१०) ऑटीझम स्पेशल अ‍ॅक्टीव्हिटीज व कोपिंग टेक्निक्स

Submitted by Mother Warrior on 16 April, 2014 - 17:06

प्रत्येकालाच एक कम्फर्ट झोन असतो. ती अमुक एक गोष्ट केली की बरं वाटतं, किंवा अमुक एक पदार्थ खाल्ला, कॉफी प्यायली की बरं वाटतं. अशा सारखेच काही कम्फर्ट झोन्स ऑटीझम असलेल्या मुलांचेही असू शकतात.
फक्त फरक हा आहे, की ती मुलं आपल्याला येऊन सांगू शकत नाहीत. त्यामुळे केअरगिव्हरलाच त्यांच्या दृष्टीने विचार करून वेगवेगळ्या अ‍ॅक्टीव्हिटीज कराव्या लागतात.

१) stimming : ऑटीझम अंतर्गत जवळपास प्रत्येक मूल स्टीमिंग बिहेविअर दाखवून देतेच. स्टीमिंग म्हणजे काय? तर Self-stimulatory behavior. मग ते हाताचे फ्लॅपिंग असेल, गोल गिरक्या घेणे असेल, किंवा छोटासा मणी दोन बोटात फिरवत बसणे असेल, किंवा वुडन ब्लॉक्स - खेळणी एका रांगेत लावून ठेवणे असेल. प्रत्येक मुलाची पर्सनालिटी वेगळी त्यामुळे प्रत्येकाची तर्हा वेगळी. लक्षात ठेवा : If you meet one person with autism, you've met one person with autism.

IMG_2180.JPG
मला शक्यतो मुलाचे हे बिहेविअर जितके कमी करता येईल तितके करायचे असते. आयडियली. परंतू कधीकधी परिस्थिती अगदीच हाताबाहेर गेलेली असते. कधी तो सर्दीने बेजार असतो. कधी घरात खूप लोकं असतील. किंवा कधी नुसताच कंटाळा आला असेल त्याला. अशा वेळेस मात्र मी मुद्दाम स्वतःहून खेळणी लाईन अप करत बसते. कधी आम्ही दोघंही हँड फ्लेपिंग करतो. कधी सलग १०-१५ मिनिटं एकेका पायाने हॉपिंग करत त्याचा हॅपी डान्स करतो. माझ्या मुलाला इन्स्टंटली बरं वाटतं. मला खात्री आहे यामुळे माझ्या मुलाला मी 'त्याच्या जगात' आल्याची भावना होत असेल. हे आपल्या जगाच्या दृष्टीने वेडं वागणं असेल, पण त्याने मुलाशी झटक्यात कनेक्ट होता येतं. प्रत्येक पालकाने हा असा हॅपी डान्स केलाच पाहीजे.

२) deep pressure : मागे लिहीलेल्या सेन्सरी इंटीग्रेशनच्या लेखामध्ये आपण proprioceptive sense बद्दल थोडक्यात वाचले. proprioceptive sense म्हणजेच बॉडी पोझिशन. हा सेन्स फार जास्त प्रमाणात आपले अस्तित्व दाखवून देतो. त्यामुळे सोफ्यावर सतत जाऊन आदळणे, मसल्स ताठरणे, कुठेतरी अडगळीत जाऊन बसणे असे प्रकार होतात. या सेन्सला थोडसं अजुन सेन्सिबल बनवण्यासाठी घरात एक मोठी बीन बॅग हवीच. peapod_beanbag.jpgबीन बॅगवर जाऊन क्रॅश होणे, त्यात लोळणे हे नुसतेच आरामादायी नाही तर ह्या मुलांसाठी फार उपयोगी आहे. बीन बॅगेच्याच मटेरियलसारखी मोठी गादी असेल तर त्या गादीमध्ये त्याला रॅप करून वरून डीप प्रेशर द्या.
ऑक्युपेशनल थेरपिस्टला विचारून प्रत्येक जॉईंटला डीप प्रेशर कसे द्यायचे हे शिकून घ्या. ही मुलं toe walking सतत करत असल्याने चवड्यांकडील भाग अगदी घट्टे पडल्यासारखा होतो. सतत पाऊल बाहेरच्या बाजूल स्ट्रेच केल्यामुळे आपण डीप प्रेशर देताना पाऊल शरीराच्या दिशेला वळवतो - त्याने मुलांना बरे वाटते. याचप्रमाणे दिवसभरात जमेल तेव्हा त्यांना अतिशय घट्ट मिठी मारावी. खांदे आतल्या साईडला दाबावेत. कुठल्याही बिहेविअर प्रॉब्लेमला डीप प्रेशर हे बर्‍याचदा उत्तर असते.. Happy

३) epsom salt bath : एप्सम सॉल्टने अगदी पटकन शांत वाटते. तसेच काही इजा झाली असेल तरी त्यावर फायदा होतो. त्याहीपेक्षा महत्वाचा फायदा - ऑटीझम असला की gut problems असतातच. त्यामुळे अन्नातील आवश्यक गोष्टी शरीराला मिळतीलच असे नाही. उदा: सल्फर. एप्सम सॉल्ट जेव्हा गरम पाण्याच्या बाथमध्ये आपण मिसळून/सोक करून त्यात मुलाला २० मिनिटं बसवतो तेव्हा त्वचेतील पोअर्समधून सल्फर शरीराला मिळते. ह्या उपायाने खात्रीशीर फायदा होतो. मूल बर्‍याचदा शांतपणॅ झोपी जाते नंतर. बिलिव्ह मी, हा खूप मोठा फायदा आहे. ऑटीस्टीक मूल शांतपणे झोपी जाणे हे दिवसभरातील अचिव्हमेंट असते. बर्याचदा एप्सम सॉल्टनंतर मूल खूप अटेन्टीव्ह झाल्याचेही आढळून येते. रोज असा बाथ दिला तरी चालतो.

४) PECS [ Picture Exchange Communication System ] : ही खरंतर एक पध्दत आहे संवादाची. परंतू आमच्या घरात पेक्स आल्यापासून बरीच शांतता प्रस्थापित झाली आहे. नाहीतर फ्रस्ट्रेशन लेव्हल इतकी जास्त होती आधी, की सतत चावणे, ओरबाडणे, डोकं आपटणे असंच सगळं चालायचे. परंतू पेक्स आल्यापासून माझ्या मुलाला अगदी हुकमी एक्का मिळाला आहे संवादाचा. अर्थात हे आमचे काम की त्याला कुठल्या गोष्टींचे पेक्स लागतील, तो विचार आम्ही करून, फोटो काढून, प्रिंट करून मग ते लॅमिनेट करून मागे वेल्क्रो लावून पेक्सचे पुस्तक तयार करणे. ही सिस्टीम बरीच किचकट आहे. परंतू त्याचा फायदा इतका आहे की मी अगदी आवडीने हे काम करते. लॅमिनेटर घरातच आणून ठेवल्यामुळे बरंच सोपं झाले आहे आता. माझ्या घरातील पेक्सबुकमधील हे एक पान. हे माझ्या मुलाचे आवडते शोज आहेत. IMG_2185.JPG
याचप्रमाणे त्याच्या दुधाचा कप, पाण्याची बाटली, आवडीचे खाण्याचे पदार्थ, डायपर इत्यादी गोष्टींचे पेक्स आम्ही तयार करून ठेवले आहेत.
मी मागे सांगितल्याप्रमाणे माझ्या मुलाला आता वाचता येते. त्यामुळे पेक्ससारखीच मी आता वेक्स सिस्टीम घरात चालू केली आहे. वर्ड्स एक्स्चेंज कम्युनिकेशन सिस्टीम. त्याच्या दैनंदिन जीवनातील महत्वाच्या अ‍ॅक्टीव्हिटीजच्या शब्दांना मी लॅमिनेट करून कार्ड्स तयार करून घरी चिकटवली आहेत. उदा: हे शाळेला जातानाचे कार्ड. ही मुलं व्हिज्युअल लर्नर असल्याने डोळ्यांनी त्यांनी ते स्केज्युल पाहीले की त्यांचे मन जरा तयार होते पुढील कार्यक्रमासाठी. सरप्राईझेस आर नो नो इन अवर हाऊस.
IMG_2187.JPGIMG_2188.JPG
असेच झोपतानाचे आहे, जेवायच्या वेळेचे आहे. पार्कमध्ये जायचे आहे. मी प्रत्येक सिनारिओ तर नाही प्रिंट करू शकत परंतू महत्वाच्या गोष्टी जिथे त्याने कम्युनिकेट करणे गरजेचे आहे किंवा त्याने ती गोष्ट करणं भाग आहे, अशा वेळेस याचा खूपच उपयोग होतो. कालच मुलाने घरात पाहुण्यांशी मी गप्पा मारत असताना मला 'बेड' हा शब्द आणून दिला. कारण तो खूप पेंगुळला होता. Happy

५) Sensory Brush मसाज :

sensorybrush.png
या अशा सेन्सरी ब्रशने मुलाचे सर्व अंग, मुख्यत्वेकरून हात, पाय, पोट व पाठ हे हलक्या हाताने घासावेत. खसाखसा नाही. एकाच दिशेने जरा दाब देऊन ब्रश घासत न्यावा. सेन्सरी इंटीग्रेशनच्या दृष्टीने या एक्झरसाईझचे महत्व आहे. पहिल्यांदा ओटीने जेव्हा आमच्या मुलाला असा मसाज दिला तेव्हा आम्ही प्रथम आमच्या मुलाला नंतर शांतपणे खुर्चीवर बसून राहीलेले पाहीले.

६) sign language : ही एक खूप महत्वाची स्टेप आहे मुलांच्या कम्युनिकेशनमधली. खरंतर आता मी भूतकाळात जाऊन बदल करू शकले तर मला मुलाला अगदी तान्हा असल्यापासून साईन लँग्वेज शिकवायला आवडेल. उगीचच नकोसे फिलिंग येते खरे, की सईन लँग्वेज शिकवली की हा बोलणारच नाही की काय. तसे होत नाही. उलट होण्याची शक्यता जास्त. मुलांना साईन लँग्वेजनुसार कम्युनिकेशनची सवय लागली की त्यांना त्यातली सहजता कळते. व आपण तर त्याने केलेल्या साईनवर तो शब्द उच्चारून दाखवतोच. त्यामुळे शब्दही कानावर पडतो व असोशिएशन पटकन होते. मी सर्व पालकांना सांगीन की तुमचं बाळ स्पेक्ट्रमवर असो वा नसो, बेसिक साईन लँग्वेज शिकवा. मोअर, ऑल डन, हेल्प, कुकी, मिल्क, ड्रिंक, ईट इत्यादी. हे खूप सोप्पे हातवारे असतात व मुलं कम्युनिकेट करायला लवकर शिकतात. माझा मुलगा वरीलपैकी कुकी व ड्रिंक वगळता साईन्स करतो त्यामुळे देखील आमचे काम सोपे होते. प्लीज ही भाषा शिका व शिकवा मुलांना.

या व अशाच बर्याच अ‍ॅक्टीव्हिटीज, टेक्निक्स आम्ही दिवसभरात मुलाबरोबर करत असतो. या सर्वांचा कुठेनाकुठेतरी फायदा होतोच. अजुनही कितीतरी गोष्टी आहेत. हगिंग मशिन आहे, बॉडी सॉक आहे, ट्रॅम्पोलिन आहे. जे जे मुलाच्या दृष्टीने फायद्याचे ते ते करत राहायचे. फळाची अपेक्षा न करता. Happy

http://marathi.journeywithautism.com/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

khoop sundar mahiti det rahates. ha lekh suddhaa khoop chhan lihila aahe. tujhe kautuk karawe tewadhe kami aahe!!!!!

>>जे जे मुलाच्या दृष्टीने फायद्याचे ते ते करत राहायचे. फळाची अपेक्षा न करता. >> खरंच आहे तुम्ही म्हणता ते.
केवढे कष्ट आहेत साध्या साध्या अ‍ॅक्टिव्हीटीज, रूटिनमध्ये. तुम्ही एवढं चांगली माहिती देताय म्हणून कळतंय.

थँक्स बी,सायो, रूनी पॉटर.

मी अजुन एक मुद्दा अ‍ॅड केला आहे. साईन लँग्वेज. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे हा. कशी विसरले मघाशी कोण जाणे.

अतिशय सुंदर माहिती.
आता वाटतंय लहानपणापासून मतिमंद ठरवले गेलेले किती जण केवळ ऑटिस्टिक असतील.
असंच काही जर पहिल्यापासून शिकवलं गेलं असतं तर ती मुले कुठल्या कुठे गेली असती.

//आता वाटतंय लहानपणापासून मतिमंद ठरवले गेलेले किती जण केवळ ऑटिस्टिक असतील.
असंच काही जर पहिल्यापासून शिकवलं गेलं असतं तर ती मुले कुठल्या कुठे गेली अस//// अगदी बरोबर

खूप माहिती मिळतेय. तुम्ही हे एवढ सगळे करता हे इतर पालकांसाठी खूप प्रेरणादायी आहे>>++११

खुपच छान... आम्हि खुप काहि शिकतोय तुमच्या कडुन..

faLaachi apexa na thevata > he kiti sahaj lihitay tumhi. sagalyach palakani baaNavaava asa gun. Happy

खुप सुंदर.

मायबोली प्रशासनाला विनंति करून हे सर्व लेख एका मालिकेत गुंफणार का ? म्हणजे ते एकत्र वाचता येतील.
शिवाय गूगल सर्च मधेही दिसतील. अशा खास बालकांच्या पालकांसाठी ते खुप उपयोगी ठरतील.

धन्यवाद!!

साती, "आता वाटतंय लहानपणापासून मतिमंद ठरवले गेलेले किती जण केवळ ऑटिस्टिक असतील"... हे खरे आहे. मतिमंद सुद्धा टोक झाले. तो अमुक ना नादीष्टच आहे, एककल्ली आहे, माणूसघाणा आहे इत्यादी विशेषणं लाभलेली लोकंदेखील काही अंशी स्पेक्ट्रमवर असू शकतील. माझ्या मुलाच्या डायग्नॉसीसनंतर तसेच इतर वाचनावरून मला हेच वाटू लागले आहे, प्रत्येक माणूस असतोच स्पेक्ट्रमवर कुठेतरी. इन्टेन्सिटी कमी जास्त. जास्त झाली तर ASD, ADHD अशी अल्फाबेट्स चिकटतात मग.

दिनेश. अ‍ॅड्मिन यांनी वेगळा सपोर्ट ग्रुप तयार केला आहे, त्यात मला लेख लिहीता येतात आता. लेखमालिका गुंफणे अ‍ॅड्मिन करत असतात. पण ते नाही झाले तरी सपोर्ट ग्रुपच्या लिंकवर क्लिक केले की सर्व लेख एकत्र दिसतात.

>>तो अमुक ना नादीष्टच आहे, एककल्ली आहे, माणूसघाणा आहे इत्यादी विशेषणं लाभलेली लोकंदेखील काही अंशी स्पेक्ट्रमवर असू शकतील>> सहमत. त्यामुळे भारतात ऑटिझम फारसा दिसत नाही ह्यात फार तथ्य नसावं.

स्वमग्नता, छान मांडलात हाही लेख. एवढ्या महत्त्वाच्या खाचाखोचा अन्यथा क्वचितच कळल्या असत्या...

तुमचे लेख वाचताना अनेकदा थक्क व्हायला होतं. पालक म्हणून अशा पिल्लांच्या जगातल्या दातेरी खळग्यांत स्वतःला अगदी जाणीवपूर्वक मोल्ड करून घेऊन त्यांच्या दिनक्रमात जास्तीत जास्त कम्फर्ट मिळवून द्यायचा म्हणजे... प्रत्येक गोष्टीत किती नियोजन करावे लागत असेल.. तुमच्या लेखनातून याची कल्पना येतेय.

छान माहिती.

माझ्या मुलांच्या शाळेत लोअर स्कूलमधे बरेच स्टिमिंग ऑप्शन्स देतात मुलांना - ते स्टिमिंग आहेत हे तुमचा लेख वाचून कळले .

रबरबँडस, चिकटपट्टीचे तुकडे , टेबलच्या खालच्या बाजूला वेल्क्रोचे तुकडे असं काही काही देतात ज्याने मुलांना फोकस्ड रहायला मदत होते.

नेहमीप्रमणेच उत्तम लेख !!

तो अमुक ना नादीष्टच आहे, एककल्ली आहे, माणूसघाणा आहे इत्यादी विशेषणं लाभलेली लोकंदेखील काही अंशी स्पेक्ट्रमवर असू शकतील>> सहमत!!
माझा मावसभाऊ लहानपणापासून अतिशय तापदायक , त्रासदायक , विध्वंसक आहे. शाळा , कॉलेज इतकेच् काय पण अता कामाच्या ठिकाणीही लोक त्याच्या वागण्याला प्रचंड वैतागतात. अता तो ३५- ३६ वर्षाचा झालाय तरी वागण्यात , बोलण्यात अज्जीबात मॅच्युरीटी नाही. अतिशय विचित्र , बालीश वागणे. मावशी तर नेहमीच 'आमच्या मूळावरच आलाय हा' असे म्हणत असते. तो तसाच आहे , असा आमचा सगळ्यांचा समज आहे.
इथे अमेरिकेत आल्यावर मला ADHD हा प्रकार माहिती झाला. जेव्हा गूगल करून ADHD ची सगळी लक्षणे पाहिली तेव्हा ती सगळीच त्याच्या वागण्याशी अतिशय मिळती जुळती आहे हे लक्षात आले. त्याला ADHD असावा असा मला दाट संशय आहे. अर्थात, मी काही तज्ञ नाही पण तरी लहानपणापासून त्याचे वागणे अतिशय जवळून बघितले आहे , त्यामुळे तसे वाटतेय.

खूप सुंदर माहिती. ह्यातील खूप माहिती मला नवीन आहे. माझ्या मूलाला ओ.टी. चालू होते तेव्हा एप्सम salt आणि सेन्सरी ब्रश मसाज ह्याची माहिती नव्हती मिळाली मला. मी त्याच्या सध्याच्या टीचरला पण विचारीन, त्याला जिमball चा मसाज कधी कधी देतो. काही वर्षापूर्वी त्याचा एक पाय कमरेतून आखडायला सुरुवात झाली होती आणि तो नीट चालत नव्हता तेव्हा तपासण्या केल्या आणि तेव्हा ओ.टी. मध्ये जिम ballची treatment दिली आणि घरीपण आणला आम्ही. त्या treatmentमुळे आणि कॅल्शियम दिल्याने तो परत नीट चालायला लागला.

वरील काही उपाय विशेषतः सेन्सरी ब्रश आणि एप्सम salt मी करून बघेन.

Thank u very much.

>>प्रत्येक माणूस असतोच स्पेक्ट्रमवर कुठेतरी.
एकदम पटले.

तसेच पहिल्या मुद्द्यातले स्टिमिंग टाळायला / कमी करायला नको असे वाटले. जर काही दुखापत होत नसेल, (स्वतःला / इतरांना) तर काय हरकत आहे? तालात नाचल्याने / डोलल्याने कुणालाही बरे वाटते तसेच पेंग्विन फ्लॅपिंग.

एकूण लेख उत्तम.

धन्यवाद परत एकदा.
गजानन किती बरोबर टर्मिनॉलॉजी वापरली तुम्ही. Happy ही अशीच परिस्थिती आहे खरी. आमचे दैनंदिन आयुष्य फारच वेगळे असते बाकीच्या फॅमिलीज पेक्षा.

डेलिया, जवळचे रिलेशन असेल तर भावाशी बोलून पाहा मग. माझ्या वाचनावरून अ‍ॅडल्ट्सना उशीर्‍आ जरी निदान झाले तरी एक क्लोजर मिळाल्यासारखे होते. 'ओह हे असं होतं म्हणून मला कायम अमुक वाटायचे" इत्यादी.

अन्जू, नक्की वापरून पाहा उपाय. भारतात मिळते का एप्सम सॉल्ट. सेन्सरी ब्रशबद्दल तुम्ही ओटीला विचारू शकता. माझ्या मुलाची भारतातील ओटी, युएसमधील थेरपीकॅटलॉगवरून वस्तू मागवायची, कधी माझ्या मुलाला द्यायची वापरायला. तसं करता येतंय का विचारा. आशा आहे याने काहीतरी फाय्दा होईल. डीप प्रेशर जॉईंट्सना याबद्दलही विचारून पाहा.

मृदुला, दुखापत प्रत्यक्षदर्शनी नसली तरी स्टिमिंग बिहेविअर हे खूप अडथळा आणते प्रगतीला. रिपिटेटिव्ह बिहेविअर करत राहणे हे होतंच ऑटीझममधे. जर स्टिमिंग खूप काळ करू दिले तर ट्रान्समध्ये गेल्यासारखी होतात मुलं. आधीच अटेन्शन स्पॅन फार कमी असतो , नावाला रिस्पॉन्ड करत नाहीत त्यात तंद्री लागली किंवा जसं माझा मुलगा नुसता पळतच राहतो.. नुसतं पळून पळून बॅटरी चार्ज झाल्यासारखे होऊन खूप हायपर अ‍ॅक्टीव्ह झाले मूल की सांभाळणे अवघड जाते. अनकंट्रोलेबल. माझ्या मुलाला सतत जिभेवरून फ्लॅपिंग करायची सवय लागली होती. इतकी की त्याच्याकडून कुठल्या अ‍ॅक्टीव्हिटीज करून घेणे अवघड जायचे. किंवा ब्लॉक्स सतत ओळीने लावून ठेवायची सवय लागली की त्याच्याशी व्यवस्थित खेळणे जमत नाही मुलांना. डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागते वागणूकीकडे. कदाचित मी जास्त डिफेन्सिव्ह बनत असीन त्याच्या सवयींबद्दल. तीही शक्यता आहे.

माझ्या वाचनावरून अ‍ॅडल्ट्सना उशीर्‍आ जरी निदान झाले तरी एक क्लोजर मिळाल्यासारखे होते. 'ओह हे असं होतं म्हणून मला कायम अमुक वाटायचे" इत्यादी.>>> एकदम मान्य, मी माईल्ड डिसलेक्सीक होतो (काही बाबतीत अजूनही आहे!) हे मला तारे जमीं पर बघीतल्यावर लक्षात आले.

I am very proud of your little one for bringing that BED card to you. That means the inner coordination between
need and action is correctly associated in his mind. You are a wonderful parent.

Not able to type in Marathi from office.

अंजु, इप्सम सॉल्ट बाजारात मिळते इथे.
साध्या किराणा दुकानात रॉक सॉल्ट किंवा सैंधव म्हणून मिळते ते गुलाबी रंगाचे असते आणि त्यात मॅग्नेशियम सल्फेट बरोबरच इतर अनेक खनिजे असतात.
मेडिकल स्टोअरमध्ये मॅग्नेशियम सल्फेट किंवा मॅगसल्फ पावडर म्हणून मागून बघा.
५० ग्रॅ/ १०० ग्रॅ असे मिळतात. बर्यापैकी स्वस्त असतात.
मोठ्याना इप्सम बाथ चे फायदा मिळण्यासाठी एक टब पाण्यात कमीतकमी २०० ग्रॅ तरी सॉल्ट हवं.
लहानाना बाथ देताना हे पाणी तोंडात तर जात नाही ना ही काळजी घ्यायला हवी.

नेहमीप्रमणेच उत्तम लेख !!

कालच मुलाने घरात पाहुण्यांशी मी गप्पा मारत असताना मला 'बेड' हा शब्द आणून दिला. कारण तो खूप पेंगुळला होता.>>> कीती गोड Happy