडलेला प्रश्न होता.. आणि तो कोण आहे तेच तर शोधायचंय..तो कसा आहे त्याचं चित्र आत्ताच मनात ठेऊन पुढे गेलो तर पुर्वग्रहदोष होईल...त्याचे पर्याय मात्र समोर ठेवता येतील...ते कोणते,हे महत्वाचं!

if you assume that SOMEONE pulled it, who created that someone? <<< हा प्रश्न तुमच्या या आधीच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की मिळणार... आधी मूल मग आई असं शोधवं लागेल इतकच...

the big bang 'theory' is assuming a placeholder, and so are you. <<< ती थेओरी चूकीची आहे असं मानू... वेगळी थेओरी काय्?कारण तीच थेओरी समोर ठेऊन विचार चालू आहेत... कुठलाही 'placeholder' नाहिये तिथे...

(विज्ञाननिष्ठा व बुद्धीप्रामाण्य हा तुमचा हेतू असावा असे गृहित धरून.)<<<बरोबर... योग्य अगदी...

तुम्ही करताहात ती आर्ग्यूमेंट्स तुमच्याच मूळ हेतूचा पराभव करण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. <<<
जे समोर येईल ते याच हेतूंच्या बेसवर स्थिर असणार आहे..आणि मान्यही!जे समोर येईल ते विज्ञानाधिष्ठीतच असेल याची माझ्यासारख्या अनेकांना खात्री आहे.कुठलाही पॅरानॉर्मल चमत्कार या मागे नसेल.कुठलंही स्युडो सायन्स नसणार आहे ते... पण ते काय आहे??? Sad

@उदयन
मग,तुमची वेगळी थेअरी समोर आहे? ते मूलभूतातलं मूलभूत काय असेल?? ये ग्रॅव्हिटेशन और वीक-न्युक्लियर फोर्सेस मे कुछ संबंध है... फोटॉन ,ग्रॅव्हिटेशनल व्हेवज...सोर्स... स्थिर पार्टिकल..हलला..? फुटला? पडला?
हलवला?फोडला?पाडला? फिरवला की फिरला आपओआप?? तुमचा संशय तर सांगा... Happy

याचं उत्तर पृथ्विवर बसून मिळेल?? Uhoh

हा प्रश्न तुमच्या या आधीच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की मिळणार... आधी मूल मग आई असं शोधवं लागेल इतकच...
<<
हो?
मग आईची आई कोण? नि मग तिची? लेट्स पुट यू बिटविन पॅरलल मिरर्स.

पर्याय असू शकतात, अन पूर्वग्रह नकोत, याला 'प्लेसहोल्डर' असं नांव आहे. 'कुणीतरी' शक्ती नव्हे. 'कोणतीतरी'.

असो.

रच्याकने: पृथ्वीवर बसून उत्तर मिळत नसेल, तर उभे रहा, किंवा, झोपा. मिळेल कदाचित. Wink

placeholder...ok..is quite right...what i used is in words...excluded in terms... आणखी बोललोच तर गापै वर म्हणाले ते खरे होईल... 'कोणतीतरी'(शक्ती??)... कोणीतरी पाहीजे... Happy anyways... अवांतर झाले... नवीनही कळाले... Lol

>>>उदयन,तुम्ही जे म्हणालात तेच आधीपासून म्हणतोय...गेल्या पानावरचा माझा शेवटून दुसरा प्रतिसाद बघा व या पानावर पहिला प्रतिसाद...मध्ये लिंक गेली ...प्रतिसादपण दिसत नवव्हते...

>>>तुम्ही म्हणता की ट्रान्स-रिसिव्हर- पण जेव्हा एखादा चुंबक जे करतो त्यात वस्तू हलतेच की... किंवा इलेक्ट्रोस्टॅटीक फोर्सने कागदाचे तुकडे उचलले गेले इथे कुठे ट्रान्समिटर रिसिस्व्हर येतो? मला हेच म्हणायचे आहे की सुक्ष्म प्रमाणात एखादे चौथे-पाचवे बल अस्थित्वात असेल तर? ते बल जी प्रमुख बले माहीत आहेत त्याला वरचढ असेल तर? बरोबर?

सहावे, आणि सातवे पण असेल तर? विज्ञानाचा प्रयत्न अनावश्यक गोष्टी काढून टाकायचा असतो - उगीचच असं असेल तर आणि तसं असेल तर असा नसतो. तुम्ही उल्लेख केलेल्या दोन्ही ठिकाणी ईलेक्ट्रीक बलामुळेच ती खेचाखेची होते. वैज्ञानिकांचा प्रयत्न तर सर्व फोर्सेस एकत्र करून एकाच सुत्रानी त्यांना गुंफण्याचा आहे (ग्रॅण्ड युनिफिकेशन थेअरी)

> बिग बँग झाला असावा याला दोन प्रमुख कारणं दिली जातात-
१-ग्रहांचा-तार्‍यांचा गोल आकार.वेगाने फिरल्यशिवाय गोल आकार येऊ शकणार नाही,आणि वेग तेव्हाच मिळेल जेव्हा ते फेकले जातील.
२-विश्व सतत प्रसरण पावतं आहे.का?तुम्ही एखादा चेंडु फेकला तो समजा शंभर मीटर त्याने प्रवास केला.आता हाच प्रवास तुम्ही कैक प्रकाशवर्षे असा रिप्लेस करा.म्हणजे तुम्ही फेकलेला बॉल अजून प्रवास करतोय.त्याला इतर अनेक चेंडू भेटले त्यांनी स्वतःचे बल तयार केले आणि ते एकमेकांना ढकलतायत...

ग्रह आणि तारे फेकले गेले नाहीत. केवळ दिर्घीका फेकल्या गेल्या. आणि त्या फेकल्या जाण्याला प्रसरण असा शब्द आहे
विश्वाचे प्रसरण आणि गोष्टींनी एकमेकांना ढकलायचा काहीही संबंध नाही. इलेक्ट्रोन्युट्र्ल गोष्टी एकमेकांना ढकलत असल्याचा पुरावा उपलब्ध नाही. सबबः टेलेकायनेसीस मानायची गरज नाही

ज्याप्रमाणे थोडंसंच गरोदर राहता येत नाही त्याप्रमाणे विज्ञानिष्टताही संपुर्णच असायला हवी. त्याबाबतीत विज्ञान धर्मांपेक्षाही कर्मठ आहे. नाहीतर कोणत्या ना कोणत्या अंधश्रद्धा बळावू लागतात.

विज्ञान दास मित्रा,
आपला धागा वाचला. नेहमीच्या भिडूंनी त्यांच्या मतप्रणालीच्या अंगाने केलेले लेखन वाचले.
आपण या विषयावरील अनेक पुस्तके वाचली असावीत.

प्राचार्य (अद्वयानंद गळतगे ह्यांचे लेखन वाचले असेल. ज्यांनी पॅरा नॉर्मलवर अभ्यास करून आपले विचार मांडले आहेत. त्यांची विविध पुस्तके उपलब्ध आहेत.

पैकी विज्ञान आणि चमत्कार ग्रंथ ६६५ पानाचा असून आपल्या धाग्याच्या विषयाला पुरक लेखन त्यात आहे.
त्यांच्या त्या पुस्तकाचा परामर्ष घेणारा एक धागा टाकल्याशिवाय त्यांच्या वैचारिकतेचा आवाका ज्यांना त्यांचे लेखन अवगत नाही त्यांना कळणार नाही.
ग्रंथ परिचयासाठी नवा प्रतिसाद पहा.

Pages