मंगळ कार्य !

Submitted by अंड्या on 27 February, 2014 - 13:36

आज पत्रिका आली एका मंगळ कार्याची. एका मित्राच्या लग्नाची. म्हटलं तर माझा मित्र, म्हटलं तर माझ्या वडीलांचा मित्र. माझ्यापेक्षा बारा वर्षे मोठा तर माझ्या वडीलांपेक्षा बारा वर्षे लहान. जुन्या वाडीतला जुना मित्र. आतासे राहायला आणखी कुणीकडे. लग्न त्याचे आजवर झाले नव्हते हे पत्रिका बघूनच समजले. अन नाही म्हटले तरी धक्काच बसला. अजून झाले नव्हते की एक मोडून हे दुसरे? पहिले कोणाशी झाले, कधी झाले, का मोडले? कि झालेच नाही ! पण मग एवढे उशीरा का? भावांची लग्ने झाली असे कानावर होते. एकाचे सहकुटुंब फोटोही फेसबूकावर बघून झाले होते. मग तीनही भावांत देखणा हा, याचेच कसे राहिले? अवाजवी अपेक्षा? कि आजकाल काय ते म्हणतात ते करीअर ओरीएंटेड?

ईतक्यात आईच म्हणाली, "बरे झाले, जमले एकदाचे. मंगळ असल्याने राहिले होते.."

हा मला दुसरा धक्का .. !

एखादे तिसरेच कारण ऐकायला आवडले असते, पण हे कारण ! अजूनही आपण नक्की कोणत्या जमान्यात जगतोय. एखादी गोष्ट चांगली व्हावी यासाठी चांगला मुहुर्त बघणे (आता हि श्रद्धा असो वा अंधश्रद्धा) हे समजू शकतो. शेवटी करणार्‍याची नियत चांगलीच असते तर का उगाच वाद घाला. मात्र एखाद्या अंधश्रद्धेपोटी एखाद्याला लग्नापासून वंचित ठेवणे? हे कितपत पटते? लोकांना मुलं होत नाहीत तेव्हा किती हवालदिल होतात, उपासतापास, नवसप्रार्थना, औषधोपचार, आणि एवढेही करून न भागल्यास दत्तक घेण्याची तयारी. पण इथे तर एखाद्याला ती संधीच नाकारली जातेय. मूल तर दूरची गोष्ट पण आयुष्याच्या जोडीदारापासून वंचित ठेवले जातेय. ते देखील एका कपोकल्पित कारणासाठी?

शप्पथ वाईट वाटले एका तरुणासाठी.. स्मार्ट बंदा, एकेकाळी मैत्रीणीही बर्‍यापैकी राखून होता. पुढे जाऊन मुली फिरवण्याबाबत याचाच आदर्श ठेवावा असेही कैकदा त्या किशोरवयात मनात आले होते. पण हा गडी स्वता मात्र लग्नाच्या बाजारात मागे पडला. जरी मधल्या काळातली त्याची काही खबर नसली तरी नक्कीच कुठेतरी त्याने जमवले असणार हा त्याच्या इमेजला पाहता विश्वास पण त्या मुलीच्या घरून याच कारणास्तव नकार पचवावा लागला असणार. मग पुढे स्वतालाच लग्न करायची इच्छा राहिली नसणार. ज्या मुलीवर प्रेम होते तीच अश्या कारणामुळे मागे हटली तर ठरवून लग्न करणार्‍यात काय कोण भेटणार आणि भेटलीच तर कशी भेटणार या विचारांनीच आत्मविश्वास डळमळीत झाला असणार. काय रिअ‍ॅक्ट झाला असेल तो या सर्व परिस्थितीवर? आपलेच दुर्दैव म्हणून नशीबाला दोष देत बसला असेल की बंड करून उठावेसे वाटले असेल? आजूबाजुच्या मित्रांची, स्वताच्या भावंडांची लग्ने होताना काय वाटले असेल त्याला? च्यायला, मी त्याच्या जागी असतो तर मी काय केले असते अश्या परिस्थितीत? लोकांच्या नाकावर टिच्चून लग्न करण्यासाठी समोरून एखादी मुलगी तरी तयार व्हायला हवी. त्याचे लग्न आज एवढ्या उशीरा होत होते याचा अर्थ ती अशी सहजासहजी मिळत नाही, त्याला तरी मिळाली नाही..

नुसते विचार ओसंडून वाहू लागले माझ्या चार बाय चार च्या डोक्यात. पण हे माझ्या घरच्यांसमोर बोलण्यात काही अर्थ नव्हता हे जाणून मी मुद्दामच म्हणालो, "चला फायनली एक मुलगी, एक घर तरी त्याला असे मिळाले ज्यांचा या भाकड गोष्टींवर विश्वास नाही.."

तर कसले काय,
आई म्हणाली, "हं, मुलीला पण मंगळ असेल ..... " माझी बोलती बंद !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही बरोबर आहे ते शिर्षक. कारण मंगळामुळे मंगल कार्य ( लग्न) लांबले म्हणून मंगळ कार्य असे दिले गेलेय. असे मला तरी वाटते.:स्मित:

पत्रिकेतील मंगळ कुणाला त्रास देत असेल तर आम्हाला भेटा. त्याचा बंदोबस्त करु
>>>>>>
मृत्युयोग की मृत्युषडाष्टक काहीसा शब्द आहे, तो योग असल्यास? काही खात्रीशीर उपाय असतो का? (षडाष्टक स्पेलिंग चुकले असल्यास करेक्ट करा)

अभिषेक... त्यात अनेक प्रकार असतात रे! एक दिशा मिळते किंवा आपल्या मनाचे समाधान होते त्या गोष्टी बघुन / उपाय करुन एवढचं लक्षात ठेव रे... बाकी काही काळजी करू नकोस मृत्युषडाष्टक वै... Happy

अजूनही आपण नक्की कोणत्या जमान्यात जगतोय>> साळसकर्...एका मित्राची बायको अलिकडेच यु के मधे आलिये..वय असेल २६ -२७ वर्ष ...चार तास शोधुन तिला हवा तसे शुज सापड्ल्यावर तिने जाहीर केल कि मी शनिवारी नविन जोडे घेत नाही कारण आजारि पड्ते.. Sad आणि समजाउन सांगुन पण नाही घेतले...
ti BSc MBA aahe...:(

aai vadilanch samju shakto pan aatachi tarun pidhee jar as mhnat asel tar आपणच कुठेतरी जाउन उडि मारली पाहीजे...

पुण्याची विनिता
ते मंगळकार्यच लिहिलेय.
मंगल : शुभ
मंगळ : अशुभ
आता विचार करतोय त्या मंगळकार्याला उपस्थित राहिल्याने माझ्या आयुष्यात काही विघ्न वा माझे लग्न जमण्यात काही अडचण नाही ना येणार. Sad

शोनुकुकू, ते ही आहेच पण असे एखादे छोटेमोठे सुपरस्टिशन चालून जाते. अमुक रंगाचा शर्ट आणि तमुकतमुक आकडा वगैरे. पण जिथे परीणाम गंभीर होतात तिथे तरी सारासारविचारबुद्धी वापरा की..

मंगळ असलेली माणस खर दिसायला दे़खणी असतात,,,, पण लग्न उशिरा जमत.. हो पण याला तोन्ड द्यायला पण खमकी असतात....कधीही विशेष निराश होत नाहीत..... कायम तलवार उपसून परिस्थितीशी दोन हात करतात..आणि हाच गुण त्याना आयुश्यभर तारून नेतो... पण लोक मंगळ आहे म्ह्णून नाकारतात हे चुकीचे आहे

हर्षा __ छ्या, काळजी ग्ग कसली, तसे असते तर लग्नच केले नसते, उलट आता त्या योगाला खोटे पाडायला हट्टाने सुखाचा संसार करतोय Happy

हे तर आपले असेच चौकशी म्हणून, आईवडीलांच्या समाधानासाठी आणि त्यांची परवानगी मिळवायला म्हणून यावर तोडगा काढणे गरजेचे होते, तेव्हा चौकश्या केल्या होत्या. एकाने लाखभर खर्च सांगितला तर एकाने वीस-पंचवीस हजार, कोणी म्हणाले की यावर उपायच नाही म्हणून लग्नच करू नकोस, तर एकाने १०१ रुपये दक्षिणा घेऊन एका कागदावर मंत्र लिहून दिला... वगैरे वगैरे.. इथे आणखी काही नवीन ऐकू येतेय का बघूया म्हटलं..

मंगळ : अशुभ <<
मंगळ या शब्दाचा अर्थ अशुभ होत नाही.

>> एकेकाळी मैत्रीणीही बर्‍यापैकी राखून होता. पुढे जाऊन मुली फिरवण्याबाबत याचाच आदर्श ठेवावा असेही कैकदा त्या किशोरवयात मनात आले होते. <<
हे काय आहे? मैत्रिणी राखणे, मुली फिरवणे वगैरे? चीप

मंगळ या शब्दाचा अर्थ अशुभ होत नाही.
>>>
मी देखील तो शब्दाचा अर्थ म्हणून नाही सांगितला. Happy

हे काय आहे? मैत्रिणी राखणे, मुली फिरवणे वगैरे? चीप
>>>
हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे, चर्चेची तयारी आणि परवानगी असेल तर काढू का?

आता विचार करतोय त्या मंगळकार्याला उपस्थित राहिल्याने माझ्या आयुष्यात काही विघ्न वा माझे लग्न जमण्यात काही अडचण नाही ना येणार. <<<< सीरीयसली लिहिले आहे का? अंधश्रद्धा वगैरे जाऊ देत खड्ड्यात पण या असल्या विचारांना नक्की काय म्हनावे ते समजत नाहीये.

मंगळ पत्रिकेत असेल तर तो त्या व्यक्तीचा योग असतो. लग्नाला उपस्थित राहिल्याने अथवा व्यक्तीच्या सान्निध्यात येऊन पसरायला तो काय खरजेसारखा संसर्गजन्य रोग नव्हे!! गेट वेल सून....

लेखात लिहीलेले विचार वाचून वाटलं की तुम्ही मंगळ अशुभ वगैरे विचारांच्या विरोधात असणार. पण
>>
आता विचार करतोय त्या मंगळकार्याला उपस्थित राहिल्याने माझ्या आयुष्यात काही विघ्न वा माझे लग्न जमण्यात काही अडचण नाही ना येणार. >> हे म्हणून तुम्ही त्याच्याही वरताण आहात हे सिद्ध केलंत की.

तुम्हाला सिरीअसली असे वाटतेय का की माझा तो प्रतिसाद सिरीअसली होता Uhoh
जर लेखात लिहिलेले आणि प्रतिसादांत टंकलेले विचार विरोधाभास दर्शवत असतील तर तर तर..... देवा तो काय शब्द आहे.... सर्किस्ट्राकिस्टकली ???

असो, यावरून आठवले, आपल्यात आजही बरेच ठिकाणी विधवा बायकांना अश्या मंगलकार्यांपासून दूर ठेवतात या विचारांना काय बोलाल मग? किती जणांकडे असे चालते वा नाही चालत त्यांनी प्रामाणिकपणे येऊन इथे कबूल करावे.

मुख्य विषय लेखातला बाजूलाच पडला .कडक मंगळी मुलाला कोणी मुलगी देणार का ?पत्रिका बघणारे तर ज्योतिष्याने नको म्हटले की स्थळ बाजूलाच टाकतात .

परीणाम गंभीर होतात तिथे तरी सारासारविचारबुद्धी वापरा की..
>>> अगदि बरोबर्...पण समोरच्या माणसाने डोळ्यावर आणि बुद्धी वर झापडं लावली की मग किव करावीशी वाटते...

>> एकेकाळी मैत्रीणीही बर्‍यापैकी राखून होता. पुढे जाऊन मुली फिरवण्याबाबत याचाच आदर्श ठेवावा असेही कैकदा त्या किशोरवयात मनात आले होते. <<
हे काय आहे? मैत्रिणी राखणे, मुली फिरवणे वगैरे? चीप <<<<<<<<
चीप काय चीप त्यात नीरजे? त्याने वास्तव सान्गितलय, खर खर सान्गितलय अस धरुन चालू की! अन हेच खर असेल, तर अस होत नाही का?
अन असच झाल असेल, तर मग नुस्ता मन्गळ नै कै, मन्गळाबरोबर शुक्रही युतित असेल....... Wink

बाकी चालूद्यात Happy

सहमत लिंबूटिंबू, आजकाल हे असे ... आजकालच का पुर्वापार हे असे चालतच आलेय.. पण याचा शुक्राशी जोडलेला संबंध नाही समजला.. जर उलगडवून सांगाल का? ईंटरेस्टींग अँगल दिसतोय Wink

कडक मंगळी मुलाला कोणी मुलगी देणार का ?पत्रिका बघणारे तर ज्योतिष्याने नको म्हटले की स्थळ बाजूलाच टाकतात .
>>>>>>>>>>>>>

याचा अर्थ इच्छुकांनी जर या अंधश्रद्धेला लाथ मारायची धमक दाखवली तर असल्या टुकार कारणासाठी बाजूला पडलेली चांगली चांगली स्थळे त्यांच्या पदरी पडतील Happy

अश्यांचा एक डाटाबेस तयार केला पाहिजे, एक ते ज्यांची अश्या कारणामुळे लग्न जमली नाहीयेत, आणि दुसरे ते, जे मंगळाला टुल्ली देऊन अश्यांशी लग्न करायला तयार आहेत..

>>>> पण याचा शुक्राशी जोडलेला संबंध नाही समजला.. जर उलगडवून सांगाल का? ईंटरेस्टींग अँगल दिसतोय <<<<
मला काय वेड लागलय कैतरी उलगडवुन सान्गायला? अन ते ही पब्लिक फोरमवर? मला काय जादूटोणा विरोधी कायद्याच्या कचाट्यात सापडायची सध्या तरी इच्छा नाही बर्का! Proud
त्यापेक्षा इथे तिथे असे चुटूरफुटुर टीकात्मक अन भावनोत्तेजक धागे काढण्यापेक्षा मन्गळ अन शुक्र अन एकन्दरीतच ज्योतिषावर असंख्य पुस्तके उपलब्ध आहेत ती वाचायचे कष्ट घ्याल का? प्लिजच???

अस होत नाही का? <<
हे होतं म्हणजे ग्रेट आहे असे नाही. आणि जे होतं ते कौतुकही नाही. मुली फिरवणे आणि त्याबद्दल अभिमान बाळगणे हे चीपच. चीप म्हणण्याबद्दल कुणाला प्रॉब्लेम असेल तर त्याला मी काही करू शकत नाही.

नीरजे, मला नै ग प्रॉब्लेम, चीपच ते.... फक्त धाग्याच्या विषयाला अनुसरुन अशा चीप बाबीन्करता मन्गळाच्या जोडिने शुक्रालाही गुन्तवा, अन कोपर्‍यात बुधाला बसवा असे सान्गण्या पुरते माझे पोस्ट.
अन आधी पोरी "फिरवल्यात" म्हणे तर मग आता लग्न होत नै म्हणून कशाला रडावे? त्याने तरी किन्वा याने तरी?
कशावरुन आधीच्या पोरीफिरविण्याच्या दिवे लावलेल्या इतिहासाची लक्तरे लग्न जमवताना आड येत नसतील अन तो दोष उगाच मन्गळावर ढकलला जात असेल?
खरे तर प्रत्यक्षात असेच होते की एखादे स्थळ येते, बाकी सर्व ठीक असते, पण आधीचे काही "पराक्रम जगजाहिर" झालेले, त्याची माहिती झिरपत येऊन पोहोचली की कुणाला न दुखवता नकार द्यायला मन्गळ वा अन्य बाबी भारी उपयोगी पडतात, उपयोग करुन घेतला जातो. Happy असो.

हो की! त्याच्या पोरी फिरवण्याच्या इतिहासामुळेच लग्न होत नसेल. उगाच मंगळाला कशाला दोष देताय?

आणि मुळात त्याचं लग्न झालं नाही किंवा उशीरा झालंय हा इतका गळा काढून रडण्यासारखा विषय आहे का? मंगळ किंवा इतर काहीही कारणामुळे लग्न न होणं किंवा उशीरा होणं असं होऊ शकतं. काही जणांना स्वतःलाच करायचं नसतं लग्न ३५-३६ च्या आधी. त्याचा इतका इश्यू केलाच पाहिजे का?

काहीही वाटेल ते काय लिहिताय- "आपलेच दुर्दैव म्हणून नशीबाला दोष देत बसला असेल की बंड करून उठावेसे वाटले असेल? आजूबाजुच्या मित्रांची, स्वताच्या भावंडांची लग्ने होताना काय वाटले असेल त्याला?"

या असल्या लोकांमुळेच अविवाहित लोकांना प्रेशर येतं लग्नाचं आणि मग अगदी न आवडलेल्या व्यक्तीशी लग्न करुन मोकळे होतात. पुढे आयुष्यभर त्रास त्यांनाच होतो.

माझ्या ओळखीत व नात्यात अनेक अविवाहित व्यक्ती आहेत. पण मी त्यांना 'दुर्दैवी' 'कमनशिबी' 'आत्मविश्वास डळमळीत झालेले' असं काहीही म्हणत नाही. किंवा त्यांच्यात काहीतरी 'दोष' आहे- असं मला अजिबात वाटत नाही.

मंगळाचं नंतर बघू- आधी तुम्ही अविवाहित लोकांना 'कमनशिबी' म्हणून टोचणं बंद करा.

हे होतं म्हणजे ग्रेट आहे असे नाही. आणि जे होतं ते कौतुकही नाही. मुली फिरवणे आणि त्याबद्दल अभिमान बाळगणे हे चीपच. चीप म्हणण्याबद्दल कुणाला प्रॉब्लेम असेल तर त्याला मी काही करू शकत नाही.
>>>>>>>>>>>
मी कुठे म्हणालो की ते चीप नाही किंवा आहे किंवा नाही असे नाही, उलट मी म्हणालो की तो स्वतंत्र धाग्याचा विषय आहे, इथे चर्चा नकोच त्याची, उगाच मंगळ भरकटायचा Happy
बादवे, कौतुकाची गोष्ट मात्र हि नक्कीच असते हा, किमान त्या एका वयात तरी. कोणी कबूल करो वा न करो Happy

मला काय जादूटोणा विरोधी कायद्याच्या कचाट्यात सापडायची सध्या तरी इच्छा नाही बर्का!
>>>>>>>>>
हे मंगळ शुक्र या ग्रहांबद्दलचे माहिती पसरवणे हे जादू टोणा कायद्यात येते हे सांगितल्याबद्दल धन्यवाद. Happy

.

त्यापेक्षा इथे तिथे असे चुटूरफुटुर टीकात्मक अन भावनोत्तेजक धागे काढण्यापेक्षा मन्गळ अन शुक्र अन एकन्दरीतच ज्योतिषावर असंख्य पुस्तके उपलब्ध आहेत ती वाचायचे कष्ट घ्याल का? प्लिजच???
>>>>>>>>>>>>>>>>..
भावनोत्तेजक (नाईस वर्ड हं) असा हा धागा असेलही, पण टिकात्मक नव्हता, बस्स वाईट वाटले ज्याच्याशी हे घडते त्याच्याबद्दल.
बाकी ज्योतिषावर पुस्तके शालेय अभ्यासक्रमात असती तर मार्क्स मिळवण्यासाठी वाचलीही असती Happy

कशावरुन आधीच्या पोरीफिरविण्याच्या दिवे लावलेल्या इतिहासाची लक्तरे लग्न जमवताना आड येत नसतील अन तो दोष उगाच मन्गळावर ढकलला जात असेल?
>>>>>>>>>
क्या बात है !!!
शक्य आहे..

पण आता मला सांगा, जर हे मंगळ प्रकरणच नसते तर अश्या मुलांना आपले दोष लपवायला हि जागाच मिळाली नसती ना, निदान यासाठी तरी या मंगळाला गाढायला हवे की नको. Happy

.

माझ्या ओळखीत व नात्यात अनेक अविवाहित व्यक्ती आहेत. पण मी त्यांना 'दुर्दैवी' 'कमनशिबी' 'आत्मविश्वास डळमळीत झालेले' असं काहीही म्हणत नाही. किंवा त्यांच्यात काहीतरी 'दोष' आहे- असं मला अजिबात वाटत नाही.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
तुमच्या आमच्या सर्वांच्याच ओळखीत अशी एक व्यक्ती आहे...
सलमान खान..!!
पण सारेच सलमान नसतात ना राव जे याला नशीब म्हणावं.. Sad

वेदिका, अगदी बरोब्बर अचूक लिहीलेत. Happy

>>>>> आणि मुळात त्याचं लग्न झालं नाही किंवा उशीरा झालंय हा इतका गळा काढून रडण्यासारखा विषय आहे का? ><<<<<
असे जागोजागि नेटवर/मिडियामधे रडले की वातावरणनिर्मिती होऊन लग्नासारख्या विषयात तिथेही "रिझर्वेशन" लागु करता येऊ शकेल, नै का? Wink

>>>>> मंगळ किंवा इतर काहीही कारणामुळे लग्न न होणं किंवा उशीरा होणं असं होऊ शकतं. काही जणांना स्वतःलाच करायचं नसतं लग्न ३५-३६ च्या आधी. त्याचा इतका इश्यू केलाच पाहिजे का? <<<<<
अहो इश्यु केल्याखेरीज, वातावरण निर्मिती केल्याखेरीज , हिन्दू धर्मशास्त्रे/ज्योतिष यावर रान कसे उठविता येईल हिन्दूशास्त्रे/ रुढीपरंपरांमागे/ज्योतिषामागे/ अगदी मन्गळा मागेही "बामणी कावाच असतो" असे ते ब्रिगेडी बोम्बलत फिरतातच, त्यात आपल्या काडीची भर नको का पडायला? असो.

येता काळ अवघड आहे बोवा.

बामणी कावा .. आरक्षण ... ब्रिगेडी .. ओह माय माय.. लिंबूटिंबू काय हे Rofl

हि पोस्ट आधीच लिहिली असती तर तुम्ही या अँगलने चर्चा करता आहात समजले तरी असते.

>>मंगळाचं नंतर बघू- आधी तुम्ही अविवाहित लोकांना 'कमनशिबी' म्हणून टोचणं बंद करा.<<
काही स्वच्छंदी अविवाहित लोक तर विवाहितांना कमनशिबी समजतात. Wink

Pages