पालक म्हणून मोठे होताना

Submitted by वेल on 13 November, 2013 - 06:25

ह्या विषयावर दुसर्‍या बीबीवर बोललं नाही गेलं म्हणून नीधप ह्यांनी दिलेल्या सजेशन नुसार हा बी बी काढला आहे.

<<इथल्या सर्व सुजाण पालकांनी आपापले नोकरी व्यवसाय आणि मूल वाढवणे हे दोन्ही करताना आई व वडिल दोघांनी काय प्रकारच्या तडजोडी केल्या, सपोर्ट सिस्टीम निवडताना/उभारताना काय विचार केला, कश्या प्रकारे कामाची आणि जबाबदार्‍यांची विभागणी केली इत्यादी गोष्टींबद्दल सांगितले तर जे अजून सुपात आहेत त्यांना मार्गदर्शन होईल. तसेच काय गोष्टींची उणीव जाणवली, त्यातून मार्ग कसा काढला, ती उणीव कश्या प्रकारे भरून निघू शकते इत्यादी गोष्टींची चर्चा झाल्यास अजून बरे.>>
<<'मुलांना त्रयस्थांच्या हाती सोपवतांना घ्यावयाची काळजी' >> हाही चर्चेचा विषय असेल.

पाळणाघरे, शाळा, बस सर्व्हिस इत्यादी सर्व्हिसेस कडून आपल्या काय अपेक्षा आहेत हेही लिहावे.

आपल्या पालकांनी काय केले त्याचा आपल्याला काय फायदा तोटा झाला हे आपण आपल्या दृष्टीकोनातून लिहिण्यासही हरकत नाही.

कृपया तुम्ही केलेत ते चूक आणि आम्ही म्हणतो ते बरोबर असा अ‍ॅटिट्युड ठेवू नये.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आम्ही दोघांनी ऑफिसच्यावेळा वेगवेगळ्या ठेवल्यात, म्हणते मी लवकर जाऊन लवकर येते अणि नवरा उशीरा जाऊन उशीरा येतो. शाळेत जाणार्‍या मुलाला आफ्टर केअरमधे जावे लागत नाही आणि डेकेअरमधे जाणारा मुलगा दुपारची नॅप झाली की घरी, म्हणजे ५ तासच डेकेअरमधे. मोठाच्यावेळी २-३ डेकेअर बदलले, न आवडल्याने. लहान्याच्यावेळी अगदी सगळं परफेक्ट मिळालं. सकाळचा ब्रेकफास्ट, मुलाचे लंच नवर्‍याकडे आणि रात्रीचा स्वयंपाक आणि आमचे दुसर्‍या दिवशीचे लंच माझ्याकडे.

प्रीति - धन्यवाद इथे लिहिल्याबद्दल. आणि मुलांसोबत स्वतःचे शेड्युल अ‍ॅडजस्ट करण्याच्या तुम्हा दोघांच्या स्वभावाला सलाम..

डे केअर निवडताना तिथल्या सोयी, स्वच्छता, सुरक्षितता, टीचर्स ची मुलांबरोबर , पालकांबरोबरची वागणूक , टीचर्स चे शिक्षण बघितले. प्राथमिकता ही सुरक्षिततेलाच होती. डे केअर मधे स्वतः २ दिवस पुर्ण वेळ मुलीबरोबर थांबले आणि त्यांचे एकंदरीत काम कसे चालते हे समजून घेतले. डे केअर चे चार्जेस हा सर्वात शेवटी बघितलेला मुद्दा होता. महाग असले तरी पैशाचा अजीबात विचार न करता सर्वात उत्तम डे केअर निवडले.

पहिल्या प्रेगनन्सी नंतर मी जॉब सोडला. मग आधी मुलगा ४ वर्षे असताना, डे केअर चा पर्याय निवडला होता, पण प्रचंड दमछाक व्हायची, ६च्या ठोक्याला नवर्याला त्याला घेऊन यावे लागायचे. ऑफिसनन्तर काही मिटिंग वगैरे असल्यास ते रद्द करावे लागायचे. मी घरी येऊन आधी किचन मधे, कूक करून आवराआवर करेपर्यंत मुल झोपलेलं असायचं. मुलाबरोबर मला शुन्य वेळ मिळायचा. परत त्याला तिथे अजिबात करमायचं नाही, हे वेगळच, दचकून उठायचा आणि म्हणायचा, मला नाही जायचं Sad

शेवटी, हेल्पर ठेवली, तिला स्वतः ट्रेन केलं, साबांच्या लक्षणिय मदतीमुळे, तिचा स्वभाव जोखायला मदतही झाली. आता, दुसरं बाळ आहे, ४-५ महिने रजा काढून पुन्हा कामावर रुजू झाले आहे. (पुन्हा एकदा ब्रेक घेतला तर करियर पुर्ण रुइन व्हायची शक्यता असल्याने आता तो पर्याय निवडणार नाहिच). दिवसातुन १० वेळा, कॅमेरातून मी आणि नवरा घरी पाहत असतो. मुलगा पण लक्ष ठेवतो. मेन म्हणजे कधी कधी ऑफिसवरून ट्रेनिंग किन्वा साईट च्या अनुशंगाने लवकर घरी परतायला मिळते, तेंव्हा बाळं मजेत घरी असतात आणि मला बघून खूप खूश होतात. Happy

आमच्या घरी सासूबाई असल्यामुळे मला मुलाला वाढवताना फार काही त्रास झाला नाही. तो ५ महिन्यांचा झाल्यावर ऑफिस जॉइन केले होते. मात्र आमच्या आईंवर उतारवयात बाळाची पूर्ण जबाबदारी टाकणे योग्य वाटत नव्हते. म्हणून त्याला सांभाळायला बायका ठेवल्या, सासूबाई फक्त सुचना, देखरेख व बाळाचे जेवण भरवणे हे करीत असत. बायका सुद्धा आम्ही २ ठेवल्या होत्या. एक सकाळी आठ वाजता येऊन दुपारी २ वाजता जाणारी तर दुसरी दुपारी २ ते मी घरी पोहोचेपर्यंत. एकीची सुट्टी असेल तर दुसरीने दोन्ही शिफ्टस करायच्या हे आधीच ठरवले होते. त्यामुळे फार क्वचित बाईने दांडी मारली म्हणून रजा घ्यावी लागली असे माझ्या बाबतीत झाले.

नवर्याची सुद्धा शिफ्ट ड्युटी असे त्यामुळे दिवसा फक्त सासूबाई व कामवाली बाई असे कमी वेळा होत असे.

माझ्या मते बाळाला सांभाळण्यासाठी घरची सपोर्ट सिस्टीम असणे हा सर्वांत उत्तम पर्याय. आपलं घरचं माणूस आपल्या बाळाबरोबर आहे ही भावनाच मनाला निर्धास्त करते व आपण कामावर व्यवस्थित लक्ष केंद्रीत करू शकतो. पण हा पर्याय सर्वांकडे असतोच असे नाही त्यामुळे मला असे वाटते अगदी खात्रीची व्यक्ती असल्याशिवाय मुलांना त्या व्यक्तीवर एकटे सोपवू नये. त्यापेक्षा पाळणाघराचा पर्याय चांगला. समवयस्क मुलेही असतात आणि बायकासुद्धा एकपेक्षा जास्त.

हे सर्व कसं सुधारता येईल? काही मुद्दे डोक्यात आले.
१. कंपन्यांनी व्यवस्थित माणसे व जागा ठेवून कामाच्या जागी पाळणाघरे चालवणे.
यशस्वी उदा. टाटा मोटर्स, नीलसॉफ्ट, लॉरियल (मला इतकीच माहिती.)
आमच्या कंपनीने चालवायला घेतले होते पण वर्षभर फक्तएकाच लहान मुलगी सांभाळायला आली आणि एका बाळासाठी सर्व व्याप चालवणे परवडेनासे झाले त्यामुळे वर्षात बंद. हिंजेवाडीपर्यंत लहान मुले आणणे आणि पाळणाघरात ठेवणे याला पुणे शहरात (कोथरुड,हडपसर,सदाशिव पेठ इ.) राहणारे नाखूष अंतरामुळे.
२. पाळणाघर आणि जवळ किंवा खाली चांगली शाळा हा चांगला पर्याय. यशस्वी उदा. पंपकीऩ पॅच-ब्लु रिज आणि इंदिरा शाळा-इंदिरा डे केअर. 'पाळणाघर चांगले पण मूल चांगल्या शाळेत घालायचे ती खूप लांब' म्हणून पाळणाघरावर काट मारुन घरी बाई ठेवली जाते.
३. लर्निंग कर्व्ह पाळणाघर आणि डे केअर मधे दिवसभराचे सीसीटिव्ही चित्रण लाइव्ह उपलब्ध असततेआणि पालकांना पाहता येते.
४. चांगली (अनुभव आणि चांगले मनुष्यबळ सहज मिळेल अशा भागातली) पाळणाघरे महाग पडली तरी निवडणे. ऐकलेले उदा. आजोळ.
५. मुल ७-८ वर्षाचे झाल्यावर नीट विश्वासात घेऊन घरी एकटे (थोडाच वेळ) ठेवणे. (बाप ७-४ आणि आई २-८ असे काही तरी करुन काम सांभाळणे.)
६. नोकरी सोडून ५-६ वर्षे घरी राहणे ऐकायला छान वाटले तरी झेपेबल वाटत नाही. बाकी क्षेत्राचे माहित नाही पण आयटी मधे ५ वर्षे नोकरीपासून ताटातूट झालेला माणूस गेलाबाजार होतो. लहान वयाच्या माणसांबरोबर नोकरीतील झालेल्या गॅपमुळे कमी स्किल्स आणि कमी वेगाने काम करणारा 'रामूचाचा' बनणे हा अनुभव आत्मविश्वासाला मारक.
७. आईबाबा किंवा सासूसासरे तुमच्या शहरी असल्यास, प्रकृतीने चांगले आणि मुले बघण्यास इच्छुक असल्यास तो उत्तम पर्याय. पण त्याना फुकट राबत असल्याची भावना येउ नये म्हणून खूप जपावे लागते.
८. नोकरी करणारी स्त्री आणि होम मेकर स्त्री या तराजूच्य दोन बाजू. दोन्हीमधे फायदे तोटे.
होम मेकर स्त्री
फायदे: घरात सतत कोणीतरी असणे, मुलांना आधार, काळजी कमी, स्त्रीला जास्त वेळ मिळून स्वत:कडे/छंदांकडे लक्ष देता येणे.
तोटे: शहरातला घराचा अफाट इ.एम.आय./भाडे, नोकरीतील अनिश्चितता, मुलांना चांगल्या शाळेत घालण्याचा खर्च याखाली घरातला एक कमावणारा पुरुष दबून जाणे/त्याला मानसिक ताण येणे, घरात राहणारी स्त्री कंटाळणे, तिला सर्व कामे आपल्या डोक्यावर पडण्याची भावना येणे.
नोकरी करणारी स्त्री
फायदे: इ.एम आय, खर्च इ. नवर्‍याच्या बरोबरीने उचलू शकणे, नोकरीतील अनिश्चितता असली तरी एक चाक डगमगल्यास दुसरे आधार काही काळ देईल या विश्वासाने पुरुष ताणमुक्त काम करु शकणे, स्त्रीला स्वतःची वेगळी ओळख.
तोटे: मुले सांभाळणे,स्वयंपाक इ.इ. याला मागचा प्राधान्यक्रम, घरचे समजूतदार नसल्यास सुपरवूमन बनायला लागून प्रचंड दमणूक, पैसे येतात तसे या सर्व बाहेरच्या सोयी करण्यात ते खर्चही बरेच होणे.
९. वर्क फ्रॉम होम आणि अर्धा पगार/अर्धावेळ काम यांना कंपनी पॉलीसीज मधे चांगली जागा मिळणे. सध्या या गोष्टीना परवानगी मिळणे तुमच्या साहेबाच्या आणि कंपनी च्या मर्जीनुसार ठरते. कंपन्यांनी मूल असलेली स्त्री ही 'काय कटकट आहे,आता काही वर्षे हीचा कामात नीट उपयोग नाही, चांगली लग्न व्हायला २-३ वर्षे असलेली मुलगी किंवा एखादा पुरुष कामात घ्यावा म्हणजे झाले.' या दृष्टीने न पाहणे. जग बदलते आहे पण खूप हळूहळू.अजूनही मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामधे '८.३० चा पंच सांभाळत नाही' या कारणाने दबाव आणून लहान मूल असलेल्या बाईला राजीनामा द्यायला लावणे हे किस्से कमी नाहीत.
१०.जो पर्याय निवडू त्याबद्दल चलबिचल होऊ न देता तो यशस्वी करण्यासाठी कष्ट घेणे.प्रत्येकासाठी लागू पडणारे औषध वेगळे. एकच उपाय सर्वांना उपयोगी पडणार नाही.

एकच उपाय सर्वांना उपयोगी पडणार नाही.>>> अनुमोदन.
बराचसा कॉमनसेन्स आणि कान-डोळे सतत उघडे ठेवून वावरण्याला पर्याय नाही.

मूल हवयं का? का?
नोकरी / करियर (कोणाचेही) करायचे आहे का? का?
हे प्रश्न स्वतःला विचारुन समाधानकारक उत्तरं स्वतःला मिळाली तर मग पुढे प्रश्न उभे राहणार नाहीत असे वाटते.

अजुन एक पर्याय सुचवावासा वाटतो. २-३ फैमिलीज़ मिळून एक प्रशिक्षित nanny ठेवू शकतील. समजा तीन मुलांसाठी एक nanny असेल तर मुलांना एकमेकांची सोबत होइल आणि nany चा पगार तीन मुलांमध्ये विभागला जाईल.शिवाय तीन मुलांचे आई वडील, आजी आजोबा असे बरेच लोक लक्ष ठेवायला असतील.
ही तीन मुले एकाच बिल्डिंग / सोसाइटी मधली असावीत. एक एक दिवस एका एका घरी रहायचे. मुलांनाही सोपे आणि आई वडीलानाही पालनाघरात नेण्या आणण्याचा वेळ वाचेल

<<मूल हवयं का? का?
नोकरी / करियर (कोणाचेही) करायचे आहे का? का?
हे प्रश्न स्वतःला विचारुन समाधानकारक उत्तरं स्वतःला मिळाली तर मग पुढे प्रश्न उभे राहणार नाहीत असे वाटते.>> हे चर्चा इथ नको न करूया. इथे फक्त आपण अनुभवलेल्या आपल्याला चांगले रिझल्टस दिलेल्या किंवा आपल्याला सुचलेल्या नव्या आयडियाज लिहूया.

प्रोफेशनल लेवलने चालविल्या जाणार्या सुसज्ज पाळणाघरांची संख्या वाढविणे हाही एक उपाय होऊ शकतो. उत्तम गुणवत्तेच्या पाळणाघरांची मागणी व संख्या जशी वाढेल तसे लो बजेट पाळणाघरांनाही किमान सोयी सुविधा तसेच रास्त सेवा देण्याचे प्रेशर निर्माण होईल.
सुशिक्षित स्त्री पुरूषांना करियर / व्यवसायाचा हाही एक उत्तम पर्याय होऊ शकेल. मात्र पालकांची 'स्वस्तातले मस्त' पाळणाघर आपल्या बाळासाठी निवडायची मानसिकता त्यासाठी बदलावी लागेल.
प्रोफेशनल लेवलने चालणार्या पाळणाघरांचे संचालक संघटन करून सरकारवर पाळणाघरांचे प्रमाणीकरण करण्यासाठी जागरूक पालकांच्या मदतीने दबाव आणू शकतात.
आय एस ओ प्रमाणीकरण येथेही करता येऊ शकते.

आजोळ पाळणाघराच्या संचालिकांची प्राजक्ता शिरीनने घेतलेली मुलाखत जरूर वाचा.

व्यवस्थित वेळ काढून सविस्तर प्रतिसाद द्यायचा होता. म्हणून उशीरा आले या धाग्यावर.
सर्वात आधी... मला या धाग्याचं नाव खूप्पच आवडलं!! आणि पटलंही Happy वेल धन्स हा नवीन धागा सुरू केल्याबद्दल कारण इथे प्रत्येकाचे स्वतःचे अनुभव पोस्टल्यामुळे सल्ले आणि वाद कमी होतील अशी आशा. आणि त्यातून नवपालकांना महत्वाची माहीती मिळेल हीसुद्धा आशा.

अवांतर तरीही विषयाशी निगडीत म्हणून : माझं लग्न मी २६ वर्षांची असताना झालं. ठरवून प्लानिंग केल्यामुळे २९ व्या वर्षी मुलगा झाला. (मुलगा किंवा मुलगी काहीही असतं तरीही एकच पुरे! या (फक्त माझ्या एकटीच्या, पण तोच निर्णायक आणि फायनल निर्णय असल्याने) निर्णयावर ठाम असल्याने तीन वर्ष मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतलेला.

प्रेग्नन्सीमधील काही कॉम्प्लीकेश्न्स्मुळे बाळंतपणानंतर तीन महीने सासरी होते. बाळंतपण आणि बाळाची काळजी ही सर्वस्वी मुलीच्या माहेरच्यांची जबाबदारी असते असे साबांचे धन्य मत असल्यामुळे मुलगा झाल्या दिवसापासून आम्ही दोघांनीही मनाशी खूणगाठ बांधली की हे बाळ आपली जबाबदारी आहे आणि कित्तीही कष्ट पडले तरी त्याला आपल्या मनायोग्य जास्तीत जास्त योग्य रितीने घडवायचं.

बाळंतपणानंतरच्या तीन महीन्यात अतिशय मानसिक ताणाखालून जात असल्याने आणि सासरी मदतीपेक्षा भयानक त्रास असल्याने मला पोस्ट पार्टम डिप्रेशन आले होते. मुंबईला घरी आणल्यानंतर मुलाची तीन महीने तशी आबाळच झालेली असल्याने, मूल कमी वजनाचे असल्याने, सतत आजारी पडत असल्याने आणि पाळणाघराबाबत अज्जीबात खात्री नसल्याने (मूळात भीती असल्याने) मी नोकरीमधून घेतलेला ब्रेक जुनी नोकरी सोडण्यात पर्यवसान झाले.

पहीलं वर्ष संपूर्ण त्याची आजारपणं समजून घेण्यात आणि त्याच्या खाण्यापिण्याच्या वेळा समजून घेण्यात गेलं. भरीस भर म्ह्णून माझं डिप्रेशन अधून मधून डो़कं वर काढे. माझ्यासाठी व विशेष म्हणजे माझ्या नवर्‍यासाठी पहीली दोन वर्षे खूप कसोटीची होती. जवळपास पहील्या वर्षभरानंतर हजारो टेस्ट्स करून त्या नॉर्मल आल्यावर मुलाला दुध व दुग्धजन्य पदार्थ यांतील प्रोटीनची अ‍ॅलर्जी आहे त्यामुळे त्याला वरचेवर ताप, इन्फेक्शन्स, उलट्या, मोशन्स होतात असे निदान झाले. त्यानुसार बाळाची औषधे व इतर आयुर्वेदिक गुटीची औषधे सुरू केली. अधूनमधून खूपच फ्रस्ट्रेशन येई. पण दोघं रडत, एकमेकांना धीर देत आजारपणं, जागरणं काढत राहायचो.

या सर्वात मदतीला कोणीच नसल्याने कसेबसे दीड वर्ष काढले. यात माझ्या खाण्यापिण्याची तब्बेतीची खूप हेळसांड झाली. सतत बाळाच्या न वाढणार्‍या वजनाचा आणि त्याला काय काय खायला देता येईल या विचाराने अक्षरशः वेड्यासारखी सगळी माहीती पिंजून काढली. नंतर एक मुलगी कामाला मदतीला ठेवलेली. तिचा मदतीपेक्षा त्रासच झाला. तिने गावी घालून ठेवलेल्या गोंधळाला निस्तरण्यासाठी इथे पाठवलं गेलं होतं. नंतर तिलाही काढून टाकलं. मूलगा आणि मी असे दिवसभर दोघेच असल्याने आणि दिवसभराची कामे करून मुलाला जास्त वेळ देऊ शकत नसल्याने नवर्‍याने एक पाळणाघर पाहीले. घरगुती स्वरूपाचे, आणि सोसायटीतच असल्याने ते बघायसाठी माझ्या मागे धोशा लावला. पण एवढी आजारपणे काढल्याने घाबरून मला मुलाला कोणाच्याही हातात सोपवायचं नव्हतं. तरी बघून आले. अमराठी कुटुंब आहे. त्यामुळे सुरूवातीलाच जेवणाची धाकधूक. पण पाळणाघर चालवणारी मुख्य स्त्री अतिशय प्लिझंट आणि हसमुख वाटली. तिला मी माझ्या सर्व शंका आणि अपेक्षा, मुलाची नाजूक तब्बेत सांगितलं चार तास बसवून. एका आठवड्याने पाठवेन म्हणून कळवलं पण पुन्हा धीर होईना. पुन्हा दहा एक दिवसांनी तीच चर्चा साग्रसंगीत. ती जेवण देते पण तुम्हाला काय द्यावंसं वाटतं ते दिलंत तरी चालेल. (नॉनव्हेज नाही.) म्हणून तिचा डबा लावलेला, भाज्या कुठल्या जेवण कसं असतं ते पाहण्यासाठी. तिच्यासोबत राहणारे तिचे भाऊ आणि वहीनी डबा पोहोचवायचे. स्वच्छता चांगली आणि जेवणाची क्वालिटी बरी होती. तिच्याकडे सांभाळायला चार ते पाच जण त्यापैकी चौघंजणं घरातीलच. मुले पाच सर्व वयोगटातील. अर्णवच्या वयाची एक मुलगी तर वयाच्या तिसर्‍या महीन्यापासून यायची तिथे. पुन्हा एक आठवडा काढला. नवर्‍याने पुन्हा पुन्हा समजून सांगितल्यानंतर धीर करून त्याला घेऊन गेले. पुन्हा पहील्यापासून तीच चर्चा. या सगळ्या काळात माझे तेच तेच मुद्दे असूनही त्या स्त्री ने एकदाही न वैतागता त्याच इंटेंसिटीने माझी समजूत काढली. तिच्याच सल्ल्यावरून मी त्या दिवशी त्याला एक दीड तास ठेवलं असे दोन तीन दिवस सतत ठेवायचे आणि मी सुद्धा नंतर तास दोन तास तिच्याशी गप्पा मारून यायचे. त्या कालावधीत मुले काय करतात, कसे भांडतात, खेळतात, खातात, शी शू आल्यास कसे सांगतात, स्वच्छ्ता सगळंच बघता आलं. मग पुढचा आठवडा तास वाढवत नेऊन दोन तास, चार तास करत गेले. तोपर्यंत घरी काम करायला घेतलेलं. मग तो राहतोय याची मला खात्री पटल्यानंतर ( तो तर खूप सोशल असल्याने आणि मुलांच्यात मिसळायला खेळायला आवडत असल्याने दुसर्‍याच दिवसापासूनच तिथे रूळला. ) घरी काम घेतलेल्या कंपनीला जॉईन करण्यासाठी होकार कळवला.

घरी मूल सांभाळायला मध्यमवयीन बाई ठेवायची म्हणजे तिची घरकामात मदत होईल या नवर्‍याच्या सूचनेला मी ठामपणे नकार दिला. त्याने तिच्यावर लक्ष ठेवायला कोणी नसणार. सीसीटिव्ही लावला तरी पूर्णवेळ काय करते, काय व किती भरवते, ताजे अन्न देते का आणि मुख्य मुद्दा मुलांच्यात दिवसभर मिसळणे व त्यायोगे त्याच्याशी संवाद साधायला, ग्रूम व्हायला काहीच वाव नाही. इथे आता तो हटकून तिन्ही भाषा (त्यातल्या त्यात बर्‍याचदा हिंदी) बोलतो, नर्सरी र्‍हाईम्स म्हणतो, खूप खेळतो. नवनवीन पदार्थ खातो जे मला रोज करणे शक्य होत नाही. तरीही मी जमतील तसे मिक्स व्हेज सूप, मिश्र डाळींचे सूप, मिक्स पीठ पराठा, पोळीचा लाडू असे डब्यात देतेच रोज. बाकी इडली, डोसा, उपमा, खिचडी वै. तो तिथेच खातो. मुख्य म्हणजे तो तिथे जायला उत्सुक असतो, आनंदी असतो. येताना चटकन यायला तयार नसतो. ती आंटी त्याला खूप आवडते. हल्ली आजारीही कमी पडतो. त्याच्या पेडीच्या मते आजारपण कमी होण्याचे मुख्य कारण तो आनंदी राहाणं आणि आनंदी माणसांच्यात राहाणं.

अजूनही चुकत माकत शिकतोच आहोत, वाढतोच आहोत दोघेही पालक म्हणून. अर्णवच्या बेबीसिटींग वाल्या आंटीचीही हेल्प होते सल्ले घ्यायला. तिने तर तिची दोन्ही मुले एकटीने वाढवली पॅरॅलाईज्ड व पूर्णपणे बेडरिडन नवर्‍याचे आजारपण सांभाळून.

यात सांगण्यासारखे अजून दोन मुद्दे... माझ्या नवर्‍याची साथ खूप मोलाची आहे. त्याने माझी नोकरी दुय्यम, मी घरी आहे म्हणून गृहीत धरणं, कामावरून दमून आलाय म्हणून रिलॅक्स होणं हे कटाक्षाने टाळलं. रात्रीची जागरणं, वेळी अवेळी दवाखान्यात धावणं, अर्णवचं खाणं पिणं औषधे समजून घेऊन माझ्याबरोबरीने ते करणं, अर्णवची शी शू न कंटाळता साफ करणं, नोकरी सांभाळून केलं. कामावरून आल्यावर मी दिवसभर कंटाळले असेन म्हणून अर्णवला खेळवत मला रिलॅक्स व्हायला टाईम देणं, माझ्या चिडचिडीला समजावत, मला मोटीव्हेट करत राहणं आणि माझं फ्रस्ट्रेशन कमी व्हावं म्हणून मी पुन्हा जॉब जॉईन करावा म्हणून पाळणाघर शोधून चौकशी करण्याची धावपळ त्यानेच केली. अजूनही माझ्यापेक्षा अर्णवला बाबाच सर्व गोष्टींना लागतो. आणि दुसरा मुद्दा यात अर्णवचीही साथ खूप मोलाची आहे कारण तो प्रचंड अ‍ॅड्जसेबल व समजूतदार मुलगा आहे. (अर्थात त्याच्या समजूतदार्पणालाही आम्ही गृहीत धरण्याची चूक करत नाही).

आणखी एक मुद्दा की जवळपास दोन अडीच वर्षं आम्ही म्हणजे मी अज्जीबात बाहेर जात नव्हते. घर पाळणाघर आणि दवाखाना बस्स! नंतर जॉब चालू केला. पण एकदा दांडी मारून दोघंच पिक्चर पाहायला जाऊ अशी फर्माईश नवर्‍याने केली (त्याचंही बरोबर होतं, मी दोन अडीच वर्षात प्रचंड फ्रस्ट्रेशन, तणावातून गेले होते) पण तिथे बसून गिल्टने धड पिक्चरही एंजॉय करता येणार नाही म्हणून नाही गेले ते आजतागायत आम्ही दोघं घरीच लॅपीवर किंवा टिव्हीवर मुव्हीज बघतो. तेही वेळ मिळाला तरच (तसं खूपच कमी वेळा होतं त्यामुळे बघायच्या असलेल्या चित्रपटांची यादी बरीच मोठी आहे Happy )

आता वाटतेय नोकरी पुन्हा चालू केली ते बरंच केलं. सासर्‍यांच्या अ‍ॅक्सीडेंट आणि नंतरच्या आजारपणामुळे नवर्‍याचा पूर्ण पगार तिथे जाई. आणि माझ्या मानसिक गरजेसाठी सॅटीस्फॅक्शनसाठी माझा जॉब गरजेचा होता.

(इथले बरेच भयानक अनुभव वाचून वाटतेय) सध्या मी अगदी पूर्णपणे निश्चिंत नसेन तरी बरीचशी आहे. निबंध समाप्त.

प्रिंसेस, तू ही ईथे लिहावस असं मला वाटतं, कारण ज्याप्रकारे तू दोन्ही मुलांना सांभाळून, नोकरी सांभाळून घराकडे बघतेस, ते मला कौतुकास्पद वाटतं Happy

प्रिंसेस, तू ही ईथे लिहावस असं मला वाटतं, कारण ज्याप्रकारे तू दोन्ही मुलांना सांभाळून, नोकरी सांभाळून घराकडे बघतेस, ते मला कौतुकास्पद वाटतं >> प्लीज लिहाच आपापले अनुभव अडचणी आणि त्यात ठेवलेला पॉझिटिव्ह अ‍ॅटीट्यूड व काढलेला मार्ग. आम्हाला शिकायला मिळेल.

इथे फक्त बायकाच लिहित आहेत का??

मी लहान असताना एक वर्ष मला व माझ्या धाकट्या बहिणीला सांभाळायला घरी कोणी नव्हते. आम्ही नुकतीच जागा बदलली होती, आजी आजोबांवर त्यांच्या वयात व आजोबांच्या बिघडलेल्या तब्येतीचा विचार करता आमची जबाबदारी टाकणे माझ्या आई वडिलांना नको वाटत होते.
आई व बाबांना गृहकर्ज, आजोबांचे कर्करोग उपचार, इतर जबाबदार्या यांमुळे रजा/ ब्रेकचा विचार करणेही परवडणारे नव्हते.
शेवटी एक पर्याय शोधला...

आमच्या राहत्या घरापासून जवळच आई-बाबांची एक मैत्रीण राहायची. आम्हाला अगदी आम्ही दोघी तान्ह्या असल्यापासून ओळखणारी... तिची मुले आमची दोस्त मंडळी! मग तिच्याकडे रोज सकाळी आम्हाला सोडायचे ठरले. तीही मध्यमवर्गीय, आर्थिक जबाबदार्या, विवंचना इ. टिपिकल त्या काळच्या समस्यांमधून जात होती.

आईबाबांनी काही आर्थिक मोबदल्याचे बदल्यात तिच्याकडे आम्हाला सकाळच्या वेळी सोडायचा निर्णय घेतला.
सकाळी ७ वाजता आम्ही घरून चहा-दूध बिस्किटे / पोळी खाऊन, आवरून, शाळेचे गणवेश चढवून, दप्तर - डबा घेऊन आईबरोबर निघायचो. ती आम्हाला मैत्रिणीकडे सोडून पुढे नोकरीच्या ठिकाणी जायची.
ह्या मावशीकडे आम्ही पोहोचेस्तोवर तिची दोन मुले त्यांच्या शाळेत व नवरा ऑफिसला रवाना झालेले असायचे. घरी तिच्या सासूबाई व धाकटा मुलगा असायचे. ही मावशी घरी ९ - ९:३० पर्यंत ट्यूशन्स घ्यायची. आम्हालाही अभ्यासाला बसवायची. १० वा. ती तिच्या नोकरीसाठी निघायची. मग त्यानंतर तिचा मुलगा व आम्ही दोघी भरपूर दंगा करून घ्यायचो! १०:३० वा. तिच्या सासूबाई आम्हाला गरम गरम वरणभात, चटणी / कोशिंबीर खाऊ घालायच्या. जेवण झाल्यावर दप्तर आवरून आमची वरात चालत चालत, रमत गमत शाळेत. तिथे बुचाची फुले वेच, गुलमोहोराच्या पाकळ्यांचा हार कर, जंगलजिमवर खेळ, चित्र काढ असे करत शाळा भरेपर्यंत कसा वेळ जायचा ते समजायचे नाही.
सायंकाळी आई घरी असायची.
अशा प्रकारे विश्वासातील, ओळखीतील घरात आम्हालाही जड गेले नाही व पालकही निर्धास्त राहिले.

इथे फक्त बायकाच लिहित आहेत का??>> अकु नवर्‍याला सांगितलं असतं पण तो नाहीये माबोवर.
नाहीतर संगोपनाचा अनुभव त्यालाही माझ्याइतकाच कांकणभर जास्तच म्हण आहे Happy

इथे फक्त बायकाच लिहित आहेत का??
<
Happy याची कारणमीमांसा करावी काय?

आमचे विचार भयानक आहेत असं सर्टिफिकेशन मिळालंय पलिकडल्या धाग्यावर. मग इथे लिहायचं टाळतोय सध्या.

नीधप | 16 May, 2014 - 10:33
विषय निघाला म्हणून... मूल रांगतं की चालतं झालं की अमेरिकेत (इतर देशातलं माहित नाही म्हणून फक्त तिथे) घर चाइल्ड प्रूफ करून घेतात. त्याच्या ठराविक गाइडलाइन्स असतात. ते जर कुणी इथे कारणांसहीत टाकलं तर निदान काय काय पद्धतीने काळजी घ्यायला हवी हे अनेक पालकांना समजेल.

>>>>

मुल रा.न्गते किन्वा चालते झाले ़की सगळ्या गिळत्या येणासारक्या गोश्टि जस नाणी, बटन, खेळणि लेगो पिसेस, पॅक ब.न्द ठेवाव्या लागतात, फर्निचरला शार्प कॉर्नर असतिल तर गार्ड बसवणे, इलेक्टिक ऑउटलेट वापरात नसतिल ़किन्वा फार खाली असतिल तर त्यावर कॅप घालणे, हॉट वॉटर टेम्प अअ‍ॅड्जेस्ट करने, घारात जिना असेल तर बेबी गेट लावणे, डायनि.न्ग टॅबल च्या चेअर वर बसायच्या छोट्ञा चेअर बसवणे,
१२ वर्शाखालिल सगळि मुल गाडित( कार) बॅक सिटवर च बसतात..बेल्ट लावणे ग्रुहित आहेच..
पाळणा घाराच लायसि.न्ग घ्यायला परिक्षा अस्तात, ह्यात काम करणार्या कुणालाही early child care certification , Red Cross certification, CPR training compulsory असते. तुम्ही किति मुल केअर करु शकाता हे तुमच्या लयसन आनी जागेवर ठरते,
१५ मुलासाठी २ प्रशिक्षका आनी एक डेकर ओनर to guide and take care of all असावा लागतो..
( हा नियम राज्य आनी तालुका निहाय आहे)
डे केअर चे परिक्षण करुन , baby proof आहे हे बघुन लायसन्स मिळते..
( काही मुद्दे राहिले असतिलच ते बाकिच्या.न्नी अ‍ॅड करा)

मूल रांगतं की चालतं झालं की अमेरिकेत (इतर देशातलं माहित नाही म्हणून फक्त तिथे) घर चाइल्ड प्रूफ करून घेतात. त्याच्या ठराविक गाइडलाइन्स असतात. ते जर कुणी इथे कारणांसहीत टाकलं तर निदान काय काय पद्धतीने काळजी घ्यायला हवी हे अनेक पालकांना समजेल. >>>

नीधप- भारतीय घराला अनुसरुन करुन घ्यायचे काही बदल

१) घरातल्या सर्व दरवाजांच्या आतल्या/बाहेरच्या कड्या या धरुन उभं रहाणार्‍या मुलांच्या हातांच्या अंतरापेक्षा उंच बसवून घ्याव्या. अडकवण्याच्या कड्या असतील तर त्या काढून टाकाव्या.
२) एलेक्ट्रिक प्लग लहान मुलांचे हात सहज पोचतील अशा उंचीवर असतील तर ते शॉकप्रूफ करुन घ्यावे. प्लग्जची भोकं टेपने बंद करावीत.
३) दिवाण, टेबल, खुर्च्या अशा सर्व फर्निचर्सचे कोपरे गोलाकारच असावेत.
४) सहज ढकलले जातील असे व्हिलवाले फर्निचर नीट स्टॉपर्स लावून घ्यावे.
५) खिडक्या, बाल्कन्या यांचे ग्रील्स डोकं अडकेल अशा डिझाईनचे असेल तर बदलावे.
६) मुलांचे हात पोहोचतील अशा उंचीवर कोणत्याही काचेच्या कॅबिनेट्स, हलके फर्निचर नसावे. औषधे, स्प्रे अशा गोष्टी सुरक्षित ठिकाणी असाव्या.
७) स्वयंपाकघरात तेलांच्या बरण्या, इतर सामान, गॅस सिलिंडर वगैरे ठिकाणी मुलं पोहोचू शकणार नाहीत याची काळजी घ्यावी.
८) मुख्य दरवाजाला आणि अनेकदा स्वयंपाकघरालाही फळी बसवून घ्यावी.
९) रांगत्या मुलाच्या हात-पायांना टोचू शकतील अशा तर्‍हेने जर फरशा, टाइल्स उखडल्या असतील तर त्यांची योग्य निगराणी आधीच करावी.
१०) भिंतीला खालच्या पातळीवर कोणतेही खिळे, खुंट्या ठोकू नयेत. आधिच असतील तर उचकटाव्या.
११) भारतीय पद्धतीचे संडास असतील तर दरवाजे कायम बंद असावेत.
१२) मुल रांगत वा सरकत असताना अडकून पडेल अशा अरुंद गॅप्स दिवाण, सोफा यांना खालच्या बाजूने ठेवू नयेत. बेड आणि भिंत यांच्यामधे स्कर्टींगमुळे गॅप पडते तीही धोकादायक.
१३) शू, चपला यांच्या रॅक्स हॉलमधे असतील तर आजूबाजूला चपला विखरुन पडणार नाहीत याची काळजी आपण घ्यावी. पाहुण्यांनाही सांगावे. रांगती मुलं चपला तोंडात घालण्याचा आवडता खेळ खेळतात जो अत्यंत अनहायजिनिक आहे.
१४) लादी पुसताना केमिकल्सने पुसू नये. त्याकरता ऑरगॅनिक पर्याय उपलबध असतात.
१५) मुलांना खेळायला घरातल्या वस्तू देताना त्यांच्या कडा, कोपरे तपासूनच द्यावे. उदा. वाट्या, चमचे इत्यादी.
१६) मुलांना घरात वावरताना सोपे, मोकळे जावे याकरता घरात शोभेच्या जमिनीवरच्या वस्तूंची अडगळ नसावी. उदा. फ्लॉवर व्हासेस, कुंड्या, पुतळे. फिश टॅन्क सुरक्षित जागी असावा.
१७) लहान फ्लॅटमधे पेट्स असतील तर त्यांची नीट व्यवस्था लावावी. शक्यतो तान्हे मुल घरात असताना आजूबाजूला कुत्री-मांजरी न वावरलेलीच चांगली.
१८) घरात जमिनीच्या पातळीवर अनेक ठिकाणी लोड, तक्क्ये, उशा असू द्याव्या. मुलांना ते आवडते आणि त्यांना बसताना, उभं रहाताना तोल गेल्यासही आधाराला त्यांचा उपयोग होतो.
१९) सुट्टे पैसे, पिना, बटणे अशा लहान आकाराच्या वस्तू घ्ररात कुठेही ठेवू नयेत.
२०) पाणी जात असेल तर अनेक घरांमधे ड्र्म्स, बादल्या यात पाणी भरुन ठेवतात. ते फक्त बाथरुममधे आणि वर झाकण लावून बंद केलेलेच असावे.

शर्मिला अतिशय उपयुक्त यादी.. यात भर
लादी टाईल्सची गुळगुळीत नसावी आणि लादीवर सांडलेले पाणी, मुलाची शू लगेचच पुसून टाकावी. नुकतेच चालायला शिकणारे मूल पाय घसरून प्डण्याची शक्यता असते.

मुलाला खेळायला पेन, पेन्सील्स, स्केच पेन्स कधी देऊ नये. डोळ्याला लागणे, कानात नाकात घालणे किंवा तोंडात घालणे इत्यादी अपघात होऊ शकतात.

मूल एकटे झोपले असेल तर सरळ लादीवर सतरंजी अंथरूण घालून झोपवावे. बेडवर बाजूला सपोर्ट लावूनही पडण्याचा धोका असतो. प्ले पेन असेल तर प्रश्नच नाही.

Pages