माझ्याच आतल्या संवेदनशील मनाचा पहिल्यांदा परिचय झाला ते वय होत फार फार तर १०-१२ वर्ष. त्या आधी काही गोष्टी अश्या मनाला स्पर्शून जातात किंवा इजा करून जातात. या इजा दुखतात दुखऱ्या दिसत नसल्या तरी आणि ते मनाचे स्पर्श अश्रूवाटे व्यक्तही होतात असं काही अस्तित्वात असतं हे माझ्या गावीही नव्हतं…. या feelings हे emotions पहिल्यांदा जागृत झाले किंवा माझ्यातल्याच माझ्या या रूपाचा मला खरा परिचय झाला तो क्षण ती वेळ मला अजूनही आठवते… आणि त्यासाठी ठरलेलं निमित्त्य देखील.
मी शाळेतून परतले होते दुपारची वेळ होती. आदित्य पांचोली आणि रुख्सार यांचा 'याद रखेगी दुनिया' नावाचा सिनेमा चालू झाला. 1992 ला रिलीज झालेला फ्लॉप सिनेमा म्हणून टीव्ही वर येण्या पूर्वी नावही ऐकलं नव्हतं. बघत बसले, उटी सारख्या नयनरम्य हिलस्टेशन ला शूट झालेला भन्नाट सिनेमा (त्यावेळचा) खळखळून हसायला लावणारा आणि तेवढ्याच उत्कटतेने रडायलाही लावणारा. हल्लीच सिनेमा परत पाहण्याचा योग आला आणि सारे जुने क्षण पुन्हा आठवले…
कुठल्याश्या दुर्धर आजाराने कोलमडून गेलेला विकी आनंद (आदित्य पांचोली) आयुष्याचे शेवटचे दिवस शांततेने काढावे म्हणून या हिलस्टेशन वर येउन राहू लागतो. त्याचा आजार आणि आता तो कदाचित लवकर मरणार या विचाराने विकी आणि आपण बघे सुद्धा नर्वस झालेलो असतांनाच.मस्ती करणारया, तिथल्या लहान मुलांसोबत मिळून सतत खोड्या काढत असणार्या, आपल्याच आजी आणि वडलांशी खोटं बोलणाऱ्या गोड हसऱ्या उत्साही नैनाची (रुख्सार) एन्ट्री होते. तिच्या खोड्या अन मस्ती बघत सिनेमा पुढे सरत जातो आणि आपण या खुशमिजाज, मनमोकळ्या स्वभावाच्या खोडकर अन अविरत मस्ती करत राहणाऱ्या हसर्या नैना सोबत आपसूक गुंतत जातो ….आपल्या भोवतालचे वातावरण कसे रम्य होत जाते आपल्यालाच काळात नाही. सिनेमा पुढे सरकतो नैना ने केलेल्या कुठल्याश्या खोडीचा बदला घ्यायचा म्हणून एकदा विकी तिला जंगलात सोडून येतो. ती परत आली कि नाही हे बघायला तिच्या घरी जातो तेव्हा ती आलेली नाही हे कळतं आणि त्याबरोबरच तिला असणारा भयंकर आणि शेवटच्या टप्प्याला पोचलेल्या रोगाबाद्दलही. आणि कालपासून ती परत आलेली नाहीये म्हणजे तिने औषधही घेतलेले नाहीये आणि अश्या परिस्थितीत तिला काहीही होऊ शकतं हे तिची आजी त्याला सांगते . … आणि आपण काय चूक केली हे विकीच्या ध्यानात येतं. तो तिला परत घ्यायला त्याच जागेवर जातो तेव्हा नैना रात्रभर थंडीमुळे अन औषध न घेतल्याने पुरती ढासळली असते पण अश्याही परिस्थितीत विकी जवळ येती तेव्हा तिच्या खोड्या चालूच असतात. आणि चेहेर्यावरचे हसू कायम असते.
या क्षणापासून दोघांत एक गोड नातं निर्माण होतं.… दोन लोकं … दोघेही मृत्युच्या दारात उभे परंतु एक संपूर्ण कोलमडून जाउन आतापासूनच जगणं सोडून दिलेला तर दुसरी थोडंसं उरलेल आयुष्य तिच्या अटींवर जगणारी दीर्घ आयुष्यातही उपभोगता येणार नाही ती सर्व सुख, आनंद ओढून जगणारी.
तिच्या जगण्याच्या या सुंदर पद्धतीत विकी सुद्धा जगायला शिकू लागतो. आयुष्याकडून त्याच्या अपेक्षा वाढतात स्वप्न जागृत होऊ लागतात.….
http://www.youtube.com/watch?v=fZ7sGrGICkI
पुढला बराच सिनेमा या दोघांच्या प्रेमाच्या प्रसंगाने भरून जातो. आणि आपल्यासारखा संवेदनशील प्रेक्षक भावूकतेच्या लाटेवर हिंदोळे घेऊ लागतो. अश्यातच तिचे डॉक्टर वडील (विक्रम गोखले) विकी ला तिच्यापासून दूर राहण्याची विनंती करतो. तिच्या भल्यासाठी म्हणून विकी मनावर दगड ठेवून तिच्यापासून दूर होतो आणि अश्याच वेळी नैनाचा रोग डोकं वर काढतो. ती आजारी पडते आणि अगदी शेवटच्या टप्प्याला येउन पोचते. ती दवाखान्यात असतांना विकी ने गायलेले हे गाणे …तुमचाही जीव पिळवटून टाकणार नाही तरच नवल ….
http://www.youtube.com/watch?v=kMaKDFSG_pE
तिला जातांना बघवणार नाही म्हणून किंवा विकीला एकटं सोडून जातेय हे पाहून ती दुखी होईल म्हणून विकी परत जायला निघतो…. आणि पुढे काय ……. हे वेडं खूळ अश्याही स्थितीत अगदी स्ट्रेचर वरून रेल्वे स्टेशन वर तिच्या मुळ दाखवलेल्या स्वभावानुसार हसत हसत उपस्थित होते … Somehow Happy Ending
आज बघतांना सिनेमा कसा वाटेल कसा जाणवेल माहिती नाही पण माझ्या मनाला स्पर्शून गेलेला आणि आज इतक्या वर्षांनीही मनातून तस्सुभरही निघू न शकलेला संवेदना जागवणारा आणि सिनेमा बद्दल प्रेम निर्माण करणारा हा सिनेमा …त्यावेळी निर्माण झालेले ते feelings न emotions आजतागायत जिवंत आहेत. हा सिनेमा म्हणजे सिनेमांमधल माझं पहिलं प्रेम हे मी कधीच विसरू शकणार नाही.
.त्याचा माधुरीबरोबर चा एकच
.त्याचा माधुरीबरोबर चा एकच चित्रपट सोलो मधे आठवतो बर्याच जनांना <<< सैलाब.
त्याचा अजून एक सोलो, 'चोर और
त्याचा अजून एक सोलो, 'चोर और चांद' कोणी पाहिला आहे का?
मी
मी
गुगल ने सुध्दा हाथ टेकवले
गुगल ने सुध्दा हाथ टेकवले शोधताना
तो जेलमधून पळालेला असतो आणि
तो जेलमधून पळालेला असतो आणि हिरवीण लग्नाच्या मांडवातून का कायशीशी स्टोरी आहे ना? आठवत पण नाहीये. अ आणी अ आहे अगदी
भेटला.................
भेटला................. निर्माता ................आदित्य पांचोली आहे......... आणि हिरोईन ..............पुजा भट्ट
'चोर और चांद' कोणी पाहिला आहे
'चोर और चांद' कोणी पाहिला आहे का?>>> पूजाभट्ट सोबत चा का?
मी बघितलाय मग.
या सिनेमाच माहीत नाही, कारण
या सिनेमाच माहीत नाही, कारण पाहीलाच नव्हता. पण मैत्रिणीन्च्या नादाला लागुन असले भुक्कड सिनेमे पाहीलेत ना, की बस. आणी त्या काळात ते महान/ उच्च/ दर्जेदार असे वाटायचे. माझी एक मैत्रिण स्वतला उर्मिला मातोन्डकर समजायची, दुसरी स्वतला दिव्या भारती समजायची. मग सगळ्या साळकाया माळकाया नटुन थटुन, गजरे लावुन, उर्मिलाचे ते नरसिम्हा फेमस ड्रेस घालुन टुमकत मटकत जायच्या. चुकुन माकुन मी बरोबर गेले तर या भवान्या मला तिकीट काढायला लावायच्या.:राग:
आता टॉकीजचे तोन्डही बघावेसे वाटत नाही.:अरेरे::फिदी:
वोक्के! म्हंजे हा सिनेमा
वोक्के! म्हंजे हा सिनेमा पाहणारा मीच एकटा नाही!
चोर और चांद' कोणी पाहिला आहे
चोर और चांद' कोणी पाहिला आहे का?>>> मी पण
त्यात "रुक्सार बाई" एक
त्यात "रुक्सार बाई" एक चित्रपट करुन पाकिस्तानात कि लंडन ला परत गेल्या त्यामुळे ही रुक्सार कोण हे सांगताच येत नव्हते. - नाही उदयन अजून एक होता. मी बघितलाय पण नाव आठवत नाही. ऋषी कपूर होता . याददाश ची काय तरी भानगड होती. कोणाला आठवतं का??
तया सिनेमाचे नाव जनम-जनम!
तया सिनेमाचे नाव जनम-जनम!
इंतेहा ये प्यार की
इंतेहा ये प्यार की ............हा होता ऋषिकपुर बरोबर
उदयनचे बरोबरे!
उदयनचे बरोबरे!
जनम जनम मधे रुक्सार नव्हती
जनम जनम मधे रुक्सार नव्हती .............विनिता होती
शेवटी सापडला - इंतेहा प्यार
शेवटी सापडला - इंतेहा प्यार की
रुखसार हल्ली मालिकेत येत
रुखसार हल्ली मालिकेत येत असते. बहुतेक ती नुतनचा मुलगा होता त्यात यायची. नंतर बहल बाहेर गेला व नाभिनयसम्राट शरद केळकर आला ती मालिका.
हा सिनेमा मात्र पांचोली असल्याने पाहिला गेला नाही.
चोर और चांद' कोणी पाहिला आहे
चोर और चांद' कोणी पाहिला आहे का?>>> मी पण >> +१ = ५
वरील सर्वांबद्दल माझा आदर
वरील सर्वांबद्दल माझा आदर द्विगुणित झालेला आहे.
त्याचा अजून एक सोलो, 'चोर और
त्याचा अजून एक सोलो, 'चोर और चांद' कोणी पाहिला आहे का? <<<< मी पण..
शनिवारवाड्यावर जाहीर सत्कारच
शनिवारवाड्यावर जाहीर सत्कारच करा...
फारएण्ड
फारएण्ड
रेवती … मलाही आवडायची … तिचा
रेवती … मलाही आवडायची … तिचा 'मुस्कुराहट' पहिला होता तेव्हापासून नंतर 'लव' पाहिला आणि त्यात जाम च आवडली. कधीतरी चुकूनच 'रात' पाहण्यात आला तेही चुकून रातच्यालाच आणि मग रेवती लैच डेंजर वाटू लागली. पण असो ….
काही फिल्म कधी येतात न कधी
काही फिल्म कधी येतात न कधी निघून जातात कळतही नाही. त्यावेळी ते बघावेसे पण वाटलेले नसतात पण कधीतरी निवांत वेळी योगायोगानेच बघण्यात येतात अन अतिशय आवडून जातात. इतरांसाठी ते फ्लॉप मूवी असले तरी आपल्यासाठी त्याचा दर्जा वेगळा असतो. असेच सेम वाइस अ वर्सा. लोकांना अतिशय आवडलेला अन डोक्यावर उचलून धरलेला सिनेमा सुद्धा आपल्याला टोकाचा टुकार वाटू शकतो …हा हे सर्व आपण आपलीच आवड आणि आपलीच बुद्धी वापरत असेल तर …. वाहत्या प्रवाहाच्या दिशेनेच वाहून जायचं असेल तर … चाललंय तसं चालायचं असंच होत जातं
मुस्कुराहट आमच्यासाठी फार
मुस्कुराहट आमच्यासाठी फार स्पेशल पिक्चर होता.
रेवतीचा सर्वात आवडता सिनेमा रात आणि अंजली. तिने दिग्दर्शित केलेले सिनेमा सुद्धा (मित्र आणि फिर मिलेंगे) आवडले होते.
मयी तुझ्यामुळे कुठकुठले
मयी तुझ्यामुळे कुठकुठले चित्रपट आठवले.
मुस्कुराहट - त्यात तो उंच हिरो होता ना.
मृणाल : तो जय मेहेता होता पण
मृणाल : तो जय मेहेता होता पण त्यानंतर फार कधी पहिले नाही त्याला स्क्रीन वर … त्याचे आणखी काही फिल्म आहेत काय ?
मुस्कुराहट खूपच गोड प्रेमकथा … त्यात तिने वेडी असण्याच नाटक केलंय. खूप निरागस वाटते त्यात रेवती खरंच.
यातली सगळी गाणी पण सुंदर आहेत. त्यातला 'बंदा नवाझ …' गान खूप गोड … त्यात 'पीछे मत आ पीछे मत आ ' म्हणतांना रेवती कसली गोड दिसलीये.
'गुनगुन करता आया भंवरा भवरे ने सुनाया' गाणं पण ऐकायला मस्त वाटतं
मुस्कुराहट चा हीरो जय मेहेता
मुस्कुराहट चा हीरो जय मेहेता आणि जुही चावलाचा नवरा जय मेहेता एकच का?
वरदा हे मला नाही माहिती खरंच
वरदा हे मला नाही माहिती खरंच … जुही चावलाचे पर्सनल लाइफ़ नेहेमीच पडद्याआड राहिले आहे तिच्या परिवाराबद्दल फारसे काही माहिती नाही .
नाही............तो जय मेहता
नाही............तो जय मेहता वेगळा आहे .........तो बिझनेस मन आहे........आता चक्क म्हातारा आहे..(तेव्हादेखील असेल)
Pages