बनपुरी

Submitted by लक्ष्मी गोडबोले on 11 March, 2014 - 06:39
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ किलो मैदा

१२ केळी

दोन वाटी दही

जिरे

साखर

क्रमवार पाककृती: 

एक किलो मैदा, १२ केळी , लागेल तितके दही घालावे. साखर, जिरे मिसळून मळून रात्रभर ठेऊन द्यावे. पीठ मळायला लागेल तितके दहीच घालावे. पाणी अजिबात घालू नये.

सकाळी त्याच्या पुर्‍या करुन तळाव्यात

वाढणी/प्रमाण: 
-
अधिक टिपा: 

इडलीवडा वाल्या कर्नाटकी आण्णाच्या दुकानात आज हा नवीन पदार्थ दिसला, त्याने रेसिपी दिली.

पुर्‍या अगदी स्पाँजी होतात. तेलही जास्त पीत नाहीत.

मैद्याऐवजी गव्हाचे पीठ / आटा वापरुन करता येईल का?

या पुर्‍या दोन दिवस टिकतात.

कसलीही भाजी, चटणी, सांबार याबरोबर खाता येतात. नुसत्या खाल्ल्या तरी छान लागतात.

माहितीचा स्रोत: 
दुकानवाला
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त. सोपी वाटतेय कृती.
मुलांच्या डब्यासाठी करायला हरकत नाही. आता सुट्टीत लागेलच दिवसभर काहीतरी चरायला. Happy

छानच लागतात हे. कर्नाटकचाच प्रकार आहे. आईला तिच्या मैत्रिणीने सांगितला होता.
निवल्यावरपण छानच लागतात.

या गोडसर पुर्‍या आणि लिंबाचे लोणचे खूप्पच छान लागतात.जास्त प्रमाणात आणलेली केळी "उरली" कि आई या गोड पुर्‍या कणीक वापरुन करीत असे.

मला वाटते मैदा वापरल्याने पुर्‍या अगदी स्पाँजी होतात. आतून अगदी शुभ्र जाळीदार होतात. कणिक वापरले तर कदाचित जाळीदारपणा कमी येईल, पण मैद्यापेक्षा जास्त पौष्टिक असतील.

बनानाचे बन की बनवल्याचे बन? Proud

केळी पु-या करण्यासाठी म्हणून आणावी लागतील व मैदा ही,

त्यापरीस फोटो तील छानच दिसतायत, हा फोटो घारग्याचा म्हणून पण खपेल सहज! (हो हो होसूमीयाघ मधले घारगे हो..)

याचा स्वाद मस्त लागेल असं वाटतंय. पण एवढं तळण आणि मैदा म्हटल्यावर खाल्ल्या जाणार नाहीत आमच्याकडे.
अती पिकलेलं केळं उरलं, तर माझा शॉर्टकट असा: केळ कुस्करून त्यात किंचित मीठ, हवी असल्यास साखर आणि सामावेल तेवढी कणीक घालायची, आणि त्याची घडीची पोळी करून वर हवं तर तूप घालून गरम गरम खायची. मस्त लागते! Happy

वर लिहिलेले प्रमाण हे आण्णाच्या दुकानासाठी आहे. स्वतःपुरतेच करताना ऐवज त्या त्या प्रमाणात घ्यावा.

हो, स्पाँजी झाल्या होत्या पुर्‍या. तरी सर्वात फोटोतली वरची दिसणारी पुरी जर्रा जास्त वेळ तळली गेल्यामुळे कडेला किंचित कडक झाली होती.

छान.

Happy

पाककृतीत आलेलं वर्णन वाचून आणि अकुने टाकलेले प्रचि बघून फारच उत्सुकता वाटल्याने लगेच करून बघितल्या पुर्‍या. छान खुसखुशीत झाल्या पण दही आणि केळं अशी एकत्रित चव नाही आवडली. २ पुर्‍यांमध्येच मंडळींनी माघार घेतली.

आमच्या गोव्यात हया पु-याना बन्स म्हणतात. छान लागतात. मैदा,साखर , मिठ, जीरे, खाण्याचा सोडा,पाणी वापरुन रात्री भिजवुन ठेवतात. सकाळी पु-या तळतात. काही लोक वरील प्रकारे करतात.

पदेर ( गोव्यातला पाव वाला ) बन्स विकतात. पदेराकडच्या बन्स मध्ये केळी, दही नसते. ते सोड्याच्या जागी यीस्ट वापरतात.

>>आमच्या गोव्यात हया पु-याना बन्स म्हणतात. छान लागतात. मैदा,साखर , मिठ, जीरे, खाण्याचा सोडा,पाणी वापरुन रात्री भिजवुन ठेवतात. सकाळी पु-या तळतात. काही लोक वरील प्रकारे करतात. <<

आमची घरची क्रुतीत थोडा फरक आहे.(प्रत्येक घरची अशी एक कृती असते)

त्याबरोबर एक खास बटाट्याची भाजी करते आई. आज वेळ झाला तर लिहिन. जराशी वेगळी असल्याने लिहिते.(लिहावीशी वाटते , त्याच निमित्ताने आठवण). Happy

ती गोवा-स्पेशल बटाट्याची भाजी आणि पुर्‍या असा बेत एका मैत्रिणीकडे खाल्ला आहे. पण तिने साध्याच पुर्‍यांची कणिक भिजवून पुर्‍या जरा जाडसर लाटल्या होत्या. रेसिपी लिहाच Happy

लक्ष्मी, तुमच्या सांगण्यावरून इथेही पोस्टत आहे :)..,
कर्नाटकात खरच हा प्रकार खूप आवडीने खाल्ला जातो आणि अनेक रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफस्ट साठी इडली-वड्याबरोबरीने हजर असतो..स्मित
अनिलभाई, एक किलो मैद्यासाठी चालू शकतील बहुतेक बारा केळी.. घरी बनवायचे तर एवढ्या प्रमाणात करायची गरज नाही.. उरलेली, जास्त पिकलेली केळी मिक्सर किंवा फु़ड प्रोसेसर मध्ये फिरवून घ्यावीत, त्यातच जिरे,चवीपुरते मीठ व दही घालून, त्यात मावेल एवढा मैदा/कणीक घालून फिरवावे. (विकतची नक्कीच मैद्यची असते पण घरी कणकेची करू शकता.. ) पीठ फार कडक होउ न देता मऊसर राहू द्यावे.. सकाळी ते जरासे आंबून फुगलेले दिसेल.. तेलाच्या हाताने गोळे करून जराशी जाडसर पुरी बनवावी.. मध्यम आचेवर खरपूस तळावी. आतून साधारण ब्रेडसारखे टेक्शर येते.. ह्या सोबत नारळाची चटणी व कुर्मा दिला जातो..