एक हसीना थी

Submitted by संपदा on 3 June, 2014 - 06:12

स्टार प्लस वरील नवीन मालिका " एक हसीना थी " बद्दल चर्चा करण्यासाठी नवीन धागा.

पात्र परिचय -
दुर्गा ठाकूर ( पूर्वाश्रमीची नित्या ) - संजीदा शेख.
साक्षी गोयंका - सिमॉन सिंग.
राजनाथ गोयंका - अयूब खान.
शौर्य गोयंका - वत्सल सेठ.

कथा -
नित्या आणि पायल ह्या राजनाथ गोयंकाच्या ड्रायव्हरच्या मुली असतात. पायल शौर्यने तिच्यावर केलेल्या अत्याचाराविरुद्ध कोर्टात जाते मात्र साक्षी गोयंका ( शौर्यची आई ) पायलला खोटे ठरवून केस जिंकते. पायलला हा धक्का सहन न झाल्याने तिचे मानसिक संतुलन बिघडते. नित्या शौर्यला ह्या कृत्याचा जाब विचारायचा प्रयत्न करते पण तो तिला गुंडांकरवी मारण्याचा प्रयत्न करतो. गुंडांपासून स्वतःचा जीव वाचवायला पळत असताना ती डॉ. ठाकूरच्या गाडीवर आपटून बेशुद्ध होते. डॉ.ठाकूर तिचा जीव वाचवतात व प्लॅस्टिक सर्जरी करून तिला दुर्गा हे नांव देतात.

दुर्गा कलकत्त्यात परत येऊन गोयंकांचा सूड घेण्यासाठी आधी गोयंकांशी ओळख करून घेते. साक्षी मात्र तिला बघून नेहमी अस्वस्थ होत असते पण राजनाथ गोयंका आणि शौर्य ह्यांना दुर्गा निरूपद्रवी असल्याचे वाटत असते. दुर्गा मात्र पोलिस कमिशनर आणि माथूर ( गोयंकांचा सी.ई.ओ ) ह्यांना आपल्या मार्गातून दूर करते.

शौर्यला दुर्गाशी ओळख वाढवायची असते पण दुर्गा त्याला अजिबात दाद देत नाही. म्हणून शौर्य दुर्गाबरोबर विविध एन.जी.ओ. मध्ये जाऊन तिला मदत करतो. दुर्गा शौर्यची ओळख बागचीशी करून देते. बागची व त्याची मुलगी दिव्या हे पायल केसमधले साक्षीदार असतात. दुर्गाला ईंप्रेस करण्यासाठी शौर्य बागचीच्या डोळ्याचे ऑपरेशन स्वतःच्या पैशाने करून घेतो. बागचीला परत दिसायला लागते पण साक्षीच्या भीतीने तो सत्य परिस्थिती लपवून ठेवतो. दिव्या आणि बागची साक्षीच्या तावडीत सापडतात , ती त्यांना जाळून मारण्याची सुपारी आकाशला देते. प्रत्यक्षात आकाश दुर्गाला सामील असतो. आकाशच्या मदतीने दुर्गा त्या दोघांना आगीतून वाचवते.

दुर्गाला कॅन्सर इन्स्टिट्यूट उघडायचे असल्याने शौर्यची मोठी काकू स्वतःची जमीन देते. ह्या काकूचा मुलगा देव नित्याचा बेस्ट फ्रेंड असतो. त्याला पायल आणि नित्याचे काय झाले हे कळलेले नसते म्हणून त्यांचा शोध घेण्यासाठी तो परत आला आहे. नित्याचा मात्र देववर राग आहे कारण त्याने पायल प्रकरणात गोयंकांची बाजू घेत असल्याचा मेल तिला केला होता. ( हा मेल बहुतेक साक्षीनेच पाठवायची व्यवस्था केलेली असते. )

राजनाथ आणि साक्षीची बेस्ट फ्रेंड रायमा ह्यांचे अफेअर आहे. रायमाचा डिव्होर्स झालेला आहे. शौर्यला स्वतःच्या वडिलांचे हे गुपित कळले असल्याने तो ब्लॅकमेल करतो आहे आणि दुर्गाशी लग्न करण्यासाठी डॉ. ठाकूरचे मन वळवण्यासाठी राजनाथला भरीस पाडतो आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बघतेय मी सध्यातरी... पण सध्या तरी बर्‍याचदा दुर्गाचीच सरशी दाखवलेय. साक्षी गोयंका एवढी पाताळयंत्री बाई असताना ती काही गोष्टींची नीट पडताळणी करत नाही की तिला अज्जिबात संशयही येत नाही हे जरा पचत नाहीये. जसं बागची बाबा आणि दिव्या खरंच मेले का? आग लागल्यानंतर दुर्गा जोरजोरात बागची बाबांच्या नावे ओरडत असते. गोंधळात नाही तरी थोडा तरी आवाज कोणालातरी ऐकू आला असता. आकाश नेमका त्याच काळात कुठे गायब झालेला ते साक्षीच्या लक्षातही येत नाही. तसेच तिच्या नवर्‍याचे राजनाथ आणि रायमाचे अफेअर इतके वर्ष तिच्यापासून यशस्वीपणे लपून आहे...

काही गोष्टी नजरेआड केल्या तर बरीच बरी चाललेय सध्या तरी ही सिरीयल. पण थोडी तरी जुगलबंदी दाखवावी. सध्या तरी दुर्गाचं पारडं विजयाच्या बाजूने झुकतेय. साक्षीलाही शहकाटशह देताना दाखवू देत म्हणजे चुरशीचा सामना पाहील्यासारखं वाटेल Happy

आग लागल्यानंतर दुर्गा जोरजोरात बागची बाबांच्या नावे ओरडत असते. गोंधळात नाही तरी थोडा तरी आवाज कोणालातरी ऐकू आला असता. आकाश नेमका त्याच काळात कुठे गायब झालेला ते साक्षीच्या लक्षातही येत नाही. >>> दुर्गा गाडीबाहेर येऊन ओरडते तेव्हा साक्षी आणि तिचे भाडोत्री आकाश च्याच सांगण्यावरून तिथून ऑल्रेडी निघून गेलेले असतात. साक्षीला सर्व संपेपर्यन्त तिथेच थांबून खात्री करायची असते पण आकाश पोलिस आल्याचे सांगतो , तोवर आकाश वर तिचा विश्वास बसलेला असतो त्यामुळे ती निघून जाते.

मला आतापर्यन्त चांगली वाटत आहे ही सिरियल , पण देवची महा बोरिंग एन्ट्री झाल्यामुळे सध्या धाकधूक वाटत आहे. Happy

अगदी... नवर्‍याचे आणि स्वतःच्याच खास मैत्रीणीचे अफेयर हिला अजुन माहीत नाही, हे पटत नाहीये.. तिच्या आधीच मुलाला पण कळलं...पण हिला नाही..

काल तर शौर्य ने कृरपणाची हाईट केली..त्या माणसाला मारून..

व्वा संपदा.. मी आज हाच धागा काढायच्या विचारात होते. पण ऑफीसमध्ये एवढी बिझी झाले की वेळच नाही मिळाला! आत्ता कुठे थोडी फ्री होत्ये.. एनीवे थँक्यू संपदा Happy
जाम इंटरेस्टिंग वाटायला लागल्ये ही सीरियल.. पण वरती म्हणाल्याप्रमाणे आत्तापर्यंत दुर्गाचेच पारडे जड आहे. तो शौर्य एवढा डोकेबाज नाहीये त्यामुळे त्याच्याकडून काही अपेक्षा नाही पण त्याची आई (सिमॉन सिंग) भलतीच चलाख असल्याने ती दुर्गाला काटें की टक्कर देईल असे वाटते..

पण देवची महा बोरिंग एन्ट्री झाल्यामुळे सध्या धाकधूक वाटत आहे.>> खरंय तो फारच सुमार आहे दिसायला.
पण बाकी प्लॉट,ड्रामा इंटरेस्टिंग वाटतोय. सिमॉन सिंग अजूनही सुंदर दिसते हीनामध्ये दिसायची तशी.तिच्या साड्या,जुलरी सगळंच ती छान कॅरी करते.

शौर्य गोयंका बापाला ब्लॅकमेल करतोय यावरुन तो किती पाताळयंत्री असेल अस वाटत. पण त्याची आई सॉफिस्टिकेटेड पाताळयंत्री आहे. सर्व काही वरवरुन चांगली राहुन करतेय. दिव्या आणि बागची गायब झालेत हे जेंव्हा दुर्गा सांगते त्यावर तिची रियॅक्शन कसली थंड असते.

बाकी कालच्या तिच्या डॉयलॉग वरुन ' सिर्फ मै ही नही कोई और भी तुम्हे अच्छी तरह से जानता है' तत्सम काहीतरी तिला रायमा आणि नवर्‍याचे अफेयर माहिती असावे अस वाटतय. पण योग्य वेळ आली की ती हुकुमाचा एक्का काढेल अस वाटतय.

शौर्यने आईपासुन वडिलांचे अफेयर लपवणे मला तरी काही पटले नाही. कारण दरवेळी तिने त्याला वाचवलेले असते त्याचे फाजील लाड पुरवलेले असतात.

शौर्यने आईपासुन वडिलांचे अफेयर लपवणे मला तरी काही पटले नाही. कारण दरवेळी तिने त्याला वाचवलेले असते त्याचे फाजील लाड पुरवलेले असतात.>> तो अतिशय स्वार्थी मुलगा आहे आईवडीलांसारखाच. त्याला दुर्गा मिळविण्यासाठी वडलांची गरज असते म्हणून तो लपवतो.

मी पण बघते ही सीरीयल. बरीचशी रीव्हेन्जची कॉपी आहे असं वाटत नाही का?

माझे मधले काही भाग मिस झालेत त्यामुळे दुर्गाकडे एवढा पैसा कुठून आला ते नक्की समजलं नाहीये.

नंदिनी दुर्गाला (नित्याला) गायब करणार असते गोएंका फॅमिली तेव्हा तिचा अ‍ॅक्सिडेंट प्रसिद्ध डॉक्टर दयाल ठाकूरांचा गाडीखालीच होतो. त्यात तिचा चेहरा खराब होतो (पहा योगायोग :फिदी:) आणि मग तेच तिची प्लॅस्टिक सर्जरी करतात. आणि तिला मुलगी मानतात. झालं, आला पैसा..

ओह अस्सं आहे तर हे सगळं प्रकरणं.. म्हणजे ती डॉ. ठाकूर यांची खरी मुलगी नाहीये. आणि जिच्यावर अत्याचार झाला तिची नातेवाईक आहे तर..!

माझे मधले काही भाग मिस झालेत त्यामुळे दुर्गाकडे एवढा पैसा कुठून आला ते नक्की समजलं नाहीये.>>>> तिचे दत्तक वडील डॉ. ठाकूर तिला मदत करतायत.
मला आवडली ही सिरीयल. सध्याच्या रडगाणी असलेल्या हिंदी सिरीयल्स मध्ये स्ट्राँग स्त्री - जी सगळ्या कट कारस्थानांना पुरून उरते - दाखवली आहे हा चांगला, सकरात्मक बदल आहे. गोयंका खानदानाची नस न नस तिला ठाऊक आहे त्यामुळे तिच्या सगळ्या चाली 'कॅलक्युलेटेड' आहेत.
'रीव्हेन्ज' बघायला हवी.

नाही नाही. पायलची मोठी बहिण नित्या म्हणजेच दुर्गा. फक्त चेहरा बदललाय. कारण चेहरा बदलून मैदानात उतरेपर्यंत तिला कळून चुकतं की तिची फॅमिली गायब करण्यात आली आहे.

मीसुद्धा "रीव्हेन्ज" नाही पाहिलेली. अशीच असेल तर बघायला आवडेल.
मला यातली घरं आणि इन्टिरियर डेकॉर जाम आवडतात. ठाकूर- गोएन्काज दोन्ही घरं फार मस्त आहेत.

अशीच एक 'रिव्हेन्ज' वाली सीरिअल चॅनेल 'व्ही' वर लागते.. पाँच नावाची... यात हिरॉईनच्या बहिणीचा रॅगिंगमुळे मृत्यू होतो आणि मग हिरॉईन रॅगिंग करणा-या ५ जणांचा बदला घ्यायला येते. आधी लपून छपून वार करते, पण मग त्यांना तिचे सत्य कळते आणि ते तिला प्रचंड छळतात, मारहाण करून फेकून देतात. तरीही ती परत कॉलेजमध्ये येते आणि उघडपणे सूडाचे नाट्य सुरू होते. सॉलीड आहे ही पण सीरिअल.

रीव्हेन्ज भारी आहे. त्यामधल्या ~ओब्व्हियस उचललेल्या गोष्टी म्हणजे नायिकेने बदला घेण्यासाठी श्रीमंत बनून येणे, मुलाचा वापर करून घरात प्रवेश मिळवणे, अतिशय उंची सेट, कपडे आणि दागिने. अर्थात त्यात प्लास्टिक सर्जरी वगैरे नाही, आणि बदल्याचं कारण, फार मोठं आहे (टेररिस्ट प्लॉट) वगैरे. शिवाय, मुख्य व्हिलनचा (साक्षीचा) कोल्ड लूक. रीव्हेन्जमधली बाई तर भारी खडूस आणि खवट दिसते.

मस्त आहे हि सिरिअल!!!सास बहू ड्राम्यापे़क्षा तर नक्किच!!!!सिमॉन सिंग छान दिसते. तीचे मोत्याचे नेकलेस आणि साड्या खुपच आवडले मला!!!!!

मालिका मी बघेन याची शक्यता नाहीच.. पण याच नावाचा उर्मिला मातोंडकर आणि सैफ अलि खानचा चित्रपट आला होता का ? त्याची कथा फार वेगळी होती ना ?
आणि मूळात ही ओळ.. कर्ज मधल्या गाण्यातली आहे ना ?

मी ही बघते ही मलिका.आगदि न चुकता...त्या देव ला उगाच आणलय ह्यात.

मला डॉ.ठाकुर चि अ‍ॅक्टिंग प्रचंड आवडते.

आजचि कथा थोडक्यात : देव सत्य जाणून घेण्याचा त्याचा परीने प्रयत्न करतो आहे.मुलाने सुचवल्याप्रमाणे राजनाथ एक मीटंग ठेवतो जिथे रोबिंद्र गांगुलि(व्हाइस छन्सेलर) येतो आपल्या आनिवर्सरी चा पार्टि ला आमंत्रित करण्यासाठि.राजनाथ त्याचि ओळख ठकुर आनि दुर्गा शि करून देतो.दुर्गा आपल्या बाबांना इशार्यातच सांगते कि हाच तो प्रिंसिपल गांगुली ज्याने पायल वर जबर्दस्ति ही केलि आणि कोर्टात खोटि साक्श हि दिलि.राजनथ त्याला आर्किटेक्ट चा अपघाताबद्दल सांगतो आणि म्हणतो कि आता कोणाला शोधावे कळत नाहि.गांगुली म्हणतो 'चिराग तले अंधेरा'.शौर्यच आहे कि.मग कशाला हवय अजून द्सर आर्किटेक्ट.

ही शौर्य आणि गांगुलीचि सेटिंगच असते हे त्यात दाखवलय.सगळे हो म्हणतात.गांगुली गेल्यावर दुर्गा टॉन्ट मारते 'जरूर किसि काम अंजाम दिया होगा जो इतने कम समय में व्हा.छा. बनगये'.त्या वर साक्षि म्हणते 'हुषार असेल हि तो.तुला बर सगळ्यांच माहित असत.तु तर अलीकडेच आलि आहेस'.दुर्गा सांगते 'माझा जन्म इथलाच आहे.तुमचाशि पहिल्यांदा भेटले तेव्हाच ठरवल कि शहरातल्या सगळ्या बड्या व्यक्तिंचि माहिति कायम ठेवत राहायचि'

आता दुर्गा चा लिस्ट्वर गांगुली आहे.साक्षि रायमा चा घरी येते आणि म्हणते कि शौर्य हे जे काहि करतोय ते दुर्गाचा जवळ येण्यासाठि हे मि समजू शकते.तरी मि हो म्हणाले कारण त्याचे कामात लक्ष तरी लागेल पण राजनाथ कसा काय हो म्हणाला. राजनाथ ला काहि तरि दबाव आहे ज्यामुळे तो शौर्य च सगळच ऐकत आहे.

आकाश वेषांतर करून्,ए.सि.ठीक करण्याचा बहाण्याने गांगुलीच्या घरि कॅमेरा बसवत आहे तोवर शौर्य तिथे येतो गांगुलीला पैसे देण्यासाठि.आकाश चि गोचि होते.

आता नेमका ए.सि.कसा त्याच वेळेला खराब झाला हे नका विचारु.अर्थातच आधि ए.सि.खराब करून मगच घरात घुसला आहे तो ( अशा बाबतीत लॉजि़कल दिग्दर्शन आहे.आधि आपल्याला प्रश्न पडतो खरा पण नंतर उत्तर मिळते.देव करो आणि ही मालिका भरकटूदे नको)

Pages