अमेरिकेतील (Boston javal)१ महिना वास्तव्यात आपले आपण हिंडू-फिरु शकू अश्या जागा कोणत्या?

Submitted by मेधावि on 27 May, 2014 - 22:14

मी पहिल्यांदाच अमेरिकेला जाणार आहे. बोस्टनच्या जवळ नातेवाईकांचे घर आहे. तिथे गेल्यावर तिथे फिरण्यासाठी अमेरिकेतील नातेवाईक आहेत परंतु ते फक्त विकांतालाच बरोबर येउ शकतील. अमेरिकेतील १ महिन्याच्या वास्तव्यात विकांताख्रेरिजच्या दिवसांत मी व माझी २० वर्षाची मुलगी आपले आपण हिंडू-फिरु शकू अश्या जागा कोणत्या आहेत त्याबद्दल कोणी मार्गदर्शन करू शकेल का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खजूर : SFO (उसगाव)
आंबे: टोरोंटो (कॅनडा)
रस्त्याने अमेरिकेला जाताना तर अगदीच भोंगळ कारभार आहे, काहीच विचारात नाहीत. अर्थात जागेजागेवर, माणसांवर अवलंबून पण आहेच पण त्याचा इथे संबंध नाही. मुलगा कार सीटवर बसतो तर काच खाली कर इतकं पण सांगत नाहीत. Happy
https://help.cbp.gov/app/answers/detail/a_id/82/~/travelers-bringing-foo... बऱ्याच गोष्टी दिल्यात चालणाऱ्या. सगळं वाचलं नाहीये.

ह्या गोष्टी असतील तर चालेल आंबे भारतातून. Happy
https://epermits.aphis.usda.gov/manual/index.cfm?action=cirReportP&PERMI...

प्रश्न जर तुमच्या आयुर्वेदिक औषधांचाच असेल तर आणायला काहीही हरकत नाही. पावडरी असतील तर डॉक्टरचं प्रिस्किपशनवगैरे एकत्र चेक-इन मध्ये ठेवा. तुमच्यासाठीच आणताहात आणि तेही औषधे. माझे बाबा आणतात त्यांची काही चूर्ण. जितके दिवस राहणार तितका साठा आणा म्हणजे इकडे शोधाशोध नको.

शेवटी: फळं, बिया न्यायला बंदी नाही, फक्त सांगून सवरून न्या. मी डिक्लेअर करून आंबे अनेक वेळा आणले आहेत. कोणी उघडून सुद्धा पहिले नाहीत. एकदा डिक्लेअर केलं न्हवत आणि पोलिसाने सामान चेक केलं त्यात काहीच न्हवत पण अगदी निघताना आत्याने खजूर दिलेले ते वर टाकलेले. ते दिसले त्याला, विचारलं तर म्हंटलं खजूर आहेत, तर म्हणाला यात सीड आहेत. हसून माफी मागितली तर ठीके म्हणाला.
आणि टेन्शन येणार असेल आणि त्याविना राहणे शक्य असेल तर न आणणे श्रेयस्कर.

असामी | 1 August, 2014 - 11:15
अमितला अनुमोदन. बॉस्टनमधे बहुतेक वेळा अजिबात बघत नाही हा माझा अनुभव आहे.>>>>
>>>>>

माझा अगदी उलटा अनुभव आहे! २०१२ साली आले तेव्हा तादुळ बॅन म्हनून आ.न्बेमोहोर ता.न्दुळ फेकलेले..
घरचे म्हणुन आर्जवाने दिलेले आख्खे तुर पण चालणार नाही म्हटलेले( फेकले नाहीत)
विमानाने अमेरिकेत येणार असाल तर फळ ,बिया आणु नये! कस्टमवाले पिडतात,नियामबाह्य आहेच! (मी आणत नाहीच! मी बोस्टनलाच असते)

चेक इन बॅगेला कुलुप लावावे की नाही? >> TSA अ‍ॅप्रूव्हड लॉक असेल तरच लावा. साधे कुलुप लाउ नका, ते तोडतात आणि बॅगेचेपण नुकसान होउ शकते.

बॅग बाहेरून दोरीने बांधावे की नाही ? >> म्हणजे नक्की काय करणार आहात आणि कशासाठी?

मनीष +१
सुमेधा चेक इन बॅगांमधे काहीही किमती वस्तू, पैसे ठेवू नका. बॅगेलाच जे इनबिल्ट लॉक असते नंबर फिरवून लावायचे ते पण एकदा माझे तोडले होते युरोपात असतांना तेव्हापसून मी बॅगेला कुलुप लावणे बंदच केलेय. खूप काळजी वाटत असेल तर दोरी सारखाच बॅगेला लावायचा इलास्टीकचा पट्टा मिळतो तो पण लावू शकता.
बॅगांना तुमच्या नाव आणि फोन नंबरची चिठी मात्र नक्की लावा. तसेच एखादे स्टीकर, कलरफुल दोरी, रुमाल काहीतरी छोटेसे खूण म्हणून बांधा. नेहमीच्या सवयीच्या बॅगा नसतील तर परत घेतांना चटकन ओळखू येत नाहीत तेव्हा लांबुनही बॅग ओळखायला ही खूण फार उपयोगी पडते.

परदेशाचे फारसे माहित नाही पण चेकइन नंतरच्या फेकाफेकीमधे बॅग उघडू नये म्हणून चेनची बॅग असेल तर चेनचे घोडे एकत्र आले की सरळ त्यांना एका की रिंग मधे अडकवून टाकायचे. म्हणजे सरकले तरी एकत्र सरकतात दोघे आणि चेन उघडत नाही. कस्टम्सवाल्यांना गरज पडल्यास आपल्या मदतीशिवाय उघडता येते. त्यामुळे बॅगेची मोडतोड होत नाही.

दोरीऐवजी बेल्टस लावू शकतेस. बॅगांना वरून लावायचे बेल्टस लक्ष्मीरोडवर दिनशाकडे मिळतात. ते लावच. कारण चेकइन केल्यानंतर आपल्या हातात बॅग येईपर्यंत य वेळा य पद्धतीने फेकाफेक होते बॅगांची. आतमधे सामान घट्ट भरून असेल तर त्या फेकाफेकीत आतल्या प्रेशरने बॅगा उघडू शकतात कधी कधी.

माझ्या १० वर्ष जुन्या अनुभवानुसार असे बेल्ट वा दोरी बांधायला कुठलाच नियम आडकाठी करत नाही. किल्लीचे किंवा नंबराचे कुलुप जे फक्त तुम्हीच उघडू शकता असे असेल तर कस्टमवाले गरजेचे वाटल्यास ते तोडू शकतात.

१० वर्षात परदेश प्रवास केलेला नसल्याने माहिती तेवढी जुनी आहे.

Neeraja, ring chi idea bhari ahe. kulup n lavata ring ch lavin. Bag che belts pan baghin. Runi Manish Neeraja Dhanyavaad.

प्रवासातल्या फेकाफेकीत बॅग उघडू नये म्हणून बाहेरच्या बाजूने बांधावी का काय >> आय होप की तुम्ही पूर्वी ज्या सूटकेसेस वापरायचे त्या घेउन नाही जात आहात. तसे असेल तर बांधा. पण तसली सूटकेस घेउन नका जाउ. चेनवाली चेक्-इन बॅग घेउन जात असाल तर शक्यतो त्या आपोआप उघडल्या जात नाहीत फेकाफेकीत (माझी तरी गेल्या कित्येक प्रवासांमधे (अमेरिका आणि युरोप) उघडली नाहिये आणी मी कोणाकडून ऐकलेही नाहिये.)
तरीपण हल्ली बॅगांना बांधायला बेल्ट मिळतात ती बांधायला हरकत नाही. एखाद्या झँगपँग Wink रंगांची घेतलात तर बॅग ओळखायलाही उपयोग होतो Happy

अ‍ॅनसिन, क्रोसिन, लोमोटील वगैरे अत्यंत जनरल औषधे पर्स मधे १-२ टॅब्लेट्स ठेवल्या तर चालतात का?

अ‍ॅनसिन, क्रोसिन, लोमोटील वगैरे अत्यंत जनरल औषधे पर्स मधे १-२ टॅब्लेट्स ठेवल्या तर चालतात का?
>>> चालतिल!, बॅगा गच्च अजिबात भरू नका, कुलुप लावु नका,

मनीष, माझ्या एका झिपवाल्या बॅगेची मेटल फ्रेम पार वाकलेली आणि हॅण्डल तुटलेलं अशी मिळाली होती मला.

माझी नाही पण काही जणांची बॅग एका बाजूने आ वासायला लागलीये, वस्तू आता सांडतील की मग सांडतील अवस्थेत यायला लागल्यात पण बाहेरून पट्टा/ दोरी लावल्याने वाचलंय अस मनोरम दृश्य एक दोन वेळा तरी पाह्यलंय अ‍ॅटलांटा एअरपोर्टच्या बॅगेज क्लेम मधे.

Pages