'आजोबा' - परस्परसंबंध ओळखा स्पर्धा - चित्र क्रमांक २

Submitted by माध्यम_प्रायोजक on 30 April, 2014 - 03:58

'ही आपल्यासमोर आहेत ही माणसं कोण?', 'नक्की चाल्लंय काय त्यांचं?', 'आणि हा कुत्रा का घाबरालाय म्हणतो मी एवढा? आता खाणार आहे का मी त्याला इथे अडगळीत?'...

आजोबाला नक्कीच असे प्रश्न अनेकदा पडले असतील. पण आता हे प्रश्न विचारणार कोणाला आणि उत्तरं देणार तरी कोण?

पण तुमचं-आमचं तसं नाही. आम्ही विचारलेल्या प्रश्नांची तुम्ही नक्की उत्तरं देऊ शकता. Proud

'आजोबा' हा चित्रपट प्रदर्शित होतोय ९ मे रोजी. त्या निमित्ताने आम्ही घेऊन आलो आहोत एक स्पर्धा.

परस्परसंबंध ओळखा स्पर्धा.

ही स्पर्धा अगदी सोप्पी बरं का!

खाली एक चित्र दिलं आहे. या एका चित्रात अजून काही चित्रं आहेत. काही आकडे आहेत, काही आकृत्या आहेत.

koda-2.jpg

या चित्रातली चित्रं, आकडे, आकृत्या 'आजोबा' या चित्रपटातल्या तीन महत्त्वाच्या कलाकारांकडे नामनिर्देश करतात.

तुम्हांला या कलाकारांची नावं ओळखायची आहेत.

हां, पण फक्त ही नावं ओळखून काम भागणार नाही. तुम्हांला या चित्रांचा तुम्ही ओळखलेल्या नावांशी संबंध कसा, हेही सांगायचं आहे. अपूर्ण उत्तरं बक्षिसासाठी विचारात घेतली जाणार नाहीत

आता आम्ही एवढी मेहनत घेतली, बक्षिसाचं काय?, असं तुम्ही विचारण्याआधीच सांगून टाकतो.

या कोड्याचं अचूक उत्तर देणार्‍या पहिल्या स्पर्धकाला मिळेल ६ मे रोजी मुंबईत होणार्‍या किंवा ९ मे रोजी पुण्यात होणार्‍या 'आजोबा'च्या शुभारंभाच्या खेळाचं एक तिकीट. या खेळाला चित्रपटातील (आजोबा वगळता) सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित असतील.

या कोड्याचं बरोब्बर उत्तर देण्याची अंतिम मुदत आहे १ मे, रात्री बारा वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार).

महत्त्वाची सूचना -

उत्तर याच बाफवर लिहायचं असलं, तरी स्पष्टीकरणासह संपूर्ण उत्तर दिलं असलं, तरच बक्षीस मिळेल.

तसंच, शुभारंभाच्या खेळाची तिकिटं चित्रपटनिर्मात्यांकडून देण्यात येतात. अपरिहार्य कारणास्तव कार्यक्रमात बदल झाल्यास तसं विजेत्यांना कळवण्यात येईल.

IMG-20140426-WA0001.jpg

तर मग लावा तुमचं डोकं कामाला, आणि बघा 'आजोबा'ला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हांला सापडतायेत का...

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

...

माप्रा सांगतात की 'कोण' यापेक्षा 'काय' याला महत्त्व द्या.
त्या अजून उत्तर न सापडलेल्या गोष्टीचा संबंध भारतीय इतिहासाशी आहे, तसाच एका मोठ्या हिंदी लेखकाच्या प्रसिद्ध पुस्तकाच्या मुखपृष्ठाशीही आहे. या दोहोंचा संबंध एका कलाकाराच्या नावाशी आहे.

फार कंटाळवाणं वाटत असेल तर उत्तर सांगून टाकू का?

ऊर्मिला = लक्ष्मणाची बायको
रामायणाच्या एका प्रचलित कथेनुसार निद्रादेवीकड़े उर्मिलाने वर मागितला होता लक्ष्म्णाचि सर्व झोप तिला देण्याचा जेणेकरून लक्ष्मण चोवीस तास रामाच्या सेवेत राहील

सुप्रसिद्ध हिंदी साहित्यिक मैथिलि शरण गुप्त यांच्या साकेत पुस्तकाचे मुख्य पात्र उर्मिला आहे

जाई,
बिंगो!!
बरोब्बर उत्तर.
फक्त एक सुधारणा. प्रेमचंद यांच्या 'बडे घर की बेटी' या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीच्या मुखपृष्ठावर झोपलेली स्त्री आहे.

कोडं सोडवण्यात सहभागी झालेल्या सर्वांचं अभिनंदन Happy

खरं म्हणजे सर्वांनाच तिकिटं देण्याची इच्छा आहे, पण तसं शक्य नाही.
त्यामुळे जास्तीत जास्त उत्तरं दिलेल्या जिप्सी, हर्पेन आणि मी_आर्या यांना प्रत्येकी एक तिकीट देण्यात येईल.

तिघांचंही अभिनंदन Happy

धन्यवाद माप्रा Happy

यशपाल शर्मा - लकीरे (नाटक​)>>>>>हे नसतं ओळखु आलं.
जाई, मस्तच.

आधीच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे मी तिकिटासाठी खेळत नव्हतो, त्यामुळे माझे तिकिट गजानन किंवा उदय यांना देण्यात यावे. Happy Happy

अजुन कोडी आहेत का? सोडवायला धम्माल येतेय. Happy

आधीच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे मी तिकिटासाठी खेळत नव्हतो, त्यामुळे माझे तिकिट गजानन किंवा उदय यांना देण्यात यावे. स्मित स्मित>>>>>>>

आम्ही पण आहोत.

उर्मिलाला पाहायचं होतं जवळून Happy

arere
kashala jyach ticket tyalach rahu det ki Happy
jipsya bayakola gheun ja movie la hakanaka
(ka tula tila mabokarana bhetavayachi bhiti watatey? Proud )

रिया, तुम्हाला देवनागरीत लिहायला काही अडचण येत असेल तर अ‍ॅडमिनांना विचारून बघा.

( रोमन पोस्टी बहुतेकदा वाचकांकडून वाचल्याच जात नाहीत. Proud )

yes I know.

mi vipu pan keli admin na but no reply :(.

baki roman posti vachalya jat nahit he agadi kharay Sad
(mi pan skip karate)

<<त्यामुळे जास्तीत जास्त उत्तरं दिलेल्या जिप्सी, हर्पेन आणि मी_आर्या यांना प्रत्येकी एक तिकीट देण्यात येईल.<<
हॉय्लॉ... मला पण तिकिट लागलय काय???
मी आता पाहिलं हे. ४ दिवस गावाला गेले होते.

धन्यवाद माप्रा!! Happy

Pages