वालाचा मसाले भात

Submitted by शलाका पाटील on 20 January, 2014 - 04:38
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ कप जुना तांदूळ (बासमतीच घ्यावा असे काही नाही आंबेमोहर किंवा कोलम पण चालेल)
१ १/४ वाटी मोड आणून सोललेले वाल
२ कप उभा चिरलेला कांदा
१ कप चिरलेला टोमाटो
ठेचलेला लसुन १ टीस्पून
राई १ टीस्पून
जिरे १ टीस्पून
हिंगे १/४ टीस्पून
हळद १/२ टीस्पून
मसाला ४/५ टीस्पून
गोडा मसाला २ टीस्पून
तेल ५/६ टीस्पून
गरम पाणी ४/५ कप
मीठ चवीनुसार
कोथिंबीर आणि खवलेले ओले खोबरे सजावटीसाठी

क्रमवार पाककृती: 

१.तांदूळ आणि वाल धुवून बाजूला ठेवावेत
२.एका जाड बुडाच्या पातेल्यात तेल गरम करून मोहरी टाकावी ती तडतडली की त्यात जीरे लसुन कांदा टाकून गुलाबी रंगावर परतून घ्यावा
३. नंतर त्यात हळद हिंग आणि मसाला टाकून परतावा, त्यात वाल टोमाटो आणि गोडा मसाला टाकून परतून घ्यावे
४. नंतर त्यात तांदूळ आणि मीठ टाकून छान एकत्र करून जरा परतून घ्यावे नंतर त्यात पाणी घालून १५/२० मिनिटे भात शिजवून घ्यावा
५. नंतर हलक्या हाताने हलवून दोन वाफा काढाव्यात खिचडी तयार.
६. वरून कोथिंबीर खोबरे आणि थोडेसे तूप घालून गरमागरम वाढावी.

अधिक टिपा: 

अस्सल कोकणी चवीसाठी २ कप पाणी आणि २ कप नारळाचे दुध वापरावे

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे. आम्ही ह्याला डाळिंबे भात म्हणतो ( वालाला डाळींब्या म्हणतो म्हणून), मी कांदा-टोमाटो नाही घालत.

वाल थोडे कडवे असतात म्हणून भात शिजल्यावर त्यात थोडासा गुळ टाकून निट हलवून घेऊन दोन वाफा काढाव्यात गुळाच्या गोडीने अजून चविष्ट लागते

आमच्याकडे पण असाच करतात. फक्त टोमॅटो घालत नाही. श्रावणी शनिवारी/सोमवारी केला तर कांदा घालत नाही. तोंपासु...आता लवकर करावाच लागणार.