होणार सून मी या घरची" -१

Submitted by दक्षिणा on 3 December, 2013 - 04:15

नविन मालिका होणार सून मी या घरची या धाग्यावरच्या पोष्टी २००० च्या पुढे गेल्याने. हा नविन धागा. सिरियल नविन न राहिल्याने, शिर्षकातला 'नविन' हा शब्द काढलेला आहे. आता उरलेला काथ्याकूट इथे करूया Proud

Honar-Sun-Mee-Hya-Gharchi.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्या जोशीनी नेमक्या कोणत्या
भूमिकेत पडद्यावर दर्शन दिले >>>> मला तरी ते श्री चे बाबाचा रोल करत आहेत असे वाटते
चुभुदेघे

मंगळवार दि. ४ फ़ेब्रुवारी २०१४ : अपडेट

श्री चा नित्याचा बसस्टॉप....वेळ झालेला आहे. तो घाईघाईने स्टॉपवर आला आहे. बस तर नाही तेव्हा तिथेच मोबाईल कानाला लावून बोलत असलेल्या एका प्रवाशाला तो विचारतो, "अहो, ८ ची बस गेली का ?" प्रवासी तसाच वळून त्याच्याकडे पाहतो. श्री देखील काहीतरी चटका बसल्यागत त्याच्याकडे पाहतो. प्रवासी अद्यापि फोनवर बोलत असल्याचे पाहून तो घाईघाईने "ओ, आय अ‍ॅम सॉरी...सॉरी" असे म्हणतो. प्रवासी दुसरीकडे फोन बंद करतो. श्री आपला खिसा चाचपतो तर त्याला समजते की आपला फोन विसरला..."अरे यार, ह्या गडबडीत माझा फोनही विसरला ?" प्रवासी त्याच्याकडे पाहत विचारतो, "एक्सक्यूज मी....आर यू सर्चिंग फॉर समथिंग ?" श्री म्हणतो, "हो, मी माझा फोन घरी विसरलो आहे आणि मला एक महत्वाचा फोन करायचा आहे. इफ यू डोण्ट माईंड मी तुमचा फोन वापरू शकतो का ?" प्रवासी चटदिशी त्याला आपला फोन देतात. श्री जान्हवीला फोन लावून मोबाईलविषयी बोलतो. तिकडून जान्हवी त्याला सांगते, "अरे, फोनच नव्हे तर तू तुझे पैशाचे पाकिटदेखील विसरला आहेस..." श्री डोक्यावर हात मारून घेतो, "मी आता ऑफिसला कसा जाऊ जान्हवी ?" ती म्हणते, "तू तिथेच थांब. मी दहा मिनिटात आवरून मोबाईल आणि पाकिट घेऊन तिथे येते...." श्री ला तर घाई आहे....त्याच्याकडे रिक्षालाही पैसे नाहीत....त्याची ती अवस्था पाहून तो प्रवासी त्याला काही पैसे देवू करतो पण श्री सुरुवातीला ते नाकारतो. पण प्रवासी त्याला म्हणतो, "अहो, रिक्षासाठी म्हणून घ्या. तुम्ही नंतर द्या मला परत..." श्री म्हणतो, "अहो पण मी तुम्हाला पैसे परत देणार कुठे ?" प्रवासी हसतो, म्हणतो, "ते सोडून द्या. आयुष्यात असे बरेच काही गेले आहे, एवढ्या पैशाचे काय." श्री अस्वस्थ होतो. "मी तुमचे पैसे इथेच परत करतो. मला तुमचे नाव कळेल का ?" प्रवासी, "नावाचे काय आहे एवढे मोठे, जाऊ द्या..." श्री देखील हसतो आणि त्याच्याशी हस्तांदोलन करताना म्हणतो, "चला, मग तुमचे नाव नावाचे काय आहे मोठे. ठीक आहे मी याच नावाने हाक मारतो." दोघेही हसतात. श्री ची बस येते तो बाय म्हणून बसमध्ये चढतो.

श्री जातो आणि पाठोपाठ जान्हवी त्याचा मोबाईल आणि पाकिट घेऊन येते....येताना ज्या नंबरवरून तिला फोन आलेला असतो, त्या नंबरला फोन करून "तुमच्या जवळ मघाशी जे कुणी होते आणि मला फोन करीत होते, ते आहेत का ?" प्रवासी तिथेच आहे. ते तिला उत्तर देतात...आणि दोघेही एकमेकाकडे पाहात हसतात. जान्हवी त्यांचे आभार मानते....पण प्रवाशाकडून तिला समजते की श्री आत्ताच गेला आहे. मात्र "तुम्ही तातडीने मागोमाग गेला तर पुढच्याच स्टॉपवर ते तुम्हाला भेटतील..." असेही समजते. जान्हवी त्यांचे आभार मानून आपल्या कारकडे जाते.

सहस्त्रबुद्धे यांचे घर. सदाशिवराव शतपावली करीत आहेत. पिंट्या कोचवर बसला आहे तर शशीकलाबाई नवर्‍याला टोमणे मारीत बसल्या आहेत. पिंट्या जान्हवीचा विषय काढून तिला आजीकडून त्रास होत असल्याची बातमी सांगतो. ती ऐकून शशीकलाबाई आजीना शिव्याची लाखोली वाहतात पण सदाशिवराव दोघानांही झापतात. "जान्हवी आणि आजी यांचे संबंध कसे झाले आहेत त्याची चौकशी तुम्ही कुणी करायची नाही. मुलीचे लग्न झाले म्हणजे तिच्या सासरच्या घडामोडीत आपण लक्ष घालणे चुकीचे...त्यातही पिंट्याने आणलेल्या बातमीचा मला विश्वास नाही. तेव्हा हा विषय बंद..." इतका करारीपण दाखविल्यावर आई आणि मुलगा दोघेही चूप बसतात.

आजीसह सहीही स्त्रिया दिवाणखान्यात बसल्या आहेत. आजी एका पार्टीशी फोनवर बोलत आहेत...म्हणतात, "अहो, तुमचा मुद्दा मला कळला. पण माझी नातसून आता घरी नाही. ती आल्यावर तिच्याशी बोलून मग मी तुम्हाला सांगेन...." आजीचा जान्हवीवरील वाढता विश्वास पाहून शरयू, सरसू, नर्मदा, इंदू यांच्या चेहर्‍यावर आनंद पसरतो, तर बेबीआत्या चेहर्‍यावर काही भाव दाखवत नाही. पण "आता आपण जेवायला घेऊ या. जान्हवी केव्हा येणार हे ती सांगत नसल्याने तिची किती वेळ वाट पाहायची ?" त्यावर आजी जान्हवीची बाजू घेऊन म्हणतात, "तुम्ही सार्‍याजणी जेऊन घ्या. जान्हवीची वाट पाहू नका. मला माहीत आहे ती श्री कडे गेली असणार..." आजीच्या या बोलण्यावर सार्‍याच आश्चर्यचकीत होतात...विशेषतः शरयू. ती म्हणते, "पण आईआजी तुम्हाला कसं कळलं की जान्हवी श्री कडे जाते ?" आजी उत्तरतात, "अगं, त्यात काय कळायचं ? तिनं स्वतःच मला ते सांगितले होते...तेव्हा तिची वाट पाहू नका. मी वर खोलीत जाऊन थोडावेळ पडते. तुम्ही जेवून घ्या. जान्हवी आल्यानंतर आम्ही जेवण करू.".....सार्‍या नि:शब्दच होतात.

फ्लॅटवर आलेल्या जान्हवीला घरात चाललेल्या उलाढालीविषयी काहीच माहिती नाही. तिचा नवरा बाहेर कोचवर कसल्यातरी विचारात आहे आणि ही किचनमध्ये भाजी निवडत गीता रफीचे प्यासामधील "हम आपकी आँखोमे इस दिलको बसा दे तो...." हे गाणे आनंदाने गुणगुणत आहे....तिकडे डोक्यावरील ओझ्यामुळे वैतागलेला श्री तिला "गाणे बंद कर..." असा हुकूम सुनावतो....जान्हवी तोंडावर हात ठेवून आपले हसू दाबून ठेवते. किचन शांत झालेले पाहून श्री आत येतो, "सॉरी....तू काहीतरी बोल ना..." म्हणून तिच्याच मागे लागतो, "ऑफिसमधील घडामोडींनी मी अस्वस्थ झालो आहे....काही उपाय सुचेनासे झाले आहेत..." जान्हवी एकीकडे त्याच्या बाजू आपण घेत आहे असे दाखविते तर दुसरीकडे मनातल्या मनात त्याची केविलवाणी अवस्था पाहून गुदगुल्या केल्यासारखे हसतही आहे.

"गोकुळ" मध्ये यानंतर मात्र शरयूचा फटकारा जबरदस्त. आजीसोडून बाकीच्या पाच जेवायला बसतात. जान्हवी आणि आजी यांच्यासाठी जेवण बाजूला काढले जाते. शरयू म्हणते, "हल्ली जान्हवी खूप उशीरा येते ना ? तिला लवकर जेवायला येण्याचा नियम लागू नाही का पडत ?" त्याला बेबीआत्या उत्तर देते, "अगं तिला का उशीर होतो हे जर आईआजीला माहीत आहे, तर मग तिला का लागू पडतील नियम ?" शरयू शांत आवाजात म्हणते, "पण बेबीवन्स, आपल्याकडे एकाला एक आणि दुसर्‍याला दुसरा नियम असे नाही ना ! सगळ्यांना नियम सारखेच असेच आईआजी म्हणतात." नर्मदाआई मध्ये बोलतात, "अगं हो, पण जान्हवीची गोष्ट सध्या वेगळी आहे ना, म्हणून..." शरयू तीक्ष्ण नजर करून नर्मदाआईला विचारते, "काय वेगळी आहे ?" इंदूआई उत्तरते, "शरयू...श्री घराबाहेर राहतो म्हणून जान्हवी त्याला भेटायला जाते..." शरयूचा युक्तीवाद, "हेच म्हणते मी....आईंना हे कसं पटतं ?" सरसू खुलासा करते, "श्री ने घरी आले पाहिजे असे आपण सारे म्हणतो मग त्यासाठी जान्हवीने श्री ला भेटायला हवेच ना ?" शरयू इथे उदासवाणे हसते, म्हणते, "अस्सं....म्हणजे आईना पटणारे कारण असेल तर मग नियमांचे उल्लंघन केले तर चालते." सरसू हताश स्वरात विचारते, "शरयू तुला नक्की काय म्हणायचय ?" शरयू डोळ्यात पाणी आणून सांगते, "मला इतकेच म्हणायचे आहे की, जो नियम मला तोच नियम जान्हवीला असं आई म्हणाल्या होत्या....तेव्हा मग आता कुणा एकासाठी हा नियम का मोडला जातो ?" भरल्या ताटावरून शरयू तिथून उठते व आपल्या खोलीकडे जाते....बाकीच्या सार्‍या तिला हाका मारतात पण ती थांबत नाही.

मामा प्रथम धन्यवाद, डोंबिवलीच्या मुलींबद्दल कौतुकोद्गार काढल्याबद्दल, मी हे complement माझ्यासाठीपण घेते आणि नवऱ्यालापण वाचून दाखवले की तुपण समजूतदार आहेस माझ्याशी लग्न केल्यामुळे, इति मामा.

मामा नेहेमीप्रमाणे सुंदर अपडेट्स. जान्हवीने पिंट्याला सांगितले नाही का? तिचे आणि आजींचे नाते कसे गोड होत चालले आहे ते. शरयू दुरावणार बहुतेक आता जान्हवीपासून.

मनोज जोशी हे श्रीचे बाबा आहेत, आणि प्रसाद ओक हे श्रीचे काका आहेत.
आजच्या भागात जेव्हा श्रीचे पाकिट घरी राहते अणि जान्हवि ते पाकिट बसस्टॉपवर घेऊन येते तर तीला असा प्रश्न का पडत नाही कि श्री बसने पैसे नसताना कसा काय गेला?

Muktajit

"....श्री बसने पैसे नसताना कसा काय गेला?...." ~ नाईस ऑब्झर्वेशन रीअली !
आता याला उत्तर काय द्यायचे असे मनी आले, पण चला, असे समजू की तिला वाटले असेल नव-याकडे पाचदहा रुपये असतील खिशात, सुट्टे. शिवाय ती घाईगर्दीतही दिसली खूप.

अन्जू : शरयू व जान्हवीमध्ये काही दुरावा निर्माण होईल असा शरयूचा स्वभाव रंगविलेला नाही. उलटपक्षी घरातील कुणीही जान्हवीला सून म्हणून स्वीकारायला तयार नव्हते त्या क्षणापासून शरयूनेच तिला आपली मानून माया केल्याचे दाखले आहेत. शरयूची नाराजी आहे ती सासूबाईबद्दल....भेदभाव करतात याबाबत.

काहीच कळलं नसतं! प्रॉब्लेम एकच होता, श्री समजुतदार झालाच नाही. खो खो त्या यड्या वाट पाहात बसल्या हा आत्ता समजुतदार होईल मग समजुतदार होईल, पण नाहीच्च मुळी झाला तो समजुतदार! मग कसा काय दाखवणार फोटो? >>> सॉलीड बेफी Biggrin

आता या मालिकेत परत आयडेंटीटी गुलदस्त्यात ठेवण्याचा खेळ सुरु होईल... श्री आणि मनोज जोशी दोघही पटकन सांगुन मोकळ होणार नाहीत ते कोण आहेत ते. मग परत मनोज जोशीच आईआज्जी समोर येण>>>>>>> हो मुग्धा ही शक्यता नाकारता येणार नाही>>>> अंजली बघितल का मी म्हणाले होते तसच झाल. मनोज जोशीला श्रीने नाव विचारल्यावर त्याने "नावात काय आहे" असा डायलॉग टाकला. श्री पण अगदी वडीलांच्याच वळणावर गेलाय. जान्हवीने त्याला पहिल्यांदा नाव विचारल तेव्हा याने अकाउंटंट अस सांगितल, मनोज जोशीनां श्रीच्या वडिलांच्या रोलसाठी आणल असल्याचा भक्कम पुरावा आहे हा.... जैसा बाप (नावात काय आहे) वैसा बेटा (अकाउंटंट)

Its been long time mala maayboli var yayche hote.. finally i am maaybolikar.. khup chan serial aahe hi.. ashok mama thanks alot..tumchyamule majha serial madhla intrest ajun pan kayam aahe.. me roj tumche updates vachte.. tumchi update karnyachi shailly khup chan aahe..
baki sadsyanche means aaditi anju..befikir saglyanche comments pan khup chan astat.. how to type in marathi??

अरे हा मुलगा पाकीट विसरतो, मोबईल विसरतो , सकाळी वेळेवर उठायला विसरतो , रोज ऑफिसला धावत पळत पोचतो. घरी असताना ६ आया काळजी घ्यायला होत्या म्हणून निभत होत वाटत याच.

ते त्याचे गुलदस्त्यातले बाबा त्याला १०० रुपये देतात ना?
म्हणजे ते म्हणतात ते बेकार आहेत सध्या
पण ते कोण्या अनोळखी मुलाला बससाठी म्हणुन चक्क २०० रुपये असेच देऊन टाकतात.
पण श्री मोठ्या औदार्याने फक्त १००च रुपये घेतो!
(आम्ही वेंधळ्या सारखे एकतर पैसे घेतलेच नसते नाही तरी इतके नको २०-३० असतील तरी बास असं सांगितलं असतं Uhoh )

हो ना?

एकता कपूरच्या सिरियल्स सारखी अतार्किक व अगम्य आगापीछा नसणारी (कहानी घर घर की, क्यूं की सास भी कभी बहू थी आठवायला पण नको वाटतात) सिरियल बघून कंटाळा आलाय, डोके रोज रात्री ८ वाजता नाही बाजुला काढून ठेवू शकत!

काल जानुश्रीच्या लग्नानंतर बऱ्याच दिवसांनी हि मालिका बघितली. अशोक मामा आणि बेफ़िकीर यांच्या अपडेटस मात्र इथे नियमितपणे न चुकता वाचते. मनोज जोशी अगदी आभाळमाया मधुन आल्यासारखा वाटतो. मी लहानपणी पाहिलेली आभाळमाया मालिका पुसटशी आठवते आहे. आता किमान मनोज जोशीसाठी तरी हि मालिका पुन्हा पाहायला सुरुवात करणार आहे. अर्थातच रोज इथे येऊन अशोक मामांच्या अपडेटस वाचणे सोडणार नाही आहे मी.

मनोज जोशी अगदी आभाळमाया मधुन आल्यासारखा वाटतो. मी लहानपणी पाहिलेली आभाळमाया मालिका पुसटशी आठवते आहे. >>>+१

मला वाटत आता कथेत थोडसं पाणी घालतायत.....पण मुद्दा, म्हणजे कथेचा विषय तोच ठेवल्याने आणि कथा भलत्याच दिशेने न फिरवल्याने विरस झाला नाही.

रच्याकने,
माझ्या आईला आज्जीन भेट म्हणून एक नव मंगळसूत्र दिल....'जान्हवी' मंगळसूत्र!!! तस छान दिसत. बघा, मालिका आणि त्यातली पात्र किती हिट आहेत ते!!!!

जान्हवी ने तर बघितले आहेत ना पूर्वीचे (श्री च्या आई-बाबाम्चे) फोटोज.. २-३ दिवसांपुर्वीच्य भागात दाखवलं होतं ना, की श्री ची आई अन जान्हवी जुने फोटोज बघत आठवणी काढत आहेत असं!!!

डब्ब बनवण्याच्या गडबडीत विसरली असेल बापडी! असो..

जान्हवी ने तर बघितले आहेत ना पूर्वीचे (श्री च्या आई-बाबाम्चे) फोटोज.. २-३ दिवसांपुर्वीच्य भागात दाखवलं होतं ना, की श्री ची आई अन जान्हवी जुने फोटोज बघत आठवणी काढत आहेत असं!!! >>> हो पण तेव्हा तिने नाही बघितले फोटो

मनोज जोशी ला अश्याच भुमिका मिळतात-अभाळमाया, अवंतिका..

बाकी मालिका दि.कथा लेखक हा धागा वाचत असावेत.. शरयु ला पडलेला प्रश्न आणि निर्माण झालेली असुया या धाग्यावर फार पूर्वी चर्चिली गेली होती ना? एकाला एक नियम दुसर्याला दुसरा असं...

मनोज जोशी ला अश्याच भुमिका मिळतात-अभाळमाया, अवंतिका..>>> गीता अवंतिका मध्ये मनोज जोशी??? आठवत नाहीये...

काहीच कळलं नसतं! प्रॉब्लेम एकच होता, श्री समजुतदार झालाच नाही. खो खो त्या यड्या वाट पाहात बसल्या हा आत्ता समजुतदार होईल मग समजुतदार होईल, पण नाहीच्च मुळी झाला तो समजुतदार! मग कसा काय दाखवणार फोटो? >> :खोखो:... आणि तो कधी होणारही नाही .. सिरीअल कशी चालेल गोगलगायच्या गतीने!
अंजली . Lol

काय टाईमपास करतायत .. एका/की ला पण कॉमन सेन्स नाही..

ओ पोरींनो..... इतकं त्या जान्हवी आणि तिच्या सासर्‍याबद्दल लिहित आहात, त्याच्याच बरोबरीने त्या नवीन सदस्य या नात्याने इथे आजच आलेल्या Smartmau ला मराठीमध्ये टंकन कसे करायचे तेही शिकवा ना?

स्मार्टमाऊ.... इथे मराठीसाठी मी "बराह" प्रणालीचा वापर करतो, ज्याद्वारे आपल्याला ८ ते १० भारतीय भाषात टायपिंग करता येते. बराह सॉफ्टवेअर गुगलवरून दोनेक मिनिटात उतरवून घेता येते.....फ्री आहे. ट्राय कर.

अर्थात अन्य कुणी दुसरा मार्ग सांगितला तर तोदेखील तू चेक करू शकतेसच.

मामा, मी मराठीसाठी 'गुगल इनपुट टूल्स' वापरते, ते मला सोपे वाटते. Smartmau जमेल तुम्हाला, बरेच पर्याय आहेत.

मामा तुम्ही डोंबिवलीच्या मुलींबद्दल जे काही बोललात त्यासाठी, मी तुमच्या बाजूने. ह्या दृष्टीकोनातून मी मान्य करते श्री समजूतदार आहे.

Pages