इंग्रजीवरील प्रभुत्व

Submitted by विजय देशमुख on 11 February, 2014 - 22:26

आजकाल इंग्रजी भाषा आवश्यक झाली आहे. आपल्याला आवडो वा नावडो, कधीतरी कुठेतरी असं वाटुनच जातं की आता इंग्रजीवरही प्रभुत्व हवच. आपापल्या क्षेत्रांत आवश्यक असणारे संभाषण, प्रेझेंटेशन्स वगैरे फारशी जड जात नाही. ती सवयीने जमायला लागतात, पण आपल्या क्षेत्राच्या बाहेर विचार करणे, बोलणे, वाचणे, लिहिणे फारसं जमत नाही. असं नाही की इंग्रजी बोलताच येत नाही, पण वेळेवर नेमके शब्द आठवत नाही किंवा काय बोलावं, ते सुचत नाही. कित्येकदा इतर लोकं धडाधड सिडने शेल्डॉन {माझ्या काळातली} वगैरे कादंबरी लेखकांची नावे घेतात, तेंव्हा वाटते की अरे, आपण काहीच वाचत नाही की काय?
जयपुर लिटरेचर फेस्टिव्हलबद्दलची पोस्ट वाचल्यावर त्यातला एकही लेखक ओळखीचा वाटला नाही. ओळखीचा तर सोडाच, कोणाचही नाव याआधी वाचलं नव्हतं. याला आळस म्हणावा की अज्ञान?
भारतात असतांना किमान आठवड्यातुन एकदातरी इंग्रजीतुन बोलणे होत होते, पण कोरियात आल्यापासुन ऑफिसात इंग्रजीच काय, कोरियनही बोलणे होत नाही. त्यामुळे आता सराव असा उरलाच नाही. बहुदा, जिथे इंग्रजीचं चलन नाही, त्या देशातल्या लोकांची परिस्थिती अशीच असावी.
आता मात्र हे अधिकच जाणवायला लागलय की इंग्रजीचं वाचन आणि संभाषण अधिक चांगलं व्हायला हवं. लेखनाचा विचारही त्यानंतर करता येईल. अभ्यासाच्या विषयाबाहेरचही ज्ञान मिळवण्यासाठी काय करता येईल? केवळ चारचौघात बोलण्यासाठी म्हणुन नव्हे तर एक अभ्यासक म्हणुन, स्वतःसाठी वेळ काढुन काहीतरी लिहिण्यासाठी, स्वतःचे विचार इंग्रजीतुन मांडण्यासाठी काय करता येईल? तुम्ही काय करता?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सई....

तुझा मुद्दा समजला. मराठी माध्यम असो वा इंग्रजी माध्यमातील शिक्षण असो....इंग्रजी येणे आणि इंग्रजी बोलायला येणे या दोन बाबीत लक्षणीय फरक आहे. मराठी माध्यमातील मुलाने अगदी पदवीपर्यंत इंग्रजीची कास धरली तर तो त्या भाषेत प्रवीण होऊ शकतो....वाचनामुळे....पण तो इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्याप्रमाणे चारचौघात धडाधड इंग्लिश बोलायला मात्र [सुरुवातीला] कचरतो....पण एकदा का त्याने रंकाळ्यात उडी घेतली तो आपसूकच बोलायला शिकतोच....भले मग ते व्याकरणशुद्ध असो वा नसो. अर्थात यासाठी त्याने या ना त्या निमित्ताने शहर बदलले पाहिजे....शिक्षणासाठी वा नोकरीसाठी. बाहेरच्या शहरात तुम्हाला इंग्रजीचा खूप फायदा होतो. विद्यापीठाच्या कॅन्टिनमध्ये एम.ए. इंग्लिशचे दोन विद्यार्थी मराठीतून चॉसरवर तावातावाने चर्चा करताना जर दिसले तर तो प्रसंग पाहवत नाही. मातृभाषाव्यतिरिक्त अन्य कोणतीही भाषा "शिकता" येते पण ती 'बोलता" येईलच असे नाही. आपण लहानपणापासून हिंदी चित्रपट पाहात आलो आहे. पात्रांची भाषा समजतेही, पण ज्यावेळी आपल्यावर हिंदी बोलायची वेळ येते त्यावेळी कळून चुकते की आपल्या जिभेला त्या भाषेची चवच कळलेली नाही.

पण मला वाटते इंग्रजी असो वा हिंदी....बोलता येत नाही म्हणून ओशाळवाणे वाटण्याचे काही कारण नसावे. समोरील व्यक्तीही तुमचे उच्चार...मग ते बरोबर असोत वा चुकीचे....ध्यानी ठेवून तुमचा पाणउतारा कधीच करत नाही. सवयीसाठी "टाईम्स....इंडिया टुडे....फ्रंटलाईन..." अशा मॅगेझिन्समधील मजकूर मोठ्याने वाचण्याची सवय ठेवावी...जेणेकरून उच्चार पक्के होतात. माझ्या कॉलेजच्या जमान्यात "स्क्रीन" नामक एक सिनेसाप्ताहिक येत असे. या मॅगेझिन वाचनाची आवड आमच्या प्राध्यापकानी लावली होती...एवढ्यासाठी की विद्यार्थांना सिनेजगताविषयी आकर्षण असते, तर निदान त्या निमित्ताने का होईना त्यानी इंग्रजीची प्रॅक्टिस करावी....'इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया" हे खुशवंतसिंग यांच्या संपादकात्वाखाली प्रसिद्ध होणारे मॅगेझिन भारतात दुमदुमत होते....यातील लेख वाचणे म्हणजे समज वाढविणे तसेच उच्चारही सुधारणे यासाठी उपयुक्त ठरते होते.

मोठ्याने आवडीच्या इंग्रजी विषयाचे वाचन....हा फार मोठा लाभाचा मुद्दा ठरू शकतो.

तर्खडकर ,कोकाटे ,पिंगे आणि चाऊस यांना सगळे विसरले की काय ?
एकदा तरी त्यांची आठवण काढा .किती कष्ट घेतलेत त्यांनी तुमचे इंग्रजी सुधारण्याचे .

अशोकजी आपण इंग्रजीचे तज्ञ व्यासंगी आहात. आपण एखादं छोटेखानी पुस्तकच लिहा.. व्याकरण सोप्या भाषेत, इतर किचकट गोष्टी, या व्यतीरीक्त संभाषणकौशल्यासाठी,इंग्रजीवर प्रभुत्वासाठी आणखि काही उपाय टीप्स .
पीडीएफ फॉर्मेटमध्ये पुस्तक आंतरजालावर फूकट ठेवायचे.audio bookसुद्धा काढता येईल. तांत्रिक सहाय्य द्यायला भाचेभाची आहेतच.आजकालची मुलं काँम्प्युटर जास्त वापरतात ,पुस्तकांचा त्यांना कंटाळा असतो.त्यांनाही सोपं पडेल.
शिक्षण समाजसेवा एकाच कामात होऊन जाईल.बघा विचार करुन.
अशीच छोटखानी ebooks अनुक्रमे मराठी व संस्कृतभाषेसाठीही काढता येतील .जेणेकरुन परदेशी मराठी पालक पाल्यांना त्याचा फायदा होईल.लेखक या भाषेतले तज्ञ हवेत, जसे अशोक पाटील इंग्रजीचे आहेत.

बरोबरे अशोकराव तुमचे.
नीट सराव नसेल तर चारचौघात देवाची "आरती" देखिल खणखणीतपणे स्पष्ट उच्चारात म्हणता येत नाही अशीच लोकं दिसतात. एरवी नरड्याच्या शीरा ताणताणून जगाला शिव्या घाल ण्यात पुढे असणारे, आरती म्हणताना मात्र समुहात देखिल आपला आवाज "वेगळा" ओळखु येईल म्हणून पुटपुटल्यागत म्हणतात अन वर "देवाला सगळे कळते, मनात भाव असावा लागतो, नुस्ता मोठा आवाज काय कामाचा" वगैरे युक्तिवाद करत रहातात.
आरतीची ही गत, तर इन्ग्रजी वगैरे परकी भाषा फार म्हणजे कोसो दूर राहिली हो.........!

परभणीच्या बालविद्यामम्दिरमधे, तेव्हा १९७७ चे सुमारास छान प्रथा होती, रोज सकाळी प्रार्थनेच्या वेळेस मैदानात सर्व विद्यार्थी/विद्यार्थिनी एकत्र जमल्यावर कोणत्याही एका विषयावर (विषय शिक्षकांकडून आधी सुचवले जायचे) पाच मिनिटे कोणीही (आदल्या दिवशी पूर्वसूचना देऊन) बोलू शकत असे. यामुळे आपल्याच भाषेबद्दल/बोलण्याबद्दल/स्वतःचाच आवाज स्पीकरमधुन मोठा ऐकण्याबद्दल वगैरे अनेक बाबीत मुलांची भीड चेपत असे. ते आठवले.
आचार्य अत्रे म्हणे नदीकाठी गालात गोटे भरुन मोठमोठ्याने बोलत असत.
वक्तृत्व जसे आवश्यक तसे त्यास ज्ञानाची जोडही आवश्यक, तर भरपुर वाचनही /मनन्/चिन्तन आवश्यक.

ग्रेट्या, अरे कित्येक वर्षान्पुर्वी मी इथे प्रस्ताव मान्डला होता की इथे इन्ग्रजीचे मुलभूत नियम हसतखेळत शिकवता येतिल असा धागा काढावा व इन्ग्रजीतील तज्ञान्नी त्यात लिहावे. साधी साधी इन्ग्रजी वाक्ये रचताना बोबडी वळते ते होणार नाही व सरावही होईल. पण ही साईट मराठी असल्याने त्याबाबत फारसे काही नि:ष्पन्न झाले नसावे बहुधा किन्वा कुणी उत्साही अन हुषार अन पुरेसा रिकामा माणूस उपलब्ध झाला नसेल.
माझे इन्ग्रजी चान्गले अस्ते तर मीच लिहू लागलो अस्तो (शिवाय या विषयावर अन्निस/बुप्रावाले वगैरे कायद्यान्च्या आधारे तुटुन पडू शकत नसल्याने धोकादायकही नाही Wink )

Proud
अहो लिबुण्णा धागा काढला की प्रत्येक वेळी नेट उघडा, बघा जास्त सोयीचे नाही पडत. pdf ebook audio book एकदा डाऊनलोडले कि मग कितीही वेळा बघता ऐकता येते. पैशांचा प्रश्न असेल तर maayboli incorporation ltd च्या तांत्रिक+आर्थिक मदतीने अशी Ebook मराठीजनांसाठी नाममात्र किंमतीत ठेवता येतील.
(संस्कृतचेही मी लिहले आहे त्यामुळे संघिष्ट लोकांचा रोषही यायचे कारण नाही :-P)

ग्रेटथिन्कर...आणि अन्जू.... तुमची सूचना मौल्यवान आहेच, त्याबद्दल दुमत नाही. फक्त मलाच सध्या डोळ्यांच्या विकाराने त्रस्त केले असल्याने [शिवाय मेंदूचे ऑपरेशनही झाले आहे नुकतेच....इथल्या सार्‍या भाच्यांना माहीत आहेच मामाची ही अवस्था] मला लिखाणासाठी जी मोकळीक तसेच शरीरअवस्था हवी असते ती मिळणे काहीसे दुरापास्त झाले आहे. तरीही इंग्रजीसंदर्भातील तुमचा विचार मनी ठेवीत आहेच.

@ अतुल ~ शुअर....माझ्याकडे तो चित्रपट आहेच. नक्की लिहितो....आवडीचा विषय.

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी निर्माण केलेल्या मायबोलीवर इंग्रजी भाषा शिकविण्याचे वर्ग चालविणे म्हणजे जरा.... Wink

नाही डॉक्टर....तसा हेतू नसेल [नाहीच]; पण दुसरी भाषा म्हणून इंग्रजी आत्मसात करणेही तितकेच आवश्यक आहे. ते मानले म्हणजे ती भाषा "बोलण्याच्या" दृष्टिकोणातून कशी शिकता येईल ? यावरील चर्चा आहे. वर्ग इथे चालविता येणार नाहीतच.

मूळात, मातृभाषेव्यतिरिक्त एखादी भाषा नीट येत नाही याबद्दल न्युनगन्ड बाळगण्याचीच गरज नाही. मला शेजारील कानडी/गुजराथी/ तेलगु व अन्य अनेक भाषा येत नाहीत,

अहो त्याचे असे आहे की इंग्रजी ही आजच्या जगात फार फार महत्वाची भाषा आहे. बहुतेक सर्व जगात जास्त करून इंग्रजीच वापरल्या जाते. त्यामुळे ज्यांना जागतिकीकरण झाल्यामुळे परकीयांशी वारंवार संबांध येत असेल त्यांना इंग्रजी न येणे ही एक मोठीच अडचण असते. नि भारतीयांना जगभर जाऊन व्यवसाय, कमाई वाढवायची असेल तर इंग्रजी येणे आवश्यक आहे. अगदी इटलि, स्पेन मधले लोक सुद्धा इंग्रजी शिकत असतात. भारतात सुद्धा इंग्रजी शिकवतात त्याचे कारण हेच. म्हणून इंग्रजी न येणे म्हणजे जरा कमीपणाचेच समजले जाते.

आता कानडी, तेलुगु अगदी मराठी सुद्धा न आल्याने काही फरक पडत नाही. गुजराती मात्र महत्वाची भाषा आहे, भारतात व्यवसाय करायचा असेल तर.

इंग्रजी येत असल्याने चिनी जपानी व इतर लोकांपेक्षा भारतीय लोकांना जास्त संधि उपलब्ध होतात. इंग्रजी चांगले येत नसेल तर पुढील उन्नती साठी अडचणी येतात. खुद्द मला काहीहि अक्कल नसताना, कसलेहि स्किल नसताना केवळ फाड फाडके मोठमोठ्ठाले शब्द वापरून इंग्रजी बोलत असल्याने कंपनीत जाम मज्जा आली नि पैसे मिळाले. अर्थात माझ्याहूनहि बेअक्कल असलेले लोक टीव्हीवर, इतरत्र केवळ भाष वापरून जास्त पैसे मिळवतात, प्रसिद्ध होतात.

म्हणून तर मला एकदम जाणवले की अहो ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या!

. "विटनेस फॉर द प्रोसिक्युशन" - १९५७>>>> अगाथा ख्रिस्ती च्या या कथेवर आधारीत एक उत्कृष्ट मराठी नाटक 'खरे सांगायचे तर … !' पाहण्यासाठी खालील दुवा पहा. विक्रम गोखले, सुप्रिया पिळगावकर ई.
छानच आहे !
http://www.youtube.com/watch?v=1rCr8myuth4

हजारो फ्री ऑडीओ बुक्स साठी audiobooks / librivox live ही फ्री apps डाऊनलोड करून पहा.

डॉ. सुरेश शिंदे, हा तर खजिनाच उघडला तुम्ही ! खुप खुप आभार.
अशोकमामा, तुमची प्रत्येक सुचना लिहुन घेतल्या आहेत. काल १२ अँग्री मेन बघितला. सबटायटल्स होती, पण कोरियन भाषेत :). त्यामुळे ती बंद केली आणि आनंद घेतला. जवळजवळ ६०-७०% वाक्य समजली. सवय व्हायला वेळ लागेल. आता रेकॉर्डींगचा आणि पुन्हा ऐकणाचा प्रयोग करुन बघेन, म्हणजे कुठे अजुन improve करता येईल ते बघता येईल.

जर अजुनही कुणाचा गैरसमज असेल, तर पुन्हा एकदा लिहितो, की इंग्रजीवर प्रभुत्व ही माझी इच्छा आहे, जबरदस्ती म्हणुन नाही, तर मला त्याची आवड (निर्माण झाली) आहे.
इब्लिस Happy असं होणार नाही हे नक्की. पण झालं तर यु-ट्युब आहे Happy

>>>>>> की इंग्रजीवर प्रभुत्व ही माझी इच्छा आहे, <<<<<
देशमुख साहेब, ते कळले आहे हो Happy मात्र अनेकान्नी सुचविल्याप्रमाणे ललित/गम्भिर लेखन जरुर वाचा/ऐका, कॉमिक्स वाचा/ सिनेमे बघा-ऐका, मात्र जोवर आत्मविश्वास जागृत होत नाही तोवर "नोटिसा/कायदे/रेग्युलेशन/निकाल" वगैरे कायदेविषयक पेपर चुकूनही वाचू नका........ येत आहे नाही ती सगळी विन्ग्रजी/मातृभाषा वगैरे विसरुन जाल अन नेहेमी "कायदेशीरच" बोलू लागाल ! Proud

मोठ्याने आवडीच्या इंग्रजी विषयाचे वाचन....हा फार मोठा लाभाचा मुद्दा ठरू शकतो>>> अगदी. तुमच्या इतरही मुद्द्यांशी सहमत.
डॉक्टरसाहेब, तुम्ही दिलेली लिंक मस्तच!!

विजय, असं स्पष्टीकरण द्यायची काही आवश्यकता दिसत नाही. कुणाला काय वाटावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, तुम्ही उत्तर द्यायला बांधील नाही.
तुम्ही हा धागा काढलात त्यासाठी मात्र अनेकानेक आभार. त्यामुळे सगळ्यांनाच जाणकारांचे साधेसुधे उपाय आणि मार्गदर्शन मिळते आहे .

काही सोपे उपाय
१. पोगो वाहिनीवर छोटा भीम किंवा तत्सम मालिकांमधील इंग्लिश संवाद अतिशय सोप्पे आणि समजतील असे. जरूर बघा.
२. दिवसातून कमीत कमी १० मिनिटे इंग्लिश न्यूज किंवा स्पीचेस ऐकणे.
३. आरशासमोर स्व:ताशी इंग्लिशमधून बोला.
४. सगळ्यात महत्वाचे, "बोलाल तरच बोलाल".
वाचनाची आवड असेल तर चेतन भगत यांचे नोवेल्स अगदी छान. (हिंग्लिश टाईप).

'सकाळ साप्ताहिक' मधील सन्दीप नूलकर यान्चे 'शब्दाशब्दात' सदर छान असते. त्यातील 'काय सान्गताय काय' मध्ये भारतीय जे चुकीचे वाक्य खूपदा बोलतात ते देउन मग योग्य इन्ग्लिश दिलेले असते. जरूर वाचा! एक उदा. देतो :
"I passed out from college in 1984'' हे चुकीचे 'भारतीय इं'. त्याचे योग्य इं असे:
' I graduated in 1984'. (pass out म्हणजे बेशुद्ध् पडणे!!!! )
मला ' I will give you missed call' या चुकीच्या वाक्यासाठी योग्य वाक्य कोणी सुचवेल का? ( Call miss होतो, तो देता कसा येइल ? ) . 'Alert call' कसे वाटते?

सर्वांनी छान उपाय सुचवले आहेत. बीबीसी वरच्या बातम्या. सर अटेंबरो यांच्या सारख्या थोर लोकांची निवेदने यांचा मला फायदा झाला. पण सर्वात जास्त फायदा झाला तो माझ्या सहकार्‍यांचा. मी मराठी माध्यमातच शिकलो त्यामूळे पहिल्यांदा न्यूनगंड होताच. पण माझ्या संभाषणातल्या , वाक्यरचनेतल्या चुका नेमकेपणाने पण खवचटपणा न करता मला दाखवून दिल्या त्यामूळे आत्मविश्वास वाढत गेला.
दुसरे म्हणजे भारतात असताना इंग्रजी बोलतानादेखील स्थानिक भाषेचा थोडाफार आधार घेतला जातो. माझे सहकारी महाराष्ट्राच्या बाहेरचे आणि अनेकदा भारताबाहेरचेही असल्याने असे शब्द कटाक्षाने टाळावे लागले.

माझे इंग्रजी वाचन मात्र फारच मर्यादीत आहे.

कुमार १

"Missed Call" ही एक अवस्था आहे...पोझिशन आहे...तिचा डिक्शनरीतील अर्थानुसार वापर करणे योग्य ठरणार नाही. Miss याचा सर्वसामान्य अर्थ "नेम चुकणे, वरून जाणे, वियोगाची जाणीव होणे, फसणे" असे विविध कंगोर्‍याचे आपल्याला मिळू शकतात. मोबाईलचा शोध हा अलिकडील असल्याने त्या यंत्राच्या कार्यपद्धतीमध्ये जेव्हा मिस्ड कॉलचा संदर्भ घेतला गेला तो वास्तविक "Fail to Take....Fail to Notice...किंवा Fail to See" या अर्थाने घेण्यात आला.

तुम्ही जे उदाहरण वर दिले आहे....ते आहे : ' I will give you missed call'....म्हणजेच तुमचा मित्र तुम्हाला असा संदेश देत आहे....याचा इथे अर्थ Skip किंवा Escape असा होईल...म्हणजे त्याच्या फोनमध्ये बॅलन्स नाही म्हणून "माझा फोन आला तरी तू तो स्किप कर...घेऊ नकोस. नंबर पाहून तूच मला परत फोन कर..." इतका अर्थ आहे त्या मिस कॉलमध्ये. उलट अर्थ असाही होऊ शकतो की तुम्ही गाडीवर आहात...फोनची रिंग होत आहे पण तुम्हाला चालत्या गाडीवर फोन घ्यायचा नाही. फोन बंद होतो...मात्र मार्क राहतो "1 Missed Call" या ठिकाणी एक कॉल तुम्ही Fail to Notice केला आहे.

प्ल्युएन्सी म्हणजेच प्रभूत्व का ?
प्रभूत्व म्हणजे काय हे नक्की करा आधी.
शेक्सपीयर बननेका कि बराक ओबामा, नायपॉल बननेका ?

धागा सुरेख व फारच उपयुक्त आहे. अकरावी पर्यन्त मराठी माध्यमात शिकुन ,एकदम डिप्लोमा साठी प्रवेश घेतल्यावर ,इंग्रजी माध्यमामुळे ,खुपच गड्बड झाली होती.फिजिक्स चा सिल्याबस सरानी तोंडी सांगितला तर लिहुन घेतांना " Heat " शब्द मी " Hit " असा वहीत लिहुन घेतला होता ( मग नंतर पुस्तकात पाहून दुरुस्त केला होता ! ! ) त्याच वेळी इंग्रजी चांगले आलेच पाहिजे याची जाणीव झाली सुदैवाने इंग्रजी कादम्बर्‍या वाचतांना Earl Stanley Gardner " यांच्या " Perry Messon solves the case of ...." वाचल्या यात निम्मे पुस्तक कोर्टातील तपासणी/उलटतपासणी अशा स्वरुपाच्या छोट्या छोट्या , सहज समजणार्‍या संवादांनी असल्याने समजणे अवघड गेले नाही . मलाही सिडने शेल्डॉन स्त्री च वाटली होती , पण एका पुस्तकावर फोटो पाहिल्यावर ' ती ' ती नसून " तो " आहे असे समजले. मराठी अनुवाद वाचल्यावर ,मूळ इंग्रजी कादंबरी ,वाचण्याची प्रेरणा व्हायलाच हवी . कारण अनुवादक शब्दश अनुवाद करीत नाहीत " पॉपीलान " चा मराठी अनुवाद वाचल्यावर , मूळ कादंबरी वाचुन जास्त छान वाटली गुन्हेगारी वा युद्ध यावर आधारीत कादंबर्‍या यातील वाक्ये सहज समजतात , म्हणून तशी पुस्तके अगोदर वाचावीत

"I passed out from college in 1984'' हे चुकीचे 'भारतीय इं'. त्याचे योग्य इं असे:>>> भारतात असंख्य लोक असे बोलत असतील तर त्यात चुकीचे काही नाही. मात्र इतर देशातील लोकांशी बोलताना भलताच अर्थ होईल, तेव्हा तशा प्रसंगांत वापरू नये. पण भारतातल्या भारतात असे वाक्य सर्वमान्य असेल तर बोलायला काहीच हरकत नाही.

I will give you missed call >> हे ही मला चुकीचे वाटत नाही. भारतात याचा वापर अगदी कॉमन आहे, त्यामुळे ऑलरेडी ते सर्वमान्य आहे.

"I passed out from college in 1984' हे चुकीचे आहे...? आं ?

एन डी ए , पोलीस यांच्या दीक्षान्त समारोहास पास औट परेडच म्हणतात ना?

Verb[edit]
pass out (third-person singular simple present passes out, present participle passing out, simple past and past participle passed out)
(intransitive) To faint; fall asleep
I pass out at the sight of blood.
I passed out on the train after drinking a bottle of vodka.
(transitive) To distribute, to hand out
We'll pass out copies of the agenda.
(of soldiers, police, fire-fighters etc.) To graduate, usually marked by the ceremony at the end of their training.  [quotations ▼]
(bridge, transitive) To end (a round) by having passes as the first four bids.

मलाही ते मुळात चुकीचे वाटतच नाही. पण जरी असते तरी जर इतके भारतीय तसे बोलत असतील तर आत्तापर्यंत सर्वमान्य झाले असेल असे मला म्हणायचे होते. प्रिपोन शब्दाप्रमाणे.

पण सर्वमान्य आहे म्हणुन तेच वापरत राहिले पाहिजे असे कुठेय? योग्य काय आहे ते कळल्यावर तेच वापरणे जास्त बरोबर नाही का? ज्याच्या त्याच्या आपापल्या पातळीनुसार आणखी अचुकतेकडे जायला ही मदतच होईल.

नाही सर्वमान्य म्हणजे मी अशा अर्थाने म्हणतोय - पेपर्स मधे, ऑफिसमधील मेल्स मधे, चर्चेत, टीव्हीवर जर सर्रास असे उपयोग केले जात असतील तर ते मुळचे चुकीचे असले तरी केवळ घाऊक उपयोगामुळे हळुहळू भाषेत योग्य धरले जातात. तसे नसते तर इंग्रजीचे एवढे वेगवेगळे प्रकार दिसले नसते.

त्यामुळे "सर्वमान्य" किंवा "सगळेच करतात" मधे ते सगळे कोण आहेत हे महत्त्वाचे आहे. few/a few, little/a little मधे अनेक लोक तो "a" न लावता करतात, जो वापर "कमी" या अर्थाने करताना चुकीचा आहे. अनेक लोक तसे करतात पण ते सर्वमान्य होत नाही. मीडियाच्या, सरकारच्या, कंपन्यांच्या प्रमाण भाषेत तुम्हाला सहसा ही चूक दिसणार नाही.

हे जरा अचूकपणे सांगणे अवघड आहे असे आता लिहीताना लक्षात आले. उदाहरणांवरून सांगता येइल. बहुधा "सगळे करतात" मधले सगळे कोण यावर ते असावे Happy

Pages