९) ऑटीझमचे फायदे

Submitted by Mother Warrior on 3 April, 2014 - 16:19

शीर्षक वाचून दचकायला झाले ना? मलाही लिहीताना अवघड गेले. पण मुलाच्याबरोबरीनेच माझाही पर्स्पेक्टीव्ह बदलत चालल्याचे लक्षण असावे हे.

मी हा लेख लिहीत आहे याचा अर्थ असा नाही की सगळं आलबेल आहे. ऑटीझमच्या बरोबर येणारे त्रास काही कुठे जात नाहीत. इन फॅक्ट त्या त्रासाबद्दलच मी इतके दिवस लिहीत आहे इतक्या लेखांमधून. पण आज जरा वेगळ्या अँगलने विचार करू.

माझ्या मुलाला ऑटीझम आहे म्हणूनच :

  • त्याचा इनोसंस वयाच्या ३-४ वर्षापर्यंत टीकून राहीला आहे. अजुनही त्याच्याकडे पाहील्यावर, त्याचे खेळणे पाहील्यावर एखादे बाळच वाटते ते. आम्हाला मनापासून आनंद देते हे बाळ! Happy
  • पूर्णपणे शुद्ध्/प्युअर मन आहे त्याचे. त्याला खोटं बोलायला कधीही जमणार नाही. लबाडी, कोणाची फसवणूक कधीही जमणार नाही.
  • तो कधी फारसा रडत नाही. हे खरंतर फारसं चांगले नाही त्याच्या दृश्टीने. परंतू आमच्या आधीच चिंतेने ग्रासलेल्या घरात सतत मुलाचं व्हायनिंग व रडणं असतं तर अवघड गेलं असतं आम्हाला कायम सॅनिटी टिकवणं!
  • तो कधीच दमत नाही! (कदाचित त्याला कळत नसेल.) परंतू तो कायम हसतमुख असतो. आमच्यासाठी रोजचा धडा असतो तो. काहीही होऊदे, सगळं जग मनाविरूद्ध चालत राहूदे, पण मन कायम आनंदी असले पाहीजे.
  • त्याच्या सेन्सरी इंटीग्रेशनच्या प्रॉब्लेममुळे आम्ही अचानक स्वतःला मिळालेल्या पाचही, नाही सातही इंद्रियांच्या दैवी देणगीबाबत ऋणी झालो आहोत. आपला मेंदू एकाच वेळेस गाडी चालवतो आहे, सिग्नल्स पाळतो आहे, पेडेस्ट्रियन येत असेल तर ते टिपतो आहे, फायर इंजिन आले तर तो आवाज ऐकून लगेच गाडी बाजूला घेत आहे, त्याचवेळेस शेजारी बसलेल्या नवरा/बायकोशी पुढील महीन्यातील महत्वाच्या कामांची यादी करत आहे,त्याचवेळेस नाकाला खाज सुटली तर नाक खाजवत अहे. सगळं विदिन २ मिनिट्स! किती मल्टीटास्कींग करतो आपण!! we should really be thankful to our brains!
  • वयाच्या १.५व्या वर्षीपासून माझ्या मुलाला सर्व अल्फाबेट्स, शेप्स, कलर्स, नंबर्स पूर्णपणे येतात. ऑक्टॅगॉन, ट्रॅपेझॉईड सुद्धा! त्याच्या वयानुसारच्या अ‍ॅप्स्/व्हीडीओज मध्ये नंबर्स केवळ १ ते १० असतात. त्यामुळे मी त्याला १ ते ५० आकडे शिकवले. माझी खात्री आहे त्याला ३० पर्यंत नक्की येतात आकडे. हे झाले माझ्याकडून. तो स्वतः युट्युबवर १००,१००० इत्यादी आकड्यांबद्दलची गाणी शोधून ऐकत असतो. असल्याबाबतीत एकपाठी असल्यामुळे ते ही येत असावे त्याला. मला पत्ता नाही. शिवाय अ‍ॅप्स व व्हीडीओजवरून तो गणिताचे बेसिक्स पण शिकतोय सध्या. २+२=४ , १२+२=१४ इत्यादी. त्याच्यादृष्टीने तो मजा करतोय. परंतू त्याचा ब्रेन त्या कन्सेप्ट्स रजिस्टर करून घेत असतो.
  • दुसर्‍या वर्षीपासून त्याला वाचता येऊ लागले. तेव्हा शब्द दाखवायचा बरोबर. आता स्टोरीबुक्स मधील शब्दांवर स्क्रोल होत वाचणॅ खूप आवडते. व्हेजीटेबल, एलिफंट, हार्वेस्ट, झायलोफोन इतक्या मोठाल्या शब्दांचे स्पेलिंग त्याला अचूक येते. वॉटर, मिल्क, डान्स, सिंग, वॉक, बेबी आईनस्टाईन, सुपर व्हाय, कुकीज इत्यादी शब्दांचे कार्ड्स तो माझ्याकडे आणून देतो - जेव्हा त्यातली अमुक गोष्ट त्याला हवी असते. मी त्याच्याशी संवाद साधताना कायम त्याच्या मॅग्नेटीक पाटीवर ऑप्शन्स लिहून देते. Eat - Poli or Oatmeal. तो त्यातील हव्या त्या शब्दावर बोट ठेऊन तो पदार्थ खातो.
  • रंगामध्ये रमायला तर आवडतच आले आहे त्याला. त्यामुळे चित्रकलेत बराच वेळ रमतो. नवीन स्किल, स्मायली फेस काढणे. ते बर्‍याचदा ग्रम्पीच येतात. परंतू तो प्रयत्न करतोय!
  • लिहायला शिकतो आहे तो- वयाच्या ३.५ वर्षी! अक्षरं सुबक व छोटी नाही येत त्याला काढता. परंतू A to Z पर्यंत सर्व अक्षरं त्याला लिहीता येतात. त्याची पेन/ मार्कर धरायची ग्रिप्/होल्ड जरा चुकत असल्याने त्रास होत आहे. मी त्याला सध्या हेच शिकवते. मार्कर्स पुढे धर. व्यवस्थित मोठ्या माणसांसारखा तीन बोटात धरतो तो. पण मार्करच्या शेवटी धरल्याने काम सोपे होते. मला घाई काहीच नाही आहे. त्याला लिहीता येते हेच माझ्यासाठी वरदान आहे! अक्षर कसं का असेना!
  • एव्हढुस्सं बाळ. परंतू एक नंबर 'फ्रेंडस मधील मोनिका" आहे! घरात फिरताना कुशन खाली पडलेले त्याला चालत नाही. तो उचलून ठेवतो. डब्याचे झाकण उघडे राहीले - जमत असेल तर बंद करतो. भिंतीवरील आर्टवर्कची जागा बदलेली लगेच कळते त्याला. बेडची चादर अस्ताव्यस्त तर मुळीच खपत नाही. रात्री ३ वाजता पाणी पिताना देखील झोपेत ती चादर नीट करतो. तो दुध पीत असताना जरा खाली सांडले तर लगेच वाकून साफ करतो! (ऑटीझमबरोबर ओसीडी वागणूक येते हे ऐकले होते. आता प्रॅक्टीकल समोर दिसते आहे. ह्याला आवर घालण्यासाठी मी कधीही घरात अमुक एक गोष्ट अमुक ठिकाणी असं करत नाही. माझ्या घरातील आर्टवर्क, फर्निचर या गोष्टी सतत जागा बदलत असतात, याच कारणासाठी!)
  • कुठलेही नवीन जिगसॉ पझल त्याला झरकन सोडवता येते. हे तो कसं करतो माहीत नाही. जिगसॉ पझलच्या पीसेसच्या आकारावरून त्याला कळत असावे कदाचित, तो कुठे जाणार ते. बहुधा, visual - spatial intelligence
  • आयपॅड, आयफोन ही तर अगदी सोपी उपकरणं झाली. या मुलाला टाईप करता येते. २-३ वेळेस त्याने टाईप करून 'Eat" असे लिहीले आहे. कधी प्राण्यांची नावं लिहीली आहेत. नेक्स्ट गोल : माऊस वापरता येणे.
  • संगीताबद्दल अतोनात ओढी. मी त्याला सारेगमप वाजवायला शिकवते. तो कान देऊन ऐकतो. माझी खात्री आहे काही दिवसातच तो स्वतः वाजवू लागेल.
  • ही मुलं फारशा भावना चेहर्‍यावर दाखवत नाहीत. पण माझे मत उलटे आहे. एक्स्ट्रीम संवेदनशील असावीत ही मुलं कदाचित.
  • ऑटीझम जर आमच्या घरात आला नसता, तर मला माझी ओळख कधीच झाली नसती! माझ्यामध्ये किती अमाप मानसिक ताकद असू शकेल हे मला आधी माहीत नव्हते. मी उत्तम शिक्षिका, प्लॅनर, रिसर्च स्टुडंट, काउन्सेलर, थेरपिस्ट आहे हे मलाच माहीत नव्हते. आणि हो, लेखिका देखील! या मुलाने मला किती किती दिलंय त्याची गणती करणं अवघड आहे.

आम्ही त्याच्याबरोबर सतत काम करतो. त्याला आपले नॉर्म्स सांगतो कारण त्याला त्याचे आयुष्य जरा सोपे जाईल, समाजात वावराताना. तो कुठे 'कमी' आहे म्हणून नाही. 'नॉर्मल' काय असते ते आम्ही आमच्या आयुष्यावरून पाहीले आहे. नॉर्मल म्हणजे चारचौघांसारखे. परंतू तो 'स्पेशल' आहे. चारचौघांपेक्षा वेगळा. त्या त्याच्या क्वालिटीज आम्हाला ऑटीझममुळेच मिळाल्या आहेत -हे विसरून चालणार नाही. तो खरोखर आमचा 'बेबी आईनस्टाईन' आहे!

http://marathi.journeywithautism.com/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आई प्रचंड आशावादी असल्याशिवाय इतका प्रेरणादायी लेख कागदावर उतरू शकला नसता. ऑटिझम गटातील मुलामध्ये काय आणि किती कमी आहे याकडे लक्ष किती द्यायचे त्यापेक्षाही त्याच्यातच किती आणि काय आशादायक आहे हे पाहण्याची अगदी दैवी कला तुमच्या अंगी आल्यामुळेच तुम्ही नोंदविलेले सारे घटक फार उत्साहवर्धक झाले आहेत. जे आईवडील आपल्या मुलाबाबत ह्याच अवस्थेतून जात असतील त्यानाही आपल्या मुलातील हे गुण हेरण्याची सवय लागेल....नोंदीही ठेवल्या जातील.

तुम्ही जी उदाहरणे दिली आहेत त्यापैकी "संगीत" हे अतिशय जादूमयच आहे. एरव्ही कशी वागतील ते नीटसे सांगता येणार नाही मला, पण ज्यावेळी संगीत ऐकायला वेळ दिला जातो त्यावेळी आपण काहीतरी जगावेगळे काम करीत आहोत अशी स्पष्ट भावना यांच्या चेहर्‍यावर उमटते.....संगीत शिकत असतील वा केवळ ऐकत असतील, तरीही ते निश्चित्तच चांगला परिणाम करत असते हे उघड आहे.

अशा या सकारात्मक दृष्टिकोनाबद्दल तुमचे अभिनंदन.

आगाउ , अगदी अगदी.
आत्ताच दहावीची परिक्षा आटोपलीये माझ्या घरी. हा लेख वाचून मलाच माझी लाज वाटली .

केव्हढा बुद्धीमान आहे हा! मस्तच.
(नक्की काय अवघड जाते ते विसरायलाच झाले आहे हा लेख वाचून!)+१

आपल्या सकारात्मक दृष्टिकोनाबद्दल अभिनंदन.

नक्की काय अवघड जाते ते विसरायलाच झाले आहे हा लेख वाचून > +१. You are a great mom.
हाच सकारात्मक दृष्टीकोन सगळ्या मुलांबाबत ठेवायला हवाय. प्रत्येक मुलामधे काहितरी स्पेशल असेल. तुमचे लेख वाचुन पॅरेंटिग शिकायला मिळतय.

ह्या स्पेशल बाळासाठी "त्या"नं घडवलेल्या ह्या स्पेशल आई-वडीलांना एक कडक्क सॅल्यूट. स्वमग्नतेकडे बघण्याची दृष्टी तर अधिक प्रगल्भ होतेच आहे पण आमच्यासारख्या सर्व-सामान्य आयुष्याकडेसुद्धा एका नव्या दृष्टीनं बघण्याची प्रेरणा देते आहेस >>+++११

तुमचा मुलगा काहीतरी चांगलं पुढे करुन दाखवणार हे नक्की>>++११

हुशार आणी गोड बाळाला अनेक अनेक उत्तम आशीर्वाद ...

धन्यवाद !

पाण्यात पडलं की पोहायल येते(लागतेच) तसे आहे हे. एव्हढं कौतुक करू नका. ऑटीझम कम्युनिटीतल्या आया तर कितीतरी क्रिएटिव्ह असतात , अजुन २-४ ऑटीझम असलेली मुलं व्यबस्थित वाढवतात.. मलाही खूप करायचंय अजुन. तुमच्या कौतुकामुळे हुरुप येतो.मनापासून थँक्स!

_________/\___________ किती सुरेखरित्या प्रेम करतेस ग तू पिल्लावर.तुझ्यासारखी आई मिळणे हे तुझ्या मुलाचे भाग्य! खरंच मी नतमस्तक होते ग तुझ्या वात्सल्यावर.God bless u & ur family.

किती सकारात्मक आहात तुम्ही. मेरी तो बोलती बंद.
स्वमग्नतेकडे बघण्याची दृष्टी तर अधिक प्रगल्भ होतेच आहे पण आमच्यासारख्या सर्व-सामान्य आयुष्याकडेसुद्धा एका नव्या दृष्टीनं बघण्याची प्रेरणा देते आहेस बाई...>> +१०००

_____/\____ डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा लेख.

पुढच्या वेळी माझ्या पोराला ६चा पाढा आला नाही म्हणून ओरडायच्या आधी या लेखाची आठवण नक्की येईल. >>> आगाऊला अनुमोदन.

स्वमग्नता, तुझ्या फायद्यांमध्ये खालील फायदाही घालः

तुझ्या लेखांमुळे अनेकांना आशावादी राहून आपल्याकडे जे आहे त्याकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याचा दृष्टीकोन मिळाला.

Pages