वर्जिनिया आणि वाशिंगटन डी. सी. गटग

Submitted by हर्ट on 9 April, 2014 - 11:01

नमस्कार जनहो.

रुनि, लालू, मानुषी, स्वाती दांडेकर आणि मी बी - असे आम्ही पाचजण येत्या शुक्रवारी (११ एप्रिल २०१४) हरंडन इथे भेटणार आहोत. व्हर्जिनिया आणि वाशिंगटन डी. सी. इथे राहणार्‍या मायबोलिकरांना जर ह्या गटग मधे यावेसे वाटत असेल तर कृपया मला संदेश पाठवा. जर दुरवरुन कुणाला यायचे असेल तर आपले स्वागतच आहे!

गटग येत्या शुक्रवारी (११ एप्रिल २०१४) सायंकाळी ६:३० ला ठरले आहे.
स्थळ - हरंडन

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माहीती असलेलं बरं असतं, देसायानु!

आता हेच पहा, गेल्या एवेएठिला भाईंनी (निदान) शॉर्ट्स आणायला सांगितल्या. या गटगला बी ने कपड्यांचे थर कमी करत आणले. ट्रेंड कळते यातून. पुढच्या वेळी काय असेल याचा विचारही करवत नाही Proud

रमड,
काय विचार काय आहे?. पुढच्या गटग ला दांडी मारायला पाहीजे. हो. चुकुन रमड आली तर. Happy

आमची गटगं अतिशय सभ्य, डिसेंट असतात. आमचा भर गप्पांवर असतो त्यामुळे कुणी जास्त कपडे घातलेत नी कुणी कमी ह्याकडे लक्षच जात नाही मुळी Wink

भाई तुम्ही दांडी मारायचे बहाणे शोधता का फक्त? Proud

छे गं बाई! शॉर्ट्स गटगला पण आले नाही तर आता अजून पुढच्या पायर्‍या गाठणार्‍या गटगंना काय येणार? डोंबल!! मी आपली इथे बसून नुसताच ट्रेंड्सचा अभ्यास करतेय Lol

सभ्य, डिसेंट >>> हे वाचून उगाच लेडीजबायका आठवलं Proud

.. मी कपड्यांचा तो अख्खा उतारा केंव्हाचं काढूण टाकला आहे. उगाच भावी पिढीला त्यातून नको त्या प्रेरणा मिळू नयेत ह्या उद्देशाने Happy तुम्ही लोक वेळोवेळी केलेले संपादीत मजकुर वाचत नाही का Happy सीझन प्रमाणे कपडे घालायचे पण घालायचे हे मात्र नक्की. यदाकदाचित एखादे गटग एखाद्या बीच विच वर झाले तरचं कमीत कमी कपडे घालायची संधी मिळेल उत्सुक्त मायबोलिकरांना Happy

बी, आम्हांला वाचायचं तेच वाचतो आणि त्यातून काढायचे तेच अर्थ काढतो हे तुला लक्षात आलेलं नाही का? Proud

Pages