बेक्ड ब्रेड रोल्स

Submitted by शिवाली on 22 January, 2014 - 14:40
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

ब्रेड स्लाईसेस,उकडलेले बटाटे, आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची बारीक चिरून, तेल, जीरे-मोहोरी, हिंग, हळद, मीठ, ऑइल स्प्रे किंवा बटर

क्रमवार पाककृती: 

कढईत तेल तापत ठेवावे. तेल चांगले तापले कि जीरे-मोहोरी घालावी. पाठोपाठ फोडणीचे इतर जिन्नस घालून खमंग फोडणी करावी. फोडणीतील लसूण ब्राऊन झाली की कुस्करलेले बटाटे घालावेत. चवीप्रमाणे मीठ, हवी असल्यास चिमूटभर साखर घालून भाजी नीट ढवळून गॅस बंद करावा. एकीकडे ओव्हन १८०सें किंवा ३५० फ़ॅ वर प्रीहीट करायला ठेवणे.
ब्रेड स्लाइसच्या कडा काढून टाकणे. एक स्लाइस हातावर घेउन पाणी शिंपडुन ओला करणे. त्यामध्ये मळून घेतलेल्या भाजीचा एक मुटका ठेवुन, सर्व कडा नीट जुळवून रोल करून घ्यावा. असेच सगळे रोल्स वळून घ्यावेत.
बेकिंग ट्रेला फ़ॉइल पेपर किंवा ऑइल स्प्रे लावणे. ट्रेमध्ये रोल्स् मांडून त्यावर ऑइल स्प्रे किंवा बटर लावुन घेणे. ओव्हनमध्ये १२-१५मिनिटे बेक करणे. बाहेर काढुन हवे असल्यास वरुन बटर लावणे.
पुदिन्याची चटणी किंवा टॉमॅटो केचप दोन्हीबरोबर छान लागतात.

वाढणी/प्रमाण: 
खाल तसे
अधिक टिपा: 

ब्राउन किंवा व्हाइट कोणताही ब्रेड चालेल. फोडणी नको असल्यास वगळता येइल. मी दोन्ही प्रकारे करते. बेसिक बटाटा भाजीत गाजर, पालक, मोड आलेली कडधान्ये थोडी वाफ़वून घातल्यास भाजी वेगळ्या चवीची आणि पौष्टिक होईल. मिश्रणात थोडेसे कॉर्नफ़्लोअर घातल्यास रोल वळणे सोपे जाते.

माहितीचा स्रोत: 
आंतरजाल आणि माझे प्रयोग
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद गोपिका आणि अन्जु....मी मायबोली परिवारात नवीन आहे....लेखनाचा आणि तोही मराठीतुन, माझा पहिलाच प्रयत्न आहे.....फोटोचे तंत्र अजुन न जमल्याने तो दिलेला नाही.

शिवाली, खूपच छान आणि सोपी रेसिपी आहे.
फोटोचे तंत्र जमेल एकदम सोपे आहे. फोटो अपलोड करा आणि प्रतिसादच्या खाली मजकूरात image किंवा link द्या., हा ऑप्शन आहे तिथे क्लिक करा. प्रतिसादमध्ये लिंक येईल आणि ती तुम्ही कॉपी करून तुमच्या पाककृतीच्या संपादनमध्ये क्लिक करा आणि तुम्हाला हव तिथे पेस्ट करा. आम्हाला पण लगेच फोटो पाहायला मिळेल. Wink

@ आरती धन्यवाद. फोटो काही तांत्रिक कारणांमुळे अपलोड होत नाहीये.
@ हसरी, ब्रेड रोल्स खूपच तेल पितात. तळण नको असल्यामुळेच ओव्हनचा प्रयोग करून बघितला. ओव्हन वापरायचा नसल्यास कढईत किंवा तव्यावर तळणे हाच पर्याय शिल्लक राहिल.

शिवाली, रेसिपी मस्त वाटतेय..होपफुली मुलाच्या डब्याला पर्याय म्हणून चालावेत... (तो एक जीवन मरणाचा प्रश्न असतो काही वेळा)

अवांतर - कुकिंग स्र्पे मध्ये ब्युटेन असतं असं एका ठिकाणी ऐकलंय त्यामुळे आजकाल मी तो आणत नाही..त्याऐवजी कॉस्कोमध्ये किंवा ऑनलाईन त्या बाटल्या मिळतात (नाव विसरले त्याचं पण) त्यात ऑ ऑ भरून तेच स्प्रे केलं जातं. (हे इच्छुकांसाठी)

<<होपफुली मुलाच्या डब्याला पर्याय म्हणून चालावेत... (तो एक जीवन मरणाचा प्रश्न असतो काही वेळा)>> १ नम्बर!! माझा रोज च असतो Uhoh