झी मराठी - सा रे ग म प - सूर नव्या युगाचा

Submitted by मंजूडी on 28 January, 2014 - 02:02

झी मराठी वाहिनीवर सा रे ग म पचे नवे पर्व सुरू झाले आहे - सूर नव्या युगाचा!

यावेळी फक्त १४ स्पर्धक निवडून ही स्पर्धा चालू केलेली आहे -
महेश कंटे, श्रीनिधी घटाटे, कौशिक देशपांडे, जयंत पानसरे, भाग्यश्री टिकले, जुईली जोगळेकर, मनोज क्षिरसागर, रसिका गानू, संज्योती जगदाळे, प्रल्हाद जाधव, शंकर गिरी, मृण्मयी पाठक, रेश्मा कुलकर्णी, गणेश मेस्त्री

परीक्षक आहेत अवधूत गुप्ते आणि तौफिक कुरेशी, तर सूत्रसंचालन करतोय अभिजीत खांडकेकर.

दर सोमवार आणि मंगळवार रात्री साडेनऊ ते साडेदहा झी मराठी वाहिनीवर - "सा रे ग म प - सूर नव्या युगाचा"

पुनःप्रक्षेपण - मंगळवार आणि बुधवार दुपारी चार वाजता आणि शनिवारी रात्री साडेनऊ वाजता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला आवडलं बुवा 'सुंदर ते ध्यान' रसिकाचं. छान गायली. धूम मचालेचं बळंच कौतुक करूनही दोन म च दिले ना. झालं तर. जाहिरातीत प्रमोट करायला लागतो काहीतरी मसाला. रच्याकने, धूम ३ चं गाणं कर्कश्यच आहे.

अगदीच असह्य होत असेल, तर त्याच वेळात स्टार प्रवाहवर सचिन-सुप्रिया शो बघा. पहिले दोन भाग झाले. मी कालचा निखिल वागळेंचा पाहिला. चांगला झाला Happy

स्टार प्रवाह कात टाकू पाहतोय. बरेच नवीन आणि नावीन्यपूर्ण शोज सुरू झालेत त्यावर.

टीपः मी स्टार प्रवाह ह्या चॅनेलशी कुठूनही संबंधित नाही. ही जाहिरात नाही Wink

सचिन-सुप्रिया??? नावानेच अंगावर काटा आला. Proud बरंय, स्टार प्रवाह लागत नाही आमच्याकडे Wink

मलाही त्या गानूचं गाणं आवडलं. परवाच्या एपिसोडमधलं त्या जयंत पानसरेचं पण मस्त झालं होतं.

आडो Happy सचिनचं नाव घेतलं की असं वाटतं आधी. पण तो कमी किंवा मुलाखतकाराने जेवढं बोलायला हवं तितकंच बोलला (काल तरी). सुप्रिया उत्स्फूर्त बोलते. आणि सर्वात जास्त पाहुणे बोलतात Happy त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. सारेगमचे स्पर्धक अगदीच सुमार गायला लागले की चिडचिड करण्यापेक्षा चॅनल बदला. चॉईस आपल्याकडे असतो Happy

चॉईस आपल्याकडे असतो >>> ज्ये.ना. अथवा महिला वर्गाला असे म्हणता येते. आम्हाला नाही Wink

आडो, नाही नाही प्रॉग्रॅमच त्यांचा आहे.

त्यांच्या प्रोग्रॅममध्ये एखाद्याने जितकं बोलायला हवं तितकंच ते बोलले. (असं पौर्णिमा सांगतेय बॉ. :फिदी:)

आता इथे पण चॅनेल बदलायला लागलं!

हो हो, नीट वाचलं तेव्हा आली ती पोस्ट लक्षात म्हणून डिलीट केली माझी पोस्ट.

तरीच त्यांच्या प्रोग्रॅमची जाहिरात बघितल्यासारखं आठवत होतं काहीतरी मला.

अगदीच असह्य होत असेल, तर त्याच वेळात स्टार प्रवाहवर सचिन-सुप्रिया शो बघा. पहिले दोन भाग झाले. मी <<कालचा निखिल वागळेंचा पाहिला. चांगला झाला>>
+११११११

मलाही आवडला सचिन सुप्रिया शो. एकतर सुप्रिया आवडते मला आणि सचिन पिळगावकर चक्क डोक्यात गेला नाही या शोमध्ये! मोजकंच बोलला तो. अवधूत गुप्ते व पत्नीची मुलाखत छान झाली.
मराठी-हिंदी धेडगुजरी सारेगमपपेक्षा सचिन सुप्रिया शो नक्कीच चांगला आहे.

जगदाळे बाइ सा.रे.ग.म. जिंकणार Happy
फाटक (का पाठक??) बाईंच वद जाउ कुणाला बर्‍यापैकी आश्वासक वाटलं होतं.. चुप के से ऐकलं आणि जीभ चावली..
चक्क बेसूर??
बाकी घटाटे बाईना अवधूत ने प द्यायला हरकत नव्हती पण त्या पडल्या नागपूरकर.. नाही म्हटलं तरी विदर्भावर अन्याय होतोच आमच्या.. Happy Happy Happy

कालच्या भागात त्या रसिका गानूचं गाणं ऐकताना भजन ऐकल्याचा भास होत होता मला Uhoh आणि परिक्षकांनी 'नी' दिला तिला.

अभिजितच्या 'क्या बात है' चा पण कंटाळा आला फारच.

मला काल फक्त जयंत पानसरेचं गाणं आवडलं. तरी त्याला कमी मार्क दिले. Uhoh
रसिकाने गाण्याची सुरुवातच बेसूर केली तरी तिला नी Uhoh
गणेश मेस्त्रीला पण नी Uhoh
आणि कौशिकलाही Uhoh

झी मराठी - सा रे ग म प - (बे)सूर नव्या युगाचा असं शिर्षक आहे खरतर फक्त बे सायलेंट आहे Proud

काल 'या रावजी बसा भाऊजी' चा प्रयोग प्रचंड आवडला मला. मूळ गाणे खूप आवडते तरी पहिल्याच फटक्यात ही नवी वाद्यरचना (?) पण आवडली. सॅक्सोफोन आणि पियानो यांचा भन्नाट वापर होता. लावणीचा फॉर्म बदलून कॅब्रेसारखा फॉर्म दिला होता - १००% यशस्वी. असे काही तरी भन्नाट हवे नव्या युगाच्या पर्वात.

पण त्या जगदाळे बाई !!!! आपल्या गळ्याची तयारी काय आपण गातो काय याचा सारासार विचार करावा की माणसाने. पण त्या बाईंना काही ते मान्य नसावे. 'अशी रोखा नजर, त्यात भरलं जहर' हे आशाने महान गायलय. या बाईंनी त्याची साफ वाट लावली. तौफिक मियांनी तिचे कौतुक करावे हे चांगलेच खटकले.

रच्याकने, काल जे पियानो म्हणून वाद्य होते, ते मला कीबोर्ड सारखेच वाटत होते. पूर्वीचा तो डौलदार पियानो बघायची सवय झाल्यामुळे हे नविन रुपडे अगदीच बापुडे वाटत होते.

काल 'या रावजी बसा भाऊजी' चा प्रयोग प्रचंड आवडला मला.>>> हा नवा साज कोणी चढवला होता ते सांगितले का?

मंजूडी, जयंत पानसरे करता + १, गणेश मिस्त्रीकरता -१ (अगदीच नी नसले तरी ध लेव्हलचे होते ते गाणे) Happy

आत्तापर्यंत जेवढे ऐकलय त्यावरून जयंत पानसरे विनर आहे या पर्वाचा - माझ्यासाठी. पण तो होणार नाहीये हे काल जणवले.

वाद्यरचना कमलेश भडकमकर करतात असे पर्वाच्या सुरुवातीलाच संगितले होते. म्हणजे ही रचना पण त्यांचीच असावी असे गृहीत धरतोय मी.

मंजूडी, खूप डोळे फिरायला लागले की बघायचं सोडून दे Proud

कौशिक तर आवडत नाहीचे. जयंतचं गाणं मलाही आवडलं.

आजच्या भागात जुईली परत हिंदी गाणंच म्हणणार असं दिसतंय. प्रोमो मध्ये जेवढं दिसतंय त्यात तरी काही अपिलींग वाटत नाहीच्चे, पण परिक्षकांनी फारच स्तुती केलीये असं कळतंय. कठीण दिसतंय एकंदरीत.

मंजूडी, खूप डोळे फिरायला लागले की बघायचं सोडून दे>> Lol

आजच्या भागात जुईली परत हिंदी गाणंच म्हणणार>>> भुंग्या, तिला मराठी गाणी गायला सांग, लोकाग्रहास्तव Wink

प्रोमो मध्ये जेवढं दिसतंय त्यात तरी काही अपिलींग वाटत नाहीच्चे, पण परिक्षकांनी फारच स्तुती केलीये असं कळतंय. कठीण दिसतंय एकंदरीत.>> +१००.

वाईट वाईट वाईट....

झीवाल्यांपर्यंत कोणी तरी पोहोचवा रे.. की दर्जा जामच घसरला आहे यंदा... ईटीव्ही किंवा मी मराठी वरची स्पर्धा वाटते आहे..

Pages