पॅरानॉर्मल-सत्य असत्याचे संतुलन किती?

Submitted by विज्ञानदासू on 1 June, 2014 - 06:41

लहरविज्ञान(Wave Physics) ऊर्जाशास्त्र्(Thermodynamics,Electromagnetics,Quantum Physics alied Energies), मानसशास्त्र या त्रिकोणी बंधांची खूणगाठ मनाशी बांधून केलेली वाटचाल अतर्क्य घटनांसाठी त्यातल्या त्यात भितीदायक घटनांसाठी दिलासादायक ठरेल यात शंका नाही,त्याचाच थोडासा आढावा घेण्यासाठी हा लेख प्रपंच.

एका धाग्यावर,एका प्रश्ना मागील उत्तर उघड करण्याचा काहींनी आग्रह केला.खरेतर विशेष उत्तर नव्हतंच त्या प्रश्नाचं. किंबहूना कुठल्याही मोठ्या रहस्याचं कारण हे साधंच असतं,असं आईन्स्टाईन महाशयांनीच सांगून ठेवलं आहे.बॉलीवूड आणि हॉलिवूडचे चित्रपट बघून बर्‍याच गोष्टी आपल्याला त्या थाटाच्या लागतात.त्याविरूध्द काही निघालं की हिरमोड होतोच ही खरे तर आपण आपल्या मेंदूला लावलेली सवय आहे,असे आता म्हणावे लागेल.

त्या धाग्यावरील घटनेच्या उत्तरामागे,मग ते ऊर्जा विज्ञान असेल किंवा टेलीपॅथीसारख्या गोष्टी, टेलीकायनेटीक्स किंवा मग गाडीचं साधं मेकॅनिझम.तिथेच उत्तर होतं.गाडी तापली असल्याने बंद झाली.गाडीने थोडी विश्रांती घेतली.तापलेलं इंजिन थोड्यावेळाने नॉर्मल आल्यावर चालू झाले.वर ज्यांची गाडी होती त्यांनी भीतीने गडबडून जाऊन किक मारली असावी असे दिसते व गाडीने चालू होण्यास खो दिलेला असावा.त्यांच्या सोबतीला कोणी आल्यावर दोघांचाही धीर वाढला अशणार. त्यानेच गाडी चालू झाली.निदान वरवर पहात असेच झाले आहे असे दिसते व पटतेही.पण हे उत्तर लोकांना अपेक्षित असण्यापेक्षा त्यांना वेगळी अपेक्षा होती की काही नवल विचित्र त्यामागे असेल.

पॅरानॉर्मल(यात भूताच्या आणि दैवी दोन्ही गोष्टी येतात) म्हणजे काय याचा थोडक्यात आढावा मला घ्यावासा वाटतो आहे.पॅरानॉर्मॅलीटी ही भूत या संकल्पनेशी जोडली आहे तशीच परमेश्वर या संकल्पनेशीही आहे.तेव्हा इथे तो समज आधीच सोडवला जावा,अशी अपेक्षा ठेवतो.लेखाद्वारे भूत आहे किंवा काय यावर प्रकाश टाकावयाच नसून त्याच्या अस्थित्वाला किती महत्व द्यायचं याचा ऊहापोह केला आहे...

लहर विज्ञान आणि ऊर्जा विज्ञान समोर असताना या गोष्टी विचारात घ्यायला हव्यात.मुळात भूत(!) ही संकल्पना पाहण्याआधी थोडं फिजिक्स लक्ष्यात घ्यायला हवं.आत्मा ही एकार्थाने ऊर्जाच म्हणावी लागेल.व्यासांनी आत्म्याला "नैनं छिंदन्ती..." या श्लोकात बसवलेले आहे. दुसर्‍या बाजूने हा 'नैनं छिंदन्ती...'एक प्रकारे थर्मोडायनामिक्सचा पहिला नियम्,आत्म्याच्या व्याख्येला व एकंदर आत्म्याला चपखल बसतो.म्हणजे त्याला जर ऊर्जा मानले तर त्याचं अस्थित्वही मान्य होईल.परंतु थर्मोडायनॅमिक्स च्या पुढ्च्या नियमांनी त्याचं अस्थित्व धुसर ठरतं.तरीही,तरीही त्याला ऊर्जा मानून भूत आणि देव या दोन्ही गोष्टींकडे पाहता येईल.जर आत्मा ही एक ऊर्जाच आहे तर ऊर्जेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय...ती कितीही मॅग्नीट्युडमध्ये असू शकते तसेच धन आणि ऋण वेक्टर्समध्ये असू शकते.तिचं मोजमाप निगेटीव्ह असणार नसून तिची शक्ती धन आणि ऋण प्रभारात असू शकते.भौतिकशास्त्राचे जाणकार इथे जास्त चांगले बोलू शकतील.

तेव्हा इथे पॉसिटिव्ह आणि निगेटिव्ह्चं ऊर्जेचं मोजमाप पॅरानॉर्मल(!) अस्थित्वासाठी महत्वाचं ठरेल आणि तिथेच आपल्या थकलेल्या मेंदूला ठकवण्यासाठी,या निगेटीव्ह लहरींच्या ठराविक ठि़काणी,हीच ऊर्जा समोर येते.एक

त्याच धाग्यावरील काही घटनांचा संदर्भ देतो-
उदा.गाडी लॉक होणे,ओढ जाणवणे या खरं तर डोक्यात चालणार्‍या गोष्टी आहेत.अर्थात भिती आणि याच ऊर्जा लहरी त्याला कारण असतात.अनेक प्रसंगात गाडीला ओढ लागली आणि नंतर सुटली,हलकं वाटलं असे जाणवलेले दिसून येणे खरे तर 'न्यूरल लॅग' आहे.त्यावेळेस गाडीच्या स्पीडोमीटऱकडे कुणाचं लक्ष्य गेलं असेल तर गाडी वेगातच(जरा जास्तच) चाललेली होती असे दिसेल.

खरे तर माणूस जेव्हा प्रचंड ताकद लावून यातून बाहेर येतो तेव्हा ती त्याने 'त्या मनातल्या' न्युरल लॅगच्या थ्रेशोल्डवर केलेली मात असते.आता हेही कळण्यासाठी सिनॅप्सकडे(गुगल करावे) जावं लागेल जिथे विद्द्युत ऊर्जा आणि केमिकल्स यांचा अखंड सुंदर खेळ चालू असतो.तिथे थोडी गडबड झाली की वेगळे(पॅरानॉर्मल[!]) संदेश जाऊ लागले की तो मनाचा खेळ सत्य-आभासात परावर्तीत होतो.तर मुद्दा हा की बराच भाग ऊर्जाविज्ञानाशीच(Energetics) व उर्जावहनाशी(Energy-Dynamics) जोड्ला गेला आहे.

आता स्लीप पॅरालिसीस-ऑक्सीजनच्या कमतरतेने होऊ शकतो,हे कितींना माहीत आहे?ढगाळ हवामानात, थंडीत्,एसी मध्ये झोप लागली की स्लीप पॅराचा अनुभव बर्‍याच जणांना येऊन जातो. तोंडावर पांघरून घेऊन झोपल्यानंतरही स्लीप पॅरा.ची फेज येऊ शक्ते.तसेच स्ट्रेस आणि कमी ऑक्सीजन हेही त्याला कारणिभूत ठरतात असे सांगितलेले आहे.हॅरी पॉटरचा स्लीप पॅरालीसीस असाच आहे.गळा,डायफ्रामचे स्नायू आखडल्याने छातीवर दाब येतो.तसेच REM अवस्थेत आलेल्या जागृत मनामुळे स्वप्न किंवा आधीचे विचार यांचे आभासी वास्तवात रुपांतर होऊ शकते.

दोघांना एकाच प्रकारची स्वप्ने पडणे.इथे परत टेलीपॅथी आणि टेलीकायनेटीक्सचा संदर्भ.पण हे मुद्दे असे आहेत की इट हॅज वेरी लेस फिजीकल एव्हिडन्स अँड सो लेस अमांउंट ऑफ रेसिड्युअल प्रुफ्,बाय चान्स...मिळाले तर...अथवा शोधत बसा.उर्जा हातात सापडेल तर खरे.ते मिळतच नाही.

(poltergeist)पोल्टरगिस्ट म्हणजे आवाज करणारं भूत(!)दारे,खिडक्या हलणे,बेड हलणे इ. याचा स्त्रोत सायकोकायनेसीस असू शकेल असं बर्‍याच जणांचं मत आहे.सायकोकायनेसीस किंवा टेलीकायनेसीसची उदाहरणं आपण डायनामो सेरीज बघताना(इथे ट्रीक्स आहेत बहुदा) पाहीली आहेत किंवा अक्षय कुमार ने कॉमेडी नाईट्स मध्ये जो चष्मा उचलला होता,हाताचा स्पर्श न करता तेच.अर्थात पोल्टरगिस्टमध्ये हे करणारी व्यक्ती कोण हे मात्र कळलेलं नाहीये.अर्थात इथे त्यांचं असं म्हणणं आहे कि पोल्टर्गिस्ट या टेलीकायनेसीसचा वापर करत असावा.असावा...ती खरेच तसे करते का हा संशोधनाचा विषय आहे.याच्या अस्थित्वाला आधार नाही.

Synchronicity-ज्यात दोन किंवा अधिक घटना एकमेंकांशी दुरान्वये वा सलगीने समान असतात.उदा.दोघांना एकच स्वप्न पडणे.दोघांना एकावेळी एकच जाणीव होणे इ.या गोष्टिच्या ऊहापोहासाठी प्रसिध्द मानसशास्त्र तज्ञ कार्ल जुंगचं 'युंग ऑन सिन्क्रोनिसिटी अॅंड द पॅरानॉर्मल' हे पुस्तक वाचावं.पाऊली नावाचा शास्त्रज्ञ याच किश्शांसाठी प्रसिध्द होता.त्याचे किस्से तर अमाप प्रसिध्द्द आहेत.

मी जेव्हा कंप्यूटर लॅब मध्ये पाऊल ठेवायचो तेव्ह दोन वेळा कंप्यूटर्स आपोआप रिस्टार्ट झाले आहेत म्हणजेच लाईट त्याचवेळी गेली आणि आली आहे.अनेकदा मी खुर्चीवरुन उठलो की कॉलनीतली लाईट जाते किंवा येते तरी.एकदा वर्गात शिरलो आणि पीसीचा फ्युजच उडाला होता.यामागेही MSEB वाल्यांशी माझी 'वेव्हलेंग्थ' चांगली जुळते असा निष्कर्ष एका मित्राने काढला आहे.हा विनोदाचा भाग सोडा पण टेली कायनेसीसचं अस्थित्व आहे,असा हायपोथेटीकल विचार मांडून त्याला सत्य-असत्य ठरविण्याचा प्रयत्न अजून करायला हवा आहे.खरे तर इन्व्हर्स स्क्वेअर लॉ नुसार सायकोकायनेसीस कठीण गोष्ट आहे.पण अगदी सुक्ष्म पध्दतीने या कथीत गोष्टीचं अस्थित्व शोधण्यासाठी अजून प्रयत्न गरजेचे आहेत.अणूमधला केंद्रक आणि त्यातले उप-अणू, यांमधल्या काही थेओरीज अजून सिध्द झालेल्या नाहीत.त्यातले मेकॅनिक्स गुल्दस्त्यातच आहे... बिग बँग थेओरीमध्ये मूळ उप-कणांचे प्रसरण पहील्यांदा कसे झाले.ती उर्जा कोणती होती याचे केवळ तर्कच मांडले गेले आहेत.त्याचीही सिध्दता होत नाही तोपर्यंत काही बाबी पडद्याआडच असतील.(संपादित)

पॅरानॉर्मल(!) हे अतर्क्य नाहीच मुळी.भिती,ऊर्जेचं स्वरूप आणि ब्रेमिकल्स चा त्रिवेणी संगम होऊन भूत आणि अमानवि गोष्टींचा उगम झालेला आहे. कधी कधी अमानविय(खरे तर यात अ‍ॅंटॅ-प्रोटॅगोनिस्ट दोघे येतात) या संकल्पनेचे पूर्वग्रह मनात असल्याने त्या गोष्टींना बढावा आपलं मन देतं आणि परत भिती...असे चक्र समोर येत असावे असे दिसते.

पॅरानॉर्मल ही कंसेप्ट रोबोटस् सारखी नाटकांमधून आली असावी.जिला नंतर अभ्यासाचं(!) स्वरूप दिलं गेलं असावं.हॉलीवूड्पटांनी झोंबीला डोक्यावर घेतलं तसेच.

पॅरानॉर्मलला काहींनी स्युडोसायन्सचं रूप दिलेले आहे.जे सायन्ससारखं आहे पण सायन्स नव्हे.अमीबाला असणारे पायासारखे अवयव.म्हणून ते स्युडोपोडा.तसच हेही.म्हणजे संकल्पना तर सगळ्या वैज्ञानिक...परंतु सिद्ध करण्यामध्ये अडचणीच्या किंवा ज्यात सिध्द् करण्यासाठी बरेच अडथळे आहेत असे.बरे,अशा गोष्टी सिध्द करणार कशा?त्याला जवळपास 'शून्य' वेळा फिजीकल एविडन्स असतो. मग अशावेळी कुणीतरी जे बघीतलंय त्यावर फक्त अनुमान काढत बसणंच हातात राहतं.याचा फायदा भोंदू लोकांना आजतागायत होत आला.जसा भोंदूना फायदा तसाच स्वत:कडे लक्ष्य वेधून घेणार्‍यांनाही फायदा झाला आहे.

आशूचँपच्या या धाग्यावरचे सगळ्यांचे अनुभव खरे आहेत,जे त्यांनी स्वतः घेतले आहेत,असे म्ह्णू.परंतु त्याला कुठे ना कुठेतरी ठोस उत्तर आहे.त्यावर उपाय आहेत.ते हातात आहेत आणि काही पडद्यामध्ये आहेत.परंतु त्या उपायांचं अस्थित्व नक्की आहे.या निगेटीव्ह ऊर्जेला ऊत्तरं आहेत,हा दिलासा जरी मनात ठेवला तरी बरेच प्रश्न आणि मानसिकता सुटतील असे वाटते.

तसे,म्हणूनच माझ्या एका प्रश्नाचं उत्तर कुणीही द्यावं की फ्रेश असताना,दिवसा उजेडी अमानविय असं कधी कां जाणवत नाही?

कुठलाही 'इव्हेंट' हा एकाचा द्योतक नाहीच असू शकणार.त्यासाठी अनेक घटक एकत्र येऊन काम करत असतात.त्याच सारखे अमानविय अनुभवांची त्या-त्या क्षणी एक कारणांची साखळी असते कां,हे पाहायला हवं.ती साखळी त्यातली प्रत्येक कडी सोडवून परत जुळवता आली की झालं.भितीच्या पकड घेण्याने त्याची मिमांसा त्यावेळी शक्य होत नाही.हिरवी साडी नेसलेली स्त्री ही विचारधारेत एवढी प्रवाही आहे की मुन्नाभाई सारखी(येथे त्याचे गांधीजी) ती मनात असल्याने दिसत असते.अनेक रंगांनी ही साडी रिप्लेस केली,तशी मानसिकता भिनवली की त्या-त्या रंगातल्या साडीत ते भूत दिसेल.

युंगच्या पुस्तकात त्याने एकेठिकाणी त्याच्याच घरातली काही उदाहरणं दिली आहेत.पण त्याची कारणंही पुढे वाचायला मिळतात.युंगचा एक किस्सा रोचक आहे.त्या अनुषंघाने माझा किस्सा त्यात मिसळ्तो.त्याने त्याच्या एका पेशंटला एक रत्न भेट दिले असे स्वप्न त्या पेशंट्ला पडत असे.ते रत्न एका बीट्लसारखे(कठीण कवचाचा किडा किंवा ममी रिटर्न्स मधला इजिप्शीयन बीट्ल) आकाराला होते.एकदा तिच्यावर थेरपी चालू असताना एक बीटल जुंगच्या खिडकीवर धडका देऊ लागला.(असाच एक मोठा ब्राऊनबीट्ल माझ्या खोलीच्या खिडकीवर रात्री तीन-चार दिवस धडका देत आहे आणि आत्ता पुस्तकात मला युंगचा किस्सा सापडावा हा काय योगायोग आहे?)जुंगने त्याला पकडले आणि आश्चर्य म्हणजे तो किडा हा त्याच प्रकारचा होता ज्याचे रत्नरुपी स्वप्न त्या पेशंटला पडत असे.

युंगने याची मिमांसा मटेरीअलिझमच्या बाहेरची घट्ना अशी केली आहे.तो मानसशास्त्रीय कारणे मानतो तर कधी दिग्मूढदेखील होतो.कारणांचे अस्थित्वमय पुरावे दिसू शकत नाहीत याचा उद्वेगही त्याला येतो.कधी कधी त्याचा संबंध अॅस्ट्रॉलॉजीशी तो जोडतो.

पॅरानॉर्मलच्या नाट्यमय अस्थित्वापेक्षा,दुनियेत ऊर्जाविज्ञानाचं स्थान बलाढ्य आहे,असेच म्हणावे लागेल. त्या घटनांना आपण कसे बघतो हे आपल्या डोळसपणावर अवलंबून आहे.आपण एवढं रोज वाचतो.नव्या संकल्पनांच्या संपर्कात राहतो.नवीन जाणून घेण्याचा अट्टहास बाळगतो.पण असे अनेक लोक आहेत ज्यांना हे ज्ञान मिळत नाही पुस्तकांपासून ही माणसं हाता-तोंडाच्या लढाईत बाजूला राहतात.ती माणसं कशी रहात असतील्,त्यांच्याकडे काय पर्याय असतील आणि त्यांचे प्रबोधन कसे केले जावे हा प्रश्न आहे.

मला जमेल तसे इथे मांडलेले आहे.त्यानिमित्ताने याविषयाचे थोडे लिटरेचर नजरेखालून गेले आणि नवीन ज्ञानात भर पडली असे वाटते.मी या विषयातला जाणकार नव्हे व एरवीही एक विद्यार्थीच. परंतु माणसाने बघताना भौतिकाकडून अदिभौतिकाकडे(जर ते असेल तर) जावे असे नाही का? आमच्या संस्कृतच्या सरांनी एकदा म्हटलेले जिथे विज्ञान संपते तिथे अध्यात्म चालू होते.त्यावर वर्गात वादंग होऊन त्यांना आपले म्हणणे मागे घ्यावे लागले.

खरे तर विज्ञानाला अवकाश हीच मर्यादा आहे.त्यामुळे अध्यात्म म्हणजे विज्ञानच.पोथी,पुराण म्हणजे त्याच स्युडोसायन्सला समजण्याचा आटापिटा ठरेल किंवा टूल्स(?) म्हणता येतील.आदिभौतिक हेच मुळात मानवनिर्मित आहे त्यामुळे ते सत्य मानण्याऐवजी आईनस्टाईनचे नैसर्गीक रहस्य जास्त स्वारस्ययुक्त वाटते,ज्याला आईन्स्टाईन कुट म्हणतो,ते कुटील कसे असेल?आणि मानवाला अमानविय त्रास देण्यात याच विज्ञानाला पर्यायाने काय हशील होणार आहे?

वरच्या उदाहरणात गाडीला किक मारताच गाडी चालू झाली कारण ती नॉर्मलला आली असावी.अत्यंत वेगात चालवून ती तापून बंद पडली हे तिथे लक्ष्यात आले असते तर भिती अजूनच वाढली नसती.तिथे वेळीच लगाम बसला असता आणि निदान गाडी ढ्कलत न्यायला बळही आले असते. हे मात्र निश्चित खरं कि कई बार दिमाग पे डर हावी हो जाता है.... लेकीन डर भी केमिकल लोच्याही हय बाबांनो...

मुळात येणारे अनुभव हे सगळे सायकॉलॉजिकल फेनोमेनॉ आहेत असा मतप्रवाद आहे आणि वैयक्तिक रित्या त्याचं विश्लेषण मान्य असल्याने मलाही तो मान्यच आहे.विज्ञान हे डोळस तपास शिकवत असते.अंधश्रध्दा हा थोडासा गोंधळात टाकणारा शब्द आहे.

डोळसपणे कुणी भूतावर श्रध्दा ठेवली तर त्या माणसाची ती श्रध्दा ठरेल.जर देव ही देवळातली कंसेप्ट कुणी अश्रध्द ठरविली तर ती अंधश्रध्दा होईल.ती भावना आहे तर तिला शास्त्र काट्याची कसोटी लावायला नको काय? ती संकल्पना व्यक्तीविचार सापेक्ष आहे आणि विचार हा बुध्दीवर अवलंबून आणि बुध्दी अर्थात शिक्षणावर.ती श्रध्द्दा म्हणून माना पण त्याची कसोटी करून,अशीच अनेक विद्वानांची आकांक्षा आहे.

मी स्वतः भूत पाहीलेलं नाही आहे जर पाहीलं असतं तरी त्याला मानलं नसतं.कारण अद्रुश्यापेक्षा माणसाच्या वावरावरती माझा विश्वास आहे आणि भूतासारख्या वाम गोष्टीवर ते अस्थित्वात असेल तरी विश्वास नसेलच.म्हणून इकडच्या या एका धाग्यावरील अनुभवांना मी हस्यास्पद मानत नाही.परंतु त्यांचं स्पष्टीकरण असू शकतं इतकं मला ठामपणे म्हणायचं आहे.ते स्पष्टीकरण नसता,त्या गोष्टी हस्यास्पदच(चेष्टेने हस्यास्पद नव्हे) ठरतात.त्याची अनेक उदाहरणे ज्योतिबा,जेजुरीला किंवा इतर ठिकाणी गेलात तर दिसतात.ज्योतिबाला गेलो होतो तिथे एका महीलेला चक्कर आली.त्यांना आम्ही सांगीतले गाडीने पन्हाळा हॉस्पिटलला जाऊ.पण त्यांनी ऐकले नाही. ज्योतिबाच्या दारात काय भिती वगैरे त्यांचे म्हणणे.जवळपास दोन-अडीच तास ती महीला त्या भर उन्हात, फुफाट्यात पडून होती.तिच्याभोवती तिचे नातेवाईक होते.पण एकालाही हालचाल कराविशी नव्हती वाटली. डिहायड्रेशन आणि पार्शल कोमा.शेवटी देवस्थळ्यांनी उचलून दवाखान्यात नेली पण नाही वाचू शकली.

विज्ञान सर्वव्यापक जरी असले तरी काही संदर्भात अजून रहस्यच आहे,पण म्हणून त्याला अतर्क्य म्हणून वा अध्यात्मिक म्हणून न पाहता,शास्त्र म्हणूनच पहावे,अशी विज्ञानाच्या भक्तांतर्फे इच्छा.

-विज्ञानदास.
धन्यावाद!

(लेखात तांत्रिक चूक असल्यास निदर्शनास आणल्या जाव्यात.आभार)
संदर्भ-कार्ल युंग ऑन सिक्रोनिसीटी अँड द पॅरानॉर्मल
-www.indianparanormalsociety.com
-Some Referal Articles
-Richard Wisemans Statements/Articles(जरुर वाचावित अशी)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

- ग्रंथ परिचय –
विज्ञान अणि चमत्कार

एडमिन च्या सांगण्यावरून येथील ग्रंथ परिचय वाचू आनंदे या सदरात डकवला आहे.
याची नोंद घ्यावी...

Happy

@aschig
>>>सहावे, आणि सातवे पण असेल तर? विज्ञानाचा प्रयत्न अनावश्यक गोष्टी काढून टाकायचा असतो - उगीचच असं असेल तर आणि तसं असेल तर असा नसतो. <<<<
मी फक्त हायपोथेटीकल 'Guess' केला आहे.असेल तर .असं -तसं असा अर्थ कुणी त्यातून काढू नये. जेव्हा एखाद्या आजाराचे कारण समोर येत नाही तेव्हा अनेक अंदाज बांधले जातात..याचा अर्थ असा नव्हे की ते अंदाजच उत्तरे आहेत..बरोबर? मला 'n' numbers of guesses करण्याचा पूर्ण अधिकार आहे असे समजतो...त्यातले किती योग्य चूक ते ठरेलच.आईन्स्टाईन यांनी बरेच Guesses मांडले आहेत्च की...म्हणजे असं झालं असेल तर...ही अत्यंत उपयुअक्त गोष्ट...बघा!

>>>विश्वाचे प्रसरण आणि गोष्टींनी एकमेकांना ढकलायचा काहीही संबंध नाही.<<<< बरोबर...पण वर मलाही एकमेकांना ढकलणे आणि प्रसरण या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत असेच म्हणायचे आहे.त्या एकाच वाक्यात आल्याने तसा समज होतोय खरा.

>>>इलेक्ट्रोन्युट्र्ल गोष्टी एकमेकांना ढकलत असल्याचा पुरावा उपलब्ध नाही. सबबः टेलेकायनेसीस मानायची गरज नाही<<<< परत तुम्ही इलेक्ट्रोन्युट्रल ही एकच गोष्ट डोळ्यसामोर ठेवलीत... शोध थांबत कधीच नसतो,या विज्ञानाच्या जगात कधीही तुमची थेअरी खोडली जाऊ शकते...सो पर्याय्,अंदाज बांधतच पुढे जावं लागतं... मी आपल्या आणि इथल्या सर्व्वांच्या माहीतीसाठी सांगू इच्छितो की अगदी नेहमीच्या लोकांनीही हे लक्ष्यात ठेवा----
Always Make Guess,Try,But Don't Assume About Something Permanently... समाजात वावरताना शिक्के मारायची सवय जात नाही मराठी माणसाची(सार्वत्रिक बोलत आहे..कुणा एकासाठी नाही.)

>>>सबबः टेलेकायनेसीस मानायची गरज नाही<<< एका मिटरच्या नाही पण मिलीमिटरच्या परीघामध्ये टेलीकायनेसीस असू शकतं...ते सिध्द करता येईलसुध्दा... पण जर सिध्द झालं नाही तर मान्य आपल्याला...(टेलीकायनेसीस्/सायकोकायनेसिस म्हणजे काय ?)

>>>तसेच ग्रह/तारे 'गोल'(च) का झाले आणि त्यांना 'वेग का मिळाला' याचे यथार्थ स्पष्टीकरण वाचण्यास मी उत्सुक आहे.... कारण जे स्पष्टीकरण आहे ते तेच आहे असे मला वाटते.

>>>ज्याप्रमाणे थोडंसंच गरोदर राहता येत नाही त्याप्रमाणे विज्ञानिष्टताही संपुर्णच असायला हवी. त्याबाबतीत विज्ञान धर्मांपेक्षाही कर्मठ आहे. नाहीतर कोणत्या ना कोणत्या अंधश्रद्धा बळावू लागतात.<<< पटलं..अगदी बरोबर.. Happy

(बघा माझा मुद्दा कुठे वेगळा आला असल्यास क्षमस्व...निदर्शनास आणून द्यावा...योग्य तेथे सोपे एखादे उदाहरण दिल्यास वाचताना इतरांना व मला मदत होईल...)

ध.

त्यांनी तसे म्हणणे म्हणजे एखाद्या विहिरीतील बेडकांनी विहिरीच्या बाहेर पाण्याचे जग अस्तित्वातच नाही असे म्हटल्यासारखे आहे.<<<< असे कोण म्हणते? अध्यात्मवाल्यांनी जसे काही ते त्रिलोकात(??) टूर्स करून आले आहेत असा आविर्भाव निर्माण करतात... त्यांनी सिध्द करावं मग...दाखवावा स्वर्ग कुठे आणि ब्रह्मा इकडे बसतो...
इकडे पार्वतीने जाळून घेतेलं स्वतःला..इकडे सीता गेली धरणीच्या पोटी... इकडे राधा रडत बसायची... बायकोला हाकलून देणारे बालाजी सारखे देव तुमचे... काही जमेना/उत्तर मिळेना,सुचेना की ढकलले देवावर...

भौतिकवादी शास्त्रज्ञ भौतिक शास्त्राबाहेर जगच अस्तित्वात नाही असे म्हणू शकणार नाहीत<<<<असे कोण म्हणाले?...हे हस्यास्पद वाटते आहे.

या अध्यात्माने या देशाला जेवढी वैचारीक समृध्दी दिली त्यापेक्षा अधिकपट साखळदंडांनी बांधलेले आयुष्य दिले. आज अध्यात्मच नसते तर गंगा घाण झाली असती?... नाही ना? कुंभमेळा करून रोगराई पसरलीच नसती... सप्ताह्,सोहळे,जेवणावळी,अनेक दिवस चालणारी भजने,किर्तने आणि नको त्या अध्यात्मिक गोष्टींमध्ये अमूल्य वेळ लावण्यापेक्षा सामान्य माणसाचं आयुष्य कसं सोपं होईल यावर वेळ देता आला असता की.... कितीतरी गोष्टी सो कॉल्ड अध्यात्माने कठीण करून ठेवल्या आहेत... त्यातून बाहेर पडणे नितांत आवश्यक आहे.

निदान इथून पुढे तरी देशात चार-चार नोबेल मिळवणारे येवोत हीच सदिच्छा आहे इथल्या लोकांना...

(गापै,यांच्या विनंतीवरून संपादित) ध.

या अध्यात्माने या देशाला जेवढी वैचारीक समृध्दी दिली त्यापेक्षा अधिकपट साखळदंडांनी बांधलेले आयुष्य दिले
खर आहे.

पण वैचारीक समृध्दीमुळे एक मोठा समाजवर्ग चांगल्या मार्गाने जात आहे. देव आहे कि नाही यावर अनेक मतभेद होतील कदाचित पण देवाच्या भितीने किंवा आदराने कित्येक लोक चांगली कामेही करतच असतात. मग महाराष्ट्राच्या मातीत जे कोणी संत होऊन गेले त्यांनी चांगले वागल्याने किंवा तशी कर्म केल्याने मोक्षप्राप्ती होईल वगैरे असे सांगितले. बर ज्यांनी आयुष्यभर चांगली कृत्ये केली त्यांना सारेच लाभले का ? पण त्यातून मिळणारे समाधान हीच मोठी संपत्ती असते. कोणत्याही गोष्टीचे अर्धवट ज्ञान घातकच तसेच अध्यात्मही आहे. एखाद्याला गुरु मानून किंवा त्याच्यामागे आयुष्याचा काही भाग घालवून अध्यात्मिक होणे शक्य नाही त्यासाठी आपल्या मनातच परमेश्वर शोधला पाहिजे.

इथे आपला धागा पॅरानॉर्मलचा आहे आपण फार तर अशा गोष्टींना पॅरलल नॉर्मल असेच म्हणू शकतो. जे माहीत नाही त्याचा शोध घेण्यापुर्वीच त्याला पॅरानॉर्मल म्हणून डिक्लेर करणे चूकीचेच.

.बरोबर,योग्य बोललात.,किकु. Happy

Anyways thanx all for discussions,especially उदयन,aschig... राजेश के आणि किरण आपले सुंदर प्रतिसाद..
इतरही सगळे... नेहमीचे माबोकर..

<विज्ञान सर्वव्यापक जरी असले तरी काही संदर्भात अजून रहस्यच आहे,पण म्हणून त्याला अतर्क्य म्हणून वा अध्यात्मिक म्हणून न पाहता,शास्त्र म्हणूनच पहावे,अशी विज्ञानाच्या भक्तांतर्फे इच्छा.>
मित्रा,
गळतगे यांचे विचार वाचून मग आपले म्हणणे मांडावे.
माझ्या बद्दल म्हणाल तर ...
वैज्ञानिकतेला कोणीही नाकारत नाही, हे सत्य. मात्र विज्ञानवादी दासांना मी मानत नाही. विज्ञान भक्त मी नाही. जगात घडणाऱ्या घटना मग कितीही चमत्कारांनी बद्ध असोत. त्या नियमांनी बद्ध असतात.
ब्रह्मविद्येच्या मार्गाने ती सोडवणूक करता येते असा रोकडा विचार मला भावतो...

विज्विज्ञन,

१.
>> टाळकुटेपणा करण्यापेक्षा सामान्य माणसाचं आयुअष्य कसं सोपं होईल यावर वेळ देता आला असता की....

ज्यांच्याकडे बुद्धी आणि शक्ती आहे त्यांनी वेळ द्यावा. यात टाळकुटेपणाचा दोष काय? मी टाळकुट्या आहे म्हणजे मी प्रयत्नवादी नाही असं कशावरून?

२.
>> कितीतरी गोष्टी सो कॉल्ड अध्यात्माने कठीण करून ठेवल्या आहेत...

कितीतरी गोष्टी सो कॉल्ड विज्ञानाने कठीण करून ठेवल्या आहेत. प्रदूषण ही घातक समस्या केवळ विज्ञानामुळेच निर्माण झाली आहे. शतकभरापूर्वी कुठे होतं प्रदूषण?

३.
>> निदान इथून पुढे तरी देशात चार-चार नोबेल मिळवणारे येवोत हीच सदिच्छा आहे इथल्या लोकांना...

नोबेल मिळाल्याने असा काय मोठा देशाचा विकास होणारे? त्यापेक्षा भारताच्या अध्यात्मिक पार्श्वभूमीचा संदर्भात संशोधन व्हावं अस म्हणेन मी.

आ.न.,
-गा.पै.

पैलवान,लई चिडलासा..वाईच दम घ्या... आमच्या सांगलीची हळद घातलेलं कोल्हापूरी कट्ट्यावरचं दूध प्या गुटूक्-गुटूक..मिशीला लागलेलं निपटा झ्याक पंच्यानं... आन ऐका....

टाळकुटेचा अर्थ टाळ वाजविणारे नसून वेळ वाया घालवणारे असा आहे. आठवडा-आठवडा विनाकारण सप्ताह्, सोहळे घालून त्यात वेळ-घालवणे याला उपयोजून एकच टाळकुटे असा संदर्भ घेतला.प्रदूषण ही आजच्या प्रगतीची देण आहे मान्य.त्यावर उपाय वैज्ञानिकच आहेत.अध्यात्मिकतेने लोकसंख्या कमी होते किंवा त्यावर निर्बंध येतो असे कुठे आहे का? प्रदूषण होते,किंवा फे.बु,वॉ.अ‍ॅ. मुळे घरातले संवाद बंद झाले,वेग वाढला-एकेमेकांन वेळ देणे कमी झाले यावरचा उपाय काही तो नव्हे जो आपल्या मनात आहे.प्रगती हे बदल लक्ष्यात घेऊनच करायची असते.पण ते सोडून बाकीचं आपण सगळेच करत असतो.नोबेल ही प्रमुख संकल्पना आहे.पण ती तेवढीच मोठी गरजपण आहे आज भारताला... अध्यात्मावर एखादं संशोधन व्हावं सुंदर कल्पना... आपण डॉ.सी.एन.आर.राव यांचे लेख वाचावेत असे वाटते. आईन्स्टाईन हाही स्पिरीच्युअल होता.पण त्याची संकल्पना,व्याख्या वेगळी होती.

Happy आभार...
परत परत तेच मुद्दे समोर येताहेत.माबोवर इतरत्रसुध्दा आधी यावर चर्चा-वाद झाले आहेत.
गापै,आपल्याच सोबत आय थिंक.

विज्ञानदास,

>> टाळकुटेचा अर्थ टाळ वाजविणारे नसून वेळ वाया घालवणारे असा आहे

माझ्या मते टाळकुटे या शब्दात भक्तिमार्गाने जाणाऱ्यांचा हीन उल्लेख अभिप्रेत आहे. हा शब्द संतांच्या बाबतीत इतिहासाचार्य राजवाडे वापरात असंत. ते वजनदार असामी असल्याने या उल्लेखास कोणी विरोध करीत नसे.

तस्मात आळशी वा निरुद्योगी असा शब्द वापरावा असं सुचवेन.

आ.न.,
-गा.पै.

विदन्यानदासजि

आपन मला शुध्धलेखकनाचा सराव करायला सान्गितलेला आहे. त्याबद्दल काहि खुलासा आपनास मि आधिच केला होता असे आठवते आहे. तरि आपन दिलेल्या आदनेप्रमाने रोज इथ सराव करत जाईन. आपलि प्रश्न उत्तरे पन इथेच करुयात.

ज्या ज्या प्रश्नाना उत्तर जमतिल ति इथच देत जाइन. ज्याचि उत्तर नसतिल ति कसा काय देनार ?

आपन माज्यावर रागावलेले नाहित हे कळल्याने आनन्द झाला. तरि पन आपन प्रकट होन्यास का सान्गत आहात हे अजुन समजल नाहि. कारन मि पहिल्यापस्न प्रकटच आहे. फोन नम्बर दिला तर लोक पैशे मागतात हा वाइट अनुभव आहे आनि घरच पत्ता दिला तर गाडितलि हवा सोडुन देतात म्हनुन ते काय मि करनार नाहि.

तरि इतर आयडिंकडुन आपन प्रकट होन्याकडे लक्श द्यावे. कारन नावावरुन काय टोटलच लागत नाहि. मानुस आहे का भुत त्याचि.

इथे दोन 'उदयन'(उदय,नव्हे) आहेत का? हे कोणीतरी वेगळे दिसतात..की तेच्च आहेत.,चर्चा अर्धवट टाकून पळालेले ते वेगळे उदयन का? खर्‍या उदयन यांनी खुलासा करावा.तरी काही बोलायचे असल्यास विपूमध्ये भेटावे. :स्मायली:
चर्चेत हार झाली की मान्य न करता चर्चा अर्धवट टाकून पळणारे उदयन कोण बरे? :प्रश्नचिन्हांकित :

माझ्याही विस्मरणात गेलेला धागा...आत्ता आठवले.. Wink

मीच उदयन आहे
आणि आपल्या माहीती करीता सांगू इच्छितो की मी कधीच चर्चा सोडून पळून जात नाही
नाही हां जायला मात्र लावतो Wink
असो
घरी गेल्यावर मोबाइल वरून टाईप करायला वैताग येतो

आईनस्टाईन म्हटला कि E=mc2 समोर येते,
सहाजिकच त्याच्यासारखा अभ्यास आपण केलेला नाही पण तरीही एकूण वस्तूमान स्थिर कसे का विचार येतोच.

इथे रोज लाखो माणसे,प्राणी जन्माला येतात, हजारो भूकंप होऊन डोंगर पर्वत तयार होतात,कुठे आग लागून जंगले किंवा इमारती नष्ट होतात. म्हणजेच निर्मीती आणि संपुष्टात येणा-या असंख्य गोष्टी आहेतच. पृथ्वीच्या पोटातून आजवर माणवाने इंधन स्वरुपात कित्येक टन मटेरिअल काढले आणि ते जाळून धूरही केला मग तरीही हा सिध्दांत तंतोतंत जूळू शकेल का ?
इथेही c म्हणजे प्रकाशाचा वेग जो आपण कोणत्याही साधारण उपकरणाने मोजू शकत नाही.किंवा आधूनिक उपकरणांनी मोजला तरी कदाचित तो तंतोतंत असेलच असे नाही असे माझे व्ययक्तिक मत.मग शेवटी विज्ञान विज्ञान म्हणजे ते तर्कच आहेत जे काही प्रमाणात (१०० % नाही) सिध्द करणे शक्य आहे असेच म्हणावे लागते. सहाजिकच संशोधनातील प्रगतीमुळे तर्कही बदलणे भाग पडते.

भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या काही व्यक्तीकडून मला काही विचित्रच ऐकायला मिळते तेव्हा त्यांची किव वाटते. जसे अमूक अमूक शोध प्रथम भारतातच लागला किंवा त्याचा प्रयोग प्रथम इथेच केला गेला. नंतर कित्येक वर्षानी तमूक शास्त्रज्ञाने आपल्याच ज्ञानाचा आधार घेवून शोध लावला आणि सारे क्रेडीट घेतेले.
त्यांच्या माहीतीबाबत मला फारसे वाईट वाटत नाही मात्र ज्यांनी आयुष्यभर संशोधन करुन आपल्या जीवनातल्या ब-याचशा अडचणी किंवा बाबी सूकर केल्या त्यांच्या कार्यावर,बुद्धीवर प्रश्नचिन्ह का ?

समजा असे काही प्रयोग इथे झालेच असतील तर ते उजेडात आणणे हे त्याच लोकांचे काम होते.तिथे त्या वेळच्या सिस्टीमला दोष देणे,किंवा आपला देश गरीब ,संशोधनाला प्रोत्साहन न देणारा अशी भंपक वाक्य सोडू नये.पौराणिक विचार आणि देवदेवतांचा अतिरेक यामुळे भारतीय संशोधनाला नक्कीच फटका बसला आहे.याबबत नंतर सविस्तर लिहीन.

भारतीय परंपरा प्राचीन आहे. म्हणून त्यात सर्व ज्ञान समाविष्ट असणार, असे मानून वृथाभिमान नसावा हे तर्क संगत आहे.

मिळाला शेवटी धागा.........

------------------------------------------------

@उदयन
मग,तुमची वेगळी थेअरी समोर आहे? ते मूलभूतातलं मूलभूत काय असेल?? ये ग्रॅव्हिटेशन और वीक-न्युक्लियर फोर्सेस मे कुछ संबंध है... फोटॉन ,ग्रॅव्हिटेशनल व्हेवज...सोर्स... स्थिर पार्टिकल..हलला..? फुटला? पडला?
हलवला?फोडला?पाडला? फिरवला की फिरला आपओआप?? तुमचा संशय तर सांगा... स्मित

याचं उत्तर पृथ्विवर बसून मिळेल??

----------------------------------------------------

हा तुमचा शेवटचा प्रतिसाद .. मला... पण यात तर सगळे प्रश्नच आहेत ? Uhoh खरे प्रश्न आहेत की मस्करीस्वरुपाचे ? अणि धागाकर्ता आपण आहे.. त्यामुळे प्रश्नांची उत्तरे तुम्ही द्यायची आहे हे बेसिक विसरलात का ? Happy

असो..........

आजच्या घडीला आपण त्रिमीती माहित आहे... अंतर , उंची, खोली... चौथी मिती आपण "काळ / वेग" अजुन ठरवत आहे त्यात यश अजुन तरी लाभले नाही आहे (माझ्यामते) हे झाले मानवी आकलन शक्तीच्यानुसार ... परंतु अजुन बर्याच मिती असण्याची शक्यता देखील नकारत नाही कोणी.. भविष्यात अणि भुतकाळात जाण्याकरीता आपल्याला इतर मितींचीच आवश्यकता लागणार आहे. आकाशात बरेच तारे आहेत पण आपण जेव्हा ते बघतो तेव्हा त्या क्षणी त्यापैकी कित्येक तारे निस्तेज झालेले आहे तरी देखील आपण त्यांना त्या क्षणी बघतो .. म्हणजे आपण त्यांचा भुतकाळ बघतो .. त्यांचा प्रकाश पृथ्वीवर पोहचण्यास वेळ लागत असल्याने हे घडते पण त्या क्षणी त्या वेळेला सर्वजगाचा विचार केल्यास आपण पृथ्वीवर राहुन त्या तार्याचा भुतकाळ बघतो हे खरे आहे.....:)

आपले डोळे हे ५७६ मेगापिक्सल क्षमतेचे आहेत.. त्यामुळे आपल्या डोळ्यांना दिसण्याच्या मर्यादा आहेत
फुलपांखरुच्या डोळ्यांचे मेगा पिक्सल हे ६४हजारापेक्षा जास्त आहेत ..जे रंग या ज्या काही इतर संकल्पना जगात आहे ते त्यांना दिसत असतील परंतु आपल्याला नाही .. जसे जन्मत: अंधत्व असणार्या माणसाला रंग ही संकल्पनाच ठाउक नसते .. त्याला जो रंग दिसत असेल (उदा. डोळे बंद केल्यावर काळ्या रंगाचा अंधार असतो) तो रंग देखील सांगु शकणार नाही कारण त्याला इतर रंगच माहीती नसतात .. पण ते अस्तित्वात आहे.. तसेच असण्याची शक्यता आहे

जगात बरेच काही अजुन आहे .. आणि ते प्रचंड प्रमाणात आहे परंतु त्याची आकलन करण्यासाठी लागणारी क्षमता मानवा कडे नसल्याने तो ते नाहीच म्हणत आहे ..

आता राहिले तुमचे बिगबँग थिअरी ..अशी उर्जा अस्तित्वात असु शकते ज्याचा शोध आपल्याला अजुन ही लागला नाही. चुंबकत्व येण्याकरीता देखील काहीतरी घडावे लागते इथे तर अवघे विश्व घडले आहे.. क्लिक हवेच .. जगात सुरुवात झालेली आहे जी अमर्याद आहे आणि घटना घडतच आहेत परंतु सुरुवात होण्याकरीता देखील घटना घटायला हवी Happy

खरे प्रश्न आहेत की मस्करीस्वरुपाचे ?<<<
जे लिहीतो ते शक्यतो मनापासून असतं उदयन.थोडं का होईना सगळ्यांनाच ते जाणवलं असावं असं वाटतं.

बाकी वर जे विचारत आहात ते आधीचे प्रतिसाद वाचलेत तर प्रत्येकाचं उत्तर त्यात आहे अगदी लेखानुसरुन अवांतर असले तरी.. जर मनापासूनच जाणूनच घ्यायचं असेल तर ते पुन्हा वाचावेत,विनंती.आभार आपले...
--------------------------------------------------------------
लेखाततील संकल्पनेबद्दल बर्‍याच गोष्टी लोकांना माहीतीही नवत्या.अगदी आम्ही भूतावर विश्वास ठेवणार्‍यांपासून ते आम्ही असं काही मानत नाही म्हणणार्‍यांपर्यंत... कुठल्याही गोष्टीवर श्रद्धा ठेवताना व नाकारताना त्या गोष्टींची कारणं माहीत असणं आवश्यकच असतं...अगदी भूतावर श्रद्धा असेल तर का आहे याची सबळ कारणं माहीत असायला हवीत.नाहीतर ती मानण्या न मानण्यातील अंधश्रद्धा ठरते. म्हणूनच हे लिहीलं आहे.त्यावरचे प्रश्न,चर्चा आल्या असत्या तर उत्तमच होते.

असो...

आभार. Happy

सगळे वाचुन झालेले आहेत...
मधे तुम्ही बिगबँग थिअरी वगैरे आणलात म्हनुन हे लिहावे लागले कारण बिगबँग होण्याची कारणे देखील अजुन स्पष्ट झालेली नाही आहे ..

विज्ञानातील लोकांकडे ते शेवटचे टोक आहे. त्या पलिकडे अजुन गेलेले नाही जसे धार्मिक लोक देवाच्या पलिकडे गेलेले नाहीत. सर्व मनुष्यांमधे परमात्मा आहे पण परमात्मा कुठे आहे कसा आहे काय आहे.. निर्माण कसा झाला.. ? नाही माहीत परमात्मा शेवट आहे परमात्मा अंत आहे ..

तसेच विश्वाची निर्मिती बिगबँग झाली इथुनच शेवटाला सुरुवात झाली यापलिकडे अजुन ही लोक गेली नाहीतच ..

राहिले पॅरानॉर्मल अ‍ॅक्टिव्हिटीज .. जसे आकलन तसे परिणाम इतकेच

विज्ञानातील लोकांकडे ते शेवटचे टोक आहे.<<< ५०% बरोबर..खरे त्यापलीकडे असलेले खरे टोक अदृश्य आहे आणि तेच शोधतोय आपण... Happy
धार्मिक लोक देवाच्या पलिकडे गेलेले नाहीत.<<< त्यांच्याकडे लिखितच फक्त आहे उदयन. सैद्धान्तिक असे काहीही नाही.

जसे आकलन तसे परिणाम इतकेच<<< ते दिसलंच...

(अवांतरः- विषय निघालाच आहे तर,ग्रह/तारे हे गोलच का याचं उत्तर मला मिळत नाही आहे... कृपया कोणी जाणकार सांगतील का? प्लीज..)

विज्ञानदास | तुम्ही मांडलेल्या ७ मुद्द्यांशी सहमत आहे परंतु "सबब विज्ञान अमर्याद आहे अध्यात्म मानवनिर्मित आहे" हे वाक्य उलट आहे .. निसर्ग मानवनिर्मित आहे असं आपण म्हणू शकतो का ? मुळात विज्ञान आणि अध्यात्म ह्यात मूळ फरक काय आहे हे स्पष्ट करून सांगावे . विज्ञान आणि अध्यात्म हे एकाच आहेत . फरक फक्त एवढाच कि अध्यात्मातल्या ज्या गोष्टी माणसाला समजल्या त्याला विज्ञान म्हनला जातं आणि ज्या नाही त्यांना अध्यात्म म्हणून त्यांची काल्पनिक
गोष्टी म्हणून निर्भत्सना होते .

या लेखातली भाषा अत्यंत confusing आहे. नक्की काय म्हणायचं ते समजत नाहीये

या लेखातली भाषा अत्यंत confusing आहे. नक्की काय म्हणायचं ते समजत नाहीये<<< तसं झालंय खरं. Happy असो.

सबब विज्ञान अमर्याद आहे अध्यात्म मानवनिर्मित आहे" हे वाक्य उलट आहे<<<
म्हणजे असं 'अध्यात्म अमर्याद आहे आणि विज्ञान मानवनिर्मित.' म्हणजे ग्रॅव्हिटेशन मानवनिर्मित आणि गणपती अमर्याद.किंवा मीठ हे मानवनिर्मित आणि वेद हे अमर्याद?

किंवा मीठ हे काय आहे आपल्याला कळाले.ते दोन मुलद्रव्याचं संयुग आहे.तर ते आपल्याला ज्ञात झालं म्हणजे मीठ अध्यात्म आहे.किंवा ग्रॅव्हिटेशनचा स्रोत आपल्याला कुठे आहे पत्ता नाही याचा,म्हणजे तेही अध्यात्म? ओके.मान्य केलं.(थोड्यावेळासाठी)

फरक फक्त एवढाच कि अध्यात्मातल्या ज्या गोष्टी माणसाला समजल्या त्याला विज्ञान म्हनला जातं आणि ज्या नाही त्यांना अध्यात्म म्हणून त्यांची काल्पनिक गोष्टी म्हणून निर्भत्सना होते . <<< आपण जरा यादी दिलीत तर बरं.दोन्हीची यादीच द्या.किंवा उदाहरणं द्या.म्हणजे कळेल मला.

वर एकेठिकाणी माझंही ते म्हणणं आहे.आध्यात्म हे विज्ञान आहे किंवा व्यत्यासात जे विज्ञान आहे ते अध्यात्म.
पण अध्यात्म आणि सो कॉल्ड आध्यात्म यात फरक आहे.निसर्गात लपलेली गुपीतं शोधनं माणसाचं काम.त्या गोष्टींचं अस्थित्व निसर्गात आहे त्याचं कारण विश्वाची इक्विलीब्रियम साधण्याची कुवत.म्हणजे मी माझा तोल ढ्ळू देणार नाही हे विश्वाचं ब्रीदवाक्य.उदा.आपल्या हृदयाच्या जागीच ह्र्दय का,ते टाचेमध्ये किंवा कवटीमध्ये का नाही? किंवा मानवी ह्र्दयाला दोन झडपा आणि पक्ष्यांना एकच असं का?तर ते उत्क्रांत झाले त्या त्या पद्धतीने.कुणी विश्वनिर्माता आला,त्याने बेंबीतुन उगवलेल्या कमळातून जनमालेल्याने पाणि शंपडलं आणि प्राणी माणसं तयार झाले याला उत्क्रांती विज्ञान मान्यता देत नाही.याच्या सिद्धता आहेत.

तेव्हा जरा दोन्हीची उदाहरणं द्या.मग सांगेन.

उदयन Happy
परवाच बातमी बघा.बिगबँग झालं असतं तर विश्व जन्मता क्षणी हिग्ज-बोसॉन मुळे, 'हायली अनस्टेबल' होउन कोसळलं असतं.पण विश्व तर आहे आता.म्हणजे बिग बँग झालाच नसावा,असं काही शास्त्रज्ञ म्हणतायत.तर मेडीयाने 'चर्चच्या आनंदास उधान' या अर्थाच्या बातम्या आणल्या.घ्या!
अजून कशात काही नाय तोवर ह्यांचंच...खरं सांगू ज्याना विज्ञानातलं कळत नाही असे,'सो कॉल्ड अध्यात्माला' मानतात आणि ज्यांना विज्ञानातलं खरोखरच कळलेलं नसतं ते उगाच लोकांच्या सोयीस्कर आयुष्यासाठी झटत बसतात.

बिग बँग हा एकच पर्याय वाटतो.कारण ग्रह फिरतात का आणि त्यांना गुरुत्वाकर्षण आहे याचं कारण वजन आणि गती मध्येच आहे.मग गती मिळणार म्हणजे नेमकं त्याला आपण चेंडू फेकतो,तसं कोणीतरी त्यांना फेकायला हवं.आता युनिफाईड बिग बँग की अनेक ठिकाणी बिग बँग्स झाले आहेत्,इकडं पुन्हा लक्ष्य वळवायला हवं. म्हणजे नुसत्या प्रकाशकणांनीच नव्या कणांना जन्म दिला असेल तर?जरा गोंधळात टाकणारंच आहे.बिग बँग झालेला आहे त्याच्या पाऊलखुणा मात्र सापडत आहेत.

ही पहा बातमी:-
http://www.dailymail.co.uk/sciencetech/article-2666906/Big-Bang-controve...

नमस्कार वि.दास !

१). विचारशक्ति logically किती प्रमाणात प्रखर आहे ?

२). दिवसा ढवळ्याही ह्या शक्तिंचा प्रभाव प्रखरपणे जाणवु शकतो. पण ह्याला काही विशीष्ट सीमा आहेत.

३). तत्व विचार इ..... विचार करणे म्हणजे काय आणि खरे तत्व म्हणजे काय ? ह्या विचरांचा उहापोह फार होतो.

प्रणाम,

आपल्याला जर मेटाफिसिक्स आणि स्पिरिट सायन्समधे इंटरेस्ट असेल, तर thespiritscience.net या संकेतस्थळाला भेट देऊन बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल.

आपल्याला जर मेटाफिसिक्स आणि स्पिरिट सायन्समधे इंटरेस्ट असेल, तर thespiritscience.net या संकेतस्थळाला भेट देऊन बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल.

Pages