चंदेरी पडद्यावरच्या माझ्या आवडत्या स्त्री-व्यक्तीरेखा

Submitted by संयोजक_संयुक्ता on 7 March, 2014 - 23:18

chanderi.jpg

रुपेरी पडद्यावर दिसणार्‍या काही व्यक्तीरेखा आपल्या मनात कायमचं घर करतात, आपलं आयुष्य त्या त्या काळापुरतं का होईना व्यापून टाकतात. आजवर या चंदेरी पडद्यावर कित्येक ताकदीच्या स्त्री व्यक्तीरेखा साकारल्या गेल्या आहेत. स्त्रीच्या वैशिष्ट्यांचे कित्येक कंगोरे त्या व्यक्तीरेखांच्या रुपात आपल्यासमोर आले आहेत, स्त्रीची हळवी, भावनिक बाजूही दिसली आहे, तसंच वेळप्रसंगी कणखर, सबला रुपातदेखील तिला आपण पाहिलं आहे. ती व्यक्तीरेखा निर्भय पोलिस अधिकारी स्त्रीची असो किंवा अन्यायाविरुद्ध उभ्या राहणार्‍या सामान्य स्त्रीची असो, किंवा आयुष्यातल्या वादळांमधून धडपडत वाट काढणार्‍या निश्चयी कौटुंबिक स्त्रीची असो; आपल्याला त्या भारावून टाकतात, काहीतरी शिकवून जातात. खळखळत्या हास्याच्या साथीने आयुष्याला सामोरी जाणारी स्त्री असो किंवा चेहेर्‍यावर ठाम गंभीर मुखवटा घेऊन जबाबदार्‍या निभावणारी स्त्री असो. प्रत्येक व्यक्तीरेखेच्या वैशिष्ट्यांनी आपल्याला आजवर बरंच देणं दिलंय.

यंदाच्या महिला दिनाच्या निमित्ताने आपण सगळे मिळून या स्त्री-भूमिकांच्या आठवणी जाग्या करुया. आपल्याला आवडलेली ही चंदेरी व्यक्तीरेखा का आवडली, तिच्या व्यक्तीमत्त्वाचे कुठले पैलू आवडले, हे इथे लिहूया. स्त्री भूमिकेबद्दल लिहीताना त्या त्या चित्रपटाची थोडी पार्श्वभूमीदेखील लिहू शकता. कुठल्याही भाषेतल्या, कुठल्याही देशातल्या चित्रपटातील स्त्री व्यक्तीरेखेबद्दल इथे लिहायला हरकत नाही. आपल्याला आपले प्रतिसाद याच धाग्यात लिहायचे आहेत. शब्दमर्यादा नाही.

लिहायला सुरुवात करुया?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिंडरेला - ती टोनी कोलेट आहे. आणी हो मुव्ही अतीशय सुरेख आहे.

अकु - पिंजर बद्द्ल अगदी अगदी. मी सुद्धा पुन्हा पुन्हा बघते. मनोज वाजपाई सुद्धा छा गया है एकदम त्या रशीदच्या रोल मध्ये. शेवटी उर्मीला परत येते त्यावेळी त्याचे एक्स्प्रेशन आणि रडणं मी विसरु नाही शकत.

शर्मीला फडके - सगळ्याच पोस्टींना अनुमोदन.

मोनालीसा स्माईल् - उफ्फ्फ. कितीही वेळा बघता येईल असा सिनेमा.

ललीता-प्रीती - तुम्ही किती सुंदर वर्णन केले आहे मेग रायनचे. अगदी अशीच आहे ती

स्पार्टाकस - मम्मो ची आठवण काढ्ल्याबद्द्ल धन्यवाद.

माझ्या काही आणखी आवडत्या.

सरदारी बेगम - गाणं हेच सर्वस्व असणारी बेगम खुप तडजोडी करते आयुष्यात. सुरेख संगीत आणी किरण खेरचा चांगला अभीनय आहे.

हरीभरी - शबाना आझ़्मी, नंदीता दास ई.स्टारकास्ट आहे. ग्रामीण भागातल्या मुस्लीम स्त्रीयांच्या आयूष्याचा लेखाजोखा. नॅचरली, सुरेख अभीनय आहेच.

ह्याशिवाय मेग रायन, जुलीया रॉबर्ट्स, मेरील स्ट्रीप ह्यांच्या बहुतेक व्यक्तीरेखा आवडतातच.

हुतुतू मधली तब्बू, चीनी कम मधली आणि हेराफेरीतली पण -- जाम आवडली होती.

रंग दे मधली वहिदापण छानच -- तिच्या जुन्या सिनेमातील भूमिका बघितल्या की तिच्याइतकी इतकी graceful अजून कोणी नाही.

हरी भरी छान होता - नंदिता रुसून आपली सुटकेस घेऊन जाते, तो प्रसंग तर गोडच.

ERIN brokovich मधली आणि Notting Hill जुलिया roberts . Runaway Bride धमाल --

हजारो ख्वाइशे ऐसी मधली चित्रांगदा

समय मधली सुश्मिता सेन -- ही वाटली होती IB officer

फिर भी दिल हिंदुस्तानी मधली जुही आणि तीन दिवारे मधली जुही -दोन वेगळ्या व्यक्तिरेखा. तीन दिवारेमध्ये जेव्हा नवर्याला रात्री धमकावते त्या प्रसंगातली जुही फार करारी दिसली होती.

लज्जा मधली मनीषा आणि माधुरी दोघी - रस्त्याच्या कडेला लघवीला बसणारी, शीळ घालणारी आणि रंगमंचावर प्रियकराला जाब विचारणारी माधुरी अफलातूनच होती. देढ ईश्कीया बघायचाय अजून . खामोशीमधली मनीषा

कहाणी, नोवन किल्ड जेसिका, डर्टी पिक्चर, पा, ईश्कीया मधली विद्या बालन. ईश्कीय मध्ये ती नसरुद्दिनला खड्सावते -- कौन हो तुम मेरे पती, यार … तो प्रसंग आणि अगदी थंड डोक्याने निर्णय घेणारी, दोघां मामू भातीज्यानी केलेल्या प्रेमात आपल्याला हवे तेच शोधणारी ।

सुमित्रा भावेने चाकोरी म्हणून एक छोटी फिल्म केली होती -- त्यात काम केलेली मुलगी आणि व्यक्तिरेखा

डोर मधली गुल पनाग

फ़िजां मधली करिष्मा - तिचा हा एकच सिनेमा मी पाहिलाय -- दिसतेही छान आणि व्यक्तिरेखा ही मस्त. करीना असोका मध्ये मादक दिसते, जब वी ची गीत ही छान.

बेंड इट लाईक बेकहम मधल्या दोघी, कायरा नाईटली ने dangerous method मध्ये ही खूप छान काम केले आहे.

गुजारीश आणि जोधा अकबर मधली ऐश्वर्या -इतका तरल प्रेमानुभव डोळ्यातून व्यक्त केला आहे.

बर्फी मधली प्रियांका चोप्रा -- आणि Black मधली राणी मुखर्जी, सदमामधली श्रीदेवी --त्या भूमिकांचे सोने केले आहे

The Artist मध्ये Peppy Miller ची भूमिका करणारी Bejo - मूक अभिनयात अप्रतिम

Matrix ची Trinity, Constant Gardner ची Tessa, Iron Lady मधली मेरिल स्ट्रीप

चक दे मधली कोमल, बंटी और बबली मधली राणी, लज्जा मधली माधुरी -- बंडखोर आणि धमाल जगणाऱ्या या व्यक्तिरेखा फारच आवडतात.

तलाश मध्ये मुलगा गमावलेली आणि नवऱ्याचे वागणे समजाऊन घेत नव्या अनुभवास सामोरी जाणारी राणी मुखर्जी

धोबी घाटमध्ये उत्तर प्रदेशातून आलेल्या आणि मुंबईत एकट्या पडलेल्या मुलीच्या दृष्टीकोनातून मुंबई रंगवणारी यास्मीन - कीर्ती मल्होत्रा

बाकी स्मिताबद्दल लिहिलेच आहे.

जाने तू न जाने ना - मधली रतना पाठक -- माझ्या खूप फेमिनीस्ट मैत्रिणींची आठवण करून देणारी -- काय जेवूयात मग scrambled egg on toast -- सिंगल मदर घरातील ओळखीचा प्रसंग वाटला, वर वर hilarious वाटणाऱ्या अनेक प्रसंगातून आपल्या मुलाला वेगळे बनवण्याची- स्वतःची तत्वे, मुल्ये आपल्या मुलास देण्याची तिची धडपड सुरेख होती. इम्रानने रंगवलेल्या त्या भूमिकेत हुशार आणि EQ ने काम करणारी अशा सिंगल मदरची मुले मला तरी आठवली होती.

गान्धी चित्रपटातील कस्तुरबा गान्धी अर्थात रोहिणी हट्टन्गडी, ही माझी आवडती स्त्री व्यक्तिरेखा

'बा' च्या वयाहुन त्या वेळी कितीतरी लहान असुनही समर्थपणे पेललेली व्यक्तिरेखा. मला मनापासुन वाटते की कोणतीही ऐतिहासिक वा तत्सम भूमिका साकारणे हे काल्पनिक भूमिका साकारण्यापेक्शा कधीही अवघडच! कारण प्रेक्शकान्च्या मनावार त्या व्यक्तीचा प्रभाव असतो आणि कलावन्ताला या भुमिकेला न्याय द्यायचा असतो.
मात्र रोहिणीताईनी ही भूमिका प्रचन्ड ताकदीने पेलली आहे. कित्येक वर्शे कस्तुर्बा गान्धी = रोहिणी हट्टन्गडी हे समीकरण जनमानसात भिनले आहे.

बापुन्च्या अर्धान्गिनीची भुमिका वटवताना या भुमिकेशी र्रोहिणीताई अगदी समरसुन गेल्या मात्र याचा एक तोटा असा कि त्यानन्तरही त्याना कायम चरित्र भुमिकाच मिळत गेल्यआ. अर्थात त्या भुमिकान्चेही त्यानी सोनेच केले, हे वेगळे सान्गायला नकोच !!

आवडती कलाकार उर्मिला मातोंडकर बद्दल थोडंसं...

एक हसीना थी मधली फसगत झालेली आणि त्याचा पुरेपुर बदला घेणारी प्रेमिका...
तेहजीब मधली आपल्या आईला आपल्या वडिलांच्या मृत्यूस जबाबदार मानून आयुष्यभर तिचा तिरस्कार करणारी मुलगी, तसंच आपल्या गतिमंद बहिणीला आईपासून दूर ठेऊन एकटीने सांभाळणारी बहीण...
भूत मधली झपाटलेली एक सामान्य बायको...
नैना मधली अपघातात दृष्टी गमावलेली स्त्री..
कौन मधली विक्षिप्त स्त्री.. (व्यक्तिरेखांबद्दल लिहायचं आहे त्यामुळे थोडंसं विषयाला अवांतर- कौन या सिनेमातल्या क्ल्यायमॅक्स मधला तिचा स्क्रीन वरचा फक्त वावरच अंगावर काटा आणतो)

एक हसीना थी मधली उर्मिला खरंच छान होती. असहाय्य प्रेमिका ते थंड डोक्याने सैफला उंदरांच्या तावडीत देणारी स्त्री तिने मस्त निभावली आहे.
तसाच तिचा प्यार तूने क्या किया मधला रोल होता. स्वभावातली स्थित्यंतरं किती सहज दाखवली आहेत तिने!

असहाय्य प्रेमिका ते थंड डोक्याने सैफला उंदरांच्या तावडीत देणारी स्त्री तिने मस्त निभावली आहे. >> झाल सांगून!!! एका वाक्यात अख्खी गोष्ट. काय म्हणाव अशा स्पोयलरला.

मेरील स्ट्रीप चा उल्लेख झाला आणि मला Devil wears Prada मधली Miranda Priestly आठवली! काय सुंदर व्यक्तिमत्व उभं केलंय! एक अत्यंत यशस्वी आणि महत्वाकांक्षी स्त्री जी कामाच्या बाबतीत कठोर आहे, स्वतःच्या कामात नं. १ आहे. आणि आपलं स्थान अबाधित राखण्यासाठी काहीही करू शकते! आणि Meryl Streep ने जशी पडद्यावर रंगवली आहे तशी अजून कोणी रंगवू शकलं असतं असं वाटत नाही. आणि शेवटी ती Anne Hathaway ला सांगते ना की You always have a choice! ते वाक्य माझ्या डोक्यात सतत असतं. मला choice नव्हता हे असं दुसऱ्याला म्हणताना पुन्हा विचार करायला भाग पाडतं हे वाक्य!

विचारलंय स्त्री व्यक्तिरेखा आणि बहुतेक सगळे आपल्या आवडत्या अभिनेत्रींबद्दलच लिहितायत. >>>> खरं आहे.

मी मात्र व्यक्तिरेखेबद्दल लिहिलंय हां.

छान लिहितायत सगळे...
शर्मिला मस्त पोस्ट ! तुझ्या सिनेमा सिनेमा सिरीज मधला पुढचा लेख हया विषयावर टाक. Happy
अश्विनीमामींनी कुठल्यातरी लेखन स्पर्धेत अश्याच विषयावरचा लेख लिहिला होता ना ?

एरिन ब्रॉकोविच ची ज्युलिया रॉबर्ट्स ने साकारलेली व्यक्तिरेखा! सिंगल मदर, हातातोंडाची गाठ असताना अग्रेसिव होणारी स्त्री, प्रसंगावधान राखणारी, हजरजबाबी, फटकळ, जे काम करतोय त्याचा आवाका लक्षात आल्यावर त्यात स्वतःला झोकून देणारी, स्वतःची मते असणारी आणि ती मते जाहीर करायला (आणि तेही तिच्या खास पद्धतीने) मागेपुढे न बघणारी स्त्री... रसायनांचा दुष्परिणाम झालेल्या आजारी परिवारांना भेटताना तितकीच हळवी होणारी, पण वरकरणी खंबीरपणा दाखवणारी, त्यांना न्याय मिळवून द्यायला वेळप्रसंगी धोका पत्करणारी स्त्री....
मला आवडली ही व्यक्तिरेखा...

छान धागा पण लिस्ट मोठ्ठी ..
लेट्स्ट इंग्लिश विंग्लिश मधली श्रीदेवी मस्तं :), कौटुंबिक कॉप्लेक्स मधून बाहेर पडून एका भाषा शिकण्याच्या प्रयत्नात नकळत self respect, dignity परत मिळवते.. स्वतःला एक्स्प्लोअर करते .
तेच ते नेहेमीचं ' living for family-kids- always giving attitude' घरगुती रुटिन सोडून लोकांशी इंटरॅक्ट करताना , घराबाहेर पडून जगाचा अनुभव घेताना सामान्य स्त्रीं चं कॅरॅक्टर फुलत जातं , मस्तं दाखवलय !

कहानी मधली विद्या बालन पण आवडते.

जुन्या पैकी (मी वहिदा रेहमान ची फॅन नाही पण) गाइड मधली तिची रोझीची व्यक्तीरेखा फार मस्तं !

डेव्हिल वेअर्स प्राडा मधली मिरांडा प्रिस्ली- ,अर्थात मेरील स्ट्रिप पण अतिशय आवडतं कॅरॅक्टर .. वैअय्क्तिक आयुष्यात काही वादळ चालु असेल त्याचा तिच्या करिअर मधे काही लवलेश नाही.. तिच्या पॅरिस मधल्या मह्त्त्वाच्या मिटिंग च्या वेळीच नेमकी दुसर्या कि तिसर्‍या नवर्‍याकडुन नोटिस येते , त्याबद्दल न्यु एमिलीला सांगताना क्षण भर भावुक होते, एमिली मिटिंग पोस्टपोन करायची का विचारते तेंव्हा तिचं एक्स्प्रेशन भारी..'काय संबंध' टाइप .. मस्तं !

सेक्स अँड द सिटी मधली सॅमंथा पण भारी , तिचे Samantha quotes वाचायला मजा येते :).

इन जनरल मला त्यागमूर्ति- रडक्या- कौटुंबिक बायका बघायाला सिनेमात प्रत्यक्षात आवडत नाहीत :).

नीधप, मी तरी व्यक्तिरेखा असं समजून च प्रतिसाद दिलाय गं. नाहीतर जब वी मधली गीत आय मीन करिना इतर कोणत्याही चित्रपटात मी बघू शकत नाही. Biggrin

जब वी मधली गीतची व्यक्तिरेखा मलाही आवडली होती. एरवी अशा बडबड्या - गडबड्या मुलीला कितपत सहन करू शकेन हे माहिती नसले तरी! Biggrin

जुनो - जुनोची सावत्र आई - किती वेगळी आणि सपोर्टीव आहे.

स्टेपमॉम - दोघी सवतींच्या कॅरॅक्टर्स, ओढाताण, समझौता. सगळंच बँग ऑन.

ज्युली अँड ज्युलीया - ज्युलीआ चाईल्ड किती सुंदर रंगवली आहे मेरील स्ट्रीप ने. व्यक्तीरेखेचे सगळे कंगोरे छान समोर येतात.

जब वी मेट ची गीत एक व्यक्तीरेखा म्हणून बरेच जणांना आवडते असं दिसतय :).
समहाउ मला अशी कॅरॅक्टर्स सिनेमातला एंटरटेनिंग फॅक्टर म्हणून ओके वाटतात , लिव्ह लाइफ टु फुलेस्ट वगैरेही ओके पण आजच्या जनरेशन ची मुलगी दाखवली असूनही अयुष्यात लग्नं करण्याशिवाय काही महत्त्वांकांक्षा नाही .. पटत नाहीत आणि आवडत नाहीत एक व्यक्ती म्हणून अशा कॅरॅक्टर चा विचार केला तर !

नवरंग मधली जमुना. मला हे पात्र फार आवडतं. जमुना अगदी नॉनग्लॅमरस तर आहेच पण ती कर्तव्यदक्ष आहे. घरात सासू-सासरे. ती सतत कामात, व्यापात व्यग्र आहे. इतकी कि ती नवर्याला रिझवण्यातही संकोच करते. खरं तर तिच्य मनात अढी आहे कि नवर्याला मोहिनी आवडते. आता हि मोहिनी कोण ते तिला कळणे शक्यच नाही कारण मोहिनी आहे,दिवाकराची, तिच्य नवारयाची प्रेरणा. काल्पनिक muse . पण झालय‌ काय त्यामुळे आधीच स्वभावाने संकोची असलेल्या, किंचित रुक्ष पणाकडे झुकणार्या जमुनेला नवर्याशी मानाने एकरूप होताच येत नाही.हा जो भावनिक अडसर आहे तो इतका मस्त रंगवला आहे, कुठेही एक्सप्लिसिट बोलून न दाखवता, संध्याने तिच्य विभ्रमातून, त्राग्यातून तो प्रकट केलेला आहे. दिवाकर तर कवीच आहे, सदैव सरस्वतीच्या उपासनेत बुडालेल्या त्याचे जमुनावरती अतिशय प्रेम आहे. पण जमुनाला ते कळत नाही, तिचे जे मत्सरायुक्त दु:ख आहे, ते दिग्दर्शकाने खूप छान रंगविले आहे.ती फणसासारखी आहे. बाहेरुन काटेरी आतुन गोड. रुक्ष भासते पण मनात भावनांचा कोलाहल जपते. तिला नवर्याचे प्रेम हवे आहे पण कसे मिळवायचे ते कळत नाही. खरं तर आपण आपल्या कवी नवर्याला पुरेशी साथ देऊ शकू कि नाही याबद्दल ती साशंक आहे. हा न्यूनगंड, मत्सर,, भावनिक अडसर .... तिचे सगळे सर्व shadow aspects मला अतिशय "मानवी" आणि म्हणून विलोभनीय वाटतात.

इतक्या सकाळी इतका छान धागा समोर आला आणि काहीही आठवेना. एकदम कोरी पाटी झालीय.
पाच सहा दिवसांपूर्वी गाईड पाहिला. त्यातल्या रोझीचं गारूड अजून आहे मनावर. गाईड ही कादंबरी लिहीली गेली तेव्हांचा काळ.
तेव्हां भारतात स्त्रिया कशा राहत असतील, वागत असतील. तशीच ती आहे.
पण तरीही ती संधी मिळते तेव्हां बंड करते. त्या वेळच्या मानाने फारच क्रांतीकारी असेल ना ते ?
त्या वेळी झेपलं नसेल. ती काळाच्या पुढची नायिका असेल.
आज तरी कुठे बायका इतकं आपल्याला हवं तसं वागतील ? खूप थोड्या असतील.
राजू गाईड हा निमित्त आहे. त्यातून तिला स्वत्वाची जाणीव येते. तोपर्यंत नवरा हेच सर्वस्व. पदरी पडलं पवित्र झालं हीच तिची मानसिकता असते. राजू भेटल्यावर तिला नवं आयुष्य जगावंसं वाटतं. मग तिला स्वतःची ओळख होते. नंतर ती राजूला देखील बाजूला सारते.
एक स्वतंत्र स्त्री होण्याचा तिचा प्रवास. आणि तरीही तिचं प्रेम. त्याची ओढ. खूप कॉम्प्लेक्स कॅरेक्टर.

जाने तू या जाने ना मधली सिंगल मदर रत्ना पाठक - अतिशय रिअलीस्टीक भुमिका. आपल्या मुलाला गरजेनुसार खोचक टोमणे मारणारी पण त्याच्या मनातील गोष्टी त्याच्या आधी माहित असणारी, मुलावरच्या संकटाने व्याकुळ होणारी आणि ते सोडवण्यासाठी विश्वासू मैत्रिणीची मदत मागणारी वर्किंग वुमन. ही भुमिका रत्ना पाठकने नेहमीच्याच ताकदीने सादर केली आहे.

पिंजरमधील उर्मिला - जबरदस्त काम आहे. पळवून नेलेली आणि त्यामुळे खुद्द आईने झिडकारलेली, पळवणार्या माणसाबद्दल, आपली आयडेंटीटी नष्ट झाल्याबद्दल राग आणि हळूहळू हेच आपलं आयुष्य आहे हे ॲक्सेप्ट करणारी, तरीही आपलं मागलं आयुष्य विसरू न पाहणारी मुलगी. आपल्या नव्या आयडेंटीटीचा वापर करून आपल्या वहिनीला सोडवणारी मुलगी. अंगावर येतो तो पिक्चर. अतिशय आवडला

झुबैदा - वडील अमरीश पुरीच्या टिपीकल पुरूषी मनोवृत्तीमुळे घुसमटून गेलेली झुबैदा. नंतर मनोज वाजपेयीच्या प्रेमात गुरफटलेली आणि ते जेव्हा हरवू पाहतेय तेव्हा त्याची साथ सुटू नये म्हणून वाट्टेल ते करणारी झुबैदा.
बोनस म्हणजे या पिक्चरमधे राणीच्या वेशातली करीश्मा अप्रतिम दिसलेय. आणि मनोज वाजपेयी रॉयल आयकॅंडी

जाता जाता : ‘ती सध्या काय करते’ मधे उर्मिला कानिटकरने अंकुश चौधरीच्या बायकोची छोटीशी भुमिका केलेय पण या भुमिकेचं डीटेलिंग मस्त आहे. नवर्याची मैत्रिण तितक्याच विश्वासाने ॲक्सेप्ट करणारी, नवर्याने फालतू प्रश्न विचारल्यावर वैतागणारी आणि ओव्हरऑल नॉर्मल, अगदी आपली बहीण किंवा मैत्रिण वाटू शकणारी मुलगी.

सगळंवाचून झालं, कोणी नर्गिस चं नाव घेतलं नाही Mother India साठी प्रियांका फॉर मेरी कॉम दामिनी साठी मीनाक्षी सगळे acting आणि परफॉर्मन्स साठीच आवडले आहेत
मीनाकुमारी साठी वेगळा धागा निघेल बहुधा, दिल एक मंदिर, दिल अपना प्रीत पराई, पाकिझा
नूतन फॉर बंदिनी, अनाडी, सुजाता

Pages