तुका म्हणे

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 31 March, 2014 - 11:02

माझे वेडे शब्द
वाचू नका कुणी
उरात टोचणी
लागेल बा ||१ ||
सदैव छळेल
जीवनाचे कोडे
अरुपाचे वेड
डोईवरी ||२ ||
थांबा जरा पहा
करा विचार हा
संसार अवघा
विस्कटेल ||३||
नसे घडीभर
जीवा विरंगुळा
ऐश्या प्रवासाला
जाणे पडे ||४ ||
मग तयातून
नसेच सुटका
म्हणतसे तुका
तुम्हा आम्हा ||५||

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पंढरीचे भूत मोठे | आल्या गेल्या झडपी वाटे

बहु खेचरीचं रान | बघ हे वेडे होय मन

जाऊ नका कोणी, तिथे जाऊ नका कोणी | जे गेले, नाही आले परतोनी

तुका पंढरीसी गेला | पुन्हा जन्मा नाही आला

जे तुकोबा विठ्ठलरुप झाले तेच सांगताहेत हे ...... अशा या तुकोबांच्या अभंगांचे वेड एकदा का लागले की ते सुटता सुटणार नाही मग .....

हा खराखुरा भाव उमटलाय या रचनेत ....
त्यामुळे डॉ.साहेब . _____/\______

नेहमीपेक्षा जास्तच आवडली
आता ह्या प्रत्येक ओळीवर जमेल तितका अधिक विचार करणार आहे ....

गामाजी नमस्ते
आशयात असहमत होण्याजोगे नक्कीच काही नाही असे माझे वै.म.
ह्या प्रवासात अशीही अवस्था येते जिथे हे शब्द हे भाव खरे ठरू पाहतात ...हेही वै.म.
धन्यवाद

सर्व प्रथम सर्वाना धन्यवाद .
गा ,पै <<परम विश्रामस्थळ आहे ते!>>>वाचले मन भरून आले ..कदाचित पुढे कधीतरी आशय मनात विरघळेल अशी आशा बाळगतो .
शशांकचा अभिप्राय तुकाराम बुवाचा आशीर्वाद समजतो .

समीर ,वैभव पुन्हा धन्यवाद ..

वैवकु आणि विप्र, आशयाशी असहमत असलो तरी त्यामागील भावाशी पूर्णपणे सहमत आहे! शेवटी सगुण निर्गुण एकु गोविंदु रे! Happy
आ.न.,
-गा.पै.