मुलं लाजवतात तेव्हा !

Submitted by .. on 22 March, 2011 - 14:40

आपली दिव्य मुलं आपल्याला चार्-चौघात कधीकधी तोंड लपवायला लावतात, अश्या काही करामती करतात की आपल्याला धरणी दुभंगून पोटात घेईल काय असे व्हावे. तर आपल्या पोरांच्या अश्या अफलातून करामती इथे लिहूया.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बटांना >>>>>>:हहगलो:

तेव्हापासुन या गाण्यातला रोमान्टीकपणा माझ्यापुरता तरी पूरता संपला..>>>>>:हहगलो:

तेव्हापासुन या गाण्यातला रोमान्टीकपणा माझ्यापुरता तरी पूरता संपला..
<<

बटा बटाचे रूप आगळे
प्रत्येकाचे दैव वेगळे...

Rofl

माझा एक किस्सा.
मी पहिलीत असताना, मी, आई आणि माझी बहीण, आईच्या मैत्रिणीच्या लग्नाला गेलो होतो.
( तिचं लग्न एका बिजवराशी झालं होतं. लव्ह मॅरेज. )
आई ब्युटिशियन असल्याने, तिथे मैत्रिणीने आईलाच मेक-अपचं काम दिलं होतं.
मी आणि बहिण बाहेर हॉल मध्ये खेळत होतो. तेवढ्यात मला ते काका दिसले. ( नवरा मुलगा कसं म्हणणार ? Uhoh )
मी कशासाठी तरी आईकडे गेले आतल्या खोलीत ( नवरीच्या ) तर तिथे तिच्या मैत्रिणीला मुंडावळ्या वगैरे बांधलेल्या दिसल्या, तर मी खणखणीत आवाजात, " अगं आई बाहेर पण ना एक म्हातारा माणूस बसलाय असं बांधून. "
आईने माझ्या हाताला चिमटा काढत कानात हळूच सांगितले, " उमा, आत्ताच्या आत्ता बाहेर जाऊन बस. मी तिथे येईपर्यंत उठलीस तिथून तर बघ. "

Proud Proud Proud

मेहबूब सांगितले तेव्हाच हसून वाट लागलेली. हा जोक आमच्या घरी सांगितला तेव्हा हसून फवारे उडाले (कारण जेवताना सांगितला आईला, बाबाला).

आता , बटांना...

हे राम! कळस आहे.

बटांचा नविन अर्थ्ज लक्षात घेता उधळी मुजोर वारा ला पण नविन परिमाण प्राप्त होत आहे.
भन्नाट किस्सा आहे.

शूम्पी,

>> बटांचा नविन अर्थ्ज लक्षात घेता उधळी मुजोर वारा ला पण नविन परिमाण प्राप्त होत आहे.

Rofl

आभाळच भाळ होते, होती बटाही पक्षी Uhoh
ओढून जीव घेते, पदरावरील नक्षी ! Biggrin
लाटांस अंतरीच्या, नाही मुळी निवारा

या ओळींना पण नवीन आयाम प्राप्त झालाय!!

आ.न.,
-गा.पै.

बटांना ! बापरे ! त्या गीतकाराने हे ऐकले तर गीतलेखन सोडून तंबाखुचे दुकान काढेल बिचारा !

बटांना नि त्याचे नविन परिणाम >> ...

पण ईब्लिस आता मला ओरिजीनल 'घटाघटाचे रूप आगळे...' ला पण नविन परिमाण प्राप्त झाल्यासारखे वाटतेय.... Happy

Pages