झी मराठी - सा रे ग म प - सूर नव्या युगाचा

Submitted by मंजूडी on 28 January, 2014 - 02:02

झी मराठी वाहिनीवर सा रे ग म पचे नवे पर्व सुरू झाले आहे - सूर नव्या युगाचा!

यावेळी फक्त १४ स्पर्धक निवडून ही स्पर्धा चालू केलेली आहे -
महेश कंटे, श्रीनिधी घटाटे, कौशिक देशपांडे, जयंत पानसरे, भाग्यश्री टिकले, जुईली जोगळेकर, मनोज क्षिरसागर, रसिका गानू, संज्योती जगदाळे, प्रल्हाद जाधव, शंकर गिरी, मृण्मयी पाठक, रेश्मा कुलकर्णी, गणेश मेस्त्री

परीक्षक आहेत अवधूत गुप्ते आणि तौफिक कुरेशी, तर सूत्रसंचालन करतोय अभिजीत खांडकेकर.

दर सोमवार आणि मंगळवार रात्री साडेनऊ ते साडेदहा झी मराठी वाहिनीवर - "सा रे ग म प - सूर नव्या युगाचा"

पुनःप्रक्षेपण - मंगळवार आणि बुधवार दुपारी चार वाजता आणि शनिवारी रात्री साडेनऊ वाजता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमचं वय काय? तुम्ही बोलता काय? >> खरचं लिही. आणि कालचे त्याचे पहिले गाणे देखील यथातथाच होते. लगेच बंद केला टिव्ही. अतिशय रटाळ कार्यक्रम आहे हा.

मागचा कुठलातरी भाग आज युट्यूबवर पाहिला थोडासा.. टिकले बाईंना 'केव्हा तरी पहाटे' काय दिलं!! Uhoh

आडो माझे पण. प्रल्हाद जास्ती!!

मंजुडे अगदीच अनुमोदक. कोण जाणार असे विचारुन दाखवायचा प्रयत्न करतात की हा कार्यक्रम किती खेळीमेळीचा आहे. एखाद्या स्पर्धकाने ही जाणार ही टूकार गायली म्हणले तर कट करतील. Proud

मला ते फेसबुकचे प्रकरण समजलेच नाही. जयंत पण फेसबुकवर असेलच की! लोक जाऊन जयंतच्याच पेजवर लिहितील ना उगाच अवधुतच्या पेजवर का लिहित बसतील?

मंगळवार सायंकाळपर्यंत या बाफावर हालचाल जाणवली नाही यातच या कारेक्रमाचं सौख्य सामावलेले आहे. जय हिंद!

अस्सं होय Proud

काल त्या जगदाळे ने गायलेला तो झुला नाहीच आवडला मला. पण ते संगीतही विसंगत वाटलं मला तरी. आणि परिक्षकांनी त्याची तारीफ केली.

हो पौर्णिमा, डोंबिवलीच्या फक्त ह्याच उमेदवाराला सपोर्ट करतेय मी. Proud

काल त्या जगदाळे ने गायलेला तो झुला नाहीच आवडला मला. पण ते संगीतही विसंगत वाटलं मला तरी. आणि परिक्षकांनी त्याची तारीफ केली. >>> +१

डोंबिवलीच्या कट्टयार कुलकर्णीला माझा फुल सपोर्ट आहे. पण त्या कौशिक देशपांडेला अजिबात नाही. आधीच अनेक ठिकाणी पाटया टाकुन आलेल्याला का म्हणुन सपोर्ट करायचा? केवळ तो डोंबिवलीचा आहे म्हणुन! अजिबात नाही.

>>गायकांपेक्षा रिअरेंजर वाट लावतात गाण्यांची

नाही, मला नाही तसं वाटत.
रि-अरेंजमेंट (सगळ्याच गाण्यांची असं नव्हे) पण सुंदर आहे.
गायकांचे सूर जर काळजाला भिडणारे असतील ना तर ह्या रि-अरेंजमेंटमध्येही गाणी खुलतील.

केसरिया बालम- हे राजस्थानी लोकगीत आहे.
ते नव्याने डोर सिनेमात आलं (बहुतेक आधी कुठल्यातरी जुन्या सिनेमातहीहोतं, नक्की आठवत नाही)
त्यात ज्याने कुणी म्हटलंय त्याचे सूर जबरदस्त आहेत.
ताल वगैरेही वेगळ्या पद्धतीने वापरलेत (थोडक्यात रि-अरेंज्ड आहे)..तरीही ते भावतं..
याचं कारण फक्त रि-अरेंजमेंट नव्हे, गायकाचे सूरही.

मला उलट सगळ्या म्युझिशिअन्सची दया येते. इतक्या बेसूर आवाजांना इतकी सुरेल आणि संयत साथसंगत करत असतात.

केसरिया बालम- प्रोमोमधेच पाहिलं आणि आवडलं नाही. आवाज चोरटा लागत होता वरच्या सुरांमध्ये.
प्रत्यक्ष एपिसोडमधलं यूट्यूबवर ऐकेन.

Pages