एक हसीना थी

Submitted by संपदा on 3 June, 2014 - 06:12

स्टार प्लस वरील नवीन मालिका " एक हसीना थी " बद्दल चर्चा करण्यासाठी नवीन धागा.

पात्र परिचय -
दुर्गा ठाकूर ( पूर्वाश्रमीची नित्या ) - संजीदा शेख.
साक्षी गोयंका - सिमॉन सिंग.
राजनाथ गोयंका - अयूब खान.
शौर्य गोयंका - वत्सल सेठ.

कथा -
नित्या आणि पायल ह्या राजनाथ गोयंकाच्या ड्रायव्हरच्या मुली असतात. पायल शौर्यने तिच्यावर केलेल्या अत्याचाराविरुद्ध कोर्टात जाते मात्र साक्षी गोयंका ( शौर्यची आई ) पायलला खोटे ठरवून केस जिंकते. पायलला हा धक्का सहन न झाल्याने तिचे मानसिक संतुलन बिघडते. नित्या शौर्यला ह्या कृत्याचा जाब विचारायचा प्रयत्न करते पण तो तिला गुंडांकरवी मारण्याचा प्रयत्न करतो. गुंडांपासून स्वतःचा जीव वाचवायला पळत असताना ती डॉ. ठाकूरच्या गाडीवर आपटून बेशुद्ध होते. डॉ.ठाकूर तिचा जीव वाचवतात व प्लॅस्टिक सर्जरी करून तिला दुर्गा हे नांव देतात.

दुर्गा कलकत्त्यात परत येऊन गोयंकांचा सूड घेण्यासाठी आधी गोयंकांशी ओळख करून घेते. साक्षी मात्र तिला बघून नेहमी अस्वस्थ होत असते पण राजनाथ गोयंका आणि शौर्य ह्यांना दुर्गा निरूपद्रवी असल्याचे वाटत असते. दुर्गा मात्र पोलिस कमिशनर आणि माथूर ( गोयंकांचा सी.ई.ओ ) ह्यांना आपल्या मार्गातून दूर करते.

शौर्यला दुर्गाशी ओळख वाढवायची असते पण दुर्गा त्याला अजिबात दाद देत नाही. म्हणून शौर्य दुर्गाबरोबर विविध एन.जी.ओ. मध्ये जाऊन तिला मदत करतो. दुर्गा शौर्यची ओळख बागचीशी करून देते. बागची व त्याची मुलगी दिव्या हे पायल केसमधले साक्षीदार असतात. दुर्गाला ईंप्रेस करण्यासाठी शौर्य बागचीच्या डोळ्याचे ऑपरेशन स्वतःच्या पैशाने करून घेतो. बागचीला परत दिसायला लागते पण साक्षीच्या भीतीने तो सत्य परिस्थिती लपवून ठेवतो. दिव्या आणि बागची साक्षीच्या तावडीत सापडतात , ती त्यांना जाळून मारण्याची सुपारी आकाशला देते. प्रत्यक्षात आकाश दुर्गाला सामील असतो. आकाशच्या मदतीने दुर्गा त्या दोघांना आगीतून वाचवते.

दुर्गाला कॅन्सर इन्स्टिट्यूट उघडायचे असल्याने शौर्यची मोठी काकू स्वतःची जमीन देते. ह्या काकूचा मुलगा देव नित्याचा बेस्ट फ्रेंड असतो. त्याला पायल आणि नित्याचे काय झाले हे कळलेले नसते म्हणून त्यांचा शोध घेण्यासाठी तो परत आला आहे. नित्याचा मात्र देववर राग आहे कारण त्याने पायल प्रकरणात गोयंकांची बाजू घेत असल्याचा मेल तिला केला होता. ( हा मेल बहुतेक साक्षीनेच पाठवायची व्यवस्था केलेली असते. )

राजनाथ आणि साक्षीची बेस्ट फ्रेंड रायमा ह्यांचे अफेअर आहे. रायमाचा डिव्होर्स झालेला आहे. शौर्यला स्वतःच्या वडिलांचे हे गुपित कळले असल्याने तो ब्लॅकमेल करतो आहे आणि दुर्गाशी लग्न करण्यासाठी डॉ. ठाकूरचे मन वळवण्यासाठी राजनाथला भरीस पाडतो आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

थँक्यू चैत्राली Happy पण नित्याची डायरी तिच्याकडे कशी, या देवच्या प्रश्नावर तिच काय स्पष्टीकरण असेल?

मी पाहतेय.
देव गोएंका नित्याच्या शोधात आहे, त्याने बलात्काराच्या खटल्याची फाईल अधिक अभ्यासासाठी मागवली, दुर्गा देवला जास्ती फुटेज देते त्यामुळे शौर्य इन्सिक्युअर होतो. हातची दुर्गा गेली तर ह्या भितीपोटी तो देव ला मारण्याचा कट रचतो. तो फसतो. शरद गोएंका दुर्गाबद्दल माहिती काढतो, तिची सर्जरी झाली आहे आणि ती यूएसच्या कुठल्यातरी दवाखान्यात झाली आहे हे माहिती होते तिथला डॉ मात्र कोणतीही माहिती देण्यास नकार देतो. त्याने माहिती देऊ नये असं बाबा ठाकूर ने त्याला सांगितलेलें असतं. दुर्गा शरद ला काल भेटून सांगते की ती खरी दुर्गा ठाकूर नाही.

शरद नाही शेखर मेहरा Happy .

खर्‍या दुर्गाने बहुतेक आत्महत्या केली असावी किंवा तिचा अ‍ॅक्सिडंटमध्ये मृत्यू झाला असावा. कारण मागे एकदा डॉ. ठाकूर नित्या ऊर्फ दुर्गाला सांगत असतो की त्या दोघांचे भांडण झाले होते आणि त्याला सॉरी म्हणण्याचा अवसर न देताच दुर्गा गेली.

अरे हा धागा बंद का पडला?
आजकाल बर्‍यापैकी नियमितपणे ही मालिका बघितली जातेय.
लवकरच संपेल बहुतेक. बरेच ट्विस्ट येऊन गेले मध्यंतरी.
दुर्गाची शेवटची चाल काय असेल याची उत्सुकता आहे.
सध्या तरी साक्षी, शौर्य आणि राजनाथचे पारडे जड आहे.

सध्या फारच फास्ट सुरू आहे ही सिरियल. चाल पे चाल.
शौर्या गोएंका च्या मृत्यूचा फार्स आणि काल त्याने लग्गेच न्युझिलंड ला जाण्या अगोदर आकाश आणि ऋषी ला मारलं सुद्धा. बहुतेक त्याचं हेच कृत्य त्याला गोत्यात आणणार.

त्याने लग्गेच न्युझिलंड ला जाण्या अगोदर आकाश आणि ऋषी ला मारलं सुद्धा.>> हे मिसलं!!
अक्रम रेहमत खान चं सिक्रेट साक्षीला कळालंच नाही वाटते!
पायल कुठे गेली?

शौर्य ने मारलं आकाशला... किती कनिंग दाखवली आहे ती. पण काम छानच केलंय तिने.
आता सिरियल पळवतायत असं वाटतंय.
पैशाच्या जोरावर लोक वाट्टेल ते करू शकतात. शौर्या गोयंका ची बॉडी कोणीच कसं पहात नाही? खूप पैसे असले तरिही इतक्या लोकांना कसं मॅनेज करू शकते ती? आणि अती म्हणजे जो मेलाय त्याला एकट्यालाच गाडी हातात देऊन एअरपोर्टला पाठवलंय. हे अतिच ना? सोडायला जात नाहे? ही कसली आई?

Udya last episode ahe bahutek karan monday ८ chya slot LA navin malika suru hotey

मला वाटतं आकाश आणि शौर्याचा तो मित्र मेले नाहीत, ते एक नाटक आहे. दुर्गा आणि देवला माहीत असावं शौर्य मेला नाहीये आणि ही त्यांची चाल असावी त्याच्या कडून त्याचे पाप वदवून घ्यायची.

बस आता काही मिनिट आणखीन... आता खरंच धीर निघत नाहीये. मस्त मालिका होती ही.

आकाश आणि ऋषी दोघेही सुखरूप आहेत.
चला उद्या सीरियलचा शेवटचा भाग. हैप्पी एन्डिंग असुदेत म्हणजे झाल!

नक्की संपली का? शेवटी परत शौर्य चा कॉल आल्यासारखा दाखवलाय.. सिझन २ येतोय का?
शेवट फारच पळवला.. पटकन न्यायही मिळाला, लगेच साक्षीच्या डोक्यावर परिणामही झाला..!!

आणि आकाश हाच अक्रम असणं केव्हडं सरप्राईज होतं.. ते ही किती साधी गोष्ट असल्यासारखं सांगितलं..

स्टार प्लसच्या शेड्युलमध्ये आज रात्री ८ वा. "तू मेरा हिरो" ही नवीन सिरियल दिसते आहे, म्हणजे 'एक हसीना थी' संपली.

Pages