Veggie Soup

Submitted by बस्के on 11 March, 2014 - 20:13
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ टोमॅटो
२ गाजरं
५-७ पालकाची पानं
४-५ bok choy ची पानं
५-७ Romain व Iceberg Lettuce ची पानं
२-३ Red Cabbage/ Chicory ची पानं
अर्धी ढब्बू मिरची
१ मध्यम कांदा
४ लसणाच्या पाकळ्या
मीरपूड
थोडी कोथिंबीर
मीठ
(असल्यास) गार्लिक बटर. [ हे न वापरल्यास ही रेस्पी व्हीगन होईल.]

क्रमवार पाककृती: 

soup1.jpg

छोट्या कुकरमध्ये वरील सर्व भाज्या/ग्रीन्स (कांदा वगळून) व मीठ घालून २ शिट्ट्या काढाव्यात. [ भाज्या फार गाळ करायच्या नाही आहेत. माझा कुकर छोटा आणि जरा बिघडलेला आहे, सारख्या शिट्ट्या करतो. मोठा कुकर वापरला तर कदाचित एकच शिट्टी व प्रेशर बास होईल.]
तोवर कांदा जरा मोठा कापून घेणे.
गॅसवर भांड्यात गार्लिक बटर घालून कांदा मोठ्या फ्लेमवर परतून घेणे व अर्धाकच्चा शिजवणे. त्यातच कोथिंबीर घालून परतणे.
व कुकरमधील शिजवलेल्या भाज्या - त्यातल्या पाण्यासकट घालून गरम करणे.

व्हेजी सूप तयार!

soup2.jpg

वाढणी/प्रमाण: 
दोन जणांना दोन सर्वींग्ज
माहितीचा स्रोत: 
मीच.
आहार: 
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त दिसतंय. मी हव्या असलेल्या भाज्या कुकरला शिजवून मग मिक्सरला फिरवते. आणि मग उकळी काढते. त्यात मीठ वगैरे. हवं असल्यास क्रश्ड पेपर वगैरे. हेल्दी आहे खूपच.

मस्त आणि सोप्पं दिसतंय. याला एक छोटासा ट्विस्ट द्यायचा असेल तर बटर न वापरता लाल रंगाचं चायनीज सिसमी ऑईल (तीळाचे तेल) वापरा. वरूनही एखाद चमचा थोडं घालावं. एक वेगळीच चव येते. दार्जिलिंग, सिक्कीम भागात थुकपा चाखला तेव्हा ही चव अत्यंत आवडली होती. तिथेच मला हा सिक्रेट इन्ग्रेडियन्ट कळला.

मी हे तेल वापरते.

मामी, येस. तसंही एकदा करून बघणार आहे. (माझ्या डोक्यात थाई काहीतरी होतं)
यावेळेस असं केले कारण घसे बरे नाहीत. त्यामुळे गरम गरम, पोटभरीचे व मालमसाला न घातलेले छान वाटले!

अगं मी ठीके.. नवरा अजुन खोकतोय. तो चहा पीत नाही फारसा त्यामुळे नाही जमलं. मी नेक्स्ट टाईम आजारी पडले की करीन ट्राय! (काहीपण! Proud )

मस्त, मी पण हे सूप हॅन्ड ब्लेन्डर वापरून गुळगुळीत करते. (त्यामुळेच लेक त्यात काय घातलय हे निवडत न बसता यम्मी यम्मी करत पीते Wink ) मी फक्त इथे मिळतील ते घटक वापरुन व्हेरिएशन म्हणून चालवते Wink

मामी, तू लिहीलेलं तेल मुंबई/ठाणे इ. ठिकाणी कुठे मिळेल? आणि हा मीठवाला चाय काय प्रकार आहे?

ते तेल कुठेही मिळेल कवे. सुपरमार्केटात साधारणपणे चायनीज सॉस वगैरे विकायला असतात त्याच कप्प्यात हे सापडेल.

घसा खराब असेल तर आपल्या नेहमीच्या चहात एक चिमूट किंवा त्याहून कमी मीठ घालून तो चहा गरमगरम प्यावा. घशाला लगेच आराम मिळतो. गरम पाण्यानं मिठाच्या गुळण्या करतो त्यापेक्षा हे घशात आतपर्यंत जातं.

घसा खराब असेल तर आपल्या नेहमीच्या चहात एक चिमूट किंवा त्याहून कमी मीठ घालून तो चहा गरमगरम प्यावा. घशाला लगेच आराम मिळतो. गरम पाण्यानं मिठाच्या गुळण्या करतो त्यापेक्षा हे घशात आतपर्यंत जातं.>>ओक्के! कसं लागत असेल कल्पना येत नाहीये पण प्रयोग करुन बघेन

सायोने पण बहुतेक याच तेलाबद्दल लिहीले होते मागे.
फार महाग असते का इकडे? मी होल फुड्स मध्ये पाहीले ते चांगलेच महाग होते.

कॉस्टको मध्ये ह्या तेलाची बरीच मोठी बाटली $११ ला मिळते. हे तेल अ़जुन कशात वापरता येईल?
बस्के मस्त रेसिपी. मी पण ब्लेंड करुन घेते अस सूप.

भारी दिसतंय सूप.

अवांतर- चहा ऐवजी सोसवेल इतक्या कढत पाण्यात मीठ आणि हळद घालून दिवसातून २-३ वेळा प्यायल्यास सर्दी-खोकल्याच्या सुरुवातीची जी खवखव असते ती एकदम पळून जाते. नंतर कफ पण कमी होतो.

मस्त दिसतेय रेसिपी. ब्लेंडर मधे फिरवलेले मला फारसे पटत नाही. कारण नुस्तेच गिळले जाते. जरा "बाइट" अस्ला की खाल्ल्याचे समाधान मिळते. यात सेलरी पण छान लागेल असे वाटते.
बायदवे, bok choy कधी ट्राय केले नाही, कसा असतो फ्लेवर ? कशाच्या जवळपास ?

वेगळा खाऊन नाही पाहीला मी. सुप्स व सलाड्स मध्ये चांगले लागले..

सुनिधी, मलाही तुकडे आवडतात..
सिंडी, थँक्स. उपाय करून पाहीन.

मस्त सूप... मला गाजर वगैरेंचे तुकडे सूप बोलच्या एकदम तळाशी ठेवून मग त्यांचे रवंथ करायला आवडते!

ह्यात इथे मिळणार्‍या भाज्यांच्या उपलब्धतेनुसार कोबी / फ्लॉवर, मटार, श्रावणघेवडा, स्वीट कॉर्न इत्यादींपैकी बरंच काय काय ढकलता येतं. लसूण आवडत नसेल तर किसलेलं आलं, मीठ, मिरपूड घालूनही मस्त लागतं सूप.

मस्त आहे हा प्रकार. याचं इटालियन व्हर्शन म्हणजे मिनिस्ट्रोनी. त्यात ऑऑ मधे कांदा परतून फ्रेश बेसिल आणि पार्सली घालायची. आणि उकळताना शेवट्च्या ५ मि त थोडा पास्ता टाकायचा. त्या ५ मि त तो शिजतो आणि अगदी पिठूळपण लागत नाही. या सूपात लाल माठ मस्त लागतो.

छान दिसते अहे सुप . साधा पत्ता कोबि टाकून मी करते . शीर्षक मराठी तुन लिहिले तर नाही का चालणार .

छान दिसते अहे सुप . साधा पत्ता कोबि टाकून मी करते . शीर्षक मराठी तुन लिहिले तर नाही का चालणार .

मी सूप करताना कुकरला नाही शिजवत भाज्या. तश्याच शिजवते. वेळ लागतो खरे खूप.
आता एकदा या पद्धतीने करून बघते. Happy

फारच तोंपासु दिसतंय सूप. बोकचॉय ऐवजी काही वापरता येईल कां, म्हणजे मस्ट आहे कां? इथे मिळेल याची गॅरंटी नाही.

घसा खराब असेल तर
<<
हळद मिठाच्या पाण्याची रेस्पी नाहिये का माबोवर?

एक कप पाणी उकळा. उकळी फुटली की त्यात चिमूटभर हळद, चिमूटभर मीठ. अन जस्ट पाव चमचा साजुक तूप.
पाऊण कप झालं, की कपात काढा, अन हळू हळू फुंकत पिऊन टाका.

घशाला कसं वाटलं ते लिहा.

नाही गं आडो. मी दुकानातील दिसतील त्या हिरव्या भाज्या, सलाद ग्रीन्स आणल्या होत्या. जे मिळेल ते घे. Happy

बॉक चॉय साधारण अगदी माइल्ड कोबी - अगदी माइल्ड पातीचा कांद याच्यामधली चव वाटते मला तरी. अगदी कोवळी पाने असली तर चव जास्त छान वाटते. मी कधी बॉकचॉय कधी सूप मधे वापरलं नाही . आता एकदा करुन पाहीन.

फोटो टेम्प्टिंग वाटतोय एकदम.

Pages