याद रखेगी दुनिया ... माझं पहिलं प्रेम !!

Submitted by मी मी on 9 January, 2014 - 12:39

माझ्याच आतल्या संवेदनशील मनाचा पहिल्यांदा परिचय झाला ते वय होत फार फार तर १०-१२ वर्ष. त्या आधी काही गोष्टी अश्या मनाला स्पर्शून जातात किंवा इजा करून जातात. या इजा दुखतात दुखऱ्या दिसत नसल्या तरी आणि ते मनाचे स्पर्श अश्रूवाटे व्यक्तही होतात असं काही अस्तित्वात असतं हे माझ्या गावीही नव्हतं…. या feelings हे emotions पहिल्यांदा जागृत झाले किंवा माझ्यातल्याच माझ्या या रूपाचा मला खरा परिचय झाला तो क्षण ती वेळ मला अजूनही आठवते… आणि त्यासाठी ठरलेलं निमित्त्य देखील.

मी शाळेतून परतले होते दुपारची वेळ होती. आदित्य पांचोली आणि रुख्सार यांचा 'याद रखेगी दुनिया' नावाचा सिनेमा चालू झाला. 1992 ला रिलीज झालेला फ्लॉप सिनेमा म्हणून टीव्ही वर येण्या पूर्वी नावही ऐकलं नव्हतं. बघत बसले, उटी सारख्या नयनरम्य हिलस्टेशन ला शूट झालेला भन्नाट सिनेमा (त्यावेळचा) खळखळून हसायला लावणारा आणि तेवढ्याच उत्कटतेने रडायलाही लावणारा. हल्लीच सिनेमा परत पाहण्याचा योग आला आणि सारे जुने क्षण पुन्हा आठवले…

कुठल्याश्या दुर्धर आजाराने कोलमडून गेलेला विकी आनंद (आदित्य पांचोली) आयुष्याचे शेवटचे दिवस शांततेने काढावे म्हणून या हिलस्टेशन वर येउन राहू लागतो. त्याचा आजार आणि आता तो कदाचित लवकर मरणार या विचाराने विकी आणि आपण बघे सुद्धा नर्वस झालेलो असतांनाच.मस्ती करणारया, तिथल्या लहान मुलांसोबत मिळून सतत खोड्या काढत असणार्या, आपल्याच आजी आणि वडलांशी खोटं बोलणाऱ्या गोड हसऱ्या उत्साही नैनाची (रुख्सार) एन्ट्री होते. तिच्या खोड्या अन मस्ती बघत सिनेमा पुढे सरत जातो आणि आपण या खुशमिजाज, मनमोकळ्या स्वभावाच्या खोडकर अन अविरत मस्ती करत राहणाऱ्या हसर्या नैना सोबत आपसूक गुंतत जातो ….आपल्या भोवतालचे वातावरण कसे रम्य होत जाते आपल्यालाच काळात नाही. सिनेमा पुढे सरकतो नैना ने केलेल्या कुठल्याश्या खोडीचा बदला घ्यायचा म्हणून एकदा विकी तिला जंगलात सोडून येतो. ती परत आली कि नाही हे बघायला तिच्या घरी जातो तेव्हा ती आलेली नाही हे कळतं आणि त्याबरोबरच तिला असणारा भयंकर आणि शेवटच्या टप्प्याला पोचलेल्या रोगाबाद्दलही. आणि कालपासून ती परत आलेली नाहीये म्हणजे तिने औषधही घेतलेले नाहीये आणि अश्या परिस्थितीत तिला काहीही होऊ शकतं हे तिची आजी त्याला सांगते . … आणि आपण काय चूक केली हे विकीच्या ध्यानात येतं. तो तिला परत घ्यायला त्याच जागेवर जातो तेव्हा नैना रात्रभर थंडीमुळे अन औषध न घेतल्याने पुरती ढासळली असते पण अश्याही परिस्थितीत विकी जवळ येती तेव्हा तिच्या खोड्या चालूच असतात. आणि चेहेर्यावरचे हसू कायम असते.

या क्षणापासून दोघांत एक गोड नातं निर्माण होतं.… दोन लोकं … दोघेही मृत्युच्या दारात उभे परंतु एक संपूर्ण कोलमडून जाउन आतापासूनच जगणं सोडून दिलेला तर दुसरी थोडंसं उरलेल आयुष्य तिच्या अटींवर जगणारी दीर्घ आयुष्यातही उपभोगता येणार नाही ती सर्व सुख, आनंद ओढून जगणारी.
तिच्या जगण्याच्या या सुंदर पद्धतीत विकी सुद्धा जगायला शिकू लागतो. आयुष्याकडून त्याच्या अपेक्षा वाढतात स्वप्न जागृत होऊ लागतात.….

http://www.youtube.com/watch?v=fZ7sGrGICkI

पुढला बराच सिनेमा या दोघांच्या प्रेमाच्या प्रसंगाने भरून जातो. आणि आपल्यासारखा संवेदनशील प्रेक्षक भावूकतेच्या लाटेवर हिंदोळे घेऊ लागतो. अश्यातच तिचे डॉक्टर वडील (विक्रम गोखले) विकी ला तिच्यापासून दूर राहण्याची विनंती करतो. तिच्या भल्यासाठी म्हणून विकी मनावर दगड ठेवून तिच्यापासून दूर होतो आणि अश्याच वेळी नैनाचा रोग डोकं वर काढतो. ती आजारी पडते आणि अगदी शेवटच्या टप्प्याला येउन पोचते. ती दवाखान्यात असतांना विकी ने गायलेले हे गाणे …तुमचाही जीव पिळवटून टाकणार नाही तरच नवल ….

http://www.youtube.com/watch?v=kMaKDFSG_pE

तिला जातांना बघवणार नाही म्हणून किंवा विकीला एकटं सोडून जातेय हे पाहून ती दुखी होईल म्हणून विकी परत जायला निघतो…. आणि पुढे काय ……. हे वेडं खूळ अश्याही स्थितीत अगदी स्ट्रेचर वरून रेल्वे स्टेशन वर तिच्या मुळ दाखवलेल्या स्वभावानुसार हसत हसत उपस्थित होते … Somehow Happy Ending

आज बघतांना सिनेमा कसा वाटेल कसा जाणवेल माहिती नाही पण माझ्या मनाला स्पर्शून गेलेला आणि आज इतक्या वर्षांनीही मनातून तस्सुभरही निघू न शकलेला संवेदना जागवणारा आणि सिनेमा बद्दल प्रेम निर्माण करणारा हा सिनेमा …त्यावेळी निर्माण झालेले ते feelings न emotions आजतागायत जिवंत आहेत. हा सिनेमा म्हणजे सिनेमांमधल माझं पहिलं प्रेम हे मी कधीच विसरू शकणार नाही.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकेकाळी मला आर माधवन आवडायचा आणि रोजा चा अरविंद स्वामी सुद्धा>>> एकेकाळी??? मला तर हे दोघे आत्ताही आवडतात. खुप क्युट आहेत दोघेही Happy

मला तर हे दोघे आत्ताही आवडतात. खुप क्युट आहेत दोघेही <<<<< Happy

अरविंदस्वामीसाठी मी एकही तमिळ अक्षर समजत नसताना कडल पाहिला होता.

मयी, एका जत्रेमध्ये ३ तोंडे असलेले देवी चमत्कारीक मुल आहे ज्याचे नाव देबशिशू आहे आणि त्याच्या आर्शिवादाने कदाचीत आपली गरीबी दूर होईल असे वाटून सीता(स्मिता पाटील) आणि तिचा नवरा रघबीर (साधू मेहेर) त्या मूलाच्या दर्शनासाठी जातात. तेव्हा त्याला कळते की हा त्याचाच मुलगा आहे जो त्याने ३० रु साठी एका माणसाला (कदाचीत ओम पूरी) विकला होता आणि बायकोला तू जन्म दिलेले मूल वारले असे सांगीतले होते तोच माणूस आता त्या मूलाच्या नावावर बक्कळ पेसा कमवत होता हे रघबीरला सहन होत नाही आणि तो ओम पूरीकडे मिळणार्‍या पेश्यातील अर्धा हिस्सा मागतो जे त्याला मिळत नाहीत आणि लोकांकडून मार खावून तो घरी परततो. घरी आल्यावर आपल्या बायकोला मला तसेच ३ तोंड असलेले मूल पाहिजे म्हणून मारहाण करतो. अशी स्टोरी आहे फिल्म देबशिशूची.you tube वर पण आहे ही फिल्म.

बादवे, दोन मात्रा द्यायच्या असतील तर कोणती key वापरावी???

एका कन्नड का तमिळ फिल्म मध्ये हिरोईनला एक मंत्र माहित असतो ज्यामुळे ती झाड बनू शकते. पण शेवटी एका चुकीमुळे ती झाडच बनुन राहते. अशीच काहीशी स्टोरी लाईन आहे. कोणाला माहीत आहे का ती फिल्म? खूप लहानपणी दूरदर्शनवरच ही फिल्म पाहीली होती

100

उद्यन Happy

आणखी एका अशाच भुल्या-बिसर्या सिनेमाबद्दल लिहितेय…. तुम्हा सर्वांना आवडेल अशी अपेक्षा आहेच.

मयी, हे पान पहायची परवानगी नाही. असा msg का येतोय ? चित्रपट ग्रुपचे सभासद असणे म्हणजे काय करावे लागेल ? तशी तर मी मायबोलीची सभासद आहेच ना?

फरदीन खान मला कधीच आवडला नाही तो फार कृत्रिम अभिनय करतो अस वाटतं

आर माधवन, अरविंद स्वामी, विनोद मेहेरा, आमिर खान असे जरा शांत अन गंभीर प्रवृत्तीचे अभिनेते आवडतात मला का कुणास ठावूक

चोर और चांद' कोणी पाहिला आहे का?>>> मी पण पाहिलेला आणि त्यातली गाणी पण आवडलेली. सपनो मे आना , दिल मे समाना हे गाणे आवडलेले तेव्हा Happy बहुतेक त्यातलच आहे.

आणखी एका अशाच भुल्या-बिसर्या सिनेमाबद्दल लिहितेय…. तुम्हा सर्वांना आवडेल अशी अपेक्षा आहेच.>>> मयी वाट बघतेय लिही लवकर

Pages