लग्न, संसार आणि त्यासंबंधित बदलते संदर्भ

Submitted by निवांत पाटील on 21 May, 2014 - 14:03

काल जवळपास ६ ते ६.३० तास एका तालुक्याच्या छोट्याशा पोलिस स्टेशन मध्ये कामानिमीत्त बसायचा प्रसंग आला. तेवढ्या वेळेत इतक्या अजब गोष्टी पहायला मिळाल्या कि त्या घडतानाच इथे टाकायचे डोक्यात आले. धाग्याचे नाव सुद्धा ठरवले. पती पत्नीतील बदलते नाते. पण त्याच नामसाधर्म्यातला धागा पाहुन तिकडेच टाकावे हा विचार आला पण तिकडे काय हे विषयानुरुप झाले नसते म्हणुन हा धागा. (नमन)

एकुण ४ प्रसंगः
पहिला. अगदी सकाळी सकाळी एक स्त्री लहान मुलीला काखेत घेउन आली. आणि ठाणे अंमलदार पाटी असलेल्या टेबलावर नुकतीच आलेल्या एका महिला पोलिसांकडे माझी नवर्‍याबद्दल तक्रार आहे ती लिहुन घ्या असे विनवु लागली. महिला पोलिसांनी तिला थोडे बसायला सांगितले आणि त्यांची आवरावर सुरु झाली, थोड्या वेळाने त तिचा पती आला. कडेवर असलेल्या मुलीला चुचकारु (एक्झॅक्टली) लागला पण ती लहान मुलगी लगेच रडु लागली. मग अंमलदार महिला पोलिसांनी ( एकवचन आदरार्थी) तिला बोलावले तसे अजुन ४-५ लोक लगेच तेथे आले. कदाचित ते बाहेर अंदाज घेत बसले असतील.

तीने लगेच बोलायला सुरवात केली. हा माझ्यावर प्रचंड संशय घेतो. मारहाण करतो. काल तलवार घेउन मारायला अंगावर आला होता. आम्ही मळ्यात रहातो. जाता येता कुणी पाणी प्यायला मागितले तर त्याचे आणि तुझे संबंध आहेत म्हणुन लगेच भांडण सुरु होते. तोपर्यंत नवर्‍याने बोलाय्ला सुरुवात केली. त्यासरशी अंमलदारांनी जी शिव्यांची लाखोली वाहली बापरे. सगळे परत शांत झाले तशी तिची सासु जी आत आली होती ती बोलु लागली. लगेच अंमल्दारांनी तीला झापले नवरा बायकोंच्या भांडणात तुम्ही पडु नका बाहेर जा म्हणुन सगळ्यांना बाहेर हाकलले.

आता या ५ मिनीटात सगळ्यांना काय चालु आहे याचा अंदाज आला होता आणि आता काय होणार याकडे (माझ्यासकट)सगळ्या ंचे लक्ष लागुन राहिले. पुढची पाच मिनिटे त्या बाईने तिच्यावर कसा अत्याचार होतो हे कथन केले.

मग अंमलदारांनी मोर्चा तिच्या नवर्‍याकडे वळवला. त्याने मुद्दा एका वाक्यात कव्हर केला. कि तिने माहेरुन एक लाल रंगाचे सिम आणले होते. ते सिम घरातल्या मोबाइल मध्ये घालुन ती कोणाशी तरी बोलायची. आणि हि गोष्ट लक्षात आल्यावर तिने ते सिम मोडुन टाकली. मग मला संशयास्पद वाटणार कि नाही?

यावर लगेच्ग त्या बाईने बोलायला सुरवात केली पण अंमलदारांनी तिला गप्प बसवले. आणि नवर्‍याला प्रश्न केला कि तुझ्याकडे मोबाइल आहे का? त्याने होय म्हटल्यावर पुढचा प्रश्न, तु त्यावरुन फोन करतोस का? हो. मग तुझी बायको तुला विचारते का कि तु कुणाशी काय बोलतोस ते? नाही. मग तुझी बायको कुणाशी काय बोलते ते तुला काय कराय्चे? ती जर तुझ्यावर संशय घेत नसेल तर तु कशाला तिच्यावर संशय घेतोस. आता तुम्ही घरी जा आणि व्यवस्थित रहा.

मग त्याची बायको परत बोलु लागली कि माहेरचा फोन घेउ देत नाही. आता भावाचे लग्न झाले पण पाठवुन दिले नाही. याची अगोदरची बायको सोडुन गेली आहे. तिला २ मुले आहेत आणि तिला देखिल हा असाच त्रास देत होता. लगेच नवर्‍याने त्याचा हुकमी एक्का टाकला. हिचा पहिला नवरा विष पिउन मेलाय आम्हाला फसवुन हे लग्न लावुन दिलेय.

आता पर्यंत माझे मत एकदा हिच्या पारड्यात तर कधी त्याच्या पारड्यात पडत होते, याक्षणी मात्र मी त्रयस्थ झालो. त्यानंतर पुरुष पोलिसांनी सुत्रे हाती घेतली . त्यांची वाक्ये काही इथे लिहु शकत नाही पण जाणकारांना अंदाज येइल. हळुहळु बाहेर काढलेले लोक आत येउ लागले आणि जमेल तसा रंग बघुन एखादे वाक्य टाकु लागले. दंगा वाढल्याने तिथुन त्या दोघांना बाहेर दुसर्‍या रुममध्ये घेउन गेले. मग एक एक जण आत येउन अंमलदार बाईंना माहितीची रसद पुरवु लागला. ज्याचे एकत्रित सार :

बायको काही कमी नाही, ती सासुला मारते. चावते. चावलेला व्रण देखिल दाखवला.
नवर्‍याला ५ तोळे सोने हवे. ३ तोल्याची चेन आणि २ तोळ्यांची अंगठी. पण मुलीची आई गवंड्याच्या हाताखाली कामाला जाते, ती कुठुन आणुन देइल? म्हणुन नवर्‍याची मारहाण. इत्यादी इत्यादी.... मुलीच्या माहेरची ४-५ मंडळी आणि मुलाकडची २ आपापसात भांडण कम चर्चा करीत होती.

थोड्या वेळाने ती बाई आली आणि तिने आग्रहच धरला कि कंप्लेंट लिहुन घ्या नाहितर आता घरी गेलो कि तो परत मारेल. पण तिला परत साहेब आल्यावर ये म्हणुन बाहेर बसवले.

(नवरा मेस्त्रीकाम करतो, बायको घरीच असते. बायकोची आई गवंड्याच्या हाताखाली कामाला जाते आणि हे लोक जिथे राहतात तेथुन मुख्य वस्ती जवळपास २ किमी अंतरावर आहे. दोघांचिही हि दुसरी लग्ने आहेत. त्याची बायको वेगळी रहाते २ मुलांना स्वतः वाढवते आणि तिचा नवरा मरण पावला आहे)

दुसरा:
तोपर्यंत दुसरी एक बाई जिचे तोंड पुर्ण सुजले होते ती येउन त्या अंमलदारांच्या जवळ रडु लागली. तिच्या नवर्‍याने तिला खुप मारले होते आणि ती कंप्लेंट द्यायला आली होती. हिची केस सुरु असताना मला फोटोकॉपीसाठी बाहेर जावे लागले त्यामुळे तिचा नेमका काय प्रॉब्लेम आहे हे समजलेच नाही. पण दुपारनंतर तिची केस लिहुन घेतली व तिला जायला सांगितले. तर ती बाहेर पडायला तयार नव्ह्ती. तुम्ही नवर्‍याला पकडुन आणा मग मी जातो असे तीचे मत होते. अंमलदारांनी तीला दवाखान्यात जायला सांगितले. पण तिच्याकडे पैसे नव्हते, ते देखिल द्यायची तयारी दाखवली. तरी ती बाहेर पडायला तयार नव्हती. शेवटी आज आमच्याकडे गाडी नाही आहे. उद्या सकाळी तुझ्या नवर्‍याला धरुन आणतो असे आश्वासन देउन तिला घालवले.

तिसरा:
वय साधारण २१ ते २२. अगदी नविन लग्न झालेली मुलगी आणि तिचे घरचे आले होते. प्रत्येक जण तिला समजुन सांगत होता कि हे सगळे व्यवस्थित होइल आम्ही सांगतो त्याला समजावुन. पण हिचे उत्तर एकच होते. मला त्याचे तोंडही पहायचे नाहिय. अगदी तिथल्या साहेबांच्या तोंडावर देखिल तीने हेच सांगितले कि मी नांदायला जाणार नाही काही झाले तरी. हि मुलगी यायच्या अगोदर मला त्याच कामासाठी बँकेत जावे लागले त्यामुळे तिचा नेमका प्रॉब्लेम समजला नाही.

चौथा: माझे काम अल्मोस्ट होत आले होते. एक म्हातारी बाई साधारणपणे ६० ते ६५ वयाची, एका महिला पोलिसांजवळ येउन आपले गार्‍हाणे मांडत होती. बहुतेक ती तीच्या ओळखिची वाटत होती. तीने सांगितले कि माझ्या नवर्‍याला आणि दिराला आत टाका नाहितर ती लोकं मला मारायची वाटचं बघत बसलेत. मग तिने एकदम हळुहळु तिला प्रॉब्लेम सांगितला. तो काही लक्षात आला नाही पण बहुतेक प्रॉपर्टीचा इश्यु असावा असे वाटले.

हे बघितल्यावर, जर एकाच दिवसांत एवढे लोक इथे येत असतील तर नेमका प्रॉबलेम काय असु शकतो? प्रत्येक केसमध्ये पोलिस समुपदेशकाची भुमिका (अगदी शिवराळ भाषा जरी वापरली तरी) घेत असल्याचे लक्षात आले. पण पहिल्या केसमधील बाईचे शब्द मन अस्वस्थ करुन गेले.
"मला जर त्याने मारुन टाकले तर कुणाला कळणार पण नाही"

मग आठवले ते पेपरला येणार्‍या घटना, हुंडाबळी , संशयावरुन हत्या, छळ, आणि आत्महत्या. आणि अजुन एक गोष्ट्, या बायकांच्यात होती धमक म्हणुन त्या तिथपर्यंत तरी पोहोच्ल्या पण ज्यांच्यात नसते धमक त्या, धमक असते पण समाजातील रुढी परंपरांनी बांधलेले असते त्या, अगदी घरात लहाण बहिन आहे तिचे लग्न जुळावे त्यात आपल्यामुळे प्रॉब्लेम येउ नये असे म्हणुन सहन करणार्‍या, अश्या किती स्त्रिया असतील?

Sad

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निवांत पाटील,

आपण दोघेही एकमेकांना पर्सनली ओळखतोच. आपल्या प्रत्येक भेटीत तुमच्यामधील जागरूक आणि चांगल्या स्वभावाचा व मनमोकळा, गप्पिष्ट माणूस नेहमीच भेटला.

वर तुम्ही दिलेले सर्व तुकडे वेगवेगळे पण एकाच प्रकारच्या नातेसंबंधांनी बांधले गेलेले आहेत, थोडक्यात विवाहबंधनाने! सगळेच जाणतात की विवाहबंधन जितके सुरक्षिततेसाठी आणि सामाजिक स्वास्थ्यासाठी निर्माण झालेले असावे, तितकेच त्याचे रौद्र स्वरूपही वारंवार डोके वर काढतच असते. त्यात तुम्ही होतातच अश्या ठिकाणी जेथे हे भीषण रूपच दिसत राहील.

ही तर वस्तूस्थितीच आहे की अश्या कित्येक स्त्रिया जीव मुठीत धरून नांदत असतील / आहेत. कायदे आहेत, अंमलबजावणीचा प्रश्न आहे, हे वास्तवही आता सर्वज्ञातच आहे. 'डोमेस्टिक व्हायोलेन्स' दिसून आला तर जागरूक नागरिकाने तो रोखण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करावा अश्या अर्थाच्या जाहिरातीही आता जुन्या झाल्या. पण परिस्थिती आहे तशीच आहे.

शेवटी सगळे करून हा प्रश्न स्त्रियांना शिक्षण व आर्थिक स्वातंत्र्य मिळणे ह्यावर येऊन अडकतात. (मागे एकदा मी 'विवाहसंस्थाच मर्यादीत केली तर' असा एक धागा काढला होता व काही सदस्यांच्या सहभागाने त्यावरील चर्चा छान रंगलीही होती). मात्र स्त्रियांना निर्णयस्वातंत्र्य मिळणे हा मुद्दा फारसा कुठे सरफेसवर येताना दिसत नाही. बहुधा त्याचे कारण हे असावे की स्त्रियांना निर्णयस्वातंत्र्य मिळाले तर त्या हाताबाहेर जातील असा एक मूर्ख विश्वास समाजातील काही धुरंधरांना वाटत असावा.

'कोतबो'पुरता हा विषय मर्यादीत नाही आहे खरे तर, पण त्या पलीकडे एक व्यक्ती, एक संघटना फारसे काही करू शकेल असेही नाही आहे.

गेल्या काही महिन्यांपासून मला उगीचच असे वाटू लागले आहे की तंत्रज्ञानातील विकासामुळे हळूहळू अनेक सुधारणा होतील. तांत्रिक विकासामुळे व्यवहारांमध्ये पारदर्शकता व त्यामुळे (फोर्स्ड का असेनात) प्रामाणिकपणा येतो. एखाद्याने नवरा बायको मधील मारहाणीचे प्रसंग चित्रीत केले तर तो नवरा काहीच करू शकणार नाही. तो असा पकडला गेलेला पाहून इतरांना जरब बसेल वगैरे! ही एक फार धूसर आशा आहे पण आहे.

चु भु द्या घ्या

-'बेफिकीर'!

अश्या नात्यांना नाते का म्हणावे? आणी अश्या नवर्यांना शिक्षा होणे ह्यापेक्षाही त्यांना माणसात आणणे महत्वाचे . नाहीतर नुसते शिक्षा होऊन हे चक्र थाबणार नाही . म्हणूनच ते पोलीस तक्रार न घेता समुपदेशन जास्त करत असावेत

मग आठवले ते पेपरला येणार्‍या घटना, हुंडाबळी , संशयावरुन हत्या, छळ, आणि आत्महत्या. आणि अजुन एक गोष्ट्, या बायकांच्यात होती धमक म्हणुन त्या तिथपर्यंत तरी पोहोच्ल्या पण ज्यांच्यात नसते धमक त्या, धमक असते पण समाजातील रुढी परंपरांनी बांधलेले असते त्या, अगदी घरात लहाण बहिन आहे तिचे लग्न जुळावे त्यात आपल्यामुळे प्रॉब्लेम येउ नये असे म्हणुन सहन करणार्‍या, अश्या किती स्त्रिया असतील? >>>

unfortunately, Domestic Violence सगळीकडे घडत असतो....educated class मधेसुद्धा!

unfortunately, Domestic Violence सगळीकडे घडत असतो....educated class मधेसुद्धा! >>>>>> अगदी अगदी. सुशिक्षित आणि सुसंस्कृत असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. sofisticated torture is common in the so called educated group.

बेफिकीर,

>> स्त्रियांना निर्णयस्वातंत्र्य मिळाले तर त्या हाताबाहेर जातील असा एक मूर्ख विश्वास समाजातील काही धुरंधरांना
>> वाटत असावा.

इथे इंग्लंडमध्ये स्त्रीस बरेच निर्णयस्वातंत्र्य आहे. तरीपण घरगुती हिंसा बरीच होते. इतरही अनेक समस्या आहेत.

बाई प्रेमाच्या बदल्यात सत्तेचे हस्तांतरण करू इच्छिते. यास पूरक असे सत्तेच्या बदल्यात प्रेमाचे हस्तांतरण पुरूष करू इच्छित असतो. या पार्श्वभूमीवर सर्वसाधारणपणे बायकांना त्यांचे निर्णय नवऱ्यांनी घेतलेले आवडतात. मात्र मध्ये हिंसाचार आला की सगळं गाडं उलथून पडतं. तर बायकांच्या निर्णयस्वातंत्र्याचा विचार कौटुंबिक हिंसेच्या संदर्भांपुरता मर्यादित ठेवावा का? की सर्वत्र लागू करावा? असा प्रश्न आहे. चर्चेच्या मर्यादा स्पष्ट आखण्यासाठी हा प्रश्न आवश्यक आहे, असं माझं मत.

उर्वरित संदेश पटला. Happy

आ.न.,
-गा.पै.

बेफी. धन्यवाद.
हे सगळे प्रसंग वास्तवातील आहेत. याशिवाय आपण आजुबाजुला कुजबुजत असलेल्या बर्‍याच गोष्टी ऐकत असतो. अगदी इथे पब्लिक फोरम वर देखिल लोक सल्ला मागतात. लग्नासंबंधित. आणि अल्मोस्ट सगळ्या लोकांची याबद्दलची मते दोन्ही साईडने एक्स्ट्रीम पासुन बर्‍यापैकी संयंत तयार झालेली दिसुन येतात.

माझ्या मनात जे प्रश्न राहुन राहुन येतात ते:
लग्न करताना दोघांना नक्कि माहित असते का कि का लग्न करायचे? कि लग्नाचे वय झाले म्हणुन कराय्चे? घरुन फोर्स होतोय म्हणुन टाळत टाळत करायचे? याबद्दल समुपदेश करावे लागेल कि ज्याचा त्याचा चॉइस म्हणुन यात हस्तक्षेप करु नये.?

लग्न केल्यानंतर ( प्रेम विवाह / ठरवुन केलेला विवाह) होउ शकणारे / होणारे बदल. त्याबदलांमुळे बदलणारी परिस्थिती त्याचा आपल्या आयुष्यावर होणारा / होउ शकणारा परिणाम याचे थेट संस्कार लग्न करायच्या अगोदर जर मुलांमुलींवर झाले तर फरक पडेल का? हे स्म्स्कार कसे करता येतील?

कारण या सगळ्या गोष्टी अगदी सेक्युलर आहेत. जात, धर्म, शिक्षण, इकॉनॉमिकल बॅकग्राउंड, समाजातील स्थान याचा बहुतेक ठिकाणी काही फरक पडत नाही. पण अशा डिस्टर्बन्स ची मेजॉरिटी वाढु लागली तर त्याच्या दुरोगामी परिणाम पुढच्या पिढीवर काय होउ शकेल?

याची चर्चा झाली तर त्यातुन काहितरी कन्स्ट्रक्टीव स्केलेटन तयार होउन, हे वाचणार्‍या तसेच त्यांच्या संबंधित लोकांचा काहितरी फायदा होउ शकेल.

चर्चेला विषय चांगला घेतलाय पण ज्यामुळे चर्चा सुरू व्हावी ती उदाहरणे केवळ एकांगी किंवा एकाच प्रकारची आहेत.
किंवा असे म्हणू की आम्हाला रिलेट होता येत नाहीये.
म्हणजे माबोवाचक समाज एक मध्यमवर्गीय , सुशिक्षित समाज समजला तर यात वैवाहिक विसंवाद हा फक्तं मारहाण , संशय, पोलिसांचा हस्तक्षेप या एकाच प्रकारे न होता अनेक वेगवेगळ्या मार्गाने होऊ शकतो.
तुमचा हेतू छान आहे, पण वरची उदाहरणे बदलता येतात का ते पहाल का?

तुमचा हेतू छान आहे, पण वरची उदाहरणे बदलता येतात का ते पहाल का?<<<

साती, तुमची ही अपेक्षा बरोबर वाटली नाही. ज्या घटना पाहून निपांनी हा लेख लिहिला / चर्चाप्रस्ताव मांडला त्या घटनांशी रिलेट न होता येणे हा वाचकांचा प्रश्न आहे. निपांना अभिप्रेत असलेल्या व केंद्रस्थानी असलेल्या मुद्याच्या समर्थनार्थ त्यांनी काल्पनिक / प्रत्यक्ष स्वतः न अनुभवलेले पण त्यांना ज्ञात असलेले असे प्रसंग का लिहावेत?

त्यांनी लिहिलेल्या प्रसंगांच्या अनुषंगाने प्रतिसाददाते आपल्या विचारांमधून विषयाचा अपेक्षित तसा विस्तार करू शकतीलच. उदाहरणार्थ तुम्ही स्वतःच नोंदवल्याप्रमाणे 'वेगवेगळ्या प्रकारांनी होणारा विसंवाद' हा एक प्रकारचा विषयाचा विस्तारच आहे ज्यायोगे तुम्ही खरे तर आपोआपच ह्या धाग्याशी रिलेट झालेला आहात / स्वतःला रिलेट करून घेण्यायोग्य मुद्दा मांडलेला आहेत. Happy

निवांतराव....

प्रत्यक्ष अनुभवलेल्या स्थितीवरून मनी आलेले विचार तुम्ही प्रभावीपणे इथे विचारासाठी मांडले आहेत हे तर उघडच आहे. तुमच्यासमवेत प्रत्यक्ष समोरासमोर बोलणेही झाले असल्याने तुमच्यातील एका लेखकाच्या लेखणीला काही तरी निमित्त मिळायला हवे असे आम्हा दोघांना (मी आणि निपो) वाटत होते. अशी वेळ तुमच्यावर पोलिस स्टेशनमध्ये म्हणजे जिथे 'तक्रार' हा एक प्रमुख घटक पाहायला मिळतो तिथे भेटावी हा एक योगायोगच. दिलेली सारी उदाहरणे वाचली आणि पटत गेले आहे की पोलिस स्टेशन प्रथम समुपदेशनासाठी प्रयत्न करीत असते (हा भाग मी देखील अनुभवला आहेच) कारण ठाणे अंमलदार काहीही लेखी स्वरुपात नोंद करण्यापूर्वी शक्यतो समजुतीच्या रुपाने काही मार्ग निघतो का हे पाहतातच....विशेषतः लग्नसमारंभानंतरच्या आयुष्यात होणार्‍या उलट्यासुलट्या घडामोडीसंदर्भात.

काही वेळा तेथील भाषा आणि आवाज मात्र सहन करण्यापल्याडचे असतात. पण तसे वर्तन त्या ठिकाणाची एक अविभाज्य अशी रित बनली आहे जी कदापिही बदलू शकणार नाही.

"...बायकांच्यात होती धमक म्हणुन त्या तिथपर्यंत तरी पोहोचल्या..." असे तुमचे निरीक्षण सांगते. मी पाहिलेल्या अशा कित्येक बायका अंगी "धमक" आहे म्हणून ठाण्यात येतात असे नसून त्याना माहेरकडील वा बर्‍याच प्रसंगी त्या स्त्रीची शोचनीय अवस्था न पाहाणारे सहृदयी शेजारीदेखील तिला घेऊन येत असतात. मुलगी अशा लोकांची सोबत असतानासुद्धा धडपणे तोंड उघडत नाही.

अनेकविध उदाहरणे आहेत....कित्येक प्रसंगी मी प्रत्यक्ष साक्षीदारही होतो. त्या अनुभवावरून लिहिण्यास भाग पडत आहे की महाराष्ट्रातील अनेक छोट्यामोठ्या शहरातून गावकसब्यातून आजही लग्न झालेल्या स्त्री ला पोलिस स्टेशन हे छळातून सुटकेचे स्थान वाटत नाही, जरी ती तिथपर्यंत गेली असली तरी....कर्माकडे बोट दाखवित ती मुकाटपणे सहन करत आहे.

बाई प्रेमाच्या बदल्यात सत्तेचे हस्तांतरण करू इच्छिते. >> गा. पै. हे जनरल होउ शकते असे नाही वाटत. अ‍ॅटलिस्ट आमच्याकडच्या भागात. शेवटी सत्ता म्हणजे काय हे डिफाइन केले तर कदाचित यावर जास्त प्रकाश पडु शकेल असे वाटते.

या पार्श्वभूमीवर सर्वसाधारणपणे बायकांना त्यांचे निर्णय नवऱ्यांनी घेतलेले आवडतात. >> हे ही वाक्य जनरल असु शकेल असे वाटत नाही. अगदी लहान मुलांनादेखिल त्यांचे निर्णय घ्यायला आवडतात / दुसर्‍यांनी घेतल्यापेक्षा.

. तर बायकांच्या निर्णयस्वातंत्र्याचा विचार कौटुंबिक हिंसेच्या संदर्भांपुरता मर्यादित ठेवावा का? की सर्वत्र लागू करावा? >>> मुळात बाई आणि पुरुष असा संदर्भ घेण्यापेक्षा 'एक व्यक्ती' म्हणुन संदर्भ घेतला तर चांगले होइल.

सातीजी: हि एकांगी उदाहरणे नाहीत. फक्त नवरा हाच व्हिलन आणि बायको व्हिक्टीम असे नाहीय. इन्फॅक्ट यात कोण बरोबर अथवा कोण चुक हे देखिल महत्वाचे नाहिय. महत्वाचे आहे ते म्हणजे हा प्रकार बंद कसा करता येइल. त्यासाठी आपण काय करु शकु.

आता नवरा बायकोला मारत असेल तर घरात लहान मुलगा असेल तर त्याच्या दॄष्टीने 'आपल्य' बायकोला मारणे हे नॉर्मल किंवा असे मारावेच लागते आणि मुलगी असेल तर तिच्या दॄष्टीने असा मार खाणे नॉर्मल किंवा खावाच लाग्तो असेच कन्सेप्ट डेव्हलप होत जातील.

अगदी शिक्षण संपत असताना याप्रकारचे समुपदेश / माहिती विद्यार्थ्यांना देता येउ शकेल का? कारण अगदी चाम्गले करीअर, चांगली नोकरी असुन या गोष्टींमुळे जर ते कुटुंब सुखी होत नसेल तर नेहमीच्या शिक्षणाबरोबर हे शिक्षणदेखिल देखिल महत्वाचे ठरेल.

कदाचित जुन्या काळात आजोबा आजी आई वडील इत्यादी लोकांकडुन कळत नकळत हे संस्कार होत असावेत ज्याचे प्रमाण आज काल छोट्या कुटुंबामुळे / संवादाच्या अभावामुळे कमी झाले असावे का?

बेफी: अगदी अगदी. यु गॉट माय पॉइंट अबसोल्यूटली.

मामा: पण हे थांबवायच कसं?

कसले डोंबलाचे सोल्युशन निघणार हो? प्रश्न विवाहसंस्थेचा नसुन स्त्रियांच्या सबलीकरणाचा आहे.
लिहीलेत ते बरे केलेत. बर्‍याच लोकांना 'हे असले काही होत नसते अलिकडच्या काळात', 'सारखे काय तेच गुर्‍हाळ' असे वाटते.
निरी़क्षणे नोंदवित जावीत. निदान परिस्थिती किती जैसे थे आहे ते तरी कळेल.

कदाचित जुन्या काळात आजोबा आजी आई वडील इत्यादी लोकांकडुन कळत नकळत हे संस्कार होत असावेत ज्याचे प्रमाण आज काल छोट्या कुटुंबामुळे / संवादाच्या अभावामुळे कमी झाले असावे का?>> उलट बायकोवर हात उगारणे, तिच्या इच्छा गृहित धरणे, मुलींचे लग्न करुन एकदाचे उजवून टाकणे याचेच संस्कार जुन्या पिढीतून व्हायची शक्यता जास्त नाही का?

रैना, +१.

आमच्याकडे शिकायला असलेल्या मुलीला मी कराटे क्लासला घातलं तर आमच्या साबा म्हणाल्या 'मुलींना कराटे कशाला, उद्या नवर्‍याने मारल्यास त्यालाच झोडून काढेल.' Wink

द्या नवर्‍याने मारल्यास त्यालाच झोडून काढेल>> हेच ते शिक्षण द्यायला हवे असे कळकळीने वाटते.
काही झाले तरी, कुठल्याही परिस्थितीत मार खाऊ नका, नीट सांगुन कळत नसेल तर उलट बडवा, पुन्हा अंगाला हात लावायची हिम्मत होता कामा नये.
तेवढे होऊनही तमाशे सुरु राहणार असतील तर कशाला पाहिजे कुंकवाचा धनी ? काय करायचे असली घाणेरडी, नीचतम कुटुंबव्यवस्था टिकवुन ? मोडु देत की खुशाल.
पण त्यासाठी स्वतःची जबाबदारी स्वतः घेणे आले. आर्थिक सबलीकरण हवेच हवे.
बेफिकीर +१

पाटील,
तुमचे शीर्षक चुकले आहे थोडेसे. मुद्दा - लग्न, संसार आणि बदलते संदर्भ नाहीये. आणि त्या संदर्भांमध्ये बदल तर अजिबात नाही झालेला.

लग्न, संसार आणि त्यासंबंधित बदलते संदर्भ >>
बदलते का? बाय्कोला मारणे हे पुर्वापार चालत आलेले आहे. आजच्या काळापेक्षा १०० वर्शापुर्वीचा काळ बघितलात तर असे प्रकार तेव्हा समाजमान्य होते असे दिसून येईल. 'नवर्‍याने मारले आणि पावसाने झोडले ' अशी काहीतरी म्हण आहे ना. तेव्हा हा नविन तयार झालेला प्रश्न नाही.
उलटपक्षी आजच्या काळात काही सामाजिकड्रुष्ट्या प्रगत कुटुम्बातल्या बायकांची या मारहाणीतून सुटका झालेली आहे. आणि या मारहाणीविरुद्ध सर्व स्तरातल्या लोकांनी आवाज उठ्वायला सुरवात केली आहे.

डोमेस्टीक अ‍ॅब्युज प्रगत देशातही आहे पण आपल्याकडे त्याला एकप्रकारची समाजमान्यता आहे. त्यामुळे बायकोला मारणे यात नवर्‍याला आणि खुद्द त्या बाईलाही काही वावगे वाटत नाही.

अशिक्षित समाजाचे सोडा पण बायकोला मारण्याबद्दल इथे माबोवर खूप काही चर्चा पुर्वी झाली होती. आणि त्यात अनेकांनी बायको मनाविरूद्ध वागत असल्यास थोडासा हात उठणे कसे सहाजिकच आहे असे सांगितले होते.
बायकोला कसे बडवावे हे बहुतेकदा बापच किन्वा आजूबाजूचे पोराला लहानपणापासून प्रात्यक्षिक दाखवून शिकवत असतात. संशयावरून नवर्‍याने बायकोला मारणे हे तर सुशिक्षित मध्यमवर्गीय घरातही घडते.

रच्याकने , फक्त डोमेस्टीक अ‍ॅब्युजच नव्हे तर आपल्या मनाविरूद्ध एखादा/ एखादी वागत असेल तर त्याला\ तिला धोपटण्याचे शिक्षण विशेषकरून मुलग्यांना अगदी बालवाडीपासून मिळत असते. हिंसेची बीजे अगदी लहानपणापासून या मुलांच्या मनात आजुबाजूच्या वातावरणातून पेरली जातात. या अशा लहान मुलातली हिंसा पाहिली की मोठेपणी ते कसे वागतील याचा विचारही करवत नाही. सध्या सतत लहान सहान कारणावरून होणारी जीवघेणी हाणामारी बघितली ( अशा बातम्या वाचल्या ) की भीती वाटते , हताश व्ह्यायला होते.

नि.पा., विचारात पाडणारा लेख. तुम्ही पाहिलेली उदा. अत्यंत कमी असून संपूर्ण घरगुती हिंसेचा चेहरा नाहीत. पण इतक्याश्या हिश्श्याचे दर्शनही तुम्हाला अस्वस्थ करून गेलं हे संवेदनशिलतेचं उदा. आहे. असो. पण या सर्व गोष्टींची इथे चर्चा करून काहीही होणार नाही.

महिला सबलिकरण, बेफी म्हणतात तसं आधुनिक तंत्रज्ञान इ. हे सामाजिक शिक्षण... ज्या स्तरात फैलावले पाहिजेत तिथे फक्त मोबाईल एक तंत्रज्ञान नसून एक शो ऑफ आणि लाऊड म्युझिक साठी वापरले जाणारे यंत्र आहे. सबलिकरण म्हणजे नक्की कशाशी खातात? हा प्रश्न या स्तरात विचारला जाऊ शकतो. कमी शिकलेले, काही विशिष्ट जातीतच असं दिसतं असं नाही निपा दुर्दैवाने हे सुशिक्षित आणि सो कॉल्ड सुसंकृत समाजातही दिसतं. कदाचित मारहाण नसेल पण मानसिक त्रास जरूर असेलच.

>>लग्न करताना दोघांना नक्कि माहित असते का कि का लग्न करायचे? कि लग्नाचे वय झाले म्हणुन कराय्चे? घरुन फोर्स होतोय म्हणुन टाळत टाळत करायचे? याबद्दल समुपदेश करावे लागेल कि ज्याचा त्याचा चॉइस म्हणुन यात हस्तक्षेप करु नये.? >> दुर्दैवाने या प्रश्नांची अनुक्रमे उत्तरं म्हणजे बर्‍याचदा माहित नसते. ९९% लोक लग्नाचे वय झाले म्हणून लग्न करतात. घरून फोर्स होतो म्हणून ही करतात (यात मग समलिंगी भरडले जातात, तिथे एक वेगळी हिंसा सुरू असते) समुपदेशन आपण होऊन न करता. त्यात अडकलेल्यांनी जर स्वतःहून समुपदेशनाच मार्ग स्विकारला तर उत्तम.
पुन्हा दुर्दैवाने समुपदेशनाचा मार्ग आपल्याला मदत करू शकेल असा विचार करणारा स्तर बर्‍यापैकी प्रगल्भ असतो, ( तो स्तर आपल्या अडचणी बर्‍यापैकी स्वतःच्या पातळीवर सोडवण्यातही सक्षम असतात्/असू शकतात) तरिही मोस्ट व्हॅलिड हेल्प म्हणून समुपदेशनाकडे पाहिले जाते. उलट तुम्ही दिलेल्या मळ्यात राहणार्‍या जोडप्यात किंवा इतर तत्सम जोडप्यांना समुपदेशन म्हणजे काय? हे कळण्याची कुवत असेल काय? नसेलच. बुद्धी किंवा प्रगल्भता वाढवू बाटलीभर म्हणून सुईतून चढवता येत नाही Sad

इथे मूळ लेखात फक्त नवर्‍याने बायकोला मारण्याचा प्रश्न आहे. पण वडील , भाऊ हेही मनाविरुद्ध वागल्यास मुलीला , बहिणीला मारहाण करण्याचे प्रकार घडतात. अनेक मुली वडीलांना , भावांना घाबरून असतात.

पण त्यासाठी स्वतःची जबाबदारी स्वतः घेणे आले. आर्थिक सबलीकरण हवेच हवे. >> डोमेस्टीक अब्युज मधे याचाही फारसा उपयोग होत नाही. बायको वेगळी रहात असली तरी तिच्यामागे जाऊन भांडण करणे , मारहाण करणे असे प्रकार घडतात. माझ्या एका मैत्रीणीला वेगळे रहात असूनही , घटस्फोटाची केस चालू असूनही तिचा नवरा घरी घूसून मारहाण करत असे.

शारीरिक अत्याचाराला बळी पडणार्‍या बायकांसाठी चांगली सपोर्ट सिस्टीम असणे गरजेचे आहे. यामधे खंबीर काळजीवाहू नातेवाईक , समुपदेशक ते कायदा , पोलिस , असे सगळेच आले.

अरे अता जाता आठवले म्हणून - ( हे सगळे टीव्हीवर ऐकलेले आहे , खरे खोटे माहित नाही पण याविषयात चपखल बसणारे सेलेब्रीटी उदा . Happy चूकीचे असल्यास सांगा म्हणजे उडवून टाकेन)
सलमान खान आणि ऐश्वर्याचा ब्रेक अप झाला तेव्हा तो तिला मारहाण करत होता असे ऐकले होते. ब्रेक अप झाल्यावर 'चलते चलते' च्या सेटवर येऊन सलमानने दंगा केला. त्यामुळे शाहरूख ने ऐश्वर्यालाच चित्रपटातून काढून टाकले. बघा अता यात ऐश्वर्याची काय चूक होती? पण सलमानच्या चूकीमुळे तिचे काम गेले.
तात्पर्य - अशा बाईला हिच्यामुळे आपल्याला त्रास होईल म्हणुन कामावरचे , आजुबाजुचे लोकही मदत करत नाहीत. ऐश्वर्याची ही कथा तर सामान्य बाईचे काय होणार .

मारहाणीचा विषय निघाला आहे तर, लहानपणी आमच्या बिल्डिंग मधे एक कुटुंब रहायचं त्या माणसाची ३ लग्न झाली होती. सर्व बायका सोडून गेल्या होत्या, एकूण मूलं ६ (सर्व बायकांची) पैकी ५ इकडेच होती. तिसरीला पण तो दारू पिऊन मारहाण करायचा. ती बाई पण मारायची, मी तर तिला बांगड्या फोडून त्या काचांनी त्याच्या शरिरावर ओरखडे काढलेले ही पाहिले आहेत. पण शेवटपर्यंत दोघांनीही एकमेकांना सोडलं नाहीच. शेवटी तो माणूस खूप दारू प्यायला लागला आणि त्यातच गेला.

मेला बरं झालं, आता डोक्याला ताप नाही. आम्ही आरामात राहू (ही वाक्यं बायकोची कारण तो माणूस सोनाराकडे दिवाणजी होता, त्याचं काम या बाईकडे आलं.)

रैना, दक्षिणा, डेलिया - पूर्ण अनुमोदन,
जर ह्यात बदल आणायला हवा तर व्यापक प्रमाणावर अवेअरनेस व्हायला हवा आणि तो आपोआप होणार नाही. त्याकरता आपण स्वतः प्रत्येकाने ज्याला / जिला हे मुद्दे पटतात त्यांनी सक्रीय व्हायला हवे.

ह्यात शाळेतल्या शिक्षक शिक्षिकांची मानसिकता बदलायचे प्रयत्न व्हायला हवेत. मग ते लोण समाजात नक्कीच झिरपत जाईल.

बायको वेगळी रहात असली तरी तिच्यामागे जाऊन भांडण करणे , मारहाण करणे असे प्रकार घडतात. >> हे अत्यंत खरं आहे. Sad मी ऐकलेल्या उदा. नवरा खुद्द बायकोला त्याच्या मित्रांकरवी फोन करून अश्लिल बोलायला लावायचा. शिव्या द्यायचा. घराखालून ३-४ मित्रांना घेऊन जाऊन हाका मारायचा (रात्री बेरात्री) मिस्ड कॉल्स, तिच्या लुनाच्या कॉर्बोरेटच्या शेवटी कंडोम पण लावून ठेवला होता. गाडी सुरू केली की फुगणार तो. मग शेजार्‍यांसमोर तमाशा.. अशी एक ना अनेक. इतकी घाणेरडी मनोवृती लोकांच्यात कुठून येते? Sad

बरेचदा जन्मदाते सुसंस्कृत पालक न होता जन्मदातेच राहतात तेव्हा असं नक्कीच होतं. अर्थात ही मूळं खूप खोलवर रुजली आहेत. ती उखडून काढायची म्हणजे प्रत्येक सुसंस्कृत स्त्रीला सावित्रीबाई आणि प्रत्येक सुसंस्कृत पुरुषाला ज्योतिबा व्हायला लागेल. पण हे व्हायची आपल्या सुशिक्षित समाजाची तयारी नसते. जवळ सगळ्यांना इंस्टंट रिझल्ट हवे असतात.

सातीने एका मुलीला कराटेच्या क्लासला घातलय हे एक खूप स्तुत्य पाऊल आहे अशी महत्वाची पावलं आपण किती जण उचलतो?

शेजारच्या घरात नवरा बायकोला मारत असेल वा तिच्याशी अ‍ॅग्रेसिवली वागत असेल तर आपण किती वेळा मध्ये पडतो? हे सोडाच आपली एखादी शेजारीण जेव्हा तिच्या मुलाला म्हणते काय मुलीसारखा रडतोस, आपण किती वेळा मध्ये पडून तिचं बोलणं चूक आहे हे तिला सांगतो? स्त्री - पुरुष डिस्क्रीमिनेशन आपल्याला आवडत नाही पण ते करणार्‍या आपल्या शेजार्‍यांना, नाते वाईकांना अगदी आपल्या आईवडिलांना आपण ते करताना कधी थांबवतो?

अजूनही आपली नोकरीतून निवृत्त न झालेली आई/ मावशी/ मामी/ आत्या इत्यादी स्वत:च्या निवृत्त झालेल्या नवर्‍यासाठी चारी ठाव स्वयंपाक करून निघते हे डिस्क्रिमिनेशन आपण बघत असतो पण आपण त्याविरुद्ध किती वेळा बोलतो?

जोवर आपलं घर बदलणार नाही तोवर समाज बदलणार नाही.

आपली संस्क्रुती पुरुषप्रधान आहे आणी निर्सगाने स्त्रियांना कमकुवत बनवले आहे.स्त्रिया नेहमीच सुरक्षीत आणी कवचात राहने पसंत करतात.कितीही सुशिक्षित जोडपे असु द्या घरचे काम स्त्रिलाच करावे लागते(काहि अपवाद असतील पण ५% पण नसतील). अशा कितीतरी गोष्टी असतात.ही मानसिकता बद्लेल तेव्हा हे सर्व थांबेल....

नताशा हे उदा. २००५-२००६ चं आहे, जेव्हा मोबाईल हे अगदी सर्वांकडे नसायचे. (मिस्ड कॉल्स हे लँडलाईनवरचे आहेत) लुनाचा जमाना म्हणजे यूकॅन इमॅजिन. मोबाईल आणि व्हॉट्सप असते तर तिचा अजूनी छळ झाला असता. अश्लिल समस, चित्रं... Sad

निर्सगाने स्त्रियांना कमकुवत बनवले आहे.स्त्रिया नेहमीच सुरक्षीत आणी कवचात राहने पसंत करतात.>> सीमा असं नाहीये.

कितीही सुशिक्षित जोडपे असु द्या घरचे काम स्त्रिलाच करावे लागते(काहि अपवाद असतील पण ५% पण नसतील). अशा कितीतरी गोष्टी असतात.ही मानसिकता बद्लेल तेव्हा हे सर्व थांबेल....>> अनुमोदन

पण हे आपणच थांबवायला हवं ना. सगळं समाजाने बदलावं असं कसं म्हणून चालेल?

वर नोंदवलेली उदाहरणे पोलीसात गेली म्हणून माहीत पडली. पण डोमेस्टिक व्हायोलन्सची ( physical, emotional, verbal, economic and sexual abuse) आणि एकंदरीतच लग्न, संसार आणि त्यासंबंधित बदलते संदर्भ या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. या विषयावर कंस्ट्रक्टिव्ह विचार वाचायला मिळतील ही आशा आणि अपेक्षा.

यासंदर्भात मुलगा, मुलगी आणि दोघांचेही आईवडील यांचे विवाहपूर्व समुपदेशन खूप गरजेचे आहे, जिथे मुलामुलीला आपले प्रश्न, समस्या, शंका, अपेक्षा पडताळून पाहता येतील आणि आईवडीलांनाही आपण या संसारात कितपत हस्तक्षेप करावा याबाबत समज देता येईल. (हे नीट मांडता आलं नाहीये कदाचित)

Pages