अमेरिकेतील (Boston javal)१ महिना वास्तव्यात आपले आपण हिंडू-फिरु शकू अश्या जागा कोणत्या?

Submitted by मेधावि on 27 May, 2014 - 22:14

मी पहिल्यांदाच अमेरिकेला जाणार आहे. बोस्टनच्या जवळ नातेवाईकांचे घर आहे. तिथे गेल्यावर तिथे फिरण्यासाठी अमेरिकेतील नातेवाईक आहेत परंतु ते फक्त विकांतालाच बरोबर येउ शकतील. अमेरिकेतील १ महिन्याच्या वास्तव्यात विकांताख्रेरिजच्या दिवसांत मी व माझी २० वर्षाची मुलगी आपले आपण हिंडू-फिरु शकू अश्या जागा कोणत्या आहेत त्याबद्दल कोणी मार्गदर्शन करू शकेल का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बॉस्टनहून ट्रेनने अथवा बसने जाऊन तुम्ही न्यु यॉर्क सिटी, वॉशिंगटन डिसी, मोहेगन कसिनो, नायगरा फॉल्स, अटलांटिक सिटी इ. ठिकाणं बघू शकता. पॅकेज टुअर्स पण असतात बहुतेक. काही माहिती मिळाल्यास सांगेन.

लास व्हेगसला गाडीची गरज पडत नाही. तो सगळा भाग चालत बघण्याचाच आहे. शिवाय तिथून हूवर डॅम आणि ग्रँड कॅनियनसाठी गाईडेड बस टूर्स मिळतात. मुलगी मोठी आहे त्यामुळे लास व्हेगस करायला काहीच हरकत नाही Happy
सोमवार ते शुक्रवारमध्ये खूप चांगले डील मिळेल.

तसेच आवडणार असेल तर ओरलँडो, फ्लोरिडा येथील डिस्ने वर्ल्डच्या थीम पार्क्स बघण्यासाठी सोमवार ते शुक्रवारमध्ये चांगले डील मिळेल. एकेका थीम पार्कला एक दिवस लागतो त्यामुळे चार दिवसांची ट्रिप करुन निवडक बघाव्यात ( लहान मुलांच्या मॅजिक किंगडम सारख्या सोडाव्या, एपकॉट सारख्या मोठ्यांच्या कराव्या. )

ह्या दोन्ही ठिकाणी बॉस्टनहून विमानाने जावे लागेल पण एअरपोर्ट पिक अप आणि ड्रॉप हॉटेलतर्फे मिळतो.

Thanks Ago and Sayo..viman valya nako....javalachya distance valya barya hotel. mhanaje sakali jaun sadhyakali parat ashya...baki sagale jan off la gele ki jaun mag ratri ghari parat Happy

माझ्याकडे न्यू-जर्सीला आलेले काही भारतीय मित्र आत्ता नायगारा, वॉशिंग्टन , फिलाडेल्फिया अशी सहल करायला गेले आहेत. चिनी लोकांच्या बस असतात... तुम्हा दोघाना बॉस्टन्हून अशी सहल घेता येईल..
नेटवर शोधून बघा..

http://www.tours4fun.com/

सुमेधाव्ही विमान नकोचं तुमचं वेगळंकारण असू शकेल. ही दोन पैशाची माहिती कदाचित कुणाला उपयोगी पडेल, आजकाल देशातले एजंट असं वेगवेगळ्या जागी हॉप करायचं तिकिट सुरुवातीलाच बुक करतात तेव्हा केलं की तिकिटाचा खर्च इक्डे आल्यावर वेगळी तिकिटं काढल्यास होईल त्यापेक्षा अगदीच नगण्य किमतीत करून देतात. इच्च्छुकांनी जरूर लाभ घ्यावा असं डील असतं. अशावेळी न्युयॉर्क, वेगस इ. पायी / पब्लिक ट्रान्स्पोर्टने फिरण्याजोगी शहरं पाह्ता येतील.

तुम्हालाप प्रवासासाठी शुभेच्छा.

अगो +१ वेगस ची मस्त ट्रिप होइल सोम. ते शुक्र मध्ये
कालच दुसर्‍या कोणत्यातरी धाग्यावर कोणीतरी ही लिंक पण दिली गायडेड टूर्बस ची
http://www.taketours.com/usa/
बॉस्टनमध्ये पण त्या डक टूर/हॉप ऑन/हॉप ऑफ वगैरे असतात ना?

बोस्ट्न जवळ आयलंडस आहेत तिथे फेरीने जाता येते
http://www.bostonharborislands.org/
व्हेल वॉचिंग एक दिवस
मार्थाज व्हिनीयार्ड
एमायटी, हार्वडच्या गायडेड टुर
एमायटी म्युझियम
बोस्ट्न अ‍ॅक्वेरीयम, सायन्स म्युझियम
मनात येईल तेव्हा क्विन्सी मार्केट फिरणे.
चायना टाऊन
बोस्ट्न कॉमन पार्कात फिरणे
आठवड्यातुन दोन गोष्टी केल्या तरी दमाल Happy
एक दिवस ब्रेक एक दिवस फिरणे.
फिरायचा कंटाळा आल्यावर रॅन्थम आउट्लेट मॉलमधे खरेदी Happy
विकेंडला जावयासोबत लांबच्या टुर्स Happy

सकाळी जाऊन संध्याकाळी परत यायचे असे असेल तर ह्या गोष्टी बघता येतात का पाहा.

१. http://www.bostonusa.com/visit/ ह्यात डाऊनटाऊन बॉस्ट्न, फ्रीडम ट्रेल, डक बोट, वगैरे गोष्टी येतील. MIT, Harvard, MFA, Science Museum, Aquarium वगैरे बघता येईल.
२. केप कॉड नि मार्थाज व्हिनीयार्ड
३. व्हेल वॉच टूर्स करता येतील ज्या केप कॉड, बॉस्ट्न, ग्लूस्टर वगैरे जागेवरून निघतात.
http://www.neaq.org/visit_planning/whale_watch/index.php?PHPSESSID=4bbef...
https://www.google.com/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=4&cad=rja&...
४. butterfly garden ला जाता येईल.
५. Maine, NH, RI येथे बरेच बीचेस आहेत पण तिथे जाण्यासाठी तुम्हाला तुमच्या नातेवाईकांची गरज लागेल. बहुतेक ठिकाणी कारर्ने जावे लागते.
६. Newburyport हा भाग बघण्यासारखा आहे. तुम्ही इथे कधी आहात ह्यावर तिथे kite festival, light festival वगैरे बघता येईल.
७. ४ जुलै ला बॉस्टनमधे मोठी परेड असते नि मोठे फायर वर्क्स असते ते बघायला जाऊ शकता. बर्‍याच लोकल टाऊनमधेही कार्निव्हल्स नि फायर वर्क्स असतात.
८. तासाभराच्या drive बरेच थीम पार्क्स नि आऊटलेट मॉल्स आहेत जेथे जाता येईल.

जॉन हँकॉकला जरुर जा; टॉप फ्लोरला स्वातंत्र्य लढ्याचं एक्झिबीट आहे. डाउनटाउन मधे नुस्तं फिरा, बॉस्टन शहराचं स्वःतचं असं वेगळं कॅरेक्टर आहे.

कल्पना नाहि; मी त्या आधी गेलो होतो. वरुन दिसणारा नजारा - एमआयटी, हार्वर्ड कँपस, चार्ल्स रिवर, केंब्रीज/बॉस्टन... अवर्णनीय.

बॉस्टनकर खुलासा करतीलच...

http://www.tours4fun.com/ माझी बहिण गेली होती या टुरने माझ्याकडे आली होती तेव्हा. खूपदा बाय टू गेट वन असतं. वेबसाईटवर पार्टनर पाहिजे अशा जाहिराती असतात (साइन इन केल्यावर). खूप भारतीय जात असल्यामुळे कुणी ना कुणी भेटतं त्यामुळे कमी खर्चात ट्रिप होते.

लास व्हेगस मध्ये सगळ्या कॅसिनो मध्ये २१ वर्षांची अट असेल त्यामुळे २० वर्षांच्या मुलीला घेऊन जाण्यात अर्थ नाही

प्रुडेन्शियल टॉवर मधे टॉप ऑफ द हब जाऊन बॉस्टनचे वरून दर्शन घेता येते. वेळ साधून गेलात तर अतिशय सुंदर सूर्यास्तही बघायला मिळतो.

बॉस्टनचा धावता इतिहास हवा असल्यास डक टूर्स ही करता येतील.

गाडी असल्यास रॉकपोर्ट, पोर्टलंड वगैरे ठिकाणेही अतिशय सुंदर आहेत. अगदी तास दीडतासाच्या अंतरावर आहेत.

आत्ता घाईत आहे पण अधिक माहिती गूगलल्यास मिळेलच.

काही अत्यंत मूलभूत शंका आहेत ज्या पट्टीच्या परदेश प्रवाश्यांना हास्यास्पद वाटतील. तरी धाडस करून इथे लिहिते आहे. जाणकारांनी मार्गदर्शन करावे.
१. लुफ्तान्साच्या वेबसाईटवर ऑन्लाईन विसा अपलोड करावे असे लिहिले आहे. म्हणजे नक्की काय करायचे असते?

२. आमचे विमान (म्हणजे आम्ही) जर्मनीतील फ्रॅकफर्ट ह्या ठिकाणी जवळपास ७-८ तास मुक्काम करणार आहे. तिथे खाणे-पिणे आपले आपण बघायचे असते की ही सोय विमानाच्या प्रवाश्यांन्साठी असते?

३. समजा तिथे पाणी विकत घ्यायचे असेल तर तिथली करन्सी आधीच घेऊन जायची का?

४. इथले मास्टर कार्ड परदेशात चालते का?
५. रोमिंग चार्जेस साधारणपणे किती असतात?
६. मोबाईलवरचा नेट पॅक (रोमिंग नसताना) परदेशात चालतो का?

१. लिंक देऊ शकाल का? विसा विमान कंपनी बोर्डिंग पास देताना बघेल, त्यापूर्वी कुठे अपलोड करायची गरज पडू नये.
२. हो. मुक्कामाच्या ठिकाणी खाणे पिणे तुमचे तुम्हाला करावे लागेल. तुम्ही बरोबर कोरडे पदार्थ ठेवू शकता. पराठे/ ठेपले/ इडली इ.
३. पाणी तिकडे विकत घ्यावे लागेल. fountain (प्यायच्या पाण्याचा छोटा नळ, ज्याच्या खाली मान वाकडी करून पाणी प्यावे लागते) पण असेल चालणार असेल तर. करन्सी हवीच असेल तर Frankfurt विमानतळावर counter असतील तिकडेच करा. फ़क़्त पाणीच हवे असेल तर २-५ USD भारतातून तिकडच्या चलनात नेण्याची गरज नाही. विमानतळावर बहुतेक USD पण घेतील, राहिलेले पैसे त्या चलनात मिळतील.
४. visa/ mastercard कुठेही चालेल. / भारतातील डेबिट कार्डने त्या त्या देशातील चलन ATM मशीन मधून बाहेर येईल. आयत्यावेळी हा बेस्ट उपाय आहे पैसे मिळवण्याचा. (आपलेच पैसे Happy )
५. भरमसाठ असतील. (तुम्ही उसगावात विचारताय का transit ला?) wifi असेल तर skype call स्वस्तात होईल. skype क्रेडिट्स बोइंगो wifi आणि call दोन्हीला कामी येतात.
६. तुम्ही भारतातला pack म्हणताय का? चालू नये.

प्रवासाला शुभेच्छा. Happy

अमेरिकेत स्वतःच्या गाडीशिवाय आपले आपण फिरणे महाग पडते आणि पब्लिक ट्रान्स्पोर्ट फारसा चांगला नसल्याने अवघडही आहे. goto buses ची ईस्ट कोस्ट टूर्स बघा. चायनीज कम्पनी आहे. जास्त चायनीज आणि काही देशी लोक असतात. पण अतिशय स्वस्त आहेत. ४-५ दिवसात पुर्ण ईस्ट कोस्ट फिरवून आण्तील. एव्हधे पैसे खर्च करून अमेरिकेत येणार अहातच तर सगळे ट्रॅव्हल अ‍ॅट्रॅक्शन्स पण बघून होतील.
तुम्ही जी ठीकाणे निवडाल त्याप्रमाणे साधारण ३०० ते ४०० डॉलर प्रत्येकी खर्च येईल.

Deliya..uttam mahiti..thx.
Amitv- khup chan sangitalet. Abhari ahe.

५. भरमसाठ असतील. (तुम्ही उसगावात विचारताय का transit ला?) wifi असेल तर skype call स्वस्तात होईल. skype क्रेडिट्स बोइंगो wifi आणि call दोन्हीला कामी येतात.- transig purate roaming have ahe. bharamsath mhanje kiti asel?
Skype credits mhanaje?
wifi vimantalavar asel ka?

६. तुम्ही भारतातला pack म्हणताय का? चालू नये.

भारतातील व्हिसा/मास्टरकार्ड (क्रेडिट कार्ड) कोठेही चालते का?

चालते असे गृहीत धरून - परकीय चलन वापरून ट्रॅन्झॅक्शन करण्याचा चार्ज सहसा असतो - तो काय आहे चेक करून ठेवा, कारण तो प्रत्येक वापराकरिता असतो.

पाणी सहसा फुकट मिळते. मी फिरलो आहे तेथे तरी होते. पण मी जर्मनीत गेलेलो नाही.

पट्टीच्या परदेश प्रवाश्यांना हास्यास्पद वाटतील >> हास्यास्पद काहीच नाही त्यात :). प्रत्येकाला कधी ना कधी हे प्रश्न पडलेले असतातच.

व्हिसा अपलोड म्हणजे बहुधा फोटो/स्कॅन्ड कॉपी असावी. पण वेबसाईट लुफ्तांसाचीच आहे ना हे कन्फर्म करून व त्यांच्या मुंबईतील नं ला फोन करून असे करावे लागते हे कन्फर्म करून मगच करा.

विमानतळावर wifi असेल. फ्री असेल तर त्यावरून skype call करू शकाल. skype क्रेडिट्स म्हणजे skype वरून फोन वर call करायला लागणारी क्रेडिट्स. जी आधी पैसे भरून घ्यावी लागतील.
खुशालीचाच फोन करायचा असेल तर भारतातील रोमिंग सुद्धा बरं पडू शकेल. २ मिनिटे बोलायला फार पैसे पडू नयेत. पण मला exactly किती महाग असेल नाही माहिती.
wifi फ्री नसेल तर बोइंगो wifi सगळ्या विमानतळावर असते, ज्याची फी क्रेडीट कार्ड ने भरू शकता, किंवा ही skype क्रेडिट्स वापरून पण ते wifi मिळते.
emergency ला रोमिंग चालू करून ठेवा. काही त्रास होत नाही, पण एक मानसिक समाधान मिळणार असं वाटत असेल तर. Happy

मी भारतातील विसा कार्ड हिथ्रो/ अमेरिका/ कॅनडा/ सिंगापूर येथे वापरले आहे.
डेबिट वरून ही पैसे काढले आहेत.
फा, मला वाटतं प्रत्येक ट्रॅन्झॅक्शनचा चार्ज हल्ली नसतो पण २.५% चार्ज असतो. नक्की आठवत नाही माहिती करून घ्या. शिवाय exchange rate बेकार असण्याचे भरपूर चान्सेस. हे फ़क़्त आयत्यावेळी दुसरा मार्ग नाही म्हणूनच म्हणत होतो मी.

fountain (प्यायच्या पाण्याचा छोटा नळ, ज्याच्या खाली मान वाकडी करून पाणी प्यावे लागते) पण असेल चालणार असेल तर. करन्सी हवीच असेल तर Frankfurt विमानतळावर counter असतील तिकडेच करा. फ़क़्त पाणीच हवे असेल तर २-५ USD भारतातून तिकडच्या चलनात नेण्याची गरज नाही. विमानतळावर बहुतेक USD पण घेतील, राहिलेले पैसे त्या चलनात मिळतील.
nalala tond laun pinyapeksha rikami batali neleli paravadali Happy

नळाला तोंड लावावे लागत नाही, लावू पण नये.

व्हिसा अपलोड करणे: मी नुकतेच हे एयर इंडियाच्या साइटवर केले होते. बुकिंग कन्फर्मेशन नंबर आणि नाव इ. माहिती दिली की तुमची आयटनरी स्क्रीनवर येते. तिथे पासपोर्ट, व्हिसा ही माहिती भरण्यासाठी फील्ड्स असतात. पासपोर्ट नंबर, व्हिसा नंबर, इश्यु डेट, कंट्री ऑफ रेसिडन्स, व्हिसा इश्यु झाला तो देश अशी माहिती भरायची असते. व्हिसा पेज स्कॅन करून अपलोड करावे लागत नाही. लुफ्तांझाच्या साइटवर पण अशीच प्रोसिजर असेल असा अंदाज.

व्हिसा/मास्टर कार्डः भारतातले कार्ड अमेरिकेत किंवा युरोपात चालते पण कन्वर्जन आणि प्रोसेसिंग चार्जेसमुळे ते अजिबात परवडत नाही. त्यापेक्षा जवळ थोडे डॉलर्स बाळगलेले बरे.

फोनः इथे अगदी बेसिक फोन्स अक्षरशः $१२ ला मिळतात. सोबत $१० (४० मिनिटं टॉक टाइम) चे क्रेडिट फ्री मिळते. फोटो आयडेंटिटी किंवा क्रेडिट कार्ड न वापरता सुद्धा हे फोन वॉलमार्ट किंवा फोन दुकानांत मिळतात. भारतातला फोन इथे येऊन बापरण्याऐवजी हा फोन कव्हरेज, चार्जेसच्या दृष्टीने बरा पडतो.

फ्रँकफर्ट एयर पोर्टवर बरीच रेस्टॉरंट्स आहेत. तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर घटक नीट बघून घ्या. केबिन लगेजमध्ये कोरडे पराठे/पोळ्या ठेवल्यात तर तिथे शोधाशोध करावी लागणार नाही.

Pages