इंग्रजीवरील प्रभुत्व

Submitted by विजय देशमुख on 11 February, 2014 - 22:26

आजकाल इंग्रजी भाषा आवश्यक झाली आहे. आपल्याला आवडो वा नावडो, कधीतरी कुठेतरी असं वाटुनच जातं की आता इंग्रजीवरही प्रभुत्व हवच. आपापल्या क्षेत्रांत आवश्यक असणारे संभाषण, प्रेझेंटेशन्स वगैरे फारशी जड जात नाही. ती सवयीने जमायला लागतात, पण आपल्या क्षेत्राच्या बाहेर विचार करणे, बोलणे, वाचणे, लिहिणे फारसं जमत नाही. असं नाही की इंग्रजी बोलताच येत नाही, पण वेळेवर नेमके शब्द आठवत नाही किंवा काय बोलावं, ते सुचत नाही. कित्येकदा इतर लोकं धडाधड सिडने शेल्डॉन {माझ्या काळातली} वगैरे कादंबरी लेखकांची नावे घेतात, तेंव्हा वाटते की अरे, आपण काहीच वाचत नाही की काय?
जयपुर लिटरेचर फेस्टिव्हलबद्दलची पोस्ट वाचल्यावर त्यातला एकही लेखक ओळखीचा वाटला नाही. ओळखीचा तर सोडाच, कोणाचही नाव याआधी वाचलं नव्हतं. याला आळस म्हणावा की अज्ञान?
भारतात असतांना किमान आठवड्यातुन एकदातरी इंग्रजीतुन बोलणे होत होते, पण कोरियात आल्यापासुन ऑफिसात इंग्रजीच काय, कोरियनही बोलणे होत नाही. त्यामुळे आता सराव असा उरलाच नाही. बहुदा, जिथे इंग्रजीचं चलन नाही, त्या देशातल्या लोकांची परिस्थिती अशीच असावी.
आता मात्र हे अधिकच जाणवायला लागलय की इंग्रजीचं वाचन आणि संभाषण अधिक चांगलं व्हायला हवं. लेखनाचा विचारही त्यानंतर करता येईल. अभ्यासाच्या विषयाबाहेरचही ज्ञान मिळवण्यासाठी काय करता येईल? केवळ चारचौघात बोलण्यासाठी म्हणुन नव्हे तर एक अभ्यासक म्हणुन, स्वतःसाठी वेळ काढुन काहीतरी लिहिण्यासाठी, स्वतःचे विचार इंग्रजीतुन मांडण्यासाठी काय करता येईल? तुम्ही काय करता?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कित्येकदा इतर लोकं धडाधड सिडने शेल्डॉन {माझ्या काळातली} वगैरे कादंबरी लेखकांची नावे घेतात, तेंव्हा वाटते की अरे, आपण काहीच वाचत नाही की काय?
>>>
मग तुम्ही बाबूराव अर्नाळकर, गुरुनाथ नाईक चन्द्रकान्त काकोडकर, बाबा कदम असली वर्ल्ड क्लासिकची नावे घेऊन समोरच्याला कॉम्प्लेक्स आणून त्याची बोलती बन्द करा. Happy

कोणत्या भाषेत गती असणे स्पृहणीय बाब असतेच पण नसेल तर त्याने काही आकाश कोसळत नाही.
मध्यन्तरी एका कॉन्सुलेट जनरलशी चर्चा करण्या चा प्रसंग आला त्याच्यापेक्षा इथल्या मराठी माध्यमाचे पाचवीच्या पोराचे इंग्रजी बरे असेल असे वाटत होते.
तुम्ही काय करता?
>>
आम्ही बिनधास्त 'बटलर्स इंग्लिश ' हाणतो..... 'हाण त्येच्या मायला सावळ्या..."

लिटेरेचर वाचायला दर ओळीत चार येळंला डिकक्षनरीकडे पळाय लागतेय...

काही लोक रोज नियमाने 'टाईमसांड्या ' वाचतात.
वोकॅब्युलरी हाच मुख्य मुद्दा आहे. ग्रामर फारसा नाही.
गो रा खैरनार खेड्यातून नोकरीसाठी मुम्बईत आले तेव्हा त्याना हा इंग्रजीचा कॉम्प्लेक्स होता त्यानी वीरकरांची आख्खी डिक्षनरीच पाठ करून टाकली. टकाटक...

आपला बोधिवृक्ष आपणच शोधणे इष्ट. आमचे एक शिक्षक नेहमी सांगत एक कोणताही धडा पूर्ण पाठ करून टाका आणि तो समोरच्याला ऐकवत चला ... त्यातही काही दम होता हे खरेच.

वोकॅब्युलरी हाच मुख्य मुद्दा आहे. ग्रामर फारसा नाही.<<< हो हे मात्र एक्दम बरोबर...

त्याच्यापेक्षा इथल्या मराठी माध्यमाचे पाचवीच्या पोराचे इंग्रजी बरे असेल असे वाटत होते.<<< बरे असेल नाहि बरे असतेच.. Happy

रॉबिनहुड म्हणाले त्याला अनुमोदन.

अधिक, माझा वैय्यक्तिक अनुभव सांगतो. मी इंग्रजी माध्यमातला असलो तरी ती कॉनव्हेंट नसल्याने एकमेकांशी इंग्रजीतच बोला अशी सक्ती नव्हती. त्यामुळे संभषणात्मक इंग्रजी चांगले व्हायला वेळ लागला. अर्थात याची अडचण फारशी झाली नाही कारण नोकरीत जवळजवळ सगळे काम संगणकावर होते आणि लेखी इंग्रजी उत्तम आहे.

मला लहानपणापासून मराठीबरोबरच इंग्रजी वर्तमानपत्रे व पुस्तके वाचण्याची खूप आवड असल्याने वाचता वाचता शब्दसंग्रह (व्होक्यॅब्युलरी) आणि व्याकरण (ग्रामर) हे दोन्ही चांगले झाले.

इंग्रजी सुधारायचे असेल तर अधिकाधिक वाचन करावे. मुख्यत्वेकरून पाश्चात्य लेखकांची पुस्तके जास्तीतजास्त वाचावी. नुकतेच जे भारतीय लेखकांनी इंग्रजी पुस्तके लिहायचा सपाटा लावला आहे त्यातले बहुतेक इंग्रजी हे भारतीय इंग्रजी आहे त्या पुस्तकांचा प्रस्तुत विषयासंदर्भात काही उपयोग नाही.

इंग्रजी बोलण्याविषयी न्युनगंड असण्याच्या मुख्य कारणांपैकी मुख्य हे इंग्रजी नीट न येणे याच बरोबर सभाधीटपणा नसणे हे देखील आहे, तेव्हा अगदी पन्नास-शंभर नव्हे तर पाच दहा जणांसमोर आधी मराठीत मग धीटपणा आल्यावर इंग्रजीत भाषण ठोकण्याचा सराव करावा. विषय काहीही असो.

मी स्वतः ब्रिटीश व अमेरिकन सिनेमे व मालिका खूप पाहिल्याने दोन्ही उच्चारांची सवय झाली व त्यांच्या भाषेतल्या आणि संस्कृती व समाजजीवनातल्या अनेक गंमतीजमती (nuances) समजल्या. त्याचा पुढे एका नोकरीत खूप उपयोग झाला व इतरांपेक्षा चांगले काम करु शकलो.

तस्मात, सतत वाचन करणे व इंग्रजी सिनेमे व मालिका बघणे हे करत रहावे. तसेच वर म्हटल्याप्रमाणे पाच-दहा जणांसमोर भाषण ठोकण्याचा सराव करावा.

अधिक काही सुचले तर लिहेन.

विजयराव....

"....आपल्याला आवडो वा नावडो, कधीतरी कुठेतरी असं वाटुनच जातं की आता इंग्रजीवरही प्रभुत्व हवच...."

तुमची ही कबुली मला फार आवडली, कारण त्यातून एक सत्य प्रकट होते की आपल्याला असो वा नसो, पण आपल्या पाल्यांनी जगातच नव्हे तर आजकाल भारतातही इंग्रजीशिवाय तरणोपाय नाही हे विनातक्रार मान्य करावे लागेल अशी स्थिती आहे. मी दक्षिणेकडील राज्यात फिरलो आहे, राहिलोही आहे [परदेशात नाही] तेव्हा या भाषेचे महत्व आणि त्यापेक्षा गरज किती महत्वाची आहे हे ढळढळीतपणे मला दिसून आले आहे. केरळामध्ये तर साधा रस्ता चुकला तर तुम्हाला इंग्रजीचा आधार घेतल्याशिवाय संभाषण करता येत नाही. मातृभाषेचे महत्व खूप आहे पण याचा अर्थ असा नव्हे की तिच आत्मसात झाली म्हणजे सारे कूट प्रश्न सुटले...त्यासाठी इंग्रजी तुमच्याकडे हवीच.

"...हे अधिकच जाणवायला लागलय की इंग्रजीचं वाचन आणि संभाषण अधिक चांगलं व्हायला हवं...."

मी जाणतो यासाठी अफाट वाचनाबरोबरच लिखाणाचीही आवश्यकता हवी. डिक्शनरी शेजारी घेऊनही विविध विषयावरील लेखन...किमान स्वःआनंदासाठी केले म्हणजे लिखाणावर पकड येते....इंग्रजीतून पत्रव्यवहार ही एक जादू आहे....आपले नित्याचे मित्र तसेच जालीय मित्र [ज्याना कधी पाहिलेले नसते] त्यांच्याशी वैचारिक देवाणघेवाण इंग्रजीतून केल्यास शब्दसंचय वाढण्यास फार मदत होते, हे स्वानुभवावरून सांगतो. परराज्यातील भटकंती आणि त्या त्या भागातील लोकांसमवेत इंग्रजीतून [व्याकरणाचा संबंध येत नाही] केलेले संभाषण तुमची सवय वाढविण्यास मदत करतो. टाईम्सच्या रविवारच्या आवृत्या इंग्रजी सुधारण्यासाठी फार उपयुक्त ठरतात. शिवाय बीबीसी आणि अन्य भारतीय इंग्रजी बातम्यांची चॅनेल्स....आवड असो वा नसो....सातत्याने पाहणे, उच्चार अभ्यासासाठी, ही आणखीन् एक चांगली बाब ठरते.

असो...फार मोठा विषय आहे. प्रतिसाद अपेक्षित आहेत इथल्या अभ्यासकांचे.

अरे फिकर नॉट मी दहावी परेन्त शुद्ध मराठीत शिकून मग इंग्रजी डेवलप करून त्यात कॉपी राइटिंग आणि काही पण उत्तम लिह्णे बोलणे आत्मसात केले. रीडर्स डायजेस्ट चा नक्की उपयोग झाला. खूप बिनधास्त बोलायला हवे.
आपले उच्चार कधी कधी गळाफटतात ( सौजन्य दगडू) कारण काही शब्द फक्त लेखीच माहीत असतात. पण गाडी पुढे रेटायची. व्यक्त कर ण्यासारखे काही तरी हवे मात्र.

"...रीडर्स डायजेस्ट चा नक्की उपयोग झाला...."

~ हे आवडले. खूप उपयोग झाला होता मलाही या रीडर्स डायजेस्टच्या वाचनाचा....त्याचबरोबर "लाईफ.... ई.एल.टी., एनकाऊंटर, टाईम, नॅशनल जिऑग्राफिक' आदी नियतकालिकांचा....फार महाग असत ही मॅगेझिन्स पण आमच्या कोल्हापूरातील नगरवाचन मंदिराने मोफत पुरविली होती ही सारी सर्वांना.

विजयराव,
दोन गोष्टी सुचवेन ज्या मला उपयोगी वाटतात.
१. इंग्लिश ऑडीओ बुक्स ऐका.
२. इंग्लिश सिनेमे इंग्लिश सबटायटल्स सह पहा, वाचा आणि ऐका.
जितके जास्त सेन्स ओर्गन्स वापराल तितका तुमचा मेंदू जास्त ट्रेन होईल.
प्रयत्नांती ….

डॉक्टर....

इंग्रजी सिनेमे सबटायटल्ससह पाहणे आणि त्यातील कथानकांना समजून घेणे हा एक मोठा आनंदी प्रकार आहे.

इंग्रीड, बोगार्टचा क्लासिक "कॅसाब्लांका"....."सायलेन्स ऑफ द लॅम्ब"....."१२ अ‍ॅन्ग्री मेन"....."अ‍ॅपोकॅलिप्स नाऊ",... "मॅट्रिक्स".....आदी काही जबरदस्त उदाहरणे आहेत की यातील अ‍ॅक्शनपेक्षाही संवाद फार महत्वाचे ठरतात आणि दृष्ये पाहताना ते संवादही पडद्यावर आले की होणारा आनंद विलक्षणच.

सुरुवातीला जरूर त्रास होत असेल शॉट्स आणि डॉयलॉग्ज एकाच वेळी पाहणे आणि अनुभवणे....पण नंतर सहज सवय होऊन जाते.

रॉबिनहुड, माझ्या कमी लिहिण्यामुळे थोडासा गैरसमज झाला असेल, तर मी माफी मागतो.
कोणीतरी म्हणतोय, म्हणुन किंवा नाईलाज म्हणुन मला इंग्रजी आलं पाहिजे, असं माझं मत नाही. मराठी भाषेचा, साहित्याचा अभिमान आहेच, आणि मीही मराठी माध्यमातुनच शिकलो (तेच चांगलं, हेही माझं मत). पण आज मला वाटतय की माझे विचार अनेकानेक लोकांपर्यंत पोहचावे. मला ज्याप्रकारे मराठीत आणि माझ्या विषयात इंग्रजीतही छान भाषण देता येतं, त्याचप्रकारे इतरही विषयांवर (ज्याबद्दल मला माहिती आहे आणि मराठीत मी उत्तमरित्या लिहू, बोलू शकतो) इंग्रजीत लेख, भाषण देता यावं. इथे माझ्यावर कोणाचीही जबरदस्ती नाही तर ती माझी आवड आहे, असं समजा.
शिक्षकी पेशात असल्याने माझ्या विद्यार्थांना अगदी थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी अगदी सहजपणे शिकवू शकतो आनि त्यासाठी आता अधिक तयारी करण्याची गरज नाही, पण जर मला अकबराचा इतिहास किंवा मोदींचे अर्थविषयक विचार किंवा आवडता चित्रपट यावर (इंग्रजीत) बोलायचं असेल, तर फारसं चांगलं बोलता येत नाही. त्याची तयारी करायची असं समजा.

अशोक, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर. सहसा मायबोली वगळता मी बरेचदा इंग्रजीच वापरतो. मित्रांशी बोलतानाही बरेचदा इंग्रजीच टाईप केल्या जाते. रोमन मराठी लिहायला अन वाचायलाही कठीण. Happy आता ब्लॉग वगैरे लिहावा की काय असा विचार करतोय. लेखी इंग्रजीत थोडी भर पडेल.

चायवाला आणि पेट थेरपी, उपाय करुन बघतो. Happy वेळ लागेल पण होईल हे नक्की.

माझ्या लेखनात विस्कळीतपणा किंवा परस्परविरोधी विधानं असतील, तर तो माझ्या लेखनाचा दोष आहे, त्यासाठी आधीच क्षमस्व.

इंग्रजी सुधारायचे असेल तर दिवसात किमान दहा मिनीटे कुठल्याही विषयावर फक्त इंग्रजीतुन विचार करुन इंग्रजीतुनच बोलुन पहा. सुरुवातीला इतर कुणासमोर बोलायची जरुर नाही, एकटेच बोलायची आणि विचार करायची प्रॅक्टीस करा. कुठलीही नविन भाषा बोलायला शिकण्यासाठी त्याचा बराच फायदा होतो.
नंतर उच्चार सुधारण्यासाठी / बदलण्यासाठी इंटरनेटवर बरेच उपाय आहेत. इंग्लिश अ‍ॅज सेकंड लँग्वेज रिसोर्सेस असे शोधले तर बरेच मिळेल.

toastmasters.org से सदस्य व्हा. बर्‍याच जणांना याची मदत झाली आहे.
ह्या संकेतस्थळावरुन तुम्हाला तुमच्या तुमच्या देशातील तुम्हाला सोयीचा क्लब शोधता येईल.

वोकॅब्युलरी हाच मुख्य मुद्दा आहे. ग्रामर फारसा नाही.>>>> +१

एकेक विषय घेऊन त्यासंदर्भात वापरल्या जाणार्‍या खासंखास शब्दांची यादी बनवायची. ते शब्द आपल्याला संभाषणात योग्य रितीने वापरता आले की आपल्याला विषयात गती आहे हे समोरच्याला कळतंच.

उदा धावण्यासंदर्भात स्पीड आणि पेस ह्यातला फरक कळला पाहिजे. लांब पल्ल्याची अंतरे धावणारे पेस वर भर देतात, छोटी अंतरे धावणारे स्पीड वर हे जाणून घेतले की झाले.
एका मिनिटात किती अंतर धावले हे विचारताना हॉऊ मच डिस्टंस यू कव्हर इन अ मिनिट ऐवजी व्हॉट्स युवर पेस विचारले की फरक पडतो.

म्हणजे धावणे असा विषय घेतला आणि तुम्ही धावणारे नसाल तरी पेस, केडन्स असे शब्द संभाषणात योग्य प्रकारे पेरत गेलात की झाले काम.

मी स्वतः अशा विषय वार याद्या तयार केल्या होत्या. तसेच समानार्थी शब्द आणि त्यांच्या छटेनुसार ते कधी कुठे कसे वापरायचे हे नीट पणे समजावून घ्यायचे.

उदा. मराठीत सरसकट ज्याला बक्षिस असे संबोधले जाते त्याला इंग्रजी मधे award, reward, prize असे वेगवेगळ्या वेळी वापरायचे शब्द आहेत. अशा एकाने दुसर्‍याला देणे या प्रकारचे gift, present, donation, contribution, extortion, असा नानाविध शब्दांचा संग्रह करायचा. शब्द आणि अर्थ चक्क लिहून काढायचे. ती वही वरचेवर चाळत रहायची. अडलेल्या शब्दांचे अर्थ बघताना डिक्षनरी सोबत थिसेरस देखिल पहायची सवय लावून घ्यायची.

अर्थात हे म्हणजे, मी असे केले, मला त्याचा फायदा झाला, तुम्हालाही होऊ शकतो. असे म्हणायचे आहे Happy

हर्पेन....

"...थिसेरस देखिल पहायची सवय लावून घ्यायची..." ह्याबद्दल तुमचे अभिनंदन ! डिक्शनरी महत्वची आहेच पण त्यासोबत थिसेरस अगदी जादूची कांडी आहे....शब्दसामर्थ्य वाढविण्यासाठी.

Roget's Thesaurus.....मुद्दाम शिफारस करीत आहे.....२०० वर्षे झाली....रत्न आहे.

खुप छान धागा. मी इंग्लीश स्पिकिंग शिकवते तेव्हा सांगते कि इंग्रजी बोलण्यासाठी तीनच गोष्टी आवश्यक आहेत:
१. आत्मविश्वास २. शब्दसंग्रह ३. व्याकरण. बस्स. Happy

मी स्वतः अशा विषय वार याद्या तयार केल्या होत्या>> जमल्यास आठव ल्या येथे टाका

मस्त धागा
मी सध्या
१ ईग्रजी सिनेमे बघणे त्यातली लक्शात राहिलेली वाक्ये वारंवार वापरणे
२ लेकी साठी आणलेल्या कारटुन मधली वाक्ये वारंवार वापरणे
३ नर्सरी ची गाणी म्हणायची 'पटापट'

असे करते
अजुन खुप काही .....

वरील सगळ्यांना अनुमोदन
विजयराव,
दोन गोष्टी सुचवेन ज्या मला उपयोगी वाटतात.
१. इंग्लिश ऑडीओ बुक्स ऐका.
२. इंग्लिश सिनेमे इंग्लिश सबटायटल्स सह पहा, वाचा आणि ऐका.
जितके जास्त सेन्स ओर्गन्स वापराल तितका तुमचा मेंदू जास्त ट्रेन होईल.
प्रयत्नांती …. >>>हे जरा जास्तच आवडल कारण आमचे अहो नेहमीच English बातम्या,मुलाखती आणि क्रिकेट वरील जे मिळेल ते वाचतात ,ऐकतात.आमच्याकडे एकच laptop असल्यामुळे सुरवातीला नाईलाजाने मी हि ऐकत होते कारण दुसरा पर्याय नाही. आता मलाच ते सगळ आवडायला लागले आहे आणि आत्मविश्वास वाढला असे वाटते.आधी मला ते नकोच वाटायचं कारण एक शब्द जर निट कळला नाही तर मग पुढे लिंक लागायची नाही. दहावी पर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमात झाले आणि पुढे सगळे इंग्लिश मध्ये तरीही समस्या होतीच.आता मस्त enjoy करते Happy

दहावी पर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमात झाले आणि पुढे सगळे इंग्लिश मध्ये तरीही समस्या होतीच.>> मी पण या कॅटॅ मधली

आता फ्रेंच च्या ४ लेव्हल्स केल्यावर लक्षात येतंय की तुलनेने इंग्रजी भाषा सोपी आहे!
पण व्यक्त होण्याकरता वोकॅब मजबूत हवं; भाषा कुठलीही का असेना!

मी करतो / केलेले उपाय- वाट्टेल त्या सोर्स मधून त्या त्या भाषेमधलं वाचत जावं. (हा उपाय बागुलबुवाने दिलेला अन इट वर्कस! :)) + मूव्हीज, टीवी शोज, न्यूज ई. आहेतच.

माझ शिक्षण मराठी माध्यमातल. तस॑ शाळेत असल्या पासुनच विदेशी भाषेचा तिरस्कार होता. त्या मुळे कधी त्या भाषे कडे प्रेमाने बघितलेच नाही पण आताच्या काळात थोडे फार परकीय भाषी ज्ञान असणे गरजेचे वाटते. प्रयत्न होतो भाषा शिकण्याचा, पर्॑तु शब्द स्॑ग्रह कमी पडतो, एवढेच नाही तर कुठला शब्द लवकर आठवतच नाही. पार गजनी होउन जात. वर दिलेल्या उपाया॑मधिल बरेच प्रयोग करुन झाले. पण काही कळत नाही मेले ते शब्द लवकर लक्षात रहात नाहीत. बर॑ काही शब्द असे आहेत कि वाक्यत ते चुकिचे वापरले गेले कि वाक्याचा अर्थ फार निराळा होतो.

एकदा पति राजा॑ना विदेशी भाषेचे वाक्य ऐकवुन खुश करवे म्हणले, मग काय आ॑तरजालावर शोध घेतला नी काही सोपी वाक्य पाठ केली. काही वाक्य न बघता लक्षात राहीली. स्॑ध्याकळी पतिराज आले , त्या॑ना वाक्य म्हणुन दाखवायला गेले , तर पाठ केलेल्या पैकी एकही वाक्य धड आठवेना. ते माझ्याशी जमेल तेवढ वि॑ग्रजी भाषेत बोलण्याचा प्रयत्न करतात. पण माझ्या कडुन उत्तर मराठीतच जाते.

प्रगत अडवान्स

काही नावाजलेल्या लेखकांची पुस्तके वाचण्याशिवाय गत्यंतर नाही .ही यादी /याद्या जालावर आहेतच .

Slang खूप महत्वाचे आहे.. मी Youtube वर अमेरिकन/ ब्रिटिश कार्यक्रमाचे एपिसोड्स बघतो आणि जेवण बनवताना जे बघितले ते पुन्हा ऐकतो...

वर्ड पॉवर मेड इझी...हे एक अत्युकृष्ठ पुस्तक आहे...त्याची सिरीज अर्थात...

एकाच शब्दाच्या वेगवेगळ्या छटा, त्याचे मूळ, संदर्भ आणि वापर इतक्या सोप्या भाषेत समजाऊन सांगितलेले असतात की ते कायमच लक्षात राहतात....

. ग्रामर फारसा नाही.
कुणाशी बोलताहात त्यावर अवलंबून आहे.
अमेरिकेत आला आल्या ब्रूकलिन, न्यू यॉर्क मधल्या एका रस्त्यावरच्या फेरीवाल्याला म्हंटले आय डोंट हॅव एनि मनि. त्याला कळले नाही, मग दुसर्‍या माणसाने सांगितले ही डोंट गॉट नो मनि!!

वोकॅब्युलरी हाच मुख्य मुद्दा आहे
हे अगदी खरे. चांगल्या लेखकांची पुस्तके वाचणे हा उपाय आहे. विल्यम बकली नावाचा राजकारणावर लिहीणारा एक माणूस होता. तो इतके कठीण शब्द वापरतो की ते वाचून नि डिक्शनरीत त्याम्चा अर्थ बघणे ही एक गंमतच असते.

पण शिकलेल्या लोकांशी बोलायची वेळ आली तर मात्र व्याकरण माहित पाहिजे.

Slang खूप महत्वाचे आहे..
तरुण मुलांना. इथे रहायचे असेल तर. पण माझा मुलगा, मुलगी, जावई हे तरुण असूनहि स्लँग बोलत नाहीत आणि माझ्या उच्चारांची टिंगल करतात.

स्लॅन्ग चे कुणी उदाहरण देऊ शकेल का? मला एकदा एक ब्रिटिश भेटला मलेशियात आणि खूप वेळ गप्पा मारल्यानंतर म्हणाला तुमचे स्लॅन्ग खूपच छान आहे. मजा आली. पण मला तो काय म्हणत आहे हे कळले नाही. म्हणजे हा शब्द ऐकला आहे पण अजून उदाहरण मिळाले नाही की नक्की स्लॅन्ग म्हणजे काय.

राजू उदाहरण नाही दिले त्यांनी ..मी नेमके उदा शोधतो आहे. मला वाटत ही उच्चाराशी निगडीत गोष्ट आहे .. लिहून सांगणे अवघड असावे.

आपली एतद्देशियांची आणखी एक गोची म्हणजे विशेषणांचे खूप कमी ज्ञान. बहुतेक इंग्रजी लेखनात निम्मी तर विशेषणेच असतात. नवजोत सिद्धूच्या तोंडाळपणाबद्दल काहीही असो त्याची चपखल विशेषणे ऐकण्यासारखी असतात.....

Pages