दोसा

Submitted by प्रीति on 14 March, 2014 - 10:55
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

दोसा-
२ वाटी ब्राऊन/बासमती तांदुळ
१ वाटी उडद दाळ
१/४ टि.स्पुन मेथ्या
मीठ

चटणी -
१:१:१:१:१ प्रमाणात भाजलेले शेंगदाणे, दाळे, डेसीकेटेड कोकोनट, कोथिंबीर, दही
हि. मिरच्या, मीठ
फोडणीसाठी-
तेल, लाल मिरच्या, जीरे, मोहोरी, उडद दाळ, कडिपत्ता

सांबार-
१ वाटी शिजलेली तुर डाळ
१/२ वाटी एमटीआर सांबार पावडर, कमी तिखट वाल्यांसाठी १/३ वाटी
२ वाट्या हि.भोपळ्याच्या १ इंच लांबीच्या फोडी
शेवग्याच्या शेंगा उकडुन
कांदा, टोमॅटो लांब चिरुन
जिरे, मोहोरी, मेथ्या, तेल
गुळ, चिंचेचा कोळ, मीठ, तिखट चवीनुसार

बटाट्याची भाजी-
४-५ मध्यम बटाटे उकडुन फोडी करुन
कांदा उभा चिरुन
१ चमचे आलं, हि.मिरची पेस्ट
जीरे, मोहोरी, उडद दाळ, कडिपत्ता, तेल
लिंबु/साईट्रिक अ‍ॅसिड

क्रमवार पाककृती: 

दोसासाठीचे जिन्नस, मीठाशिवाय ७-८ तास भिजऊन मिक्समधुन बारीक करावे. नंतर त्यात मीठ घालुन उबेला ठेवावे. जर हवामान खुप उष्ण असेल तर मीठ घालु नये. बरेच थंड असल्यास शाल पांघरुन बंदिस्त ठिकाणी ठेवावे.
जेव्हा भाजी आणि सांबार करायला घ्याल त्या शेजारी हे पीठाचे भांडे ठेवल्यास अजुन पीठ मस्त फुगते.

चटणीसाठी भाजलेले शेंगदाणे, दाळे, डेसीकेटेड कोकोनट, कोथिंबीर, दही, हि. मिरच्या, मीठ मिक्सरवर एकदम बारीक करावे, लागल्यास थोडे पाणी किंवा दही घालावे. वरतुन लाल मिरच्या, जीरे, मोहोरी, उडद दाळ, कडिपत्त्याची
खमंग फोडणी द्यावी.

भाजीसाठी जीरे, मोहोरी, उडद दाळ, कडिपत्ता फोडणी करुन कांदा मस्त परतुन घ्यावा मग आलं, हि.मिरची पेस्ट परतुन हळद, मीठ आणि लिंबु/साईट्रिक अ‍ॅसिड टाकुन मिक्स करुन बटाट्याच्या फोडी टाकाव्या.

सांबारासाठी जिरे, मोहोरी, मेथ्याची फोडणी करुन कांदा परतल्यावर, टोमॅटो आणि भोपळा शिजवुन घ्यावा. शेवग्याच्या शेंगा वेगळ्या शिजवुन भोपळा शिजल्यावर घालाव्या. हळद, चिंचेचा कोळ घालुन परतावे. मग तुरीची शिजलेली दाळ, १० वाट्या पाणी घालावे. त्यात एम्टीआर पावडर, मीठ, गुळ घालुन चांगले उकळु द्यावे. पातळ वाट्ल्यास थोडी अजुन पावडर घालावी.

सगळं रेडी झाल्यावर गरमा गरम दोसे घालावे आणि भाजी, चटणी, सांबार सोबत खावेत.

वाढणी/प्रमाण: 
२ माणसे
अधिक टिपा: 

ब्राऊन राईसचे दोसे पण मस्त होतात, फक्त रंग वेगळा येतो. जमल्यास दोसे घालायचा व्हिडिओ टाकेन.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

wow

मस्त आहे फोटो, रेसिपी.
>>१ वाटी शिजलेली तुर डाळ
१/२ वाटी एमटीआर सांबार पावडर>> नक्की अर्धी वाटी? खूप स्पायसी होत नाही? झणझणीत असते एम्टीआर पावडर.

सगळ्यांना धन्यवाद!
इब्लिस, केशर भात आहे तो.
मेधा, सासरचं साडनाव Proud
नवर्‍याच्या प्रायव्हेट वेबसाईट्वर टाकलं की आपोआप येतो, पण फोटो मीच काढलाय आयफोनच्या कॅमेरातुन.
सायो, मी ति़खट अजिबातच घालत नाही. बदल करते रेसिपीत.

मस्त सजवलंय.. दोसे छान पण भाजी अन चटणी काय सुंदर दिसतायत..

फोटोवर आपोआप वॉटरमार्क कसा येतो ते सांगशिल का मला विपूत?

सही !!

वॉव! तोंपासु फोटो.. Happy
मवा.. माझी रुममेट ब्राउन राईस,उडीद डाळ नि मुठभर हरभरा डाळ घालुन भिजवते ७-८ तास .. मग थोडे ओट्स घालुन मिक्सर मधे पीठ करुन घेते..

धन्यवाद मंडळी!
चटणी जो खातो त्याला नक्की आवडते Happy
करुन पहा नक्की!
मवा, तेच प्रमाण, साध्या तांदळा एवजी, ब्राऊन राईस.

Pages