वर्जिनिया आणि वाशिंगटन डी. सी. गटग

Submitted by हर्ट on 9 April, 2014 - 11:01

नमस्कार जनहो.

रुनि, लालू, मानुषी, स्वाती दांडेकर आणि मी बी - असे आम्ही पाचजण येत्या शुक्रवारी (११ एप्रिल २०१४) हरंडन इथे भेटणार आहोत. व्हर्जिनिया आणि वाशिंगटन डी. सी. इथे राहणार्‍या मायबोलिकरांना जर ह्या गटग मधे यावेसे वाटत असेल तर कृपया मला संदेश पाठवा. जर दुरवरुन कुणाला यायचे असेल तर आपले स्वागतच आहे!

गटग येत्या शुक्रवारी (११ एप्रिल २०१४) सायंकाळी ६:३० ला ठरले आहे.
स्थळ - हरंडन

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शुक्रवारी (११ एप्रिल २०१४) सायंकाळी ६:३० ला ठरले आहे.>> आम्हाला काम अस्ते राव. इथुन यायला ४ तास लागतात. कस जमवायच. Sad

रुनि, लालू, मानुषी आणि मी बी >>> अरे 5 झाले ना ? Proud , लालु आणि रुनीपॉटरना नमस्कार सांगा. माबोवर हल्ली त्या दिसत नाहीत.

व्हर्जिनिया, डीसी लोकं रोमात असतात. मग हा धागा चालवणार कोण? बाराकर? हे म्हणजे घरचं झालं थोडं नी बी ने धाडलं घोडंं Wink

>> लोकांच्या अंगावरील कपड्यांने थर कमीकमी होत आहेत.
बाप रे! लवकर भेटून मोकळे व्हा कोण ते! Proud

अय्या गोगा. Wink मायबोली करांचा चिवचिवाट. अच्छा है अच्छा है. Happy मजा करो नी वृत्तांत लिखो.

>> पण काहीजण मुद्दाम ऑफ्टन असा उच्चार करतात
हो हो, बरोबर आहे. तू तुला हवं तसंच टाल्क कर रे!

ऑफन आणि ऑफ्टन म्हणण्यातला फरक हा भारतातला (ब्रिटीश इंग्लिश) आणि अमेरिकन इंग्लिश ह्यामुळे असावा असं मला वाटतं.
पण ब्रिटीश आणि अमेरिकन इंग्लिशमध्ये सगळे वॉक, टॉक, हाफ चं म्हणतात. तुला तू म्हणतोस ते योग्य वाटत असेल त. कॅरी ऑन.

स्वाती, सायो - धन्यवाद. माझा तो अनवधनाने झालेला टायपो होता. मी बोलताना हाफ.. टॉक असेच बोलतो. तरीही तुमच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व.

प्रश्न भावना दुखावण्याचा वगैरे येत नाही बी. इथे आणखी आयडींना असे उच्चार करताना बघितलेलं आहे. ते खटकल्यामुळे सांगावंसं वाटलं इतकंच.
(बरं टायपो होता हे ठीक, होतं लिहिताना असं पण मग मागाहून ऑफन, ऑफ्टन कशाला म्हणालास हे कळलं नाही. असो)

गटगच्या बशी निघाल्या की नाही अजून? वाटेत खायला चिवडा / बटाटावडा वगैरे बांधून घेतला असेलच...
वॄंदाताई असल्या तर च्या-मारी वगैरे असेल..
तेव्हा खा-प्या-मजा करा... Happy

Pages