Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 5 February, 2014 - 06:37
सांज उतरती ओली
का लावुन हुरहुर जाते
मन गाभा-यात कशाचे
काहूर पेटवुन जाते
अर्घ्यातुन पागोळ्यांच्या
सुखसर्वस्वाचे दान
चुकविती बापुडी कौले
कुठल्या जन्मीचे ऋण
संन्यस्त घरांच्या भिंती
निथळती, गळती संथ
गतवैभव स्मरुनी सारे
ढाळती आसवे मंद
काळोखाचा विळखा मग
अधिकच काळा होतो
वाटते निसटले सारे
अन् जीव घाबरा होतो
उदरातुन काळोखाच्या
उमलावा प्रेमपिसारा
स्पर्शातुन उमजत जावा
जगण्याचा अर्थ निराळा
जयश्री अंबासकर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उदरातुन काळोखाच्या उमलावा
उदरातुन काळोखाच्या
उमलावा प्रेमपिसारा
स्पर्शातुन उमजत जावा
जगण्याचा अर्थ निराळा<<<
मस्त!
(ह्या कडव्यापासून एक नवीन कविता सुरू होत असल्यासारखेही वाटत राहिले)
छान , सुंदर !
छान , सुंदर !
मस्त.. आवडली कविता.
मस्त.. आवडली कविता.
आ हा हा... अर्घ्यातुन
आ हा हा...
अर्घ्यातुन पागोळ्यांच्या
सुखसर्वस्वाचे दान
चुकविती बापुडी कौले
कुठल्या जन्मीचे ऋण...
बापरे... कस्लं जीवघेणं लिहिलयस...
जयूबाई, अस्तेस कुठे? का इतकी अवचितच येतेस?
व्वा ! छान फ्लोमधे उतरलेली
व्वा ! छान फ्लोमधे उतरलेली कविता.
बेफिकीर, अन्विता, श्रीयू,
बेफिकीर, अन्विता, श्रीयू, दाद, उल्हासजी ..... धन्यु
बेफी......शेवटच्या कडव्यापासून नवी कविता सुरु होतेच आहे
दाद......तुझी दाद.......मेरा दिन बन गया यार
अगं आजकाल जरा कमीच झालाय वावर. कधीतरी येते, वाचते.
जयु ..परत परत म्हणावेसे वाटते
जयु ..परत परत म्हणावेसे वाटते की क्या बात है .....तुसी ग्रेट हो...
किती
किती अलवार!!.....................
मस्तच!!
मस्तच!!
आवडली
आवडली
सुहास्य ,शांकली, शाम,
सुहास्य ,शांकली, शाम, वैभव...... तहे दिल से शुक्रिया
संन्यस्त घरांच्या
संन्यस्त घरांच्या भिंती
निथळती, गळती संथ
>> व्व्वा!! निथळती, निखळती असंही सुचलं...
अशीच एक कविता आहे माझी... संध्यासावल्या, काळोख, घाबराघाबर...
आनंदयात्री....... संध्याकाळ
आनंदयात्री....... संध्याकाळ मधे काहीतरी गूढ आहे हे नक्की. काहीतरी कावरंबावरं करणारं.... घाबरवणारं.... !!
अशक्य सुंदर!!!
अशक्य सुंदर!!!
आवडेश शेवटच्या कडव्यापासून
आवडेश शेवटच्या कडव्यापासून नवीन कविता सुरू होतेय ह्या मताला +१
वा...मस्त.. आवडली कविता.
वा...मस्त.. आवडली कविता.
ओवी, कविन, रश्मि....... तहे
ओवी, कविन, रश्मि....... तहे दिल से शुक्रिया