एक हसीना थी

Submitted by संपदा on 3 June, 2014 - 06:12

स्टार प्लस वरील नवीन मालिका " एक हसीना थी " बद्दल चर्चा करण्यासाठी नवीन धागा.

पात्र परिचय -
दुर्गा ठाकूर ( पूर्वाश्रमीची नित्या ) - संजीदा शेख.
साक्षी गोयंका - सिमॉन सिंग.
राजनाथ गोयंका - अयूब खान.
शौर्य गोयंका - वत्सल सेठ.

कथा -
नित्या आणि पायल ह्या राजनाथ गोयंकाच्या ड्रायव्हरच्या मुली असतात. पायल शौर्यने तिच्यावर केलेल्या अत्याचाराविरुद्ध कोर्टात जाते मात्र साक्षी गोयंका ( शौर्यची आई ) पायलला खोटे ठरवून केस जिंकते. पायलला हा धक्का सहन न झाल्याने तिचे मानसिक संतुलन बिघडते. नित्या शौर्यला ह्या कृत्याचा जाब विचारायचा प्रयत्न करते पण तो तिला गुंडांकरवी मारण्याचा प्रयत्न करतो. गुंडांपासून स्वतःचा जीव वाचवायला पळत असताना ती डॉ. ठाकूरच्या गाडीवर आपटून बेशुद्ध होते. डॉ.ठाकूर तिचा जीव वाचवतात व प्लॅस्टिक सर्जरी करून तिला दुर्गा हे नांव देतात.

दुर्गा कलकत्त्यात परत येऊन गोयंकांचा सूड घेण्यासाठी आधी गोयंकांशी ओळख करून घेते. साक्षी मात्र तिला बघून नेहमी अस्वस्थ होत असते पण राजनाथ गोयंका आणि शौर्य ह्यांना दुर्गा निरूपद्रवी असल्याचे वाटत असते. दुर्गा मात्र पोलिस कमिशनर आणि माथूर ( गोयंकांचा सी.ई.ओ ) ह्यांना आपल्या मार्गातून दूर करते.

शौर्यला दुर्गाशी ओळख वाढवायची असते पण दुर्गा त्याला अजिबात दाद देत नाही. म्हणून शौर्य दुर्गाबरोबर विविध एन.जी.ओ. मध्ये जाऊन तिला मदत करतो. दुर्गा शौर्यची ओळख बागचीशी करून देते. बागची व त्याची मुलगी दिव्या हे पायल केसमधले साक्षीदार असतात. दुर्गाला ईंप्रेस करण्यासाठी शौर्य बागचीच्या डोळ्याचे ऑपरेशन स्वतःच्या पैशाने करून घेतो. बागचीला परत दिसायला लागते पण साक्षीच्या भीतीने तो सत्य परिस्थिती लपवून ठेवतो. दिव्या आणि बागची साक्षीच्या तावडीत सापडतात , ती त्यांना जाळून मारण्याची सुपारी आकाशला देते. प्रत्यक्षात आकाश दुर्गाला सामील असतो. आकाशच्या मदतीने दुर्गा त्या दोघांना आगीतून वाचवते.

दुर्गाला कॅन्सर इन्स्टिट्यूट उघडायचे असल्याने शौर्यची मोठी काकू स्वतःची जमीन देते. ह्या काकूचा मुलगा देव नित्याचा बेस्ट फ्रेंड असतो. त्याला पायल आणि नित्याचे काय झाले हे कळलेले नसते म्हणून त्यांचा शोध घेण्यासाठी तो परत आला आहे. नित्याचा मात्र देववर राग आहे कारण त्याने पायल प्रकरणात गोयंकांची बाजू घेत असल्याचा मेल तिला केला होता. ( हा मेल बहुतेक साक्षीनेच पाठवायची व्यवस्था केलेली असते. )

राजनाथ आणि साक्षीची बेस्ट फ्रेंड रायमा ह्यांचे अफेअर आहे. रायमाचा डिव्होर्स झालेला आहे. शौर्यला स्वतःच्या वडिलांचे हे गुपित कळले असल्याने तो ब्लॅकमेल करतो आहे आणि दुर्गाशी लग्न करण्यासाठी डॉ. ठाकूरचे मन वळवण्यासाठी राजनाथला भरीस पाडतो आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दक्षिणा,
पायल्चा वाढदिवस असतो.
पायल ला ज्या तर्‍हेचा केक आवडत असतो त्या केक ची ऑर्डर द्यायला देव केक शॉप मधे जातो, तेव्हा अशाच केकची ऑर्डर आत्ताच अजुन एका ग्राहकाने दिलीये असं त्याला कळतं. आणि तो दुर्गाला केक घेउन जाताना पाहतो.

त्यामुळे दुर्गाला पायल्बद्दल नक्कीच काहितरी माहित आहे असा देवला संशय येतो. तो तिचा पाठलाग करतो पण ती त्याला चुकवुन निघुन जाते.

नंतर तो तिच्या घरी जाऊन तिला पायल कूठे आहे म्हणून विचारतो..

आता ती देव घरी येऊन गेल्याचं सांगून शौर्यला भडकवणार आहे. आणि देव अजुनही सत्य खोदुन काढायच्या मार्गावर आहे हे पाहुन शौर्य त्याला धमकी देणार आहे..

देवने आधीच भडकावलं आहे शौर्यला... दुर्गाचा नंबर मागून.
दुर्गाचा नंबर याला कशाला हवाय म्हणून शौर्य आपल्या इवल्याशा मेंदूवर ताण देतोय.

सध्या साक्षी गोयंकांचं दर्शन अभावाने होत असल्याने मालिका नीरस वाटतेय १-२ एपिसोड्स Happy

परवाचा भाग काहीतरीच.. असं कोणी इतक्या सहजपणे हॉटेल रूम चेक करू शकतं का? बाकी हॉटेल चा स्टाफ, आजूबाजुला कोणीच नाही.?

हो, तरी मला वाटतंय, तिला आधीच कल्पना असावी त्याबद्दल. एकदा ती राजनाथला म्हणाली होती, तुम्हारे राज सिर्फ मैं जानती हूं...
उद्या दुर्गाच गांगुलीला expose करेल पार्टीत..

पण साक्षी ते राज योग्य वेळ आल्यावर वापरेल. आधी रायमाकडून काम करून घेऊन मग तिच्या ढुवर लाथ मारेल.

रायमा साक्षीसाठी का महत्वाची आहे? त्या दोघी नुसत्याच बेस्ट फ्रेंड्स दाखवल्यात असे वाटले मला. आधी रायमाचा साक्षीसाठीचा ईंपॉर्ट्न्स दाखवला असेल तर मी मिस केले बहुतेक.

आधी रायमाकडून काम करून घेऊन...... +१

अजुन एक एंट्री बाकी आहे दुर्गाच्या मित्राची.. तो आल्यावर प्रेमाचा त्रिकोण होतोय का चौकोन ते पाहायला हवं. बदला सोडून भलतीकडेच वळायची स्टोरी.

दक्षिणा, अमेरिकेतुन येणार आहे तो. तो खरंच मित्र आहे क छुपा शत्रू आहे ते नंतर कळेलच.
-------------------------------------------------------------------------------------------

हा धागा वाहता करायचा का? आपण नाहीतरी ठराविक लोकच येतो इथे, त्यामुळे फार काही पोस्टी वाहून जाणार नाहीत.

अमेरिकेतून किती लोक यायचेत... Proud
हो ना, पुरेशी लोकं जमा झालियेत आता बदला घ्यायला. आणि देव, मेन हीरो आहेच तिला मदत करायला.

आता हा येऊन काय करणारे काय माहित? वरवर मैत्रीचा दिखावा आणि प्रत्यक्षात शत्रू असेल असं मला वाटतंय.
कारण गोयंकांच्या बाजूने कोणी हवं ना. दुर्गाला आकाश आणि देव दोघंही आहेत.

किति लोक उगाच गोळा होतायेत.हे काय नवीन प्रकरण.परत नवि एन्ट्री ??

दुर्ग ल मदत करायल कित्त लोक आहेत.... हि तिचिच स्टाइल शिकल आह मि.जस ति तिचा बाबांना म्हणत असते 'नहि बा...ब्,हुम ऐसा नहि करेंग'...

दुर्गाचे सगळे प्लॅन अगदी सहज तडीस जात आहेत नाही का? ती साक्षी पण कधीतरी वरचढ झालेली दाखवलेली पाहिजे ना? नेहमी हिरॉईनचा विजय कसा होऊ शकतो?

दुर्गाचे सगळे प्लॅन अगदी सहज तडीस जात आहेत नाही का... +१
काल मात्र गांगुलीला त्याच्या मुलीकडूनच expose करायचा प्लॅन फसला...

हा शेखर आल्यावर दाखवतील बहुतेक दुर्गाचे प्लॅन फेल गेलेले.

आज दाखवणार... दुर्गा सीडी चेंज करत असताना तिला रंगे हाथ पकडणार... सिमॉन असुदे रे देवा..
( मला यात हिरवीणीपेक्षा व्हिलन/व्हॅम्पने बाजी पलटावी असं का वाटतेय??? ) दुसर्‍या कोणालापण वाटतेय का असं??

आज सिमॉन नसणार ती.
पण तिच्याच जोरावर जगतायत शौर्य आणि राज. नाहीतर दुर्गाने दोघांना कधीच गुंडाळल असतं. पण ती नवर्‍याला सारखी अशी दुर का ढकलत असते. तो पण नाटकच करतोय, तरी. तो जरा प्रेमने बोलायला लागला की हिला लगेच शंका येते, टेंशन होने लगती है..?
अगदी खिळवुन नाही ठेवत ही सिरियल तरी मला आवडतीये.

कटला एकदाची गांगुलीचा पत्ता.. असा काय रडत होता जसा याला खरंच पश्चाताप झालाय, हे उघडकीला आलं नसतं तर चालूच राहीले असते ना त्याचे उद्योग...

रायमाला कय दुसरं कोणी नाही का गोयंकाज सोडून? प्रत्येक ठिकाणी ती ह्याच लोकांबरोबर..

सध्या काय सुरूये? सकाळी लौकर ऑफीसला जाऊन उशीरा येण होतयं, त्यामुळे बघता येत नाही सीरियल, ना रिपीट टेलिकास्ट.. कोणीतरी अपडेट्स द्या ना..

मीनाक्षी, cancer project वर चीफ आर्किटेक्ट म्हणून शौर्यच्या जागी आता देवला नेमलंय. त्यामुळे अर्थातच शौर्य चिडलेला आहे.
दुर्गा नित्याची डायरी देवला देणार आहे. ती देवच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतिये शौर्यला जेलस करण्यासाठी.

Pages