एक हसीना थी

Submitted by संपदा on 3 June, 2014 - 06:12

स्टार प्लस वरील नवीन मालिका " एक हसीना थी " बद्दल चर्चा करण्यासाठी नवीन धागा.

पात्र परिचय -
दुर्गा ठाकूर ( पूर्वाश्रमीची नित्या ) - संजीदा शेख.
साक्षी गोयंका - सिमॉन सिंग.
राजनाथ गोयंका - अयूब खान.
शौर्य गोयंका - वत्सल सेठ.

कथा -
नित्या आणि पायल ह्या राजनाथ गोयंकाच्या ड्रायव्हरच्या मुली असतात. पायल शौर्यने तिच्यावर केलेल्या अत्याचाराविरुद्ध कोर्टात जाते मात्र साक्षी गोयंका ( शौर्यची आई ) पायलला खोटे ठरवून केस जिंकते. पायलला हा धक्का सहन न झाल्याने तिचे मानसिक संतुलन बिघडते. नित्या शौर्यला ह्या कृत्याचा जाब विचारायचा प्रयत्न करते पण तो तिला गुंडांकरवी मारण्याचा प्रयत्न करतो. गुंडांपासून स्वतःचा जीव वाचवायला पळत असताना ती डॉ. ठाकूरच्या गाडीवर आपटून बेशुद्ध होते. डॉ.ठाकूर तिचा जीव वाचवतात व प्लॅस्टिक सर्जरी करून तिला दुर्गा हे नांव देतात.

दुर्गा कलकत्त्यात परत येऊन गोयंकांचा सूड घेण्यासाठी आधी गोयंकांशी ओळख करून घेते. साक्षी मात्र तिला बघून नेहमी अस्वस्थ होत असते पण राजनाथ गोयंका आणि शौर्य ह्यांना दुर्गा निरूपद्रवी असल्याचे वाटत असते. दुर्गा मात्र पोलिस कमिशनर आणि माथूर ( गोयंकांचा सी.ई.ओ ) ह्यांना आपल्या मार्गातून दूर करते.

शौर्यला दुर्गाशी ओळख वाढवायची असते पण दुर्गा त्याला अजिबात दाद देत नाही. म्हणून शौर्य दुर्गाबरोबर विविध एन.जी.ओ. मध्ये जाऊन तिला मदत करतो. दुर्गा शौर्यची ओळख बागचीशी करून देते. बागची व त्याची मुलगी दिव्या हे पायल केसमधले साक्षीदार असतात. दुर्गाला ईंप्रेस करण्यासाठी शौर्य बागचीच्या डोळ्याचे ऑपरेशन स्वतःच्या पैशाने करून घेतो. बागचीला परत दिसायला लागते पण साक्षीच्या भीतीने तो सत्य परिस्थिती लपवून ठेवतो. दिव्या आणि बागची साक्षीच्या तावडीत सापडतात , ती त्यांना जाळून मारण्याची सुपारी आकाशला देते. प्रत्यक्षात आकाश दुर्गाला सामील असतो. आकाशच्या मदतीने दुर्गा त्या दोघांना आगीतून वाचवते.

दुर्गाला कॅन्सर इन्स्टिट्यूट उघडायचे असल्याने शौर्यची मोठी काकू स्वतःची जमीन देते. ह्या काकूचा मुलगा देव नित्याचा बेस्ट फ्रेंड असतो. त्याला पायल आणि नित्याचे काय झाले हे कळलेले नसते म्हणून त्यांचा शोध घेण्यासाठी तो परत आला आहे. नित्याचा मात्र देववर राग आहे कारण त्याने पायल प्रकरणात गोयंकांची बाजू घेत असल्याचा मेल तिला केला होता. ( हा मेल बहुतेक साक्षीनेच पाठवायची व्यवस्था केलेली असते. )

राजनाथ आणि साक्षीची बेस्ट फ्रेंड रायमा ह्यांचे अफेअर आहे. रायमाचा डिव्होर्स झालेला आहे. शौर्यला स्वतःच्या वडिलांचे हे गुपित कळले असल्याने तो ब्लॅकमेल करतो आहे आणि दुर्गाशी लग्न करण्यासाठी डॉ. ठाकूरचे मन वळवण्यासाठी राजनाथला भरीस पाडतो आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेश तो सिनेमा एक हसिना थी च. पण कथानक वेगळं होतं जरा त्याचं.

असो कालच्या भागातली एक चूक लक्षात आली का कुणाच्या? साक्षी गोएंका रायमाशी बोलताना राजनाथने शौर्य ला चिफ आर्किटेक्ट कसं काय बनवलं याबद्दल आश्चर्य व्यक्त करताना म्हणते की राजनाथ अपनी प्रोफेशनल लाईफ कभी अपने बिझनेस के बिच नही आने देता. इथे पर्सनल लाईफ हवं होतं ना? Uhoh

दक्षे, सेम हियर. मला पण हेच ऐकायला आलेलं पण लेक म्हणाली की अग ती पर्सनलच म्हणाली असेल तुला अस काहीही ऐकायला येत. :अरेरे;

नाही शुके ती प्रोफेशनलच म्हणाली.

बाय द वे आकाश स्वतः मरायला का गेला त्या गांगुलीच्या घरी? आणि सगळे एसी एकदमच खराब झाले का? Uhoh

असो कालच्या भागातली एक चूक लक्षात आली का कुणाच्या? साक्षी गोएंका रायमाशी बोलताना राजनाथने शौर्य ला चिफ आर्किटेक्ट कसं काय बनवलं याबद्दल आश्चर्य व्यक्त करताना म्हणते की राजनाथ अपनी प्रोफेशनल लाईफ कभी अपने बिझनेस के बिच नही आने देता. इथे पर्सनल लाईफ हवं होतं ना? अ ओ, आता काय करायचं>>>> हो हो...प्रोफेशनल असच म्हणालि ति....

त्याने अ.सि. खराब केले असतील आधिच म्हणूनच शिरलाय तो घरात

कॉलेजचा चँसेलर शौर्यला मत विचारतोय, मुलीला पुढील शिक्षणासाठी कुठे पाठवू? Uhoh
देवा, तुला त्याची बाजू घेण्याचे पैसे मिळत असतील पण खरं काय ते तुला माहीत आहे ना? अशा मुलाकडे तू स्वत:च्या मुलीला पाठव्णार?

मी नक्की बघेन! पण या नावातला 'एक' हा शब्द एक था टायगर या सिनेमाच्या नावात वापरला होता ना?
आणि मुळात हसिना हे तर बांगलादेशच्या पंतप्रधानांचे नाव आहे ना?

मला एक प्रश्न पडलाय. गांगुलीच्या घरात आकाश एसीवाला बनून येतो, पण मूळात कुठेतरी कंप्लेंट केली गेली असली पाहिजे ना? ती नक्की कुणी केली? तपशीलात घोळ होऊ नये म्हणून आकाश कुणाला तरी बाहेर येऊन फोन करून कंप्लेंट कॅन्सल करा म्हणतो... पण ते कशाला दाखवलंय? Uhoh

कंप्लेंट कुणी केली होती, ते आकाशला कसं कळलं हे दाखवलच नाही.
डायरेक्ट आकाश ती कँसल करतानाच दाखवलाय.
आकाशने फोन करून ती कँसल केली ते त्या कंप्लेंट ऑफीस मधला माणूस इथे येऊ नये दुरुस्तीला म्हणून. नाहीतर लगेच संशय आला असता की मगाशी येऊन गेलेला कोण?

आगाउ Happy
एसी बिघडल्याची कम्प्लेन्ट कधी कुणी केली वगैरे डीटेल्स नाही दाखवले तेच बर केलं , पेस कमी होते कथेची फार जास्त डीटेल्स दाखवल्याने. काही कही ठिकाणी दुर्लक्ष करायचं Happy

आणि आकाश बोलताना दाखवलाय दुर्गाला की या जोखमीच्या कामात जितकी कमी माणसे इन्वॉल्व्ह होतील तितके विश्वासाच्या दृष्टीने चांगले. शौर्य ओळखतो त्याला... म्हणजे कही देखा है... पण कुठे ते नाही आठवत.

रिव्हेंज डिटेल्सच्या बाबतीत जास्त उजवी वाटतेय... पण हीसुद्धा ठीक वाटतेय आतातरी.

देव अगदीच मिळमिळीत पात्र घेतलाय अ‍ॅक्टरही आणि पात्रही!!

सिमॉन मात्र आवडली यातली.... थंड राहून कावेबाजपणा करण्याचा बाज मस्त आणलाय. दिसतेही छान. साड्या आणि सेट्स मस्तच तिचे. रायमाला मधून मधून टोचन देतेय ती.. रायमा आणि राजनाथचं प्रक्रण कळेल तेव्हा (किंवा समजलेय पण त्याचा वापर करण्यासाठी) ती कुठला हुकुमाचा एक्का काढतेय ते पाहायचंय.

दुर्गा काही ठिकाणी ओव्हर कॉन्फीडंट दाखवलेय. साक्षीसारखी थंड आणि कावेबाज दाखवली असती तर चुरशीचा सामना होता.

चला सगळ्यांच सिमॉन बाबत एकमत आहे तर Happy

आज दाखवलय ना तो गांगुली कुणा पोरीशी फ्लर्ट करत असतो हे दुर्गा त्या सीसीटीव्ही फुटेज मधे बघतेय. आणि आता नंबर गांगुलीचा.

मला साक्षी काहीतरी बेरकीपणा करताना आणि चाल जिंकताना बघायला आवडेल. तशी तिने देवला या प्रकरणातुन बाजुला काढण्यात बाजी मारलिये पण तो एक छोटा विजय आहे.

त्या आगीतून बागची आणि दिव्या वाचली का? का काहीच दाखवलं नाही. >>> हो अन्जू... दुर्गा त्यांना वाचवायला जाते आणि आकाशही तिला मदत करतो. मग ते दोघे बागची आणि दिव्या यांना ठाकूरांच्या हॉस्पिटलमध्ये आणतात. तेव्हाच तर आकाश दुर्गाच्या बाजूने असल्याचे समजते.

दुर्गा काही ठिकाणी ओव्हर कॉन्फीडंट दाखवलेय. साक्षीसारखी थंड आणि कावेबाज दाखवली असती तर चुरशीचा सामना होता.< रीव्हेन्जमधली मुलगी तशी होती. तिथली व्हिलन पण काय कमी नव्हती. सिमॉन अधेमधे तिची कॉपी मारते.

पण अगदी "ओ" येईल इथवर गोड वागणार्‍या सुनांपेक्षा आणि आचरटपणा करणार्‍या मालिकांपेक्षा बरी आहे. थोडी अजून फास्ट पेसने स्टोरी गेली तर मजा येईल.

नंदिनी मम
हे फ्लॅशबॅकचे प्रकरण किती एपिसोड चालणार काय माहित. दुर्गा जशी पुर्ण तयारीनिशी आलिये बदला घ्यायला तसे देवच्या बाबतीत कुठे काही जाणवत नाही. तो आलाय नित्या आणि पायलच्या केस मधली सत्यता पडताळायला पण काहीच तयारी कशी नसावी त्याची. अगदी माहिती अधिकाराखाली केसचे डिटेल्स मिळतील हे पण त्याच्या मित्राचीच मैत्रिण सांगतेय. असो.

आणि हे प्रकरण चालू होतं तेव्हा त्याला येऊ दिलं नाही, तरीही त्यानंतर त्याने २ वर्ष का बरं लावली परत यायला?

पण अगदी "ओ" येईल इथवर गोड वागणार्‍या सुनांपेक्षा आणि आचरटपणा करणार्‍या मालिकांपेक्षा बरी आहे.>> नक्कीच Happy

थोडी अजून फास्ट पेसने स्टोरी गेली तर मजा येईल.>> सहमत

हा देव ठार वेडा आहे. जेव्हा त्याची गरज होती तेव्हा आला नाही. आता गावाच्या मागनं आलाय कबरी खोदायला.

शुभे रात्री ११.३०वाजताच मी कधी कधी बघते, पण थोडाच वेळ. काहीना काही कामे चालूच असतात. आता दुपारी २ वाजता बघेन.

Pages