२ टोमॅटो
२ गाजरं
५-७ पालकाची पानं
४-५ bok choy ची पानं
५-७ Romain व Iceberg Lettuce ची पानं
२-३ Red Cabbage/ Chicory ची पानं
अर्धी ढब्बू मिरची
१ मध्यम कांदा
४ लसणाच्या पाकळ्या
मीरपूड
थोडी कोथिंबीर
मीठ
(असल्यास) गार्लिक बटर. [ हे न वापरल्यास ही रेस्पी व्हीगन होईल.]
छोट्या कुकरमध्ये वरील सर्व भाज्या/ग्रीन्स (कांदा वगळून) व मीठ घालून २ शिट्ट्या काढाव्यात. [ भाज्या फार गाळ करायच्या नाही आहेत. माझा कुकर छोटा आणि जरा बिघडलेला आहे, सारख्या शिट्ट्या करतो. मोठा कुकर वापरला तर कदाचित एकच शिट्टी व प्रेशर बास होईल.]
तोवर कांदा जरा मोठा कापून घेणे.
गॅसवर भांड्यात गार्लिक बटर घालून कांदा मोठ्या फ्लेमवर परतून घेणे व अर्धाकच्चा शिजवणे. त्यातच कोथिंबीर घालून परतणे.
व कुकरमधील शिजवलेल्या भाज्या - त्यातल्या पाण्यासकट घालून गरम करणे.
व्हेजी सूप तयार!
बस्कुबाय, मस्तं फोटो. करून
बस्कुबाय, मस्तं फोटो. करून बघेन. पोटभरीला म्हणून यात पास्ता घालावा म्हणते.
मेधा बरोबर. बॉक चॉयला चायनिज
मेधा बरोबर. बॉक चॉयला चायनिज कॅबेज पण म्हणतात. त्यामुळे तशी चव असणार जरा..
मृ, चालतंय की. कसं होते ते सांग..
अरे वा .. सोपी कृती आहे ..
अरे वा .. सोपी कृती आहे .. मला आवडतं असं क्लीअर सूप ..
छान आहे
छान आहे
My Dad's most favorite soup.
My Dad's most favorite soup. Super easy and quick recipe BSK.
माझं आवडतं सूप. आठवड्याच्या
माझं आवडतं सूप. आठवड्याच्या शेवटी भाज्या संपत आल्य की उरल्यासुरल्या भाज्या घालून हमखास बनवलं जातं. सेल्व्ही मोडीफाईड कृतीमध्ये यात ती करी पावडर नाहीतर रस्सम पावडर घालते. बरं लागतं.
Pages