'आजोबा' - परस्परसंबंध ओळखा स्पर्धा - चित्र क्रमांक २

Submitted by माध्यम_प्रायोजक on 30 April, 2014 - 03:58

'ही आपल्यासमोर आहेत ही माणसं कोण?', 'नक्की चाल्लंय काय त्यांचं?', 'आणि हा कुत्रा का घाबरालाय म्हणतो मी एवढा? आता खाणार आहे का मी त्याला इथे अडगळीत?'...

आजोबाला नक्कीच असे प्रश्न अनेकदा पडले असतील. पण आता हे प्रश्न विचारणार कोणाला आणि उत्तरं देणार तरी कोण?

पण तुमचं-आमचं तसं नाही. आम्ही विचारलेल्या प्रश्नांची तुम्ही नक्की उत्तरं देऊ शकता. Proud

'आजोबा' हा चित्रपट प्रदर्शित होतोय ९ मे रोजी. त्या निमित्ताने आम्ही घेऊन आलो आहोत एक स्पर्धा.

परस्परसंबंध ओळखा स्पर्धा.

ही स्पर्धा अगदी सोप्पी बरं का!

खाली एक चित्र दिलं आहे. या एका चित्रात अजून काही चित्रं आहेत. काही आकडे आहेत, काही आकृत्या आहेत.

koda-2.jpg

या चित्रातली चित्रं, आकडे, आकृत्या 'आजोबा' या चित्रपटातल्या तीन महत्त्वाच्या कलाकारांकडे नामनिर्देश करतात.

तुम्हांला या कलाकारांची नावं ओळखायची आहेत.

हां, पण फक्त ही नावं ओळखून काम भागणार नाही. तुम्हांला या चित्रांचा तुम्ही ओळखलेल्या नावांशी संबंध कसा, हेही सांगायचं आहे. अपूर्ण उत्तरं बक्षिसासाठी विचारात घेतली जाणार नाहीत

आता आम्ही एवढी मेहनत घेतली, बक्षिसाचं काय?, असं तुम्ही विचारण्याआधीच सांगून टाकतो.

या कोड्याचं अचूक उत्तर देणार्‍या पहिल्या स्पर्धकाला मिळेल ६ मे रोजी मुंबईत होणार्‍या किंवा ९ मे रोजी पुण्यात होणार्‍या 'आजोबा'च्या शुभारंभाच्या खेळाचं एक तिकीट. या खेळाला चित्रपटातील (आजोबा वगळता) सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित असतील.

या कोड्याचं बरोब्बर उत्तर देण्याची अंतिम मुदत आहे १ मे, रात्री बारा वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार).

महत्त्वाची सूचना -

उत्तर याच बाफवर लिहायचं असलं, तरी स्पष्टीकरणासह संपूर्ण उत्तर दिलं असलं, तरच बक्षीस मिळेल.

तसंच, शुभारंभाच्या खेळाची तिकिटं चित्रपटनिर्मात्यांकडून देण्यात येतात. अपरिहार्य कारणास्तव कार्यक्रमात बदल झाल्यास तसं विजेत्यांना कळवण्यात येईल.

IMG-20140426-WA0001.jpg

तर मग लावा तुमचं डोकं कामाला, आणि बघा 'आजोबा'ला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हांला सापडतायेत का...

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मधला तामिळ या कन्नड तेलगु जे काही चित्रपट आहे त्याचा हिरो आहे चक्रवर्ती
चक्रवर्ती ने "सत्या" या हिंदी चित्रपटात "उर्मिला मार्तोंडकर" यांच्याबरोबर काम केलेले

मुखवट्याचा सोनेरी लोगो नैशनल स्कूल ऑफ ड्रामाचा आहे. त्यांचे या चित्रपटात कॉन्टिब्युशन असेल किंवा फक्त नैशनल हा शब्द नैशनल पार्क साठी कीवर्ड म्हणून वापरला असेल.

लोकहो,

सगळी उत्तरं एकत्र आणि व्यवस्थित द्या कृपया Happy
नाहीतरी विजेता कसा निवडणार?
शिवाय सर्वच्या सर्व चित्रांचा योग्य संबंध लागायला हवा.

यशपाल शर्मा- नॅशनल स्कुल ऑफ ड्रामाचा विद्यार्थी
उर्मिला मातोंडकर- चित्रात दिलेल्या साउथ इंडीयन सिनेमात आहे

१. उर्मिला मातोंडकर - Anaganaga Oka Roju तेलगु सिनेमा. मुख्य अभिनेत्री + बडे घर कि बेटी
२. यशपाल शर्मा - नॅशनल स्कुल ऑफ ड्रामाचा विद्यार्थी
३. ऋषिकेश जोशी - कमीने (लेले)

रुशिकेश जोशी- कमिने चित्रपट
चिन्मय कुलकर्णी - आधिच्या प्रतिसादात सांगितल्याप्रमाणे

नैशनल स्कूल ऑफ ड्रामा ????

येस... यशपाल शर्मा हे नॅशनल स्कुल ऑफ ड्रामाचे विद्यार्थी आहेत

उघड्या विहिरीत पडलेला.. रेस्क्यूची वाट बघणारा बिबट्या उर्फ आजोबा यांचं प्रतिनिधीत्व करणारं लहान मुल?

ते तेलुगु आहे. पण सिनेमा कुठला, ते नाही समजलं.. >>>>>>> मला तेलगु वाचता आले असते तर......... साउथ चित्रपटात काम नसते का केले असते Happy

मी तिन ओळखली आहेत ... मला अर्धे तिकिट द्या ....... बाकिचे अर्धे इतर ३ ओळखतील त्यांना द्या Wink

माप्रा, यशपाल सिन्हा +,त्यांची मुलगी असं काही आहे का? Happy

उत्तर "हो" किंवा "नाही" मध्ये द्या. Proud

मला अर्धे तिकिट द्या >>> उदय, तुला तसंही अर्धं तिकिटच द्यायला पाहिजे.

जिप्सी... रुमालातून मी क्लू दिलाय आता तू संबंध लाव बरं. Happy

बिबळ्याचा रंग पिवळा असतो आणि १००० म्हनजे त्याने चाललेले तितके किलोमिटर्स ?

लाईन्स म्ह्णजे रांगा .......... सह्याद्री च्या रांगा ? आजोबा तिथुनच आलेला

यशपाल शर्मा- नॅशनल स्कुल ऑफ ड्रामाचा विद्यार्थी
उर्मिला मातोंडकर- चित्रात दिलेल्या साउथ इंडीयन सिनेमात आहे. आणि त्या समांतर रेषा- 'समांतर' हा शर्मिला टागोरचा पहिला मराठी सिनेमा. तद्वतच उर्मिलाचा हा पहिला मराठी सिनेमा. Proud
ऋषीकेश जोशी- कमिने(चित्रात दिलेलं) आणि येल्लो (पिवळ्या चौकोनाचं चित्र) या दोन्ही सिनेमात काम केलय.

Pages