आधुनिक सीता - २७

Submitted by वेल on 27 January, 2014 - 06:28

bhaag 26 - http://www.maayboli.com/node/47220

रफिकच्या नातेवाईक बायकांचा आनंदोत्सव चालूच होता. माझे जेवून आणि प्रार्थना करून झाल्यावर बडी अम्मीने मला झोपायला जाण्यास सांगितले. गरोदर असल्याने फार जागरण करू नये, याउलट सकाळी लवकर उठावे असे तिचे मत होते. माझे मत काय होते, मला काय हवे होते हे व्यक्त करण्याची संधी कुठेच नव्हती. सोन्याच्या पिंजर्‍यातला पक्षी झाले होते मी. पुन्हा एकदा विचार करून करून माझे डोके दुखू लागले. डोके चेपून पाहिले, पण दुखायची थांबेनाच. मग फातिमाची वाट पाहात बसले, ती आली की तिच्याकडे डोकेदुखीसाठी काहीतरी गोळी मागायची.

"फातिमा, आय अ‍ॅम हॅविंग हेडेक. कॅन यु गिव्ह मी मेडिसिन?"
"मेडिसिन? व्हाय? व्हॉट हॅपण्ड"
"हेडेक, माय हेड इज पेनिंग"
"श्श्श.. टॉक स्लो. यु प्रेग्नण्ट. नो मेडिसिन बडी अम्मी स्कोल्ड मी. यु रीड कुराण. हेडपेन गो."
"फातिमा प्लीज. आय विल क्राय नाउ. गिव्ह मी मेडिसिन."
"श्श्श... नो शाऊट. नो क्राय. यु क्राय रफिक अँग्री. आय गिव्ह यु मेडिसिन. नो टेल एनिवन. प्लीज. प्लीज. नो टेल."
फातिमाने मला कसली तरी गोळी आणून दिली. मी ती गोळी घेऊन नुसती बसून होते. मनात विचारांनी फेर धरला होता. सागरसोबत माझं लग्न ठरल्यापासूनचा सगळा काळ सगळे प्रसंग माझ्या भोवती नाचत होते. आणि मला जोराचा हुंदका फुटला. मला रडताना पाहून फातिमाने घाईघाईने दरवाजा बंद केला.
"सकिना, व्हाय क्राय. हेड्पेन नॉट गो? प्लीज नो क्राय. रफिक अ‍ॅंग्री."
फातिमाच्या बोलण्यासोबत माझे हुंदके अजून वाढले."
"सकिना नो क्राय प्लीज नो क्राय. व्हाय यु क्राय? रफिक लव यु सो मच. डू सो मच फॉर यु. व्हाय क्राय. ही नो लव मी. ही लव यु. आय क्राय. यु नो क्राय प्लीज नो क्राय. "
मी चमकून तिच्याकडे पाहिले. रफिकच फातिमावर प्रेम नाही? आणि माझ्यावर आहे?
"फातिमा, आय डोण्ट वॉण्ट टू स्टे हियर, आय डोण्ट वॉण्ट रफिक्'स लव. आय डॉण्ट वॉण्ट धिस बेबी. आय वॉण्ट टू गो बॅक टू माय फॅमिली. इफ आय काण्ट गो बॅक आय वॉण्ट टू डाय. आय डोण्ट वॉण्ट टू स्टे इन धिस जेल. ..." आणि मी काय बोलले मलाच आठवत नाही. पण त्यानंतर तिने मला खूप समजावलं न रडण्याबद्दल, हे असं न बोलण्याबद्दल, तिने मला माझ्या घरच्यांबद्दल विचारलं आई, आजी, बाबा, आजोबा, दादा. माझं शिक्षण माझी नोकरी. सागरचा विषय तिने शिताफिने टाळला मात्र. मी बोललेलं तिला किती कळलं होतं माहित नाही पण घरच्यांबद्दल बोलून मलाच खूप हलकं वाटायला लागलं. हळू हळू मला झोप लागली.

अगदी पहाटे मला फातिमाने उठवलं. सकाळची प्रार्थना म्हणून घेतली. तिनेच मला निकाहसाठी तयार केलं. "प्लीज नो क्राय इन निकाह. आय गिव्ह यु टू इट, यु फील स्लीपी देन यु नो क्राय, बट नो स्लीप. यु स्लीप अम्मी अँग्री, नो स्लीप. " अशी कळकळीची विनंतीसुद्धा केली. तिने मला कसलीतरी खीर खायला दिली, ती खीर खाल्ल्यावर मला झोप आल्यासारखं वाटू लागलं. फातिमा माझ्याशेजारीच होती. तिने सांगितले तेव्हा मी "कुबुल" असे म्हटले आणि रफिकची मी ऑफिशियल बीवी झाले. फातिमाने सांगितल्याप्रमाणे मला खूप झोप येत होती. मला बरं वाटत नाहीये असं सांगून फातिमाने मला निकाहनंतरच्या गोंधळातून बाहेर काढले आणि झोपायला नेले. रफिकच्या कुटुंबियांचा आनंदोत्सव चालूच होता.

मी दर आठवड्याला गायनॅकला भेटत होते. रफिक दर तीन आठवड्याला माझा युएसजी स्कॅन करून घेत होता. त्याने मला मस्करीत असेही म्हटले की त्याला शक्य असते तर त्याने दर चार दिवसांनी युएसजी स्कॅन करून बेबीला पाहिले असते. गायनॅककडच्या प्रत्येक फेरीबरोबर, प्रत्येक युएस्जी स्कॅनबरोबर मला हे बाळ नकोय. देवा माझी सुटका कर अशी भावना मनात वाढीला लागली होती. मला गायनॅकने रोज काय व्यायाम करायचा हे समजावून सांगितले होते. पण कुठले तरी उलटे सुलटे व्यायाम करून अ‍ॅबॉर्शन करून घ्यावं असे विचारही माझ्या मनात येऊ लागले होते. पण फातिमा सलमा आणि रफिकच्या चारही अम्मी सतत माझ्या आजूबाजूला असत. मी वेळच्या वेळी खाते की नाही, गायनॅकने सांगितलेला व्यायाम तसाच्या तसा करते की नाही, वेळच्या वेळी त्यांनी सांगितलेले अन्न खाते की नाही ह्यावर त्यांचे बारीक लक्ष असे. रफिकने आणि मी पोटावर हात ठेवून बाळाशी बोलावे, ह्याबद्दलही रफिकच्या अम्मी आग्रही असत. सतत सूचना सतत फक्त बाळाबद्दलचं बोलणं ह्यामुळे मी कंटाळून गेले होते माझ्यासोबत बाकी काही होऊ दे पण मला हे बाळ जन्मायला नको आहे ही भावना मनात वाढीला लागली होती. मी एकटी असताना स्वतःशीच हे बोलत बसलेली असे. श्लोक, गाणी ऐकणं, पुस्तकं वाचणं मन लावून चेस खेळणं हे सगळच बम्द झालं होतं. वेळ असेल तेव्हा मी सतत टीव्ही पाहात बसत होते. ह्या सगळ्याचा परिणाम असा झाला की माझं वजन कमी झालं होतं. गायनॅकने त्याबद्दल चिंताही व्यक्त केली होती. आणि मग रफिकनेही माझ्या जेवणावर स्वतः लक्ष देण्यास सुरुवात केली.

त्या दिवशी रफिक माझ्याजवळ आला त्याचा फोन घेऊन.
"सुनु, कोणीतरी तुझ्याशी बोलतय फोनवर. फक्त कमी जास्त बोलू नकोस. तुला कळतय ना मी काय म्हणतोय"
रफिकने फोन स्वतःच्या हातात ठेवून स्पीकरफोन चालू केला."
"हॅलो"
फोनवर चिरपरिचित आवाज होता.
"सरीता, कशी आहेस ग."
"आजी ..." आणि माझ्या डोळ्यातून पाणी वाहायला लागलं.
"तू आई होणारेस म्हणे"
"आजी तू, तू कशी काय फोनवर, माझा विश्वासच बसत नाहीये कानावर. आजी तू, तूच बोलते आहेस ना. आजी तू फोन केलास? कसा काय ग? तुला नंबर कुठून मिळाला."
"मी नाही फोन केला, रफिकने फोन केला आम्हाला, आणि तुझ्याशी बोलायला सांगितलं. तेव्हा आम्हाला कळलं तू आई होणारेस, तू इस्लाम धर्म स्वीकारलास आणी रफिकसोबत निकाह देखील केलास. आम्हाला हेही कळलं की तुझं वजन कमी होतय. आणि तुझ्या डॉक्टरला त्याची भीती वाटते आहे."
'आजी मी काय बोलू ग, मला काही कळत नाही आहे"
"काही बोलू नकोस, तुझ्या मनात काय चालू आहे मला कल्पना आहे त्याची."
"आजी तुला बाबांनी माझ्याशी कसं बोलू दिलं ग. त्यांनी तर पत्रात लिहिलं होतं की..."
"तू काळजी करू नकोस त्याची, तू आत्ता फक्त स्वतःकडे लक्ष दे. मन आनंदी ठेव."
"आजी आइशी बाबाम्शी दादाशी आजोबांशी तुम्हा सगळ्यांशी बोलावसं वाटतं ग, तुम्हाला भेटावसं वाटतं ग."
"तुझ्या आणि देवाच्या मनात असेल आपल्या नशिबात असेल तर आपली भेट कधी तरी नक्कीच होईल."
"आजी परत बोलू का ग आपण?"
"रफिक म्हणालाय दर दोन तीन दिवसांनी तो आम्हाला तुझ्याशी बोलायला देईन."
"आजी खरच?"
"अग आता रफिक म्हणालाय ना मग देईलही कदाचित बोलायला. हे बघ तू जास्त विचार करू नको, स्वत:च्या तब्बेतीची काळजी घे. मन निरोगी तर शरीरही निरोगी. मनाला ताब्यात ठेव. मनाचे श्लोक ऐकत जा, दासबोध वाचत जा. आणि रफिक तसा चांगला माणूस आहे, त्याचं ऐकत जा. चल आता ठेवते फोन. दोन तीन दिवसांनी बोलू परत."
"आजी ..."
आणि रफिकने फोन बंद केला.
"आजीशी बोलून बरं वाटलं का?"
"थोडा वेळ अजून बोलायला मिळालं असतं तर."
"मिळेल मिळेल दोन दिवसांनंतर परत बोल."
"तू आजीला फोन कसा केलास."
"मला असं वाटलं तू घरच्यांशी बोललीस तर तुला बरं वाटेल."
"पण तुला कसं वाटलं आजी बोलेल माझ्याशी. आणि आता बोलले मी त्यांच्याशी तर मग त्यांना कळेल ना मी कुठे आहे कशी आहे. तुला भीती नाही वाटली."
"मुळात तुझं पत्र जेव्हा तुझ्या घरी पाठवलं होतं तेव्हाच मला कळलं होतं की तुला समजून घेणारं आणि शांत राहाणारं तुझ्या आजीइतकं दुसरं कोणी नाही. त्यामुळे घरच्या नंबरवर फोन केला तर तुझ्या आजीनेच उचलला. आणि कोणीच तुला इथे ट्रॅक करू शकत नाही. नंबर रीडायल केला तर कोणालाही लागणार नाही. आणि हे सगळं तुझ्या आजीला सांगूनच मी यांना तुझ्याशी बोलायला दिलं. तू त्यांच्याशी बोलू शकतेस. तुझ्या प्रेग्नंसीबद्दल विचारू शकतेस, त्यांचा सल्ला घेऊ शकतेस. त्यांना तुझ्या प्रेग्नंसीबद्दल सांगू शकतेस फक्त तू कुठे आहेस, कुठल्या डॉक्टरकडे जातेस, अशाबद्दल काहीही सांगायचे नाही."
"रफिक खरच तुझे खूप खूप आभार. खूप बरं वाटतय आजीशी बोलून."
"तुला आजीने काय काय वाचायला सांगितलं आहे ना, ते वाच. तुझी मानसशास्त्राची पुस्तकही तू किती दिवस झाले वाचली नाहीस. आजकाल गाणी सुद्धा ऐकत नाहीस असं ऐकलं मी. तू आनंदी राहयला पाहिजेस, तुझं वजन कमी होऊन नाही चालणार. बेबीला कसलाही धोका झालेला मला चालणार नाही." आणि मग त्याने विषय बदलला आणि तो मला बागेत फिरायला घेऊन गेला.

क्रमशः

पुढील भाग :- http://www.maayboli.com/node/48670

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

नीट विचार करता, ह्या कथेल अनेक बाजू आहेत..
१. सरिताचा सागर - तो खोटा नसेल कशावरुन - कुठला नवरा ( बायकोवर खरं प्रेम असलेला ) आपला मित्र /बॉस सतत बायकोकडे पहातो हे निमूट्पणे सहन करेल. हा कसला नवरा जो स्वतःहून बायकोला असल्या संकटात ढकलून देईल असल्या मित्राच्या घरी नेवून..
२. सरिता सुटकेचा प्रयत्न करताना दिसत नाही - कारण ते जवळ जवळ अशक्यच आहे - पण सुटका झल्यास पुढे काय..
३. रफीक आणि कंपनी हे सगळं फक्त बाळासाठी करत असावेत असंही वाटत नाहीये..
४. सरिताला बाळ नको हे समजू शकतय - पण बाळ झालं की सुट्का केवळ अशक्य( लग्नानंतर तशीही सुटकेची आशा धूसर झाली आहेच म्हणा) - तीलाही बाळाबद्दल प्रेम / माया वाटेलच - मग सोडून कशी जाणार...
५. घरच्यांपैकि सगळे सरीताला इतकेही ओळखत नाहीत की आपली मुलगी कशी आहे - ती असं वागेलच कशी आणि शोध घेण्याचा प्रयत्न करत नाहीत - very sad..

प्लिज लवकर ही गोष्ट पुढे न्या.. पुलेशु.

प्रज्ञासा, सागरने कदाचित भारतीय दुतावासात तक्रार केली असेल, पण सरिताला इथे काहिच कल्पना नाही आणि गोष्ट तिच्या दृष्टीकोनातुन असल्यामुळे कदाचित काहिच होत नाही असे वाटते आहे.
पण वेल एखादी सुशिक्षित उच्च मध्यमवर्गीय स्त्री इतके दिवस परदेशात कोण्डुन ठेवली आहे आणि तिचे देशवासीय काहिच करत नाहित हे जरा कठीण वाटते. आतापर्यंत कोणीतरी तिची मुलाखत मागितली पाहिजे पण तरी सरिताची अवस्था कठीण आहे कारण अशी मुलाखात घेणारा खरा आहे का रफिकचा माणुस आहे हे तिला कसे कळणार?

वल्लरीताई, ज्या मुळ कथेवरुन ही कथा घेतली म्हणता ती मी आत्ताच वाचली..................... ती पण छान झालीय........................ ती पुन्हा दिसलीच नाही हे शिर्षक आहे त्याचे......

http://www.kalnirnay.com/katha2012/03%20Ti%20Punha%20Dislich%20Nahi.pdf

वल्लरी ताई,

अहो लिहा की लवकर.......
आम्हाला कल्पना आहे, की तुम्ही इतर ही कामात खुप बिझी असाल....पण आता लवकर दुसराभाग येउ द्या !!!!!

पुढचा भाग येत्या बुधवारी.
<<<< बुधवार संपला देखील पुढील भाग आला नाहि अजुन

पुढचा भाग येत्या बुधवारी.
<<<< बुधवार संपला देखील पुढील भाग आला नाहि अजुन
<<< ho na.. sakal pasun 3-4 vela check karun zale Mabo

पुढचा भाग येत्या बुधवारी. >>> बुधवार येऊन पण गेला हो वेल.. कधी टाकणार तुम्ही पुढचा भाग? मान्य आहे तुम्ही बिझी असता, पण आमचीपण उत्सुकता समजून घ्या ना हो... रोज ४-५ वेळा येऊन चेक करून जातो आम्ही की भाग आलाय का ते...

मा. बो. एक नियम केला पाहिजे कि "क्रमश:" कथा ठराविक कालावधीत पूर्ण करणे बंधनकारक करावे . (माझ्यामते जास्तीत जास्त १ महिना).

मा. बो. एक नियम केला पाहिजे कि "क्रमश:" कथा ठराविक कालावधीत पूर्ण करणे बंधनकारक करावे . (माझ्यामते जास्तीत जास्त १ महिना).+ अनुमोदन

Pages