दुधी भोपळ्याचे थालीपीठ

Submitted by गायू on 18 February, 2014 - 09:21
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दुधी भोपळा किसून (साधारण अर्धा दुधी), तेल,लसूण, हिंग, हळद, धने जिरे पूड, गरम/गोडा मसाला,मीठ, गूळ, कणिक.

क्रमवार पाककृती: 

मायबोलीवर दुधी भोपळा स्पेशल बर्याच पाककृती पाहिल्या पण हि कुठे दिसली नाही म्हणून हा एक नवा प्रकार तुमच्यासाठी...
साधारण अर्धा दुधी भोपळा (अर्धा पाउण किलो वजनाचा) किसून घ्यावा. कढईत ४-५ टेबलस्पून तेल गरम करावे. त्यात लसूण किसून/ठेचून परतावा. नंतर किसलेला दुधी भोपळा त्याला सुटलेल्या पाण्यासाहित कढईवर झाकण ठेऊन शिजवून घ्यावा. थोडा रंग बदलल्यानंतर त्यात आपण फोडणीला घालतो तेवढेच हिंग हळद घालावे. अजून परतून धने जिरे पूड, मीठ,गूळ आणि मसाला घालावा आणि गॅस बंद करून १० मिनिटे झाकून ठेवावे. गार झाल्यावर त्यात बसेल एवढेच गव्हाचे पीठ किंवा पाउण भाग गव्हाचे पीठ आणि पाव भाग ज्वारीचे पीठ घालून मळून घ्यावे. नाव जरी थालीपीठ असले हे थापून किंवा लाटून देखील हे करता येते..
नंतर प्लास्टिक ची जाड पिशवी (दुधाची किंवा तेलाची असते त्या जाडीची) घेऊन छोटा गोळा घेऊन थालीपीठ थापावे. आणि तव्यावर भाजून घ्यावे. किंवा थोडे घट्ट भिजवून लाटून भाजून घ्यावे. तेलात परतल्यामुळे वरून खूप तेल लावण्याची गरज पडत नाही. गरम गरम थालीपीठ घट्ट तुपाबरोबर, दह्याबरोबर, लोणच्याबरोबर किंवा लसणाच्या चटणीबरोबर खायला मस्त लागते.

वाढणी/प्रमाण: 
वरील प्रमाणात साधारणपणे १०-१२ थालीपीठे होतात.४ जणांसाठी रात्रीच्या जेवणात जरा बदल!
अधिक टिपा: 

सॉस बरोबर खाल्लं तर सॉसचीच चव लागते म्हणून सॉस नको!

माहितीचा स्रोत: 
सासूबाई
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजून एक टीप: आवडत असेल तर पीठ मळताना कोथिंबीर चिरून टाकली तरी मस्त लागते! (आमच्याकडे सासूबाईंना कोथिंबीर विशेष आवडत नाही आणि मला ज्यात त्यात आवडते, मग आलटून पालटून घालतो) Wink

मस्त वाटते हि रेसिपि....

आमच्याकडे सासूबाईंना कोथिंबीर विशेष आवडत नाही आणि मला ज्यात त्यात आवडते, मग आलटून पालटून घालतो>>>> तुम्हा दोघिंच कौतुक, एकमेकिंचा आवडि इतक छान जोपासता Happy

राजसी- कधी कच्च्या दुधीचे केले नाहीत, प्रयोग खातर नक्की करेन! कोबीची भाजी करून स्टफ्ड पराठे केलेत..मस्त लागतात..

त्या म्हणतात "माझी आवड मी विसरलीये इतके वर्षात" निदान नावड माहितीये तर ती तरी टाळावी >> सकाळी सकाळी या वाक्यामुळे मस्तच वाटले. Happy

माझी आवड मी विसरलीये इतके वर्षात, निदान नावड माहितीये तर ती तरी टाळावी - हे आवडलच !
रेसिपी पन छानच आहे. करून बघणार Happy

त्या म्हणतात "माझी आवड मी विसरलीये इतके वर्षात" निदान नावड माहितीये तर ती तरी टाळावी ...
रेसिपी मस्तच आहे... करून बघेनच कधी जमेल तेव्हा... पण ह्या वरच्या वाक्यासाठी मानलं...
खूप सहज आणि छान आहे विचार.

माझी आवड मी विसरलीये इतके वर्षात, निदान नावड माहितीये तर ती तरी टाळावी - हे मला पण आवडल !
मस्त रेसिपी, असेच दुधीचे मुठीये पण मस्त होतात.

ओरिजिनल दुधीचे थालिपीठ म्हणजे किसलेला कच्चा दुधी, जबरी मोठा चमचा लसूण पेस्ट, हळद, ओवा, तिखट, कोथिंबीर व थालिपीठ भाजणी (बसेल एवढे)

पण ही व्हरायटी पण छान आहे.

त्या म्हणतात "माझी आवड मी विसरलीये इतके वर्षात" निदान नावड माहितीये तर ती तरी टाळावी ...
रेसिपी मस्तच आहे... करून बघेनच कधी जमेल तेव्हा... पण ह्या वरच्या वाक्यासाठी मानलं...
खूप सहज आणि छान आहे विचार.>+१

त्या म्हणतात "माझी आवड मी विसरलीये
इतके वर्षात" निदान नावड माहितीये तर
ती तरी टाळावी ...
रेसिपी मस्तच आहे... करून बघेनच कधी जमेल
तेव्हा... पण
ह्या वरच्या वाक्यासाठी मानलं...
खूप सहज आणि छान आहे विचार.>+१

ते थालीपीठ राहिले बाजूला, त्याच्यावर प्रतीक्रिया यायच्या ऐवजी सासुबाईनाच दाद दिली जातेय.:खोखो::दिवा:

गायत्री मस्त रेसेपी आहे, निदान त्याच त्याच पाककृती ऐवजी नवीन कृती मिळालीय. धन्यवाद.:स्मित:

धन्यवाद वर्षा प्राची दाद सामी रावी जाई जागू!
विनिता, असं पण करून बघेन!
धन्यवाद रश्मी, आणि बरं का,माझ्या सासूबाईंचं नाव पण रश्मी च आहे! Wink आणि त्या म्हणाल्या..माझी आवड विसरलीये!! म्हणून मी विचार केला, आवड सोडा, निदान नावड माहितीये तर ती तरी टाळावी! Wink एक नक्की,पाककृती एवढंच हिट गेलंय हे वाक्य! Wink